सिंग इज किंग

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
15 Nov 2008 - 1:44 pm

स्थळ :- पंतप्रधानांच्या बंगल्यातील मिटींग हॉल
विषय :- हिंदु दहशतवाद
पात्रे :- (हिरव्या कोचावर) अबु आझमी, शबाना आझमी (हिरव्या साडीमध्ये), जावेद अख्तर, अमर सिंह, मुल्लायम सिंह यादव, दिलिप कुमार.
(भगव्या कोचावर) लालक्रुष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, नरेन्द्र मोदी, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे.
(समोर इटलीहुन मागवलेल्या कोचावर मनमोहन सिंह, सोनीया गांधी, राहुल गांधी, विलास राव देशमुख, शरद पवार, आर. आर. पाटिल)

शबाना दिदी :- (ईकडे तिकडे बघत ) हुश्श....
दिलीप कुमार :- उमममम क्या हुआ मोहतरमा ??
शबाना दिदी :- या अल्लाह ते रामदास आठवले , मी पण येतो म्हणुन मागे लागले होते, कसे तरी त्यांना चुकवुन आले.
जावेद अख्तर :- देश है तो मुश्किले है, मुश्किले है तो कठिनाईयां है, ये है तो वो है और सब है तो रास्ते भी है.
अमरसिंह :- वाह वाह..
लालक्रुष्णजी :- (हळुच शत्रुघ्न सिन्हाच्या कानात) आपण अटलजींना आणायला हवे होते, मग कळाले असते ह्या अख्तरांना कविता काय असते ते.
अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
(भगव्या कोचावर थोडीशी खस खस )
मनमोहनजी :- आपण सगळे वेळात वेळ काढुन माझ्या बोलवण्यावरुन येथे आलात त्या बद्दल आभार.
(नाहितर आजपर्यंत लोकांनी बोलवायचे आणी आम्हि हातातली कामे (?) टाकुन पळायचे हिच आम्हाल सवय.) (मनातल्या मनात)
देश आज फ़ार मोठ्या संकटात सापडला आहे, सांप्रदायी शक्ती हावी होत आहेत, प्रांता प्रांतात भाषिक दंगली चालु आहेत, आम्ही ह्याचा तिव्र निषेध करतो, आणी लवकरात लवकर ठोस पावले उचलायचे आश्वासन देतो. ( हे वाक्य बोलताना ते आलटुन पालटुन उद्धव, विलसराव आणी आबांकडे बघतात.)
(उद्धव दालनातल्या फोटोंचे परिक्षण करत आहेत, विलासरावांना डुलकी लागली आहे आणी आबा डाव्या हाताच्या ५ बोटां मध्ये उजव्या हाताचे एक बोट घालुन स्क्रु पिळल्यासरखे काहितरी करत आहेत.)
आज देशाला गरज आहे ती सामजिक एकतेची, सर्व धर्म समभावाची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची.
राहुल :- (हळु आवाजात) मॉम लेट मी गो ना, आज मन्नु अंकल जरा जास्तच बोर करत आहेत.
सोनीया :- सिट क्वाएट, हे सगळे बघुन आणी शिकुन घे, तुला आता ह्याची सवय व्हायला हवी, भावी पंतप्रधान आहेस तु ह्या देशाचा !
शबाना दिदी :- हे सगळे बोलायला ठिक आहे मनमोहनजी, पण आज खरी परिस्थीती हि आहे कि एक मुसलमान म्हणुन मला मुंबईत राहायला घर मिळत नाहिये.
अमरसिंह :- शेम शेम शेम शेम
मुलायम :- श्शु ओरडु नका, हि काय संसद वाटली का तुम्हाला ?
उद्धव :- हे बघा हे बघा आधि तुमचे शब्द मागे घ्या ! काय वाटेल ते बोलायला आणी करायला हा काहि दिपा मेहताचा सेट नाहीये.
जावेद अख्तर :- चुप्प तुम रहो चुप्प हम रहे....
मुलायम :- हेच ते हेच ते, आरडा ओरडी आणी गोंधळ करायचा, समोरच्याला धमक्या द्यायच्या, आणी समोरचा अल्पसंख्यांक असला कि ह्यांच्या आवाजाला अजुन धार चढते.
शत्रुघ्नजी :- खामोश !! काय सारखे अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक म्हणुन गळे काढता ? काहि झाले कि अल्पसंख्यांक समाजावर अन्याय म्हणुन आरडा ओरडी करता ? पाकीस्ताना पेक्षा जास्त मुसलमान ह्या देशात आहेत आणी तिथल्या पेक्षा जास्ती सुरक्षित आहेत ! ह्हान !!
विलासराव :- (मनातल्या मनात) च्या आईला असा आवाज लावता यायला पाहिजे, आमचे ध्यान रितेश हे कधी शिकणार काय माहित...
अमरसिंह :- आता तर हिंदु दहशतवाद सुरु झाला आहे, निष्पाप मुस्लिमांवर हल्ले होत आहेत, त्यांना कोणी वाली उरला नाहिये.
लालक्रुष्णजी :- वाली हा रामाचा शत्रु होता, राम आमचा आदर्श आहे, हम मंदिर वही बनायेंगे, जय श्रिराम !!
सोनीयाजी :- हे बघा आपण ईथे भांडायला नाहि जमला, आपण एक व्हायला पाहिजे आणी देशाच्या शत्रुला नामकरण केले पाहीजे. देशाला वाचवने कि जिम्मेदारी आता बहुसंख्यांक समाजाची आहे.
विलासराव :- नामकरण नाही मॅडम, नामोहरम.
सोनीयाजी :- हो हो तेच काय ते, जे सध्या राणेंनी तुम्हाला केले आहे.
सुषमाजी :- आता ह्या देशाला वाचवण्यासाठी काय करायचे हे बाहेरुन आलेल्यांकडुन का शिकावे लागणार आम्हाला ?
शबाना दिदी :- हेच ते, आपले -परके, आतले-बाहेरचे हे भेदभाव बंद करा, सुखानी जगु द्या अल्पसंख्यकांना.
मोदी :- इस देश मे रहना होगा, तो खुद को हिंदु कहना होगा. म्हणे निष्पाप ! अहो सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुस्लिम असतात त्याचे काय ? इतकी वर्षे आमचा समाज जे सोसत आलाय ते तुमच्या बाबतीत एकदा घडल्या बरोब्बर संताप झाला की तुमचा. आणी हे नाकर्ते सरकार धावले लगेच हिंदु साधु साध्वी आणी सैनिकांना पकडुन तुम्हाला खुश करायला.
लालजी :- शांत गदाधारी भिम शांत !
मनमोहनजी :- केंद्र सरकारवर आरोप करणे चुकीचे आहे, ह्या सर्व अटक आणी गुन्ह्याची तपासणी राज्याकडे दिली आहे. (विलासरावांना डोळ्याने खुणावतात)
विलासराव :- आताच आबा पाटलांनी सांगीतल्याप्रमाणे ..
आबा :- मी कधी काय सांगीतले ? उगाच त्या चॅनेल वाल्यांसारखे वागु नका. साहेब, तुम्ही काहितरी बोला ना.
शरदराव :- आपण एक कमिटि स्थापन करुन आपदग्रस्तांना सह्हाय केले पाहिजे, त्यांची कर्जे माफ़ केली पाहिजेत आणी त्याना आर्थिक सह्हाय केले पाहिजे. मी ह्या कमिटि चा अध्यक्ष व्हायला तयार आहे.
राहुल गांधी :- पण आता आम्ही तुम्हाला पैसे खायची संधी द्यायला तयार नाहिये. हो कि नाहि ग मॉम ?
(सोनीयाजी अल्वा मॅडम चा एस.एम.एस. वाचण्यात मग्न आहेत.)
अबु आझमी :- आतापर्यंत झालेल्या सगळ्या बॉंबब्लास्टची परत चौकशी झाली पाहीजे, अफ़जल गुरु सारख्या निरपराध माणसांना सोडुन द्या. हे सगळे स्फोट संघ परिवार, भाजप, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणी बाळासाहेबांनी केले आहेत.
उध्दव :- तोंड सांभाळ रे ए आबु ! बाळासाहेबांचा अपमान म्हणजे संपुर्ण हिंदु समाजाचा अपमान. पाय ठेवु द्यायचो नाहि तुला मुंबईत !
राहुल :- मॉम, बाळासाहेब म्हणजे ते देशाची घटना लिहिणारे ना ?
सोनीया :- हुह्ह ! अरे ते आबासाहेब, बालासाहाब म्हणजे देशातील मुलींची पहिली शाळा काढणारे.
(वरिल ज्ञान ऐकुन इटलीहुन मागवलेल्या कोचावर स्मशान शांतता)
अबु :- इतनाच कर सकते तुम लोगा, सच्ची बातां बहोत कडवी लगती.
मोदि :- ए कडु अरे बस्स खाली !
मनमोहनजी :- काहि वेळा तपासकामात एका विशिष्ठ समाजाला लक्श्य केले गेले हे खरे आहे, मी त्यांची माफ़ी मागतो. पण त्या समाजानेही पुढे येउन हे थांबवायचे प्रयत्न केले पाहिजेत.
उद्धव :- कुरवाळा अजुन त्यांच्या दाढ्या.
जावेद अख्तर :- मनमोहनजी, हे ब्लास्ट म्हणजे इतकी वर्षे तळागाळात राहिलेल्या आणी सतत अपमानीत केल्या गेलेल्या समाजाच्या अस्वस्थपणाचे, वेदनेचे हुंकार आहेत.
राहुल :- म्हणजे नक्की काय आहेत ग मॉम ?
सोनीयाजी :- म्हणजे काय ते आता त्यांना पण सांगता येइल का नाही काय माहित ?
मोदि :- तुमच्या असंख्य हुंकारा नंतर हिंदुंनी एक भुभु:कार केला तर काय बिघडले मग त्यात ?
अमरसिंह :- अन्याय अन्याय .. साला अन्याय करता है, आंय ! अग्नीपथ अग्नीपथ ...
लालक्रुष्णजी :- (मोदिंकडे बघत) आता येणार्‍या निवडणुकीत जनताच याचे उत्तर देइल. समजले ? मग पंतप्रधान मीच आहे म्हटले. (मोदि आणी उद्धव एकमेकांकडे बघुन अर्थपुर्ण हसतात.)
विलासराव :- आम्ही छातीचे कोट करुन सर्वांचे रक्षण करु, सर्व प्रकारची मदत पुरवु.
राहुल :- येव्हडे सगळे करता येणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विजेचे बिल का भरत नाहि बुवा ?
(ह्या वेळी हिरव्या व भगव्या दोन्ही कोचावर खस खस)
मनमोहनजी :- आपण सर्वांनी एक होउन समजुतीने ह्यातुन मार्ग काढुया आणी हाथात हाथ घालुन पुढे जाउयात. आता आपण जेवणासाठी थोडी विश्रांती घेउयात. जयहिंद, जय जवान
शरदराव :- जय किसान !

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Nov 2008 - 1:49 pm | टारझन

मला वाटलं काही पुन्हा समिक्षा आली का काय ?

बाकी हा लेख "सिंग इज किंग" च्या तुलनेचाच आहे यात शंकाच नाही...

- टारझनकुमार

रामपुरी's picture

15 Nov 2008 - 5:53 pm | रामपुरी

अगदी बरोबर!!!

राम दादा's picture

20 Nov 2008 - 2:56 am | राम दादा

आ लेकाच्या लालुला पण टाकला असता तर्...जरा मिटिंग जोरात झाली असती...

आणि राज असता तर ..बोलुच नका..

जय महाराष्ट्र.
राम दादा..

घाटावरचे भट's picture

15 Nov 2008 - 1:53 pm | घाटावरचे भट

>>लालजी :- शांत गदाधारी भिम शांत !
=))

अनिल हटेला's picture

15 Nov 2008 - 1:58 pm | अनिल हटेला

:D :-D :D :-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

संताजी धनाजी's picture

15 Nov 2008 - 2:08 pm | संताजी धनाजी

फारच महान लिहीले आहे :)

- संताजी धनाजी

विसोबा खेचर's picture

16 Nov 2008 - 1:03 am | विसोबा खेचर

फारच महान लिहीले आहे

हेच म्हणतो..! :)

मैत्र's picture

20 Nov 2008 - 10:00 am | मैत्र

जहबहरा!! कुठल्या कुठल्या डायलॉगचं कौतुक करावं... सगळंच बेष्ट.
अटलबिहारी, रितेश, बालासाहेब, वीज बिल, अमरसिंग, आर आर - चॅनेल आणि गाय छाप :)
एक एक सिक्सर आहेत..
हे म्हणजे सगळ्याच विकेट एकाच बॉलरने सलग घेण्यासारखं आहे... जियो!!

योगी९००'s picture

15 Nov 2008 - 4:45 pm | योगी९००

:))खुप मजा आली वाचून.. :)

लालक्रुष्णजी :- (हळुच शत्रुघ्न सिन्हाच्या कानात) आपण अटलजींना आणायला हवे होते, मग कळाले असते ह्या अख्तरांना कविता काय असते ते.

हा हा हा...

विलासराव :- (मनातल्या मनात) च्या आईला असा आवाज लावता यायला पाहिजे, आमचे ध्यान रितेश हे कधी शिकणार काय माहित...

खो खो खो...

संपूंर्ण लेख
सात मजली =))

वेताळ's picture

15 Nov 2008 - 5:54 pm | वेताळ

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
बस खुप हसलो
वेताळ

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 5:57 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अरे हे आपल्या झक्याने नाव बदलले की काय :?

सांगत जा रे बाबा... ह्या वयात बिल्ला नंबर लक्ष्यात नाय राहत रे लेका ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2008 - 1:15 am | बिपिन कार्यकर्ते

उच्च...

बिपिन कार्यकर्ते

दिपोटी's picture

16 Nov 2008 - 6:30 am | दिपोटी

राजकुमारभौ,

एकाहून एक सरस संवाद !

भट्टी छान जमली आहे !

- दिपोटी

दिपोटी's picture

16 Nov 2008 - 6:31 am | दिपोटी

राजकुमारभौ,

एकाहून एक सरस संवाद !

भट्टी छान जमली आहे !

- दिपोटी

मराठी_माणूस's picture

16 Nov 2008 - 11:18 am | मराठी_माणूस

सोनीया :- सिट क्वाएट, हे सगळे बघुन आणी शिकुन घे, तुला आता ह्याची सवय व्हायला हवी, भावी पंतप्रधान आहेस तु ह्या देशाचा !

हे वाक्य मला विनोदि का वाटत नाहीय्ये :?

विनायक प्रभू's picture

16 Nov 2008 - 1:01 pm | विनायक प्रभू

हा विनोद नेहमी झालेला म्हणुन.

भास्कर केन्डे's picture

16 Nov 2008 - 11:32 am | भास्कर केन्डे

खूप हसवले भौ तुम्ही! मस्त खुसखुशीत लेखन.

असेच येऊ द्या... मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की. :)

आपला,
(ह ह लो पो) भास्कर
आम्ही येथे वसतो.

स्वाती दिनेश's picture

16 Nov 2008 - 1:19 pm | स्वाती दिनेश

झक्कास ! लेख आवडला..
स्वाती

केवळ_विशेष's picture

17 Nov 2008 - 2:25 pm | केवळ_विशेष

अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.

लै हसलो बॉ...:)

एक नंबर...

स्वप्निल..'s picture

20 Nov 2008 - 3:06 am | स्वप्निल..

हे वाक्य वाचुन मी पण खुप हसलो...

राहुल :- मॉम, बाळासाहेब म्हणजे ते देशाची घटना लिहिणारे ना ?
सोनीया :- हुह्ह ! अरे ते आबासाहेब, बालासाहाब म्हणजे देशातील मुलींची पहिली शाळा काढणारे.
(वरिल ज्ञान ऐकुन इटलीहुन मागवलेल्या कोचावर स्मशान शांतता)

हहपुवा....

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

स्वप्निल..

छोटा डॉन's picture

17 Nov 2008 - 3:05 pm | छोटा डॉन

अप्रतिम लेख, चुअफेर फटकेबाजी ...
कधी काळी पेप्रात येणार्‍या "ब्रिटीश नंदी" ची आठवण झाली ...

मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की.

+१, केन्डेसाहेबांशी सहमत ...
अजुन येऊ द्यात, पुलेशु.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन's picture

17 Nov 2008 - 3:05 pm | छोटा डॉन

अप्रतिम लेख, चुअफेर फटकेबाजी ...
कधी काळी पेप्रात येणार्‍या "ब्रिटीश नंदी" ची आठवण झाली ...

मंदिमुळे येणार्‍या डिप्रेशन मध्ये असले लेखन लोकांना दररोज वाचयाला दिलेत तर तुम्हाला आषाढीला पायी पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळेल हे नक्की.

+१, केन्डेसाहेबांशी सहमत ...
अजुन येऊ द्यात, पुलेशु.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2008 - 5:47 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हा सगळ्यांच्या विनंतीला मान देउन, लवकरच नविन लेख घेउन येत आहे.. 'सखी मदिरा' ! तुम्हा सर्वांचे कौतुक असेच लाभत राहो, हि ईश्वर चरणी प्रार्थना ___/\___

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

राघव's picture

17 Nov 2008 - 4:23 pm | राघव

हाहाहा..
लय भारी! युपी/बिहार अन् मराठी वर पण येऊ द्यात!!
मुमुक्षु

अनामिका's picture

17 Nov 2008 - 4:34 pm | अनामिका

अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.

हा पंच एकदम भन्नाट =)) =)) =)) =))
मस्तच लिहिल आहेत राजकुमार !
कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ?
"अनामिका"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2008 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.

=))

कस काय सुचत तुम्हां सगळ्यांना हे असल झक्कास लिहायला ?
+१

(पुढच्या इनिंगच्या प्रतिक्षेत)अदिती

शंकरराव's picture

17 Nov 2008 - 8:56 pm | शंकरराव

व्व्वा !! :)

लै भारी . लिखाण शैली , विनोदाच्या जागा .... क्या बात है

शंकरराव

प्राजु's picture

17 Nov 2008 - 10:19 pm | प्राजु

मस्त लिहिलं आहे.
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.

हा एकदम सिक्सर होता... मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Nov 2008 - 8:34 am | डॉ.प्रसाद दाढे

हसून हसून मेलो!