<पुन्हा पुन्हा मी!!!!>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
19 Nov 2008 - 12:17 am

<पुन्हा पुन्हा मी!!!>

(श्री प्रवीण खेर्डेकर यांच्या "पुन्हा पुन्हा मी" या कवितेवरून प्रेरणा घेऊन.......)

जीवनात नसेल टिकवले ब्रम्हचर्य आम्ही
हात अधिक महत्वाच्या कामामध्ये व्यस्त आहे...
असे उठसूठ बोंबा मारत जाऊ नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?

बेवडे म्हणून जीवनभर आम्हाला हिणवता....
श्रीखंड पुढ्यात आलं की कोणाला बनवता?
आम्ही असू "टल्ली", पण तुमच्यात संयम किती पक्का आहे?
असे डोळे फाडून पाहू नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?

तुम्हाला पोरगी पटत नाही, याचा दोष आमच्यावरच
आश्रमात कितीही शिकवा, तुमचे घोडे आडवळणावरच....
असा अन्याय आमच्यावर करणं किती रास्त आहे?
असे स्मायली टाकून सटकू नका
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?

आमच्या नांवासारखे आयडी कितिकांनी घेतले
आयडी कसले घेतले, ते तर धाडकन पडले....
आयच्यान् सांगा मिपाकरांनो! ही नक्कल काय इष्ट आहे?
असे "काका" करून गंडवू नका
अहो डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?

डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?
X(
;)
:P

विडंबनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सर्किट's picture

19 Nov 2008 - 12:19 am | सर्किट (not verified)

ड्यांबीस व्हायचे म्हणजे काही चेष्टा नाही, असे अनुमान काढता येईल.

-- (ड्यांबीस पुतण्या) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

19 Nov 2008 - 12:26 am | विसोबा खेचर

झक्कास कविता रे डांबिसा.. :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

19 Nov 2008 - 12:30 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! डांबिसखानाला परत मैदानात फुल्ल फॉर्ममधे आलेला पाहून धमाल येते आहे !

मस्तच. फुल्ल टू फॉर्म आलेला दिसतोय परत! ;)

चतुरंग

भास्कर केन्डे's picture

19 Nov 2008 - 1:49 am | भास्कर केन्डे

ऊन सावल्यांचा हा खेळ चालणारच
एक दिवस कोरडा गेला तरी डांबिस पुन्हा बहरणारच
गप्प बसायला तो काय भामटा आहे?
डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे?

आपला,
(डांबिसचा वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

19 Nov 2008 - 1:53 am | टारझन

लैच्च भारी ... बाकी डांबिस होणं च्येष्टा नैच्चये .. च्यामारी .. ह्या काकाला कै कै कै कै सुचु र्‍हायलंय हल्ली .. :)
चिवास रिगल रिचवून बसतो कायनु लिवायला ..
आम्ही आमचा जुणा आयडी कडू आठवणींमुळे बदलला तरी अजुन आम्ही खविसगीरी सोडलेली नाही

(डांबिसशिष्य)
कुबड्या खविस

घाटावरचे भट's picture

19 Nov 2008 - 4:43 am | घाटावरचे भट

=)) मान गये काका!!!

वेताळ's picture

19 Nov 2008 - 9:57 am | वेताळ

ही चेष्टा नाय बर का.
वेताळ =))

अवलिया's picture

19 Nov 2008 - 10:06 am | अवलिया

खरे आहे बाबा डांबिसा तुझे...
मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला ;)

बरय आपले आपले

नाना (चेंगट)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Nov 2008 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, लय भारी ... माग गये आप को!

>> मी ठरवले की आपण आता नाना डांबिस व्हायचे पण... नकोच ते! नाही जमणार आपल्याला Wink
अहो चेंगट, नुसते स्मायली टाकून डांबिस नाही होणार तुम्ही. संदर्भः पिडा काकांची कविता ...

राघव's picture

20 Nov 2008 - 2:35 pm | राघव

पिडांकाका भरधाव सुटलेत!! पळा पळा पळा... :D
झक्कास लिवलंय राव! जियो!!
मुमुक्षु

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 5:02 pm | लिखाळ

मस्त ! मजेदार :)
-- लिखाळ.