मी एक सेकंडह्यांड स्पार्क.गाडी घेतली आहे. हळू हळू शिकणे चालू आहे.परंतु सध्या एक समस्या भेडसावत आहे बरेच परिचित, नातेवाईक हे गाडी मागत असतात. त्यातील काहींना आपण विश्वासाने देवू शकतो परंतु काहींना मात्र टाळायचे असते. त्यांना काहीना काही कारणे द्यावे लागतात नाहीतर शिष्टपणाचा शिक्का मारायला तयार .माझा स्वभाव हा अतिभिडस्त असल्याने सर्वांना टाळता येत नाही .पहिली गोष्ट इतरांची गाडी मागणे हे काही मला योग्य वाटत नाही. परंतु काही जन मात्र बिनदिक्कत गाडी मागतात त्यांना टाळण्यासाठी काय उपाय असतील तर सुचवावे एखाद दुसर्याचा प्रयोग करून बघावे म्हणतो .
प्रतिक्रिया
7 Feb 2015 - 12:05 pm | आनन्दिता
गाडीचा ब्रेक फेल करुन ठेवा.. मागितल्यावर लगेच आदरपुर्वक गाडी द्या.
बादवे तुम्ही अगदी योग्य ठिकाणी सल्ला मागितलाय. मिपाकर असल्या बाबतीत एकसोएक सल्ले देतात.. 8P 8p
7 Feb 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा
एकसोएक सल्ले >> ही धागा १००+ जाणार"च" याची भविष्यवाणी कि खात्री ;)
7 Feb 2015 - 11:19 pm | हाडक्या
आनन्दिता बै, सातार्यात करु नका हो, लईच उतार हैत.. :))))
9 Feb 2015 - 4:43 am | आनन्दिता
चारभिंती वर लैच फेर्या मारल्यात जणु हाडक्याभौ =))
ह. घ्या..
9 Feb 2015 - 5:11 am | हाडक्या
;)
ह्म्म्म्म..
7 Feb 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा
गाडी दुसर्या ड्रायव्हरच्या हातात देत नाही असे सांगावे
किंवा
गाडीची सर्व्हिसींग बाकी आहे ती पण करूनच टाका असे सांगून द्यावी
7 Feb 2015 - 12:11 pm | प्रतापराव
हे सही वाटतेय
7 Feb 2015 - 12:11 pm | जेपी
बाकी आपला पास.
(गाडी मागणर्याकडुन त्रस्त)जेपी
7 Feb 2015 - 12:30 pm | प्रचेतस
आमच्या बोक्याला बसायला गाडी लागते असे सांगा
7 Feb 2015 - 12:39 pm | सुबोध खरे
भीड भिकेची बहीण
स्पष्टपणे एकदाच सांगा कि मला गाडी द्यायला आवडत नाही. गाडी घेतली म्हणून माज आला असे लोक सुरुवातीला बोलतील. परंतु जर गाडी कोणी ठोकली तर होणार्या लफड्यात पडण्यापेक्षा किंवा गाडीची वाट लावली तर होणार्या त्रास पेक्षा हे अंती फायद्याचे ठरेल.
7 Feb 2015 - 12:42 pm | सुबोध खरे
गाडी तुमच्या हातून बिघडली किंवा तुम्ही ठोकली तर होणारा त्रास कमी असतो. मानवी प्रवृत्ती अशीच आहे. खेळणे तुमच्या मुलाने मोडले तर तितके वाईट वाटत नाही पण तेच शेजार्याच्या मुलाने मोडले तर राग येतो.
9 Feb 2015 - 10:40 am | llपुण्याचे पेशवेll
sahamat. KiMwa saMga ki mi gaDi ek haatI tewato.
fakta tumhi dekhil tyachi gadi magu naka nahitar hech uttar parat milel. :-)
7 Feb 2015 - 12:39 pm | मित्रहो
गाडी धक्का मारल्याशिवाय सुरु होत नाही असे सांगा. हवेच असेल तर बॅटरीची वायर ढीली करुन ठेवा.
7 Feb 2015 - 12:47 pm | vikramaditya
चावी देताना फक्त एवढेच सांगा की "मध्ये मध्ये ब्रेक लागत नाही... आतापर्यत दोन-तीनदा मरता मरता वाचलो. तेवढे जरा लक्ष ठेवा."
9 Feb 2015 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
7 Feb 2015 - 12:59 pm | अद्द्या
"गाडी देणार नाहि . "
हे तीन शब्द पुरेसे होतिल असं वाट्टं
7 Feb 2015 - 1:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
माझा स्वभाव हा अतिभिडस्त असल्याने अश्याने नाय जमणार भाऊ!!! , गाडी आपल्या मेहनतीच्या पैश्याची! देणार नाय सांगा तोंडा वर!!! फारच जवळ चा असला तर शांतपाने सांगा "गाडी सिंगल हैंडेड आहे" जर अजुन गळी पडला त म्हणा बाबा तुला कुठे फिरायचे आहे सांग! मी फ़िरवतो!! पर गाडी सोडा
7 Feb 2015 - 1:55 pm | अत्रन्गि पाउस
फारच भिडस्त असाल तर खालील उपाय करावेत ...
--घरात आल्या आल्या दिसेल असे गाडी मागू नये असे ठळक पणे लिहून दिसेलसे ठेवावे (फळा / प्रिंटऔट वगैरे काहीही)
--किल्ली देतांना येतांना पेट्रोल फुल्ल करून आणायला सांगावे ...आल्यावर विचारावे ...उत्तर मिळाल्यावर जाऊन त्यांच्या समोर चेक करावे ...
-- गाडीत समोर दिसेलसा प्रिंटऔट ठेवावा त्यात खालील मुद्दे लिहावेत
किंवा गाडीची किल्ली देतांना लायसन्सची झेरोक्स / १००० रुपये अनामत वगैरे असे मागावे
एक फॉर्म भरून घ्यावा त्यात माग्नार्यचे जास्तीत जास्त तपशील भरून घ्यावेत आणि भरण्यात ३० मिनटे जटील असे बघावे ...(मधून मधून दिलेल्या फॉर्म मधील चुका काढून पुन्हा नवीन भरायला लावावात )...
अजून एक
मेकानिक कडून गाडी १० km / hr पेक्षा जास्त वेगाने जाणार नाही अशी सोय करून घ्यावी ...
- किंवा गाडी नेल्या नेल्या पोलिसांना फोन करून गाडी दमदाटी करून नेलीये असे सांगून नेणार्याचे वर्णन करावे
-जवळच्या मित्रांना,खर्या खोट्या कहाण्या सांगू,, तुम्हाला माज आलाय असे प्रसारित करू देत ...
9 Feb 2015 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
ह्या..., ह्या..., ह्या.... हा जरा जास्तच अत्रन्गिपणा झाला की वो +D
11 Feb 2015 - 3:51 pm | अत्रन्गि पाउस
वाटले काय ??*LOL*
7 Feb 2015 - 2:16 pm | जयन्त बा शिम्पि
माझी गाडी मागणार्यास स्पष्ट्पणे सांगायचो कि जवळपास जायचे तर मीच गाडी चालवीत तुला घेवून जातो, आणि फार लांब जायचे असल्यास, पेट्रोल भर , पाहिजे तेथे सोडतो. एकदा सर्वांना समजुन गेले कि हा काही गाडी देणार नाही , तिथुन कधीही कोणीही माझ्याकडे गाडी मागितली नाही .
7 Feb 2015 - 2:18 pm | गणेशा
सरळ नाही म्हणायचे.
आणि जास्तच जवळईक असेन तर मी गाडी देतो पण चालवणार मी चालत असेन तर गाडी सकट मी पण तुला घ्यावे लागेल असे सांगायचे. मी असे केलेले आठवते. थोडा त्रास स्वताला पण होतो पण पुढच्याला हे कळते की ह्याला स्वतावर विश्वास आहे ह्याची गाडी चालवण्यासाठी पुढील वेळेस तो तुम्हाला विचारायचा नाही सहसा.
हे वर्क झालेले आहे.
7 Feb 2015 - 2:47 pm | नांदेडीअन
ही चांगली कल्पना आहे.
'मलासुद्धा त्याच बाजूला जायचे आहे, सोडतो तुला.', असे कारण सांगून टाकायचे.
एखाद्या वेळी तुम्हाला जावे लागेल त्याच्यासोबत, पण नंतर नाही मागणार तो गाडी.
7 Feb 2015 - 5:00 pm | सिरुसेरि
जे तुमच्याकडे गाडी मागतात , तुम्हीही त्यांच्याकडे अधुन मधुन दुध , दही , ताक , साखर , लोणी , तूप , गूळ , पैसे मागत जा . आपोआपच ते तुम्हाला टाळू लागतील .
7 Feb 2015 - 5:07 pm | ग्रेटथिंकर
स्पष्टपणे माझी गाडी मी कुणाला देत नाही असे सांगावे. खुप गरज असेल तरच विश्वासातल्या माणसांना द्यावी.
ब्रेक कमी लागतो वगैरे कारणे देत बसु नये.
7 Feb 2015 - 5:32 pm | जेपी
काल नाना कडे दिसली तुमची गाडी.
विश्वासु होता काय?
पण ब्रिझर आणी बडवायझर च्या कॉकटेल पिला. त्याच्या नादात ठोकली बघा.
तरी सांगत होतो लै घेत जाऊ नको.
8 Feb 2015 - 3:09 pm | श्रीगुरुजी
>>> खुप गरज असेल तरच विश्वासातल्या माणसांना द्यावी.
निदान माईंना तरी देत जा *LOL*
8 Feb 2015 - 5:54 pm | hitesh
माईंना मी गाडी देईन की !
आतामाझ्याकडे गाडीच नैआणि पाय मोडुन धनगरी औषधाने ठीक झाल्याने सायकलही वापरायच्या लायकीचा माझा पाय नाही, हा भाग निराळा
8 Feb 2015 - 6:00 pm | hitesh
http://www.maayboli.com/node/30337
7 Feb 2015 - 5:08 pm | आनन्दा
गाडी देउ शकत नाही असे स्पष्ट सांगणेच जास्त योग्य.. हवे तर तुमच्या विश्वासातला ड्रायव्हर सुचवा, आणि तो येत असेल तर बघ असे सांगा.
मी माझ्या विश्वासाच्या द्रायव्हरखेरीज कोणाच्याही हातात गाडी देत नाही असे सांगणे योग्य. आणि विश्वास ठेवा यात चूक काहीच नाही. बाकी पेट्रोलचे वगैरे सल्ले लोकांनी तुम्हाला दिलेलेच आहेत. तेव्हा त्याबद्दल बोलत नाही.
7 Feb 2015 - 5:10 pm | आनन्दा
फक्त काहींना का टाळायचे हे तुम्ही सांगितले नाही. तेव्हढे सांगितले असतेत तर विचार करायला सोपे गेले असते.
7 Feb 2015 - 5:23 pm | आदूबाळ
आयुष्यात अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी "समोरचा बोर कशाने होतो" हे जाणणे आणि त्यावरचा अभ्यास वाढवणे हा उपाय मी करतो.
8 Feb 2015 - 3:13 pm | बॅटमॅन
आयला भारी ट्याक्ट आहे.
7 Feb 2015 - 6:29 pm | रेवती
जरा कसंनुसं हसून, "कसं अडचणीत टाकलत बघा, नाही हो, गाडी देता यायची नाही, सॉरी" असे म्हटल्यास राग आला तर येऊदे पण त्यांनी तुम्हाला अडचणीत टाकलं हे तरी त्यांना समजेल. आमच्या ओळखीचे एकजण उलट अडचणीत आणतात. कुठेही जायचं झालं तर "आपण एकत्र जाऊया, आमच्या गाडीतून जाऊया" असे म्हणतात आणि "आज आमची गाडी तुम्ही ड्राईव करा " असा आग्रह करतात. आम्ही नाही म्हणून सांगतो पण एकदा बरेच शॉपिंग होते तेंव्हा त्यांनी गाडी घेऊन जा असा बराच आग्रह केला तर मी तिथून पळून आले. त्यांना एयरपोर्टावर सोडायचे होते तर आमच्या गाडीतून सोडता आले असते पण त्यांच्या घरी पिक अप ला गेल्यावर स्वत:च्या व्ह्यानमध्ये सगळे सामान भरून ठेवले होते. ऐकायलाच तयार नाहीत. मग नवर्याने त्याची गाडी त्यांच्या घरापाशी ठेवली. त्यांच्या गाडीतून त्यांना सोडले. पुन्हा त्यांच्या घरी येऊन गराज उघडून ती गाडी ठेवून स्वत:ची गाडी घेऊन घरी आला.
7 Feb 2015 - 8:27 pm | पैसा
Rc book हरवलय, insurance संपलाय, puc करायचं आहे, यापैकी जे आठवेल ते सांगून टाका.
7 Feb 2015 - 9:00 pm | एस
सदाशिवपेठेत रहायला या. कुणाची हिंमत होणार नाही गाडी काय, पाणीदेखील मागण्याची.
9 Feb 2015 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
धाग्याची शंभरी गाठून द्यायची सुपारी स्विकारलेली स्पष्टपणे दिसतेय ! *lol*
11 Feb 2015 - 4:45 pm | एस
हाहाहा, सुपारीतला तुमचाही वाटा चोखपणे तुमच्यापर्यंत पोहोचविला जाईल..! ;-)
7 Feb 2015 - 10:34 pm | खटपट्या
यावरुन एक किस्सा आठवला !!
माझ्याकडे एक बिघडलेली छत्री होती. ती फक्त मला उघडता यायची. बटण दाबल्यावर विशीष्ट्प्रकारे हलवल्यावरच उघडायची. ओफिसमधे कोणी मागायला आल्यावर मी सांगायचो, की अरे छत्री बिघडली आहे तुला उघडता येणार नाही. तरी एकजण हट्ट् करुन घेउन गेला. जाताना पाउस नव्हता. येताना पाउस भरपूर होता. छत्री उघडली नाही. भिजत आला. आल्यावर माझ्यासमोर छत्री आदळून निघून गेला. :)
7 Feb 2015 - 11:06 pm | गणेशा
किस्सा चांगला आहे हो , पण छत्री वगैरे गोष्टी द्याव्यात हो, त्यामे काही नुकसान होत नाही जास्त.
8 Feb 2015 - 5:15 am | खटपट्या
मी कुठे नाही म्हणालो. बिघडली होती म्हणून दुसर्या कोणाची तरी घेउन जा असे म्हणालो. पण ओव्हर कॉन्फीडन्सने घेउन गेला. बरं उघडत नव्हती तर तिइथून फोनही नाही केला.
बाकी माझे मित्र माझ्या सर्व गोष्टी ग्रुहीत धरतात. माझी बाईकतर मला हवी असेल तेव्हा कोणाकडे आहे हे विचारावे लागायचे. कारण एकाला दीली तर ती परस्पर दुसर्याला दीली जाते, आणि तीसर्यालाही दीली जाते..
7 Feb 2015 - 11:41 pm | काळा पहाड
हे असलं काही करण्यापेक्षा गाडीचा एखादा पार्ट खराब झालाय असं सांगा. काही जटील पार्टस ची नावं लक्षात ठेवा आणि ती वापरत जा. हा सर्वात निर्धोक मार्ग आहे. पार्ट बाजारात अव्हेलेबल नाही किंवा महाग किंमतीत अव्हेलेबल आहे असे सांगा. मागणार्याला शक्यतो तांत्रिक गोष्टींची माहीती नसते. असलीच तर पार्ट अव्हेलेबिलिटी बद्दल माहीती नसते.
8 Feb 2015 - 2:30 am | माम्लेदारचा पन्खा
गाडी कधी हवी आहे ते विचारून घ्या आणि त्याच वेळेस गाडी घेऊन बाहेर निघून जा...
नाही तर नसलेल्या मित्राचं लग्न काढा आणि त्याला वरातीसाठी द्य्ययची आहे असं सांगा....वेळ पड्ल्यास त्याच्या समोरच गाडीवर चार गुलाब चिकट्वा..त्या माणसाला त्यातून व्हायचा तो बोध होईल.......
8 Feb 2015 - 3:04 am | स्वाती राजेश
तुम्ही आता पर्यंत किती जणांकडे गाडी मागितली होती? ती लोकं तुमच्याकडे तेवढ्याच हक्काने मागणार...त्यला तुम्ही काही करु शकणार नाही....
तसेच तुमचा स्वभाव कसा आहे यावर सुद्धा अवलंबुन आहे..
नाहीतर..जे लोक भेटतील त्यांना सांगत सुटायचे.जरी त्यांनी गाडी मागितली नसली तरी... की मी गाडी कुणाला पण देणार नाही.. .एकहाती वापरणार...वगैरे अशी जाहीरात आत्तापासुन्च कराय्ची....
8 Feb 2015 - 3:03 pm | शलभ
असच काहीतरी..
आपल्याला अंदाज आला की हा माणूस गाडी मागू शकतो तर लगेच चालू व्हायचं, लोकांना काही लाज/अक्कल नसते गाडी मागतात..
8 Feb 2015 - 9:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मित्रांना शक्यतो नाही म्हणतं नाही कारण त्यांच्या ड्रायव्हिंगविषयी खात्री आहे. पण नातेवैक, शेजारी-पाजारी, फुटकळ ओळखीवर गाडी मागणारे लोकं ह्यांना नकार द्यायला मी लाज-लज्जा-शरमं वगैरे वाटुन घेतं नाही. तोंडावर सांगुन मोकळा होतो द्यायची नाही गाडी म्हणुन......
(स्वबाईककाळजीवाहुत्तम) अनिरुद्ध
8 Feb 2015 - 1:04 pm | योगी९००
मित्रांना शक्यतो नाही म्हणतं नाही कारण त्यांच्या ड्रायव्हिंगविषयी खात्री आहे. पण नातेवैक, शेजारी-पाजारी, फुटकळ ओळखीवर गाडी मागणारे लोकं ह्यांना नकार द्यायला मी लाज-लज्जा-शरमं वगैरे वाटुन घेतं नाही. तोंडावर सांगुन मोकळा होतो द्यायची नाही गाडी म्हणुन......
+ १०००००००
सोपा उपाय म्हणजे आम्हालाही त्याच वेळी बाहेर जायचंय असे सांगा....
8 Feb 2015 - 3:13 pm | बॅटमॅन
है शाबास!
8 Feb 2015 - 9:27 pm | माहितगार
धागा लेखातील प्रश्न मुख्यत्वे अव्यावसायिक संबंधातील व्यक्तींना नाही कसे म्हणावयाचे असा आहे, व्यावसायिक संबंध असतील तर एखाद्या गोष्टीस लगेच स्पष्ट नाही म्हणणे शक्य असतेच असे नाही; व्यवसाय असो अथवा वस्तु त्यासाठी स्वतः मालक नसल्याची बतावणी (सुरवाती पासूनच) करून कल्पित मालक वेगळा (सहसा समोर न येणारी घरातील ज्येष्ठ व्यक्ती जसे वडील -सासरे मोठा भाऊ इत्यादी) असल्याचे सांगणे आणि त्यांना विचारून सांगतो असे म्हणणे अधिक उत्तम म्हणजे नाही म्हणण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि कारण अधिक डिप्लोमॅटीक करून सांगण्याची संधीही मिळते.
अव्यावसायिक संबंधात सुद्धा मित्र शेजारी इत्यादींचे घरातील ज्येष्ठांशी खास संबंध नसतील तर त्यांना आवडत नाही ते रागावतात असे सांगता येऊ शकते. हे हि शक्य नसेल तर वस्तु मला स्वतःच्याच ऑफीसच्या अत्यावश्यक कामाला लागणार आहे असे सांगा, असे दोन तीनदा केल्या नंतर बहुसंख्य मंडळी कटावयास हवीत. ज्यांना तुमच्या घरच्या आणि ऑफीसच्या इत्यंभूत गोष्टी माहिती असतील अशापैकी काही व्यक्ती भरीस पाडणार्या किंवा इमोशनल ब्लॅकमेल करण्याची कपॅसिटी ठेऊन असू शकतील त्यांना पहिल्या तीन वेळा मला स्वतःस लागणार आहे एवढेच सांगून नाही म्हणा आणि चौथ्या वेळी तरीही आल्यास सुस्पष्ट नाही म्हणावे चौथ्या वेळे पर्यंत तुम्ही देऊ इच्छित नाही हे व्यक्ती आग्रही असली तरी बर्यापैकी समजून चुकलेली असते त्यामुळे गरज पडलीच तर समजूत काढणे सोपे जाऊ शकते.
एवढे करूनही काही वेळा वाईटपणा घेऊनही नाही म्हणावे लागते तसे वाईटपणा घेऊनही मी नाही म्हणतो पण कुणी आपल्याला गृहीत धरणार नाही आणि स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दल अधिक सजग असणे आणि त्या साठी गरज पडली तर जी काही किंमत अपरिहार्य असेल ती मोजतो
9 Feb 2015 - 11:38 am | मराठी_माणूस
शिर्षकातला प्रश्न हा खरच गहन आहे. गाडी, कॅमेरा, तुम्ही सध्या रहात नसेलेले घर अशा गोष्टी मागणार्यांची मानसिकता नक्की कशी असते. ते अशा गोष्टी का मागत असतील , समोरच्या ला अशाने आपण संकटात टाकत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. नकार दिला तरी समजुन घेण्यापेक्षा कटुता येण्याचीच शक्यता जास्त असते .
9 Feb 2015 - 12:01 pm | प्रसाद१९७१
भीड सोडुन सरळ नाही म्हणा. जर का तुम्ही काही कारणे दिलीत तर मागणारे त्यावर उपाय सुचवतात, नाहीतर पुढच्यावेळी पुन्हा मागायला येतात.
हे करताना, ही पण काळजी घ्यायची की आपण पण कधी दुसर्याकडे गाडी कींवा कोणतीही मौल्यवान गोष्ट मागायची नाही किंवा दुसर्याची वापरायची पण नाही. दुसर्याची गाडी, तो गाडीत असताना पण चालवू नये.
9 Feb 2015 - 1:48 pm | कपिलमुनी
गाडी मागायला आले की " अरे जरा अडचण आहे .. १०,००० -५०००० दे !" असे म्हणावे .
लोका गाडी मागणे सोडून देतील
9 Feb 2015 - 11:14 pm | अर्धवटराव
प्रॉब्लेम तुमचा अनावष्यक भिडस्तपणा आहे. 'नाहि' म्हणायला कसं शिकावं असं धाग्याचं शिर्षक हवं.
गाडि मागायला येणार्या लोकांची कॅटॅगरी पाडा. कोणाला सरळ नाहि म्हणायचं, कोणाला थोडं स्पष्टीकरण देऊन नाहि म्हणायचं, कोणाला उदाहरण देऊन (अमक्या तमक्याला गाडि दिली होती, त्याने असा सत्यानाश केला वगैरे खरे खोटे उदाहरण देऊन) नाहि म्हणायचं हे एकदा ठरवुन टाका. शणिवारी मारुतीला तेल वाहुन या, नारळ फोडा, आणि करा नकार द्यायला सुरुवात :)
सुरुवातीला थोडं जड जाईल.
10 Feb 2015 - 10:05 am | चिनार
कॉलेज मध्ये असताना माझ्याजवळ मोटरसायकल होती. माझा एक मित्र मला रोज गाडी मागायचा . पेट्रोल वैगेरे भरणं तर त्याला माहीतच नव्हतं.
एकदा कॉलेज च्या वार्षिक स्नेह संमेलनात मी एका कार्यक्रमाचे निवेदन करत होतो. स्टेज वर निवेदन सुरु असताना विंगेतून तो मित्र चक्क मला गाडी मागायला आला !!!! आणी वाद नको म्हणून मी दिली सुद्धा !!
11 Feb 2015 - 4:57 pm | ऋषिकेश
जे तुही नाही म्हटल्यानंतरही तुम्हाला समजून घेऊ शकत अनाही त्यांना खुशाल नाही म्हणावं - तसेही ते तुम्हाला तितके जवळचे वाटत नाही.
जे समजून घेऊ शकतात त्यांना तर नाही म्हणावंच कारण ते जवळचे आहेत व तुम्हाला जज करणार नाहीत
थोडक्यात काय, नाही म्हणायचं असेल तर खुश्शाल नी थेट नाही असं म्हणावं! पहिल्यांदा भीड वाटेल उत्तरोत्तर ती कमी होत जाईल