'ति'ची गोष्ट

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
14 Feb 2015 - 6:09 pm

तो.....
शनिवार

नेहमीच्या सवईने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो.

पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो.

ती
शनिवार

10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल. पण कंपनीने या ब्रांचची जवाबदारी दिली आणि परत एकदा या शहरात आले.

त्या वडाखालिसुद्धा गेले होते आज. तो वड आणि ते बाक तसंच आहे... बस! बाकी सगळच बदलल आहे.

जाऊ दे. काही गोष्टींचा विचार न केलेला बरा.

------

तो
रविवार

ती खरच होती तिथे काल संध्याकाळी की मला झालेला भास्? वर्षानु वर्षांच wishfull thinking अचानक समोर साकार झाल होत... की तिने मार्ग बदलला आहे? का कुणास ठाऊक... आज गेलोच नाही तिथे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा!

ती
रविवार

आजदेखिल गेले होते त्या वडाखाली. काय शोधते आहे मी? काही वर्षांपूर्वी जे हट्टाने नाकारल ते? की आता फ़क्त आठवणी... ज्या मधल्या काळात धूसर झाल्या होत्या... त्यांना जागवते आहे? की काहीतरी घडाव अस वाटत आहे? की पुढच्या आयुष्याच्या काही निर्णयांच्या अगोदर जुन्या धूसर आठवणी संपूर्ण पुसून टाकल्या आहेत का हे स्वतःला तपासून खात्री करून घेते आहे?

आज परत कॉलेजचा annual day आठवतो आहे. रवि आणि माझी ओळख या annual day च्या निमित्तानेच झाली. लाजरा, अबोल रवि पण त्याचा आवाज एकत राहावा असा आणि हिंदी गाणी आणि त्यांच्या विषयीचा अभ्यास सुद्धा दंडगा. म्हणून तर साने सरांनी त्याला माझ्या बरोबर एंकरिंग करायला सांगितल. आणि रविशि बोलल्यानंतर मला ही पटल की तो आणि मी धमाल उडवून देऊ. नाहीतर मी कधीच कोणालाही माझ्या बरोबर उभ केल नव्हत. झाल देखिल माझ्या एस्पेक्टशन्स प्रमाणे. अप्रतिम रंगला एनुअल डे आणि स्पेशली शेवटचा सिंगिंग इवेंट. आयुष्यात प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट असावी अस मला कायमच वाटत आल आहे. सर्वानी खूप कौतुक केल आमच दोघांच.

त्यानंतर खर तर इंजिनीअरिंगच शेवटच वर्ष असल्याने अभ्यासाला लागण अपेक्षित होत. पण माझ्या आणि रविच्या भेटी आणि गप्पा अचानक वाढल्या. अगोदर 15 दिवस एनुअल च्या निमित्ताने रोज एकत्रच होतो. आता कारण संपल होत आणि तरीही दोघांनाहि भेटायची आणि बोलायची ओढ़ लागली होती.

माझे माझ्या करियरचे आणि पुढच्या आयुष्याचे प्लान्स पूर्ण ठरले होते. म्हणूनच मी कधीच इतर कुठल्याही गोष्टींकडे वळले नव्हते.पण रविचि गोष्टच वेगळी होती. त्याच्या सानिध्यात कस निवांत वाटायच. मुळात जरी स्वभाव दोन टोकाचे असले तरी त्याच्या माझ्या आवडी-निवड़ी खूप सारख्या होत्या. वाचन, निसर्ग, साइकलिंग, स्विमिंग आणि मुख्य म्हणजे दोघांनाही अभ्यासाची असलेली आवड. त्यामुळे annual मुळे झालेली ओळख पुढे मैत्रीत बदलली.

मात्र या मैत्रिने ते ख़ास वळण कधी घेतल ते मला तेव्हा समजलच नाही. खूप अवडायचा रवि मला. म्हणूनच जेव्हा त्याने प्रपोज़ केल तेव्हा मी खूप खूप खुष झाले होते. I found my Mr. Right of life! अस वाटल होत मला. पण त्याने प्रपोजल बरोबर जे package सांगितल; ते ऐकून मी हबकलेच. इथेच याच शहरात त्याच्या जॉइंट फॅमिलीमधे राहायच? मी रविला खूप खूप समजावल. माझे करियर प्लान्स त्याला माहीत होते. माझा स्वभाव.. माझे विचार... घरातल मोकळ वातावरण... माझ्या आयुष्यातले सगळेच निर्णय मी स्वतःच घेते.... सगळ सगळ माहीत असूनही त्याने अशी इच्छा ठेवावी माझ्याकडून? कस शक्य होत ते मला?

जाऊ दे! काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत.... आपण स्विकारायला शिकल पाहिजे.

तो
बुधवार

गेले 3 दिवस त्याच वळणावर उभा आहे. मुद्दाम लवकर पोहोचतो आहे आणि जास्त वेळ थांबतो आहे. आज आईने विचारल देखिल... उशीर का होतो आहे... मी डिस्टर्ब वाटलो तिला. आणि मी कायम जो विषय टाळतो; तेच नेमकं तिने विचारल. "रवि, ती भेटली की काय परत तुला?" आता काय सांगू आईला? ती माझ्या मनातून कधीच दूर गेली नव्हती मग परत भेटायचा प्रश्न येतोच कुठे? आणि प्रत्यक्ष म्हणायच तर मीच confused आहे. शनिवारी मी तिला खरच पाहिल का? गेले 3 दिवस अपेक्षेने उभा आहे पण ती परत नाही दिसली... म्हणजे भासच असावा...

ती सोडून गेली त्यावेळी देखिल असेच भास् नव्हते का होत. का केल तिने अस? आमचे स्वभाव दोन टोकाचे होते हे मान्य. पण choices same होते. तिला वाचायला आवडायच... कित्ती भटकलो होतो आम्ही दोघे... शहरात आणि शाहराबाहेर देखिल. ती कुठेही कधीही यायची माझ्याबरोबर. कधी तिच्या वडिलांनी ऑब्जेक्शन नाही घेतल. आईने ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्नच नव्हता... कारण तिच्या लहानपणीच तिची आई देवाघरी गेली होती.

फ़क्त एकदाच भेटले होते तिचे वडील मला; पण तेव्हाच त्यानी मला सांगितल होत की त्यांचा त्यांच्या मुलीवर आणि तिच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. मी तिला लग्नासाठी विचारल होत त्या अगोदर मी तिच्या वडिलांना देखिल भेटलो होतो. त्यांच्या घरातल मोकळ वातावरण आणि आमच्या घरातल थोड़ conservative वातावरण हे तिच्या पेक्षा तिच्या वडिलांना समजेल आणि ते तिला समजावतील अस वाटल होत मला. त्यांना माहीत होत की त्यांची लेक माझ्यावर खूप प्रेम करते; पण तरीही त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितल की ती जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल.

का नाही समजावल त्यांनी त्यांच्या लेकिला? माझी घालमेल... तिच्या दूर जाण्याने होणा-या यातना त्यांना कधी समजल्याच् नाही का? की ती माझ्यात कधी गुंतलीच नव्हती? आजही मी फोन केला की खूप छान बोलतात ते माझ्याशी. पण मग त्यावेळी त्यांनी असा stand का घेतला होता?

मला मान्य आहे माझ्या आई वडिलांनी खूपच strong stand घेतला त्यावेळी. पण तिने देखिल अज्जिब्बात एकल नाही. प्रेमाखातर तरी तिने थोड़ पडत घ्यायला हव होत न! मी नंतर सावकाश आई-बाबांना समजावल असतच न. पण तिने मला वेळच् दिला नाही. एक घाव दोन तुकडे असाच स्वभाव होता तिचा.. पहिल्यापासूनच! आणि म्हणूनच जेव्हा मी तिला सांगितल की आपण आई-बाबांना हळूहळू समजाऊ निदान तोपर्यंत तरी त्यांच्या बरोबर इथे राहु.. तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. तिने कायमच मला तिचे future प्लान्स सांगितले होते. तिला परदेशात जायच होत; स्वतःच्या जीवावर! आणि म्हणूनच वडिलांची आर्थिक परिस्थिति जेमतेम आहे हे ओळखून तिने खूप मेहेनत घेतली होती शिक्षणात. कायम 1st class मिळवला. कायम स्कॉलरशिप्स मिळवल्या. सगळ सगळ मला मान्य.. पण मग career म्हणजे आयुष्याच सर्वस्व कस असू शकत? आणि लग्नानंतर मी आई-बाबांची समजूत काढल्यावर त्यांनी पाठवालच असत न आम्हाला? पैशाचा प्रॉब्लम कधी नव्हताच. का नाही तिला हे पटल कधी?

मी आजही तिची वाट पाहतो आहे... आजही बाबा ऑफिसमधे पोहोचायच्या अगोदर जाऊन मी तिचे फेसबुक updates... तिचे ब्लॉग्स... तिचा success चा आलेख रोज पाहतो आहे. म्हणूनच तर गेल्या आठवद्यातल्या तिच्या 'back to old memories' या स्टेटसने आणि शनिवारच्या भासामुळे मी अस्वस्थ आहे.

भास्? की.....?

ती
बुधवार

गेले 3 दिवस मान वर करायला वेळ मिळत नव्हता. रोज रात्रि 11 वाजून जात आहेत. बाबांना सांगितल थांबू नका जेवायला पण ते एकत नाहीत. तू किती दिवस असशील सांगता येत नाही. डिनरच्या निमित्ताने तरी भेटतेस अस म्हणून हट्टाने थांबतात. पण बर आहे... त्यामुळे तरी ऑफिस मधून निघता येत.

आज मात्र बाबांनी गुगली टाकला. "पुढे काय ठरवल आहेस बेटा?" त्यांच्या या प्रश्नाने थोड़ी गड़बडले. काही कळलच नाही अस दाखवत 'अगोदर ऑफिस सेट तर होऊ दे; मग इथेच राहायच की कंपनी परत बोस्टन ला बोलावते ते पाहू.' अस भलतच उत्तर देऊन मी विषय टाळला. बाबांना कळल ते. काहीच बोलले नाहीत. पण मला माहीत आहे ते नक्की परत हां विषय काढणार. आजवर त्यानी कधीच माझा कुठलाही निर्णय खोडला नाही. पण अलीकडे त्यांच् वय झाल आहे आणि माझ्या भविष्याची... माझ्या लग्नाची काळजी त्यांना आहे; हे मला कळत आहे.

लग्न! आज परत एकदा त्या भुतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्यात. मी रविला नाही म्हणाले आणि घरी आले. खूप खूप रडले होते त्या दिवशी बाबांच्या कुशीत शिरून. ज्याच्यावर मनापासून प्रेम केल... ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगायची स्वप्न बघितली होती; त्याला नाकारुन मी घरी परतले होते. बाबांनी आईच्या मायेने मला जवळ घेतल होत. मला कद्धिच आईची उणीव जाणवली नव्हती आणि त्यादिवशी देखिल मी त्यांच्या कुशीत हुंदके देऊन रडले होते. ते फ़क्त मला थोपटत राहिले.

मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार हा निर्णय मी त्यांना सांगितला तेव्हा ते रविबद्दल विचारतील अस मला वाटल होत; पण त्यांनी नाही विचारल. मी पोस्ट ग्रेजुएशन नंतर तिथेच जॉब घेतला आणि सिटीझनशिप देखिल; तरीही त्यांच काहीही म्हणण नव्हत. अधुन मधुन तेच येत राहिले मला भेटायला. पण आता मला येऊन जेमतेम 10 दिवस झाले आहेत आणि मला त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसत आहेत. फार दिवस बाबांना टाळता येणार नाही हे मला लक्षात आल आहे. पाहू!

बाबा
बुधवार

छोकरी खरच खूप मोठी झाली. आज पहिल्यांदा तिने सरळ प्रश्नाच् उत्तर सरळ दिल नाही. तिलाही समजल आहे माझा रोख कुठे होता; पण तिने विषय टाळला. ठिक आहे. बोलेन थोड्या दिवसानी. येऊन 10 दिवस झाले आहेत पण तिने अजुन रवि बद्दल एक अवाक्षर काढलेल नाही. काय असेल तिच्या मनात? आई निराळी पोर म्हणून कायम तिचे लाड केले. जसे आणि जितके शक्य होते तसे. पण पोर पण समजुतदार आहे. कधी कुठला हट्ट नाही केला. कदाचित तिच्या बापाचा आवाका तिने लहान वयातच जोखला होता. खूप लवकर स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली. अगोदर थोड़ा त्रास झाला तिच्या अशा लवकर indipendent होण्याचा. पण ती तिच्या आई सारखी आहे. तिचे विचार खूप क्लियर असतात हे मी बघितल आहे. मुख्य म्हणजे एकदा घेतलेला निर्णय ती कधीच बदलणार नाही; याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी कधी प्रयत्न देखिल केला नाही तिचे निर्णय बदलायचा. अर्थात तिने कधी चुकीचा मार्ग नाही घेतला... पण तरीही ज्या दिवशी ती रविला नकार देऊन घरी आली होती त्यादिवसशि तिला समजावायची खूप इच्छा झाली होती की अस स्थळ शोधून सापडणार नाही. साठे इंडस्ट्रीजच नाव खूप मोठ आहे. तुला परदेशात जायचच आहे तर लग्नानंतर थोड्या दिवसांनी रविबरोबर जाशीलच... रविने मला मिद्धम अगोदर भेटून हे सांगितल होत. पण मि माझ्या लेकीला चांगलच ओळखतो. तिला हे कधीच पटल नसत... आणि म्हणूनच ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून मी तिला फ़क्त थोपटत राहिलो.

आज तिने तिला जे हव ते मिळवल आहे आणि त्याच समाधान तिच्या डोळ्यात दिसत आहे मला. पण या सगळ्या धवपळीत ती काहीतरी खूप महत्वाच् मिस करते आहे... आजही रवि मला फोन करतो. कधीतरी भेटूनहि जातो.

सांगू का तिला की त्याने अजूनही लग्न केलेले नाही. काय आहे हिच्या मनात? एकटयाने संपूर्ण आयुष्य जगण अवघड असत. आप बिती तिला कशी समजाऊ... हम्... येत्या काही दिवसात बोलल पाहिजे परत एकदा.

ती
शनिवार

आज खूप दिवसानी निवांत वेळ मिळाला आणि परत त्या बागेतल्या बाकावर जाऊन बसले. तेच जूने दिवस आठवत होते. आयुष्य किती वेगळ होत. त्यावेळी कितीतरी स्वप्न होती मनात. आज मी खरच समाधानी आहे. मी जे ठरवल होत ते मी मिळवल आहे.... स्वमहिनतीने! काहीतरी सुटत गेल या धावपळीत... मान्य आहे! जर रविशि लग्न केल असत तर आज आहे त्यापेक्षा जास्त आरामाच आणि मोठ्या अचिएवेमेंट्स असलेल आयुष्य असत. पण ते माझ नसत... ते आयुष्य मिसेस रवि साठेच असत. मला माझ्यातली 'मी' शोधायची होती. आज ती गवसलि आहे. आज मी समाधानी आहे.

आज मी बाबांच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे!

तो
शनिवार

ती तिच आहे... इथे आली आहे. कायमची असेल का? आज पाहिल तिला त्याच बाकावर! निवांत चणे खात बसली होती. माझा विचार करत असेल का ती कधीतरी? जाऊ का समोर तिच्या? सांगू का की मी अजूनही तीचीच वाट पहातो आहे?

त्यादिवशि मी तिला प्रपोज़ केल तेव्हा ती किती खुष होती. मला तर आभाळ दोन बोट उरल होत. पण मग जेव्हा मी तिला आई-बाबांची इच्छा सांगितली तेव्हा ती अगोदर एकदम गप्प झाली. आणि मग सतत तिचे प्लान्स सांगत आणि मला समजावत राहिली. अगदी मला राग येई पर्यंत. मी काही तिला तिचे प्लान्स बदलायला सांगत नव्हतो. फ़क्त थोड्या दिवसांसाठी पोस्टपोन करुया अस म्हणण होत माझ. पण तिने ठामपणे नाही म्हंटल. शेवटी 'रवि माझे विचार आणि प्लान्स माहीत असूनही तू अस praposal माझ्यापुढे ठेवतो आहेस याचच वाईट वाटत;' अस म्हणून ती उठली आणि मी काही बोलायच्या आत निघुनहि गेली. मी सुन्न होऊन बसलो. त्यानंतर ती कधीच भेटली नाही. मला माहीत होत तिने पुढच्या कोर्सचे पेपर्स फॉरवर्ड केले आहेत, पण ती इतक्या झटपट निर्णय घेईल आणि निघुन जाईल अस वाटल नाही. मी सावरून तिला contact करायचा प्रयत्न केला तोवर ती निघुनही गेली होती.

तो दिवस आणि आज.... किती वेडापिसा झालो होतो मी तिच्यासाठी. ते depression चे दिवस आठवले तरी आजही अंगावर काटा येतो. आईच् सतत लग्नासाठी मागे लागण आणि माझ तिच्या आठवाणींमधे जगण.... पण मग डँड मधे पडले आणि त्यांनी स्पष्ट सांगितल की यापुढे रवि जोपर्यंत स्वतःहुन बोलत नाही तोपर्यंत त्याच लग्न हां विषय संपला.

आज 10 वर्ष झाली... पण त्यानंतर कधीच कोणीही मला माझ्या लग्नाबद्दल विचारल नाही आणि माझ्या मनात देखील तो विषय कधी आला नाही.

आज मात्र तिला बघितल आणि परत आशा पल्वलित झाल्या. आज बाबांना गाठलच्. ते म्हणाले आहेत की त्यांच्याही मनात तिच्याकडे तिच्या लग्नाचा विषय काढायचा अस आहे आणि ते आजच तिच्याशी बोलणार आहेत. त्यांनी मला उद्या संध्याकाळी बोलावल आहे.

देवा! बस ती हो म्हणू दे आता! Waiting for tomorrow evening...

बाबा
शनिवार

थोड़ी लवकर आली आज. म्हणाली जुन्या बागेत गेली होती. पण डिस्टर्ब नाही वाटली. उलट खुश होती. जेवताना मुद्दाम स्पष्ट लग्नाचा विषय काढला मी... तिने टाळाटाळ देखिल केली नाही. म्हणाली 'मला देखिल तुमच्याशी या विषयावर बोलायच आहे. बाबा आता मी लग्नाला पूर्ण तयार आहे. मला मान्य आहे माझ्या बरोबरीच्या मुलींच्या पेक्षा माझ लग्न उशिरा होईल पण मला त्यात वावग काहीच वाटत नाही. कारण आज मी पूर्ण समाधानी आहे. माझ्या मनात माझ कैरियर कस असाव याच चित्र होत, ते पूर्ण झाल आहे... त्यामुळे आता मी लग्न करून संसारात रामणार आहे.'

तिला मी उद्या घरीच थांबायला संगीतल आहे. तिने कारण नाही विचारल. म्हणाली मलाही तुमच्याशी बोलायच आहे. कदाचित् परत जाण्याचा विचार असेल का? कोण जाणे! मात्र उद्या रवि येणार आहे संध्याकाळी. मीच बोलावल आहे त्याला. दोघांनी समोर बसून बोलाव अशी माझी इच्छा आहे. तिला मात्र तो येतो आहे याची कल्पना नाही दिलेली. तिचा बाप असूनही तिच्या मनातल ओळखण मला कधी जमलच नाही. पण तिने घरी थांबायच कबूल केल आहे. बाकी उद्याच् उद्या पाहू.

......रविवार संध्याकाळ. 4 ची वेळ. बाबा थोड़े अस्वस्थ होते. तिचा स्पष्ट आणि थोडा हट्टी स्वभाव ते जाणून होते. त्यामुळे अचानक रविला तिच्या समोर उभ करून ते चूक नाही न करत आहेत या विचारात ते सकाळपासून होते. पण आज तिचा मूड सकाळपासूनच छान होता. कित्ती तरी दिवसानी ती आज गाणं गुणगुणत होती. कितीतरी दिवसानी संपूर्ण स्वयंपाक तिने स्वतः केला होता आणि आत्तासुद्धा तिची स्वयंपाक घरात काहीतरी खुडबुड़ चालु होती. त्यामुळे तेसुद्धा relaxed मूड मधे होते.

"बाबा" अचानक तिने हाक मारली. "मी कोथिंबीर वड़ी केली आहे. येऊन बघता का नीट जमली आहे का?" बाबा तिच्या उत्साही आवाजाने खुश झाले. स्वयंपाक घराकडे जातच होते तेवढ्यात बेल वाजलि.

"मी बघते. तुम्ही चव बघा न." ती म्हणाली. आणि बाबा काही म्हणायच्या आत तिने दरवाजा उघडला. दारात रवि होता. बाबा आत जाताना थबकले. ती देखिल स्तब्ध झाली होती. रविची नजर तिच्या चेह-यावर खिळली होती. ती मिनीटभराने भानावर आली आणि दारातून बाजूला झाली; रविला आत येण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून.

बाबांनी रविचे हसून स्वागत केले. "ये रवि. कितीतरी दिवसानी दिसतो आहेस. कसा आहेस?" " मी मजेत बाबा." रवि म्हणाला आणि सोफ्यावर बसला. ती देखिल तिथेच सॉफ्यावर बसली होती. शांत हसरा चेहेरा होता तिचा. सगळेच थोड़े अवघडले होते. शेवटी तिनेच पेच सोडवला. "कसा आहेस रवि? कितीतरी वर्षानी दिसतो आहेस. काय करतोस आजकाल?" तिने विचारले. "Jist living! बाबांच्या ऑफिस मधे join केल त्यांना. आता तर संपूर्ण business मिच बघतो. ते फ़क्त सकाळी 2 तास येतात. बाकी तू कशी आहेस?" त्याने उत्तर दिल.

"Am on the top of the world. Have achieved everything that i had dreamed. हव तस शिक्षण आणि मग best नोकरी. Am really very happy and satisfied. Now is the time to take a break and think of future."

"मग काय ठरवल आहेस बेटा? खर सांगू मीच आज रविला बोलावल आहे. तुमच्याशी दोघांशी एकाच वेळी बोलावे अस ठरवल आहे मी." बाबा म्हणाले.

तिने आश्चर्य वाटून विचारल; "बाबा, आमच्याशी एकाच वेळी बोलाण्यासारख काय आहे?"

रविने तिच्याकडे चमकून पाहिल. "मी अजुन लग्न नाही केलेल. तुझे फेसबुक updates, तुझे ब्लॉग्स, तुझ्या achievements... तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मी उत्सुकतेने रोज वाचतो. आणि तरीही तुला अस वाटत नाही की आपण दोघांनी एकदा भेटल पाहिजे? बोलल पाहिजे?" रविने काकुळतिला येऊन विचारल.

"आता इतक्या वर्षांनंतर आपण का भेटाव? का बोलाव? आणि तू आता तुझ्या आयुष्यात काय करतोस ते मला का माहीत असेल?" तिने रविकडे वळुन विचारल.

"अग! का म्हणून काय विचारतेस. माझ तुझ्यावर प्रेम होत आणि अजूनही आहे. अगदी मनापासून. तू अचानक मला न सांगता निघुन गेलीस. नंतर कोणताही contact देखिल ठेवला नाहीस. मला मान्य आहे की तुझे प्लान्स खूप क्लियर होते. तुला परदेशात शिकायला जायच होत. तिथे नोकरी करून स्वतःला सिद्ध करायच होत. अग, पण लग्नानंतर देखील आपण जाऊ शकलो असतोच न. दोघेही एकत्र. मला हे देखिल मान्य आहे की माझे आई-वडील तेव्हा तयार नव्हते माझ्या परदेशात जाण्याला. त्यांना घर सांभाळणारी, सुंदर, सुशिक्षित अशी त्यांच्या noms मधे बसणारी सुन हवी होती. ते थोड़े जुन्या विचारांचे आहेत मान्य; पण दुष्ट नाहीत. मी त्यांना समजावल असत. आणि एक-दोन वर्षात ते तयार देखिल झाले असते. पण तू मला थोड़ा देखिल वेळ दिला नाहीस. अचानक निघुन गेलीस मला न सांगता. परत कधी वळूनही बघितल नाहीस तू. प्रेम केल होतस न माझ्यावर? मग कधी वाटल नाही मी जगलो की मेलो ते बघाव? तू अशी कशी अचानक निघुन गेलीस? मी तुझ्यासाठी वेडापिसा झालो. सुरवातीला आईने माझ लग्न लावायचा खूप प्रयत्न केला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मी एवढ्यात लग्न करणार नाही; हां विषय परत काढायचा नाही.. अस मी घरात ठामपणे सांगितल. तुला माहीत नाही, but i faced serious depression syndromes too. Was on medication for nearly a year. सतत तुझाच विचार. M. B. A. करणार होतो, पण अभ्यासात कधी लक्षच लागल नाही. मला विश्वास होता की तू परत येशिल एक दिवस. माझी तपश्चर्या नक्की फळाला येईल एक दिवस. मी नेहमी तुझ्या बाबांच्या contact मधे होतो. कायम फ़क्त तुझ्याबदद्लच प्रश्न! ती कशी आहे? कधी येणार आहे? माझ्याबद्दल कधी काही विचारते का? गेली 10 वर्ष फ़क्त आणि फ़क्त तुझाच विचार केला आहे. श्वास घेतो म्हणून जगतो आहे एवढच. ध्यानिमनि फ़क्त तूच असतेस. business सेट आहे... तो नीट चालवतो आहे... त्यामुळे बाबा काही म्हणत नाहीत. पण आता तू आली आहेस.. तूच म्हणालीस आत्ता की तुला आयुष्यात जे achieve करायच होत ते केल आहेस. मग आता तर आपल्या लग्नाला काही प्रोब्लेम नाही न? तू हो म्हणालीस तर मी आई-बाबांशी बोलेन. ते आता नाही म्हणणार नाहीत. आता बस हो म्हण आणि माझ्या 10 वर्षांच्या तपश्च् र्येच फळ माझ्या पदरात घाल." रवि काकुळतीला येऊन बोलत होता, तो थांबला.

ती स्तब्ध होती. शांत होती. कोणतीही reaction तिच्या चेहे-यावर नव्हती.

"बेटा, बोल न काहीतरी. तो बोलतो आहे ते खर आहे. तो खरच गेली 10 वर्ष तुझी वाट पाहतो आहे. आठवद्यातुन एकदा तरी तो मला फोन करून तुझ्याबद्दल बोलायचा.. सगळ मान्य आहे मला. पण मला तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायच आहे. मी कायम तुझ्या निर्णयात तूझ्या बरोबर आहे, हां विश्वास ठेव." बाबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले.

तिच्या डोळ्यात टचकन पाणि उभ राहील. "खूप त्रास दिला न बाबा मी तुम्हाला? खरच तुम्ही कायम माझ्या निर्णयात माझ्या बाजूने ठाम उभे राहिलात." ती म्हणाली.

"बेटा, तुझी आईसुद्धा अशीच ठाम होती ग. विचारी, कैरियर ओरिएंटेड, शांत! माझ शिक्षण ... मी आयुष्यभर केलेली नोकरी... सर्वकाही तिच्यामुळे. माझे असे काही आयुष्याचे प्लान्स नव्हतेच्. तिच्यावर प्रेम केल बस. तिने मात्र सगळ कस छान plan केल होत. तू 14 वर्षाची असताना.. तुझ्या नववित.. ती अचानक साधा ताप येण्याच्या निमित्ताने गेली; आणि मी मोडून पडलो. त्यानंतर मी अनेक वर्ष माझ्याच दुःखात होतो. आणि तू ठामपणे तुझ्या आयुष्याचा दोर धरून पुढे जात होतिस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे अस आपल् म्हणायच. खर तर मी तुझ्या आईसारखा... तुझ्यासारखा strong minded नाही, हे fact आहे. रविमधे मी स्वतःला बघतो ग. आणि म्हणूनच मी जरी आज रविला इथे बोलावल असल तरी तू जो निर्णय घेशील तो योग्य असेल असा माझा विश्वास आहे. Am always with u बेटा." बाबा म्हणाले.

ती बाबांचा हात हातात घेऊन हसली. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात बेल वाजली. तिने पुढे होऊन दार उघडल. दारात एक स्मार्ट दिसणारा पुरुष उभा होता.

"हाय! come in भास्कर. बाबा हा तुमचा होणारा जावई आहे." ती बाबांकडे वळत म्हणाली.

"आज मी मुद्दाम त्याला इथे बोलावल आहे. मला खात्री होती की तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढणार आज. म्हणूनच मी भास्कर ला बोलावून घेतल. मात्र रवि येईल अस वाटल नव्हत. रवि... मला माहीत आहे तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. आज तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देते. माझ खरच तुझ्यावर खूप प्रेम होत. पण त्याहुनहि जास्त मला माझा self respect मला मोठा होता आणि आहे. तू म्हणतोस की तु तुझ्या आई-वडीलांना समजावल असतस आणि ते तयार देखील झाले असते, मान्य! ते दुष्ट आहेत अस माझ म्हणण मुळीच नाही. पण मग त्यांनी आयुष्यभर मला हे जाणवून दिल असत की केवळ त्यांच्यामुळे मी माझ स्वप्न पूर्ण करू शकले. माझ्यासारख्या स्वाभिमानी मुलीला हे कधीच मान्य झाल नसत. अरे मी माझ संपूर्ण शिक्षण स्कोलरशिप्स मिळवून केल; माझ्या बाबांना देखील कधी माझ्या शिक्षणाचा खर्च करू दिला नाही; मग मी तुझ्या पालकांकडून काही घेतल असत का? आणि माझा हा independent स्वभाव तुझ्या घरातल्याना झेपला असता का? मी तुला न सांगता गेले अस म्हणतो आहेस. पण तुला चांगलच माहीत होत की मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार होते आणि त्याची तयारी करत होते. तू मला प्रपोज़ करायची घाई केलीस. आणि त्यात तू तुझ्या अटी सांगितल्यास.मी तुला त्यावेळी देखील म्हणाले होते की आपण अजुन थांबू आणि विचार करुया. पण तू एकायलाच तयार नव्हतास. माझ तुझ्यावर प्रेम होत रवि, पण प्रेमाचा हक्क आणि possessiveness यातला फरक तुला कधी समजलाच नाही. आणि आजही तू मला तुझी तपश्चर्या... तुझ वाट पहाण.. सांगतो आहेस; यातही मला मी कुठेच् दिसत नाही. म्हणजे पुढच आयुष्य तुझ माझ्यासाठी थांबण... तुझ दुःख या pressure खाली मी जगायच? मला हे अमान्य आहे. तो माझा स्वभाव नाही रवि. Infact रवि तुला मी कधीच समजले नाही. तू कायम तुझ्या विश्वात जगलास. तू म्हणतोस मी तुझ विश्व आहे; but the fact according to me is,am just a small part of ur world. हा भास्कर. तुला आठवतो का हा? आपल्या कॉलेज मधे नव्हता. पण प्रत्येक डिबेट कॉम्पिटिशन मधे opposite कॉलेज मधून असायचा. आम्ही अनेकदा गप्पा मारायचो. नंतर कॉलेज संपल, आणि मी परदेशात शिक्षणासाठी गेले तरी आमचा contact होता. कायम एकमेकांचे updates आम्ही एकमेकांना द्यायचो. गप्पा व्हायच्या त्यादेखिल करियर आणि काम आणि अशा विषयांच्या. आणि मग माझ्या लक्षात येत गेल की जरी मला तू आवड़ायचास पण आपले स्वभाव खूप वेगळे होते. आपल्या आवडी-निवड़ी भले सारख्या होत्या. पण आयुष्य जगताना स्वभाव जुळण जास्त आवश्यक असत हे मला भास्करला भेटल्यानंतर लक्षात आल. आपल्या दोघांच्या आयुष्याकडून अपेक्षा देखिल वेगळ्या होत्या. मी तुला दोष नाही देत रवि. कस जगाव हां प्रत्येकाचा आपापला choice असतो. तू खूप भावनिक आहेस, मी तुझ्यासारखि नाही. U always made me feel special. But that feeling never remains forever. Eventually आपले खूप खटके उड़ाले असते. I respect that u really waited for me. But according to me... आयुष्य कधी थांबत नाही. also life can't b lived under any pressure. आपल कधी जमल नसत रवि. Am really very sorry for everything. पण मी शिक्षणासाठी हां देश सोडला तेव्हा सर्वच मागे सोडून गेले. आणि तू अजूनही 10 वर्षांपूर्वीच्या दिवसांमधे अडकला आहेस. इथेच आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक लक्षात येतो. I see my future with Bhaskar."

ती बोलायची थांबली आणि रवि भानावर आला. सर्वकाही समजल्या सारख त्याने मान हलवली.

"तुझ खर आहे. We always live in different worlds. I agree." तो म्हणाला.

"All the best Bhaskar. U have got the world's best lady in ur life. All the best to both of u."

एवढच बोलून रविने आपली पावल दाराच्या दिशेने वाळवली.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

चांगलीय कथा पण शेवट नाही आवडला.

स्वाती२'s picture

14 Feb 2015 - 8:08 pm | स्वाती२

छान कथा! आवडली.

पारा's picture

14 Feb 2015 - 8:24 pm | पारा

साध्या सोप्या भाषेत छान लिहिलेली कथा आहे. शेवट कसाही असला तरी घाईत संपवल्यासारखा वाटला. अजून काही व्यक्ती ज्या उल्लेखातून आल्या त्यांची बाजू कळायला हवी होती असे वाटून गेले.

विनिता००२'s picture

16 Feb 2015 - 10:54 am | विनिता००२

आवडली
एक माणूस म्हणून तिने जसा दोघांचा ही विचार केला, तो योग्यच वाटला.
आयुष्यात कधी कधी कटू सत्य स्विकारावेच लागते.
मनाला पटले असले तरी प्रत्येक वेळी त्याची सगळी कारणे शब्दांत मांडता येत नाहीत. पण वेळ आल्यावर त्या निर्णयाचे महत्व कळते.

प्रियाजी's picture

16 Feb 2015 - 9:20 pm | प्रियाजी

ही या काळाला योग्य अशी कथा वाटते. अतिशय आवडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शेवट तर फारच आवडला.

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2015 - 10:15 pm | ज्योति अळवणी

आपण सर्वानी माझी कथा वाचली आणि ती सर्वाना आवडली हे समजून खूप बरे वाटले

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Feb 2015 - 8:59 am | निनाद मुक्काम प...

भास्करची बाजू त्या द्वारे त्यांचे मनोगत जाणून घ्यायला आवडले असते

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 9:31 pm | एक एकटा एकटाच

कथेचा प्लॉट चांगलाय.
कथेत खासकरून दिवसानुसार लिहायची स्टाईल आवडली
पण शेवट नाही आवडला.

टर्मीनेटर's picture

26 Oct 2016 - 9:43 pm | टर्मीनेटर

कथा आवडली, इंडिपेन्डन्ट आणि प्रॅक्टिकल attitude असलेली, कथेतले सगळ्यात महत्वाचे पात्र असूनही 'निनावी' नायिका पण आवडली.

नमकिन's picture

29 Oct 2016 - 10:00 am | नमकिन

स्री मनाचा लोचा!
बरं फेसबुक प्रोफाईल कोण कोण पहातोय, आवडी, शाळा, महाविद्यालय सारखे असले की सारखे दाखवतो, म्युच्युअल मैत्र असे बरेच फिचर्स आहेत, तर मुख्य मुद्दा गंडलाय की १० वर्ष स्वतःला शोधणा-या व सिद्धकरणा-या "ती"ला रवि कुमार नेमका काय करतोय तेच कळले नाहीं. हा, जरका फेसबुक पूर्व कथानक असले असते तर खपले असते एखाद वेळेस. पण मग दोन्ही बाजू अनभिज्ञ राहिल्या असत्या.
ऊपरी उपस्कर काम ध्यानात घ्यावे तांत्रिक बाजू फार महत्वपूर्ण असतात, हवा तसा अर्थ नाहीं काढता येत. ० किंवा १.

नमकिन's picture

29 Oct 2016 - 10:05 am | नमकिन

स्री मनाचा लोचा!
बरं फेसबुक प्रोफाईल कोण कोण पहातोय, आवडी, शाळा, महाविद्यालय सारखे असले की सारखे दाखवतो, म्युच्युअल मैत्र असे बरेच फिचर्स आहेत, तर मुख्य मुद्दा गंडलाय की १० वर्ष स्वतःला शोधणा-या व सिद्धकरणा-या "ती"ला रवि कुमार नेमका काय करतोय तेच कळले नाहीं. हा, जरका फेसबुक पूर्व कथानक असले असते तर खपले असते एखाद वेळेस. पण मग दोन्ही बाजू अनभिज्ञ राहिल्या असत्या.
ऊपरी उपस्कर काम ध्यानात घ्यावे तांत्रिक बाजू फार महत्वपूर्ण असतात, हवा तसा अर्थ नाहीं काढता येत. ० किंवा १.

नमकिन's picture

29 Oct 2016 - 11:36 am | नमकिन