काय हो वर्णावा
त्या नराचा स्वभाव
घेतला ज्याने देव
विकत बाजारी
चार मोजले रोकडे
अन म्हणे आता धाव
तुच मला वाचव
संकटा पासून
तुला मी रे दिले
माझ्याकडले हे धन
आता सोडव ह्यातुन
मजला देवा
अरे वेड्या त्याच्या लेखी
तू आहेस कंगाल
त्याला पाहिजे जो माल
तुझ्याकडे नाही
संत सांगती सज्जना
मनी असुदेत भाव
तोच करेल बचाव
स्वता: हून
प्रतिक्रिया
19 Mar 2015 - 4:17 pm | वेल्लाभट
एकदम मस्त.....
काही ठिकाणी मीटर थो....डसं बसत नाही असं वाटलं. पण बाकी उत्तम काव्य !
सहीच.
19 Mar 2015 - 5:48 pm | निनाद जोशी
धन्यवाद वेल्लाभट.....
19 Mar 2015 - 6:57 pm | चुकलामाकला
खूप छान अर्थाची कविता आहे, आवडली.