पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता..
त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा.
तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले..
देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली..
देवान बहुतेक त्याच आईकल..उशीरा का होईना घरात पाळणा हलला..देशमुखाला आभाळ ठेंगण झाल..
योगायोगान त्या वेळेस गावात भागवत सप्ताह चालु होता..देशमुखाने..भागवतकार पुराणीक बुवांना घरी बोलवल..
बुवा आले..देशमुखाने आदरभावाने त्यांचा पाहुणचार केला..पोराला त्यांच्या पायावर घातला आणी सवाल केला..
"बुवा,बर्याच वर्षाने देवान ऐकल..काय नाव ठेवु मुलाच ..?"
बुवा प्रसन्न हसले..म्हणाले," चांगली वेळ आहे,गावात सप्ताह चालु आहेच्,तुमच्याकडे धर्मराज अवतरलाय..धर्मराज नाव ठेवा.."
देशमुखाने पुन्हा नमस्कार केला..बुवांनी तोंडभरुन आर्शिवाद दिला.
पोरगा नावाप्रमाणे धर्मराजाचा अवतार निघाला.जुगार आणी दारुत मस्त रमला..देशमुखाच्या गढीला हादरे बसु लागले..
पोराचा वांडपणा कसा थांबवता येईल याचा विचार करत देशमुखाने त्याचे लग्न करुन दिल..तरी पठ्ठ्या सुधारायचे नाव घेईना.
घरातील ठासणिची बंदुक आता खांद्याला नावुन सगळ्या गावाची ठासत घोड्यावरुन फिरत राही.
ऐके दिवशी भर बाजारात..महिपत पाटलाच्या पोराला गोळी घातली..पाटलाच पोर मरता मरता वाचल..
पण धर्मराज परागंदा झाला..देशमुखाने अंथरुन धरल..पुराणीक बुवा भेटायला आल्यावर डोळ्यात पाणी आल त्याच्या.
"बुवा,अस कस झाल हो !! काय सांगीतलत माझ्या पोराबद्दल आणी कसा हा निघाला.."
बुवा काय बोलणार..शांतपणे देशमुखाची समजुत काढु लागले..
वातावरण शांत झाल्याव एके रात्री धर्मराज गावी परत आला...
त्या रात्री....
.
.
सगळ्या भावकीने..
.
.
..भर रस्त्यावर..दगडाने..
.
.
.धर्मराजाचा अवतार संपवला.
जाता जाता- हे देशमुख वेगळे आणी ते साहेब वेगळे..
प्रतिक्रिया
14 Mar 2015 - 1:46 pm | पैसा
जेपी हे आधी लिहिलं होतंस बहुतेक.
15 Mar 2015 - 3:51 am | स्पंदना
होय. इथेच आधी लिहीली होती ही गोष्ट.
जे पी विसरले वाटतं.
14 Mar 2015 - 2:09 pm | कंजूस
फारच लवकर आटपली गोष्ट.
14 Mar 2015 - 6:46 pm | मुक्त विहारि
मस्त....
14 Mar 2015 - 9:05 pm | एस
गोष्टीमागची गोष्ट समजली नाही. कुणी व्यनि केल्यास बरे होईल.
15 Mar 2015 - 9:27 pm | अत्रन्गि पाउस
+१..
15 Mar 2015 - 9:44 pm | माझीही शॅम्पेन
+ २
16 Mar 2015 - 7:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+३
16 Mar 2015 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१७५८
-दिलीप बिरुटे
14 Mar 2015 - 9:25 pm | पॉइंट ब्लँक
गावाचं नाव बदलापूर किंवा वसईपूर अशा प्रकारच होतं काय?
15 Mar 2015 - 12:18 am | मनीषा
संदर्भं माहित नसल्याने - कथा नीटशी समजत नाहीये.
जरा वाढवून सांगा की --
15 Mar 2015 - 9:01 am | अजया
नाही लागला संदर्भ.
17 Mar 2015 - 2:33 am | रुपी
+१
15 Mar 2015 - 9:07 am | श्रीरंग_जोशी
लै अवघड रुपककथा लिवतात जेपीभाऊ. जरा मोठे संन्यास घेतले तर कुनाला कळनार नाय अशी पुस्तकं बी लिवू शकतील ;-).
15 Mar 2015 - 6:18 pm | आदूबाळ
हायला!
15 Mar 2015 - 10:02 pm | ज्योति अळवणी
केवळ स्वतः देशमुख चांगले होते पण कदाचित नवसाने झालेल्या धर्मराजाला संस्कार देण्यात कमी पडले...
16 Mar 2015 - 5:26 pm | असंका
मला जे वाटलं तेच असेल तर पुनर्जन्म शक्य आहे! नाही तर मग मला काय नाय कळलं...
16 Mar 2015 - 5:28 pm | प्रसाद१९७१
काही कळले नाही :-(
16 Mar 2015 - 8:06 pm | नगरीनिरंजन
गोष्ट म्हणून बरी आहे; आणखी काही संदर्भ असतील तर ते कळले नाहीत.
16 Mar 2015 - 10:45 pm | सिरुसेरि
वेळच्या वेळी मुलांना लहानपणीच शिक्षा केली असती तर आज हि वेळ आली नसती .
17 Mar 2015 - 8:11 am | यसवायजी
@देशमुख वेगळे आणी ते साहेब वेगळे..??
>>साहेब कोण आता?
17 Mar 2015 - 9:38 am | जेपी
सर्वांचे आभार..
काही खुलासे...
१) हि कथा आधी खरडफळ्यावर कच्चा मसुदा म्हणुन टाकली होती.नंतर डोक्यात पुरेशी स्पष्ट झाल्यावर मेन बोर्डावर टाकली.
२) यात दडलेले रुपक तसे तर खुप सोपे आणी युनीव्हर्सल ट्रुथ(मराठी??) टाईपचे आहे.वर लावले गेलेले अंदाज रोचक आहेत.
अजुन येऊ द्या..