इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !!
माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.
आशाच येका मुली ला भेटायला मी अंधेरी लिंकिंग रोड वर संध्याकाळी गेलो होतो. Profile तर बरी वाट होती. मुलगी इंजिनीअर असून एका चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होती. अंधेरी लिंकिंग रोड वर मी त्यावेळी गोरेगावात राहत असून २-३ वर्षांनी जात असल्याने तो मला बराच बदललेला आणि चकचकीत वाटता होता. इतक्यात ती मुलगी आली – नव्हे तिला तिच्या घरच्यांनी गाडीतून सोडले.माझ्याकडे त्यावेळी गाडी नसल्याने बरे वाटले.
सुरुवातीचे हाय हलो झाल्यावर तिच्या सूचनेनुसार आम्ही येका posh restaurant मध्ये गेलो . डेकोर फारच सुन्दर होता आणि ...........संद्याकाळी ७ वाजता आम्ही दोघे सोडून कोणी नव्हतो. आमची सर्वसाधारण चर्चा चालू होती . आणि इतक्यात वेटर आला... सभ्य संस्कारानुसार ( Manners ) मी मेनू तिचाकडे दिला. “ Dont want to eat .” कोठल्याही शिकलेल्या मुलीप्रमाणे ती मध्ये मध्ये विन्ग्रेजी फडत होती. तिने झटकन मेनू बघितला.
“Screwdriver please !” ती शांत पणे म्हणाली . आणि माझी धडधड वाढली....
आता थोडे माझ्या पिण्या बद्दल ..त्यावेळी मी माझ्या वयाचा जेव्हडा पितो तेवडा प्यायचो ..झेपेल तेवडी आणि कोणाला पत्ता न लागता घरी जायचो. तसे मी लग्नाच्या बायो डाटा मध्ये “ Enjoy ड्रिंकिंग” लिहिले होते आणि माताजींचा प्रचंड ओरडा खाला होता . ( तिला मी पितो हे माहित नवते – होल्स झिंदाबाद!) ..त्यामुळे काही मित्र गमतीने बोलायचे कि सर्वसाधारण कांदे पोहे चहा पेक्षा दारू चकणा झाले पाहिजे म्हणजे सर्व कसे ओपन होतील...
पण इकडे मुलगी कडक cocktail मागत होती आणि माझ्या .......... मी गोंधळलो .... येक मन सांगत होते कि मुलगी “तयारीची” आहे आणि खूष झालो. दुसरे सांगत होते कि ती माझी परीक्षा घेतेय. तिसरे सांगत होते कि काहीतरी गडबड आहे.अजून एकदा वाटले कि हिला मला नापसंद करायचे आही आणि म्हणून अति stylish वागतेय ( होय हा हि अनुभव आला होता.) मी काय मागवावे – व्हीस्की कि cocktail ?? आणि व्यवहारी मन दारूचे दर बघून घाबरत होते .........
प्रतिक्रिया
9 Mar 2015 - 1:57 am | श्रीरंग_जोशी
प्रसंगवर्णन रंगात येत आहे असे वाटू लागताच लेख संपला.
खाली क्रमशः लिहिले नसले तरी पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
9 Mar 2015 - 3:37 am | स्रुजा
असेच म्हणते.लवकर सांगा कितीचं बिल फाडलं त्या दिवशी.
9 Mar 2015 - 4:00 am | आदूबाळ
जबरी! पुढे काय झालं?
होल्सचा उल्लेख वाचून क्षणभर डचमळलं...
9 Mar 2015 - 4:09 am | आदूबाळ
अल्कोहोलभरल्या पोटात कोणत्याही प्रकारचं मिंट गेलं की जे काय रसायन तयार होतं ते लै ड्यांजर.
9 Mar 2015 - 7:30 am | रेवती
लिहा हो पुढे काय झालं ते!
9 Mar 2015 - 8:28 am | इशा१२३
पटकन आटोपलात लेख अन मग पुढे?
लिहा लवकर..
9 Mar 2015 - 8:34 am | ज्योति अळवणी
पुढे काय झाल याची उत्सुकता आहे. नक्की पुढे लिहा
9 Mar 2015 - 9:16 am | अजया
मग पुढे?
खरं तर वरपरीक्षेला स्क्रुड्रायव्हर आड्डर करणारी आवडल्या गेली आहे.तिच्या आॅर्डरनंतर समोरच्याचा चेहेरा कस्ला प्रेक्षणीय झाला असेल या कल्पनेने गुदगुल्या झाल्या!!!
9 Mar 2015 - 9:43 am | स्नेहल महेश
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
9 Mar 2015 - 10:37 am | असंका
स्क्र्यु ड्रायव्हर आणि होल्स हे नक्की काय आहे? दारूबद्द्ल काहीतरी असावे हे तर उघडच आहे...पण थोडे डीट्टेल मध्ये कुणी सांगेल का?
9 Mar 2015 - 10:53 am | अनुप ढेरे
ते होल्स नसून हॉल्स (च्या गोळ्या) आहे. दारूचा वास येऊ नये म्हणून घेतलेल्या.
9 Mar 2015 - 10:54 am | अनुप ढेरे
असा अंदाज आहे. हॉल्सनी दारूचा वास जाईल असं वाटत नाही खर तर. त्यापेक्षा पान खाणं हे बेष्ट...
9 Mar 2015 - 10:56 am | असंका
हां...हे बरूबर वाट्टंय...पन ते स्क्र्युड्रायव्हर? गंगा जमना किंवा मारामारी सार्ख काय आहे का?
9 Mar 2015 - 10:59 am | अनुप ढेरे
गंगा-जमनाच एका प्रकारचं. फक्त मोसंबी ज्युस ऐवजी वोडका असते. :)
9 Mar 2015 - 11:07 am | अन्या दातार
http://en.wikipedia.org/wiki/Screwdriver_%28cocktail%29
9 Mar 2015 - 11:15 am | असंका
ठँक्यु बरं का अन्या दातार शेठ....!!
_/\_
9 Mar 2015 - 11:58 am | आदूबाळ
Halls च.
उमेदवारीच्या काळातलं तीथरूपांचं वाक्य आठवलं, "दारूचा वास घालावणारी कोणतीही गोळी नसते. तुला सापडली की मला सांग."
प्रस्तुत प्रसंगाच्या वेळी मी "पुदीन हरा" खाऊन आलो होतो. बट द वडील फाउंड औट.
9 Mar 2015 - 2:46 pm | अनुप ढेरे
या कांटेक्स्टमध्ये 'तीर्थ'रूप हा शब्द मजेशीर वाटतो.
9 Mar 2015 - 3:29 pm | आदूबाळ
:))
9 Mar 2015 - 4:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हायला ध्यानमेचं नै आया...."तीर्थ"रुप =))
9 Mar 2015 - 11:24 am | भिंगरी
ही कसली नविन 'इष्टाईल' सगळ्यांना ताणायची?
9 Mar 2015 - 11:28 am | सुनील
छान. पण पुढे काय झालं? क्रमशःदेखिल दिसलं नाही!!
अवांतर
ढकलपत्रांच्या काळातील एक इनोद आठवला. असाच एक 'पाहण्याचा' कार्यक्रम -
मुलगा - इंग्लिश जमते का?
मुलगी - होऽऽ पण फक्त सोड्याबरोबर!
9 Mar 2015 - 12:51 pm | बॅटमॅन
सहीच! स्क्रूड्रायव्हरची परिभाषा माहिती नव्हती.
9 Mar 2015 - 2:05 pm | हेमन्त वाघे
...लिहित आहे ..पहिलाच संगणकावर लिहायचा प्रयत्न असल्याने हा प्रयत्न गोड मानून (किंवा cocktail करून ) घ्या .हि विनंती..
हेमंत वाघे.
9 Mar 2015 - 7:31 pm | साधा मुलगा
चायला बघण्याच्या कार्यक्रमाला तीर्थपान करतात हे पहिल्यांदाच ऐकले!
मला वाटलं फक्त कॉफीपान होते बाहेर भेटतात तेव्हा.
9 Mar 2015 - 8:07 pm | वेल्लाभट
हा हा हा मजेशीर अनुभव !
10 Mar 2015 - 12:07 am | पॉइंट ब्लँक
काटा किर्र!
10 Mar 2015 - 3:23 am | सांगलीचा भडंग
कथेची सुरुवात बघून तरी काल्पनिक आहे असे वाटत आहे नाही तर पुढच्या भागात कुणाचा तरी पोपट तरी झाला आहे असे दाखवलेले असणार ( म्हणजे टेबल च्या पायाचा सैल झालेला स्क्रू अवळायाला स्क्रू ड्रैव्हर मागितला असायचा आणि कथा लेखकाने १ जेडी लार्ज ची ओरडर दिलेली असायची )