मी परत एकदा

द्विज's picture
द्विज in जे न देखे रवी...
15 Nov 2008 - 5:48 pm

जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही
कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे
असे उठ्सुठ बोम्बा मारु नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता
चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ?
आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ?
असे डोळे फाडुन बघू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच
आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच
हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे
असे बोट दाखवुन हिनवू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले
घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले
पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे
काढा ते आमच्या वर्मावरले बोट
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

वावरविचार

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 5:50 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले
घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले
पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे
काढा ते आमच्या वर्मावरले बोट
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

पार डोक्यावरुन गेलं भाऊ !
जरा वाईच अर्थ देखील लिहा कोणितरी... प्रभु आपकी शरण में... नया बालक ! ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

व्यंकु's picture

15 Nov 2008 - 11:02 pm | व्यंकु

खरंच ब्राम्हणांनाही शक्तीप्रदर्शनाची गरज आहे.
आणि तेवढी आमच्यात धमकही आहे.
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे?

चैतन्यकुलकर्णी's picture

16 Nov 2008 - 12:02 am | चैतन्यकुलकर्णी

शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!

चालु द्या. चेष्टा नव्हे हं.
वेताळ

शशिधर केळकर's picture

16 Nov 2008 - 3:34 pm | शशिधर केळकर

विषय चर्चेचा आहे हे खरे. पण कवितेमधून 'ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?' याला 'नाही' असे उत्तर मिळावे असे काहीच मुद्देसूद चर्चित नाही. तुम्ही हा विषय कवितेच्या माध्यमापेक्षा काथ्याकूट वर टाकावा असे वाटले. मनातल्या आवेशाला शब्दांच्या सामर्थ्याची जोड मिळाली तर ही मांडणी छान होऊ शकेल.
ते काहीही असो. प्रयत्न स्वागतार्ह.

कशिद's picture

17 Nov 2008 - 1:23 am | कशिद

चालु द्या. चेष्टा नव्हे हं.

sahamat