लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच.
आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो.
मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो.
त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते.
आज ४ दिवस झाले त्या माउलीने जेवण घेतले नाही. शुद्धिवर नसल्यामुळे दवाखान्यात अडमिट आहे. छोट्या बाळाला जवळ घेतले नाही ४ दिवसात.
सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाचा लबाडपणा. एका चिमुकलीवर ४ जण बलात्कार करतात, जीवे मारतात आणि ह्यांना आपल्या हॉटेलचे नाव सांभाळायचे आहे.
देवा! काय हे प्रसंग कोसळताहेत एकामागून एक.
आपण काहीच करू शकत नाही का?
(संपादित)
प्रतिक्रिया
19 Feb 2015 - 3:09 pm | पिंपातला उंदीर
ओ काय कळत कि नाही तुम्हाला ? बलात्कारासारख्या निर्घुण प्रकरणातील पिडितिचे नाव घोषित करू नये असा एक संकेत आहे . सगळे प्रसारमाध्यम तो कसोशीने पाळतात . तुम्ही त्या दुर्दैवी मुलीचे नावआणि पार्श्वभूमी बिनदिक्कत एका संकेतस्थळावर घोषित केलत . याचा परिणाम त्या परिवारावर काय होऊ शकतो याची कल्पना आहे का तुम्हाला ? मी संपादकांना विनंती करतो कि एक तर रद्दड धागा उडवा किंवा मुलीचे नाव तरी संपादित करावे . धन्यवाद
19 Feb 2015 - 3:16 pm | असंका
आपलं म्हणणं बरोबर आहे. नुसता संकेत नाही तर कायदा पण आहे तसा.
पण जरा संयमाने लिहिता आलं असतं ... त्यांच्या जवळचं कुणीतरी दिसतं आहे!
19 Feb 2015 - 5:49 pm | भिंगरी
पण आजच्या सकाळ या व्रुत्तपत्रामध्ये या मुलीचे नाव जाहिर झाले आहे म्हणून मी लिहीले.
आणि मी त्या परिवाराशी बोलले आहे.
19 Feb 2015 - 3:12 pm | सुहास झेले
संताप चीड उद्वेग समजू शकतो, पण त्या मुलीबद्दल कुठलीही माहिती बाहेर यायला नकोय. मुलीबद्दलची माहिती संपादित करावे ही विनंती..
19 Feb 2015 - 3:32 pm | पिंपातला उंदीर
एका चुकीच समर्थन म्हणून दुसर्या चुकीच उदाहरण देण बरोबर आहे का ? बाकी चालू द्या
19 Feb 2015 - 3:33 pm | शिवमुद्रा
जे उघड आहे ते का झाकुन ठेवाय्चे?
19 Feb 2015 - 3:37 pm | नाखु
तक्रारी कडे अक्षम्य दुर्लक्ष केले असे काल एबीपी वर स्वतः नातेवाईकच सांगत होते ! इतकी माणुसकी शिल्लक नाही का त्या पोलीसांत ????
याही प्रकारात वेळ काढूपणा होईल याची खात्री झालेला.
नाखु.
19 Feb 2015 - 3:39 pm | अमित मुंबईचा
अरे विषय काय आणि चाललाय काय
19 Feb 2015 - 3:41 pm | मदनबाण
इतकी माणुसकी शिल्लक नाही का त्या पोलीसांत ????
हल्ली माणुसकी कुठे आणि कोणात शिल्लक आहे ? हेच शोधायचे दिवस आहेत नाखुराव ! :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
19 Feb 2015 - 3:42 pm | गिरकी
या धागाकर्ती वर नाव जाहिर केल्याबद्दल राळ उडवणे चूक आहे.
मटा नेच त्या बिचाऱ्या मुलीचे नाव जाहिर केले आहे.
बाकी घटनेबद्द्ल काय बोलावं ते सुचत नाही. दुर्दैवी …
19 Feb 2015 - 3:51 pm | माहितगार
दुर्दैवी घटना,
नेमक माहित नाही पण जिथ पर्यंत कायद्याचा प्रश्न आहे, बहुधा पिडीत व्यक्ती जिवंत असेल तर नाव जाहीर करता येत नाही. मृत व्यक्तीचे नाव कदाचित करता येत असावे तरीही कुटूंबाला त्रास होणारच म्हणून नाव टाळलेले बरे आणि तसा स्पष्ट मिपा धोरण बनवलेले बरे म्हणजे मिपा संपादकांना नेमकी एकच भूमीका ठेवणे सोपे जाईल असे माझे व्यक्तीगत मत आहे.
19 Feb 2015 - 5:51 pm | भिंगरी
मी मान्य करते.आपण योग्य शब्दात माझी चूक जाणवून दिलीत.
19 Feb 2015 - 10:35 pm | आशु जोग
भिंगरीजी
एक गोष्ट मला नेहमी जाणवते. एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण हळहळ व्यक्त करतो. गुन्हेगारापेक्षा पोलिसयंत्रणेवर राग व्यक्त करतो. पण पोलिस तरी गुन्हा घडण्यापूर्वी कसा रोखणार...
ही मुलगी इतकी लहान आहे. तिला स्वतःला आजूबाजूचे धोके लक्षात येणे शक्य नाही.
इथे समाजामधे संस्कार नीटपणे करण्याची गरज आहे.
20 Feb 2015 - 12:26 pm | भिंगरी
आपले म्हणने ठीक आहे की पोलीसांना गुन्हा रोखणे कठीण आहे पण झालेल्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.इथे कोणाच्याही दबावात न रहाणे गरजेचे आहे.पण आपले दुर्दैव! पोलीसांना कोणाच्या ना कोणाच्या दबावतच काम करावे लागते.आणि हे सत्यच आहे.इथे कोणीही काहीही प्रतिक्रिया दिली तरी सत्य बदलणार नाही.
20 Feb 2015 - 3:51 pm | आशु जोग
काय झालं पोलिसांनी काय केलं.... जरा नीट सांगा... आम्हाला कळू द्या भिंगरी ताई / भाऊ काय असेल ते
19 Feb 2015 - 3:52 pm | असंका
इतरांनी केलं ते का आणि कोणत्या परीस्थितीत केलं ह्यावर चर्चा करू नका. आय पी सी सेक्शन २२८ अ बघा आणि ठरवा की धागा ठेवायचा की काढायचा...
19 Feb 2015 - 3:54 pm | पिंपातला उंदीर
http://www.thehoot.org/web/home/cyber2.php?cid=51&sid=6299
हे वाचा आणि बघा काही प्रकाश पडतो का ? आणि दुसर्या चुकीच उदाहरण देऊन स्वतःची चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका
19 Feb 2015 - 4:13 pm | मृत्युन्जय
कदाचित त्यांना असे म्हणायचे असावे की नाव आधीच मिडीयामध्ये आले आहे. त्यांनी शोधुन काढुन ते लोकांना सांगितलेले नाही. किंवा असे नाव जाहीर करण्याची त्यांची कही इच्छा नव्हती.
एक गोष्ट ते विसरत आहेत की जेव्हा वृत्तपत्रात आधी बातमी आली ती केवळ खुनाची होती. लैंगिक गुन्ह्याचा संशय होता. आता जेव्हा बलात्काराचा आरोप आहे तेव्हा नावे देणे चुकीचे होइल. वृत्तपत्रांनी जे केले तो कदाचित अपराध नसेल (कारण बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नव्हता). आता तो अपराध होइल.
19 Feb 2015 - 4:21 pm | संदीप डांगे
सामन्यात: वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या ह्या "अमुकवर बलात्कार झाला" अशाच असतात. इथेच समाजाचे, व्यवस्थेच्या मनाचे प्रतिबिंब दिसते.
चोरी, दरोडे किंवा खून यांची बातमी देतांना "अज्ञात इसमांनी चोरी केली, हल्ला केला, दरोडा घातला"
अशी बातमी देणारे पत्रकार "अमुक महिलेवर, महाविद्यालयीन तरुणीवर, अल्पवयीन मुलीवर, शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाला " अश्याच बातम्या देतात.
बरेचदा वाटते की हे असल्या बातम्या देणे चित्रपटात बलात्काराचा सीन दाखवण्यासारखे आंबटशौकीन लोकांच्या भावना चाळवणारे कृत्य आहे.
जसे मुस्लिम समाजाने केलेल्या हिंसक दंग्याला शिक्युलर वर्तमानपत्रे "विशिष्ट समाजाची प्रतिक्रिया" म्हणून सौम्य करून टाकतात तसेच बलात्कारपिडीत वृत्त देण्याऐवजी बलात्कार करणाऱ्याचे वृत्त देऊन त्याची बदनामी का करू नये? मकडी चित्रपटाची अभिनेत्री कुणासोबत हॉटेलमध्ये पकडली गेली तर तिचा कोण उदो उदो चालवला गेला पण तिच्यासोबत ते महाशय कोण होते ते कधीच बाहेर आले नाही का आपल्या निर्भीड, निष्पक्ष पत्रकारांना त्याचे काही पडलेले.
बातमी देण्याच्या ह्या प्रकाराने पिडीत हीच कशी दोषी असते ह्या समाजाच्या मूर्ख भावनेला अजून खतपाणी घातल्या जाते. जो पर्यंत बालात्काराकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काही खरे नाही.
20 Feb 2015 - 8:50 pm | प्रदीप
तसेच बलात्कारपिडीत वृत्त देण्याऐवजी बलात्कार करणाऱ्याचे वृत्त देऊन त्याची बदनामी का करू नये?
तुम्ही म्हणता तशी बदनामी केली जातेच, आणि ते अत्यंत चुकीचे आहे. अनेकदा भारतीय वर्तमानपत्रांच्या क्राईम रीपोर्टिंगमधे कायद्याच्या दृष्टीने कुणालाच काही चूक कसे वाटत नाही, ह्याचे मला आश्चर्य वाटत आलेले आहे. परदेशात अशा बातम्या देतांना 'alleged (culprit)', अथवा "Mr. XYZ was arrested yesterday for allegedly raping and killing.....' अशी वाक्यरचना असते. ह्यात निव्वळ कायद्य्याच्या दृष्टीने ते बरोबर असावे हे तर आहेच, पण त्यामागील भूमिका अशी की सर्व पोलिसतपास पूरा होऊन, केस कोर्टात उभी राहून संबंधित व्यक्तीवरील आरोप जोंवर कोर्ट मान्य करून त्यास गुन्हेगार ठरवत नाही, तोंवर ती व्यक्ती केवळ आरोपी आहे, गुन्हेगार नाही. आपल्या येथेतर आता गुन्ह्याविषयी बातम्या देतांना सर्रास संबंधित पोलिसही 'अमुकतमुअक्ने असे केले/ तसे केले' इत्यादी सांगतांना दिसतात!
21 Feb 2015 - 1:20 pm | संदीप डांगे
तुमचा मुद्दा बरोबरच आहे. गुन्हा सिद्ध होण्याआधीच आपल्याकडे भावनाआधारित मिडिया ट्रायल किंवा मॉब ट्रायल केली जाते.
हा विषय मोठा खोल आहे. ह्या प्रकाराला खूप बाजू आहेत.
19 Feb 2015 - 5:03 pm | आतिवास
पीडित स्त्रीची ओळख (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने) इतरांच्या लक्षात येईल अशी कोणतीही माहिती सार्वजनिक रीत्या प्रसिद्ध करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे.
संपादक, कृपया हा धागा अप्रकाशित करावा ही विनंती.
19 Feb 2015 - 5:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सद्ध्या एवढे वाईट दिवस आलेले आहेत की बहुतेक वर्तमान पत्रामधे बलात्काराची बातमी तयारचं असते म्हणे. फक्त वेळ, स्थळ आणि सामुहिक का एकट्यानी एवढाचं मथळा बदलतात. :(
एक दिवस असा यायला हवा ली गंगाजल चित्रपटामधलं एक आणि एक दृष्य सत्य व्हायला हवं. गुन्हेगार रंगेहात सापडला की त्याला अत्यंत यातनामय मरण हाच एक उपाय शिल्लक रहायला हवा. बस्सं. कायद्यानी होत नसेल तर समुहशक्तीनी तरी अश्या अपप्रकारांना आळा बसायलाच हवा. त्यापाठोपाठ मानवतेच्या नावानी गळे काढणार्या एन.जी.ओ. वाल्यांना पाठवायचं. पिडीतांच्या ह्युमन राईट्स ला काहीचं महत्त्व नाही का?
19 Feb 2015 - 5:29 pm | काळा पहाड
पाठोपाठ नव्हे आधी. ह्यूमन राईट्स वाल्यांना आधी घालवायला हवं वर.
19 Feb 2015 - 5:28 pm | काळा पहाड
मुख्य म्हणजे मॉबनं ते हॉटेल जाळून टाकायला हवं होतं आणि त्यात यांच्या घरच्यांना पण टाकून द्यायला हवं होतं. आणि मग या सगळ्यांना जागीच ठेचून ठेचून ठार करायला हवं होतं. मॉबवर गुन्हा दाखल होत नाही. बाकी इथं मिपा वर अशा हरामखोरांना पण जगण्याची संधी द्यायला हवी म्हणून बोलणारे ह्यूमन राईट्स वाले आहेतच.
19 Feb 2015 - 5:56 pm | भिंगरी
मुलीबद्दलची माहिती संपादित करावे ही विनंती..
19 Feb 2015 - 9:29 pm | अभिजित - १
मोदी साहेब -
आम्ही जुनाट कायदे बदलू .. कालबाह्य कायदे काढून टाकू, ( पहिल्या महिन्यातील वाक्य. काय झाले इथे ? )
आताच परवा बोलले कि भारतीय न्याय व्यवस्थेवर जगाचा विश्वास ( मोठ्ठा जोक )
दिपक पारेख HDFC - अजून काहीही बदलेले नाही मोदी आल्याने काहीही बदल झाला नाहीये . ( वेगळ्या संदर्भात )
अजून हि देवेंद्र सरकारचे भ्रष्टाचारी बाबुना संरक्षण .. लाचखोरांचे लाड http://www.loksatta.com/sampadkiya-news/pampering-to-bribe-takers-1072976/
कमीत कमी रेपिस्ट लोकांना तरी त्वरित फाशी देऊन न्याय करावा .. नाही तर भाजप काय परत येत नाही राज्यावर ..
19 Feb 2015 - 9:57 pm | अर्धवटराव
झालेला गुन्हा आणि व्हिक्टीमची माहिती सार्वजनीक होणं, यांत दुर्दैवी असं काहि नाहि. हा प्रताप निसर्गाने/दैवाने केलेला नाहि. निव्वळ दुर्दैव म्हणुन याकडे बघु नये. हा मानवी गुन्हा आहे. गुन्हे तपास/कंट्रोल करणार्या यंत्रणा जर शिथील झाल्या असतील तर जनतेने थोडी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी.
20 Feb 2015 - 12:36 pm | गवि
या मुलीविषयी वाचून अत्यंत हळहळ वाटली. लहान मुलांना कोणी कुठे नेऊच नये की काय, किंवा नेलेच तर त्यांची इकडेतिकडे हुंदडण्याची मोकळीक नष्ट करुन सतत वॉच ठेवून असावे काय असे विचार सतत येत राहिले. आमच्या लहानपणी एखाद्या लग्नात आम्ही पोरं गेलो की सतत इकडेतिकडे सुसाट वेगाने हुंदडत राहायचो आणि वधू अथवा वरपक्ष वगैरे काही माहीत न करुन घेता आपल्या वयाची जी पोरं दिसतील त्यांच्यासोबत त्या काळापुरती गाढ मैत्री करुन मुदपाकखान्यापासून ते गच्चीपर्यंत कुठेही लपाछपी, पकडापकडी खेळत असायचो.
अशा ठिकाणी सात वर्षाच्या पोरीबाबत असा विचार करुन कोणी तिला उपभोगून टाकून देत असतील या कल्पनेने अंग सतत शहारत आहे.
या सर्वानंतर त्या हॉटेल / रिसॉर्टवर लोकांनी हल्ला करुन मोडतोड केल्याचं वाचलं.
हा आणखी एक वेगळा मुद्दा. गुन्हेगाराला सजा मिळेल किंवा काही होईल. पण अशा अनेक घटनांमधे त्या त्या हॉटेलचं जे आर्थिक व्यावसायिक आणि रेप्युटेशनचं नुकसान होतं त्याला जबाबदार कोण असणार? नाहीच कोणी.. आणि त्याबद्दल हॉटेल कोणाकडे काही दाद मागूही शकेल असं वाटत नाही.
अशी अनेक हॉटेल्स, रिसोर्ट, शाळा, कॉलेजेस, वगैरे असतील की ज्यांचा उपयोग कधीतरी गुन्हेगारांनी केला आणि त्या हॉटेलचं / संस्थेचं नाव बदनाम होऊन बसलं. (उदा. बंगलोरची शाळा) सुरक्षिततेची जबाबदारी त्यांचीही असते हे मान्य पण कोणाकोणावर किती कॅमेरे लावणार अन किती संशय घेणार ते तरी.
20 Feb 2015 - 1:58 pm | शिवमुद्रा
तसे पन ह्या मधे होतेल चि काय चुक?
20 Feb 2015 - 2:54 pm | काळा पहाड
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 03:30 AM IST
पुणे - अल्पवयीन मुलीस निर्जनस्थळी नेऊन दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सिंहगड रस्त्यालगत कॅनॉलजवळ बुधवारी (ता. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संजय अंकुश हळंबे (वय 27) आणि सोमनाथ सर्जेराव पासलकर (वय 23, रा. रायकर मळा, धायरी) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी 12 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी बुधवारी सायंकाळी तिला शाळेतून घराजवळ सोडले. ती घरी जाताना दोन तरुणांनी तिचे तोंड दाबून अपहरण केले. तिला जबरदस्तीने दुचाकीवरून नांदेडफाटा येथील कॅनॉलजवळ नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तिला घराजवळ सोडून दिले. पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणीस सांगितला. बहिणीने ही बाब शहर नियंत्रण कक्षास कळविली. त्यानंतर सिंहगड पोलिस पीडित मुलीच्या घरी पोचले. त्यांनी मुलीस विचारणा केल्यानंतर तिने आरोपी आणि दुचाकीचे वर्णन सांगितले. त्यावरून पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कोळी, सहायक निरीक्षक जे. सी. गडकरी, कल्याणी पाडोळे, कैलास मोहोळ, किरण देशमुख, राम पवार, पांडुरंग वांजळे या कर्मचाऱ्यांनी धायरीचा परिसर पिंजून आरोपींना चार तासांत अटक केली.
आरोपी हळंबे हा पेंटर असून, विवाहित आहे; तर पासलकर हा रिक्षाचालक आहे. पोलिसांनी दोघांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
20 Feb 2015 - 2:55 pm | काळा पहाड
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015 - 02:45 AM IST
सहकारनगर - अल्पवयीन मुलीला धाक दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. देविदास ननावरे (वय 45, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीच्या (वय 12) पोटात दुखत असल्यामुळे तिला दवाखान्यात नेले होते. डॉक्टारांनी सोनाग्राफी केली. त्या वेळी ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
20 Feb 2015 - 3:00 pm | काळा पहाड
ही सकाळची बातमी: http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5735848851114377434&Se...
संपूर्ण नाव दिलेलं आहे. बेअक्कल बिनडोक पवार कुटुंबीयांकडे वर्तमानपत्र नावाची न पेलणारी जबाबदारी दिली की काय होतं त्याचं हे उदाहरण.
20 Feb 2015 - 8:10 pm | वगिश
अहो आधी फक्त खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्याची बातमी आहे हि. सकाळ सोबत म टा ने ही अशीच बातमी दिली होती.
20 Feb 2015 - 8:26 pm | काळा पहाड
अहो, बातमी नीट वाचा. तारीख पहा बातमीची. गुरुवार, 19 फेब्रुवारी 2015 - 03:45 AM IST. लोणावळा 'बंद'ला हिंसक वळण. कालची बातमी आहे. रेप झालाय हे १८ तारखेलाच कळालं होतं. http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5492160835026235676&S...
इंग्लिश एडिशन मध्ये कशी बातमी मग? भांग खाऊन बातम्या देतात का?
बाकी महाराष्ट्र टाईम्स ने पण तशीच बातमी दिली म्हणून ती गोष्ट समर्थनीय ठरते का?
22 Feb 2015 - 3:51 pm | अर्जुन
मला असे वाटते, सकाळव अर्थात पवार त्यांचा परंपरेप्रमाणेच वागले आहेत.त्यांना पिडीत कुटुंबापेक्षा कुमार रीसार्ट्चा नुकसानीचे अधिक दु:ख आहे.
23 Feb 2015 - 9:03 pm | शिवमुद्रा
दापूर येथील जैन कुटुंबातील ७ वर्षीय मुलगी लग्नसमारंभातून बेपत्ता झाली होती.
Feb 23, 2015, 08.00PM IST
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Rape-and-...