पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
10 Mar 2015 - 4:08 pm

नाय त्या वेळी अवंकाळी येऊन कामाचा बिमोड करून सगळ्यांना छळणारा ...पाऊस! मला अ‍ॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यान...दू...दू...दू...! lllllllllllllllllllllllllluuuuuuuuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif
=========================================================
पाऊस खच्चुनी हा "अत्ता" कशास देवा???
रस्त्यात आज आता,माजे चिखलं दरा-हा!

अव चीतं-गेम का रे? वैतागलेत सारे
काहिचं राहिलेले, जाती कुठे ही आता???, हळु-वारं हा कशाला???

गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली
टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा

फाऊल वाट सारी, का रे अताच झाली?
घसरुन गाडी गेली, कोरडा रस्ता कुठे हा???? बुं ssssssगाट बाइकां'चा????
=================================

रौद्ररसविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2015 - 4:17 pm | प्रसाद गोडबोले

=))

सुचतं कसं राव तुम्हाला ?

प्रचेतस's picture

10 Mar 2015 - 4:22 pm | प्रचेतस

अगदी अगदी =))

हाडक्या's picture

10 Mar 2015 - 4:47 pm | हाडक्या

अवघड जागी आदळल्यावर, एक तर शिव्या सुचतील किंवा मग अशी काव्यमौक्तिके..!!

(बुवा हलके घा हो .. तुमची अ‍ॅक्टिवा घसरल्याबद्दल सहानुभुती आहेच. तुम्हास फार काही लागले नसेल अशी आशा. )

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा

मला नाही विशेष लागल. फ़क्त पाय थोडा मुरगळलाय! पण गाडी खरचट्लि जाम! :-[

एस's picture

10 Mar 2015 - 7:58 pm | एस

आपल्याला लागल्यापेक्षा गाडीचं नुकसान झाल्याचं जास्त वाईट वाटतं असा स्वानुभव आहे. :-) तरीपण मुका मार लागला असल्यास योग्य तेवढी विश्रांती घेणे सर्वतोपरी श्रेयस्कर. बाकी अ‍ॅक्टिव्हासारख्या वाहनांची जाम भीती वाटते. लोक मारे कसं काय पळवतात अ‍ॅक्टिव्हा, स्कूटी वगैरे गाड्या त्यांचं त्यांनाच ठाऊक.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. इंजिन मागे असणार्‍या गाड्या ब्रेक लावल्यावर वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. मला मोपेड पद्धतीच्या गाड्या चालवायची जाम भिती वाटते.

हिथ्ल्या समद्यांनी हॅम्लेट घालतं चला रे...!!

अत्रुप्त आत्मा's picture

11 Mar 2015 - 10:42 am | अत्रुप्त आत्मा

@वाळु, चिखल, ऑईल वगैरेंवरुन पटकन घसरतात. >>> याचा सराव ही असली गाडी घेतल्यापासून ३ महिन्यातच झालेला होता. पण काल आमच्या शिंव्हगड कॉलेजच्या रस्त्यावरून अचानक दोन गाड्या स्पीडनी भस्सकन मधे आल्या आणि मग मला ब्रेक दाबण्यावाचून गत्यंतर उरले नाही. पण माझा स्पीड त्या कनेक्टींग वळणावर नेहमी २०..३० ला आलेला असतो. म्हणुन बचावलो. घसरताना गाडी सोडून दिली. आणि मी साइडला झालो.

धोतर भरले असेल नै चिखलाने

मेल्यान् धोतरालाच हात घातलंन्!! =))))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा

हलकट http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gifपांडूsssssssssss http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-pokemon-007.gif इथेच्च कसा आलास बरोब्बर! दू दू दू....

मला अ‍ॅक्टिव्हावरुन घसरवून पाडलन मेल्यान

तरी म्हणत होतो मांडी घालून चालवू नका. कंट्रोल राहत नै. =))

बाकी "अत्ता" हा शब्द काळजाला भिडला.

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2015 - 4:27 pm | प्रसाद गोडबोले

गाड्यांवरून नक्षी...(नक्षी...),उमटे चि तारंलेली

नकों तिथें अनुस्वार टांकण्याचा मोह इथे आवरलेला पाहुन फार हायंसे वाटले =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 4:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

निश's picture

10 Mar 2015 - 5:53 pm | निश

गुरुजी, कविता आवडली.

चुकलामाकला's picture

10 Mar 2015 - 7:04 pm | चुकलामाकला

गु्रजी, पाऊस खच्चून त्या म्होरल्या ८० cc वालीचा काय व्हो?

आत्मू, मुला हे वयंच असतं हो असं घसरण्याचं!! तुझी फक्त याक्टीवा घसरलीये, लोकांचे पाय घसरतात.

-तुझाच सखारामकाका. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा

@ -तुझाच सखारामकाका.>>> असो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोक प्रेमात पडले की काव्य सुचू लागते. त्यात गाडीवरून पडल्यावरही काही लोक खरे खरे काव्य (हो, ते तसले सामाजिक काव्य नव्हे हो, ते काय पडल्यावर ताबडतोप प्रत्येकाच्या तोंडी सहजपणे येते.) प्रसवू लागतात, ही त्यात अजून एक भर पडली ;) . अर्थात या दोन्ही पडण्यात जखम होऊन जीवघेणी कळ येते हे पण सामायिक असल्याचे (आत्ताच सुचल्याचे) नमूद करून ठेवत आहे (केवळ या मौलीक शोधाचा प्रताधिकार राखून ठेवण्यासाठी :) ). असो.

अआंमध्ये "मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या भरकन सुधार व्हावा" हीच शुभेच्छा !

अवतार's picture

10 Mar 2015 - 10:39 pm | अवतार

बाकी काव्यातील वेदना थेट मनाच्या पिस्टनला जाऊन भिडली.
गाडीसाठी पुढील ओळी :-
चकवून तिला जी गेली
ती वाट कोणती होती?

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2015 - 10:53 pm | श्रीरंग_जोशी

बुवांचा अपघात झाल्याने वाईट वाटलं.

अशा वातावरणासाठी ही गाडी बरी राहील.

Can Am Spyder

यावर मांडी घालून बसून चालवायची सोय आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

दुष्ष्ष्ट सुडुक..कोंबडिचं हाडुक!

===============
http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tekken-004.gif

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

आइल्ला...!!! काय जबराट गाडी हाय..

पॉइंट ब्लँक's picture

10 Mar 2015 - 11:31 pm | पॉइंट ब्लँक

देव तुम्हाला फोर व्हीलर घ्या असं सुचवतोय!. बाकि कविता एकदम बेस.

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2015 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

त्यांच्याकडे चारचाकी बर्‍याच वर्षांपासून आहे.

दर वेळी चार चाकी वापरणे शक्य नसते. (कारणे अनेक आहेत जसे पार्कींग वगैरे).

पॉइंट ब्लँक's picture

10 Mar 2015 - 11:45 pm | पॉइंट ब्लँक

बरोबर आहे. चार चाकी प्रत्येक वेळी वापरणे सोयीस्कर नसते.

खटपट्या's picture

11 Mar 2015 - 9:57 am | खटपट्या

आवडली !! घसरलेली कविथा !!

टायरं सुजूनं गेली,तळव्यात डंख त्यांच्या हळु-वार त्या खड्यांचा

वाह, क्या बात...

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2015 - 10:00 am | श्रीरंग_जोशी

कविता हा शब्द टंकताना तुमचा कळफलकही घसरतो (अन कविथा असे टंकले जाते) असे निरीक्षण आहे.

;-)