स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी...
* स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
* आपणास फ्लू किंवा साधी सर्दी झाली आहे हे कसे ओळखावे ?
फ्लू किंवा सर्दी ओळखण्यासाठी एक खुण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरुपाची असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
स्वाईन फ्लू मुळे कोणाला व कोणता धोका असू शकतो ?
स्वाईन फ्लूचा तीव्र प्रभाव झालेल्या व्यक्तींना खाली नमूद केल्याप्रमाणे धोका असू शकतो.
*. मोठया कालावधीसाठी फुफ्फुसाचे विकार उद्भवतात. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दम्यावर उपचार घेतले आहेत अशांनाही हा त्रास उद्द्भवतो.
*. तीव्र हृदयविकार
*. तीव्र मूत्रपिंडाचे विकार
*. तीव्र यकृताचे विकार
*. तीव्र न्युरोलोजिकल विकार
एच १ एन १ पासून बचाव करण्यासाठी
*. खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा. वापरून झाल्यावर टिश्यू पेपर फेकून दयावा.
*. डोळे, नाक, तोंड यांना सतत हात लावू नये.
*. आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नये.
*. फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.
*. खबरदारी घेण्याच्या संदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे पालन करा.
*. डॉक्टरांच्या मते मास्क पेक्षा स्वच्छ हात रुमालाचा वापर फायदेशीर ठरतो.
स्वाईन फ्लू न होण्यासाठी घ्यावयाची काळजी काय करावे आणि काय करू नये ?
*. आपले नाक व तोंड रुमालाने झाकावे, शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. वापर झाल्यावर टिश्यू फेकून दयावा.
*. आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषतः शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धुवावेत.
*. आपल्या डोळ्यांना नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे, आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
*. तुम्हाला सर्दी, खोकला यापैकी काही लक्षणे टाळावे, आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी.
*. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.
*. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांच्याशी संपर्क टाळावा.
*. भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या.
*. आपण आजारी असाल तर घरीच रहावे जर शक्य असेल तर आपल्या शाळा व्यवसाय यांपासून दूर रहावे.
*. रुग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
*. घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी खिडक्या उघडया ठेवाव्यात.
*. आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे.
स्वाईन फ्लूवर औषधोपचार कोणते ?
प्रतिबंधक औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून किंवा त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून दिली जातात. टामी फ्लू किंवा रिलेंझा ही औषधे स्वाईन फ्लूवर उपचार म्हणून दिल्या जातात. ही प्रतिबंधक औषधे विषाणूंचे पुनरुत्पादन थांबवतात. लक्षणे दिसण्याच्या ४८ तासांच्या आत ही औषधे घ्यावी लागतात. ही औषधे योग्य वेळेवर घेतल्यास फ्लूचा कालावधी १ ते २ दिवसांनी कमी करता येतो. ही औषधे ५ ते ७ दिवसांसाठी दिल्या जातात. ही औषधे फ्लूपासून पूर्णतः बचाव करू शकतात जी नाही हे अद्यापही अस्पष्ट असेच आहे. टामी फ्लू फक्त १ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना दक्षता म्हणूनही दिले जाऊ शकते. परंतु ही औषधे आरोग्य खात्याच्या व्यावसायिकांद्वारे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच दिली जातात.
औषधांचा प्रादुर्भाव
या प्रतिबंधात्मक औषधांमुळे उदासिनता, धडधड वाढणे, भीती वाटणे, एकग्रता कमी होणे व उलटया होणे यांसारखे प्रादुर्भाव होऊ शकतात. ज्यांना श्वसनाचा आधी पासूनच त्रास आहे, दमा अशांना रिलेंझा हे औषध देता येत नाही. कारण यामुळे श्वसनाचे अधिक समस्या उद्भवू शकतात. या प्रादुर्भावाविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
आपण त्वरीत काय केले पाहिजे ?
जर आपण गेल्या दहा दिवसात प्रादुर्भाव असलेल्या भागातून किंवा देशातून प्रवास केला असेल व जर स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसत असतील तर सरकारी दावाखान्यांशी संपर्क साधावा.
उपचार
आता स्वाईन फ्लू वर प्रतिबंधात्मक लस निघाली आहे. ती नाकाद्वारे किंवा टोचून घेता येते. वरीलपैकी काहीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा.
प्रतिक्रिया
19 Feb 2015 - 7:28 pm | स्वैर परी
खुप उपयुक्त माहिति.
20 Feb 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे
20 Feb 2015 - 10:17 am | रुस्तम
उपयुक्त माहिती... धन्यवाद
20 Feb 2015 - 8:49 am | सुनील
काय बाता मारता राव?
झाडं लावा, स्वाईन फ्लू पळवा!!
हाकानाका ;)
20 Feb 2015 - 8:54 am | ज्योति अळवणी
उत्तम माहिती
20 Feb 2015 - 9:24 am | चौकटराजा
हा मौसम सर्दी, श्वासनलिकदाह, यांचा ही आहे. पण हा दोन्हीत मामूली ताप ( तपमापकावर न दिसणारा येतो.). अल्प प्रमाणात डोकेदुखी ही असू शकते. कफ बाहेर काढण्यापुरता आवश्यक खोकला ही येणारच . मग १०० चे वर ताप, कोरडा जबरा खोकला, हुडहुडी व अंग दुखी हे फ्लू वा स्वाईन फ्लूचे निकष मानायचे का ? आवश्यक ती दखल व अनावश्यक घबराट यांचा मेळ घालण्यासाठी हे आवश्यक आहे.
20 Feb 2015 - 12:18 pm | मदनबाण
स्वाइन फ्लू हा तर हृदयविकार!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
HTTP/2 finished, coming to browsers within weeks
HTTP/2 Frequently Asked Questions