सबप्राईम क्रायसीस्,दलाल स्ट्रिट आणी........

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 11:46 am

सबप्राईम क्रायसीस-
साल होत २००५ साहेब दुसर्‍यांदा सिएम झाले.पण पुन्हा सिएम होण सोप नव्ह्त.स्पर्धा तिव्र होती,साहजीकच सायबांना भक्कम किमंत मोजावी लागली.साहेब त्याला गुतंवणुक समजुन कशी वसुल करता येईल याचा विचार करु लागले.
थोड्याच काळात एक एक सरकारी कार्यालय गावात येऊ लागत.त्या सोबतच नव्या माणसांची गावात भर पडु लागली.
नव्या लोकांसाठी जागेची मागणी वाढु लागली.गावा तस लहान त्यामुळे फारशी जागा नव्हती.त्यामुळे २००८ येता येता
गाव आडवतिडव पसरु लागल.
साल २००९, २६/११ घडल आणी सायबांच पद गेल.गावात निराशा पसरली.पण साहेब धोरणी होते आणी त्यांची गुंतवणुक अजुन वसुल झाली नव्ह्ती.त्यांनी आणखीन गुंतवणुक केली आणी वरच्या पदावर गेले,आणी वसुलीला लागले.
गावात पुन्हा चेतन्य पसरल.जमिनीचे भाव पुन्हा वाढु लागले.लोक मिळेल ती जमीन घेऊ/विकु लागले.
२०११ येता येता गावातल्या बार्शी रोड भागात ४० किमी पर्यंत प्लॉटींग पडली( याच भागात सायबांचा भुजबळ टाईप महाल आहे,वरुन दिसणार नाही कारण गाडी गेट मधुन थेट जमीनीत घुसते).
रिएल इस्टेटच मार्केट बेफाम वाढल ,यात भर पडत होती रोज नव्या अफवेची,आता रोज विमान येणार,गावात फाईव्ह स्टार हॉटेल होणार्,आज नवा सरकारी प्रकल्प आलाय एकुण आता गाव आता मोठ्ठ होणार.लोक वेड्यासारखे दागिने,बँकेच्या एफडी मोडुन,कर्ज घेऊन जमिनीत गुंतवणुक करु लागले.रजिस्ट्रार ऑफीसला रोज १००-१५० दस्त नोंद व्हायचे.
पण ही सुज होती...कधीना कधी तर उतरणारच...फक्त कारण पाहिजे होत ...२०१२ मधे मिळाल.
सायबांच निधन झाल...जमिनीचे भाव धाडकन कोसळले...गजबजलेल रजिस्ट्रार ऑफिस ओस पडल....
मुश्किलीन १-२ दस्त नोंद होऊ लागले...आज तिच परिस्थीती कायम आहे.
=================================================================================
दलाल स्ट्रिटः-
या काळात गावात एक नवी जमात जन्माला आली,ति म्हणजे जमिन खरेदी -विक्री करणार्‍या दलालांची.
जिभेवर गोडवा,अंगात लोचटपणा आणी या बोटाची थुंकि त्या बोटावर करण्यात पटाईत असा कुठलाही व्यक्ती त्या जमातिचा भाग होऊ जात असे.नाक्यावर उभे राहुन 'जमीन','प्लॉट' असा शब्द मोठ्याने जरी उच्चारला तरी या जमातीतिल १०-१५ लोक तुमच्यावर तुटुन पडत.रोज सांच्याला ढाब्यावर दारु ढोसत, कोण किती कमावले याच्या गप्पा रंगायच्या.

या जमातीत आमचाही एक मित्र होता.२०१० मधे प्लॉट घे,वर्षात दुप्पट होतील म्हनुन खनपटीला बसला होता.
पण घरचे बधत नाहीत हे समजल्यावर रागाने पहात्,डोळ्यावर गॉगल चढवत ..नव्या गाडीतुन निघुन गेला.
पुन्हा बोललाच नाही...वर्षभरापुर्वी एकाच्या गाडीवर मागे बसुन जाताना दिसला होता.
दोन महिण्यापुर्वी भेटला...कसनुस हसला..म्हणाला "तुझी जुनी सायकल देतो का ? एमाआयडीसित चालत जायला वेळ लागतो.उशिर झाला तर मालक अर्ध्या दिवसाचा पगार कापतो.लवकरच वापस करीन...."
=================================================================================
आणी वाहती गंगा-
याच काळात आणखिन एक प्रकार घडत होता,ते म्हणजे या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा.
२०११ मध्ये आमच्या दोन मित्रानीं ठरवल वाढत्या जागेच्या भावात स्वतःचा काही फायदा करुन घ्यायचा.एकान आपल सर्वस्व विकल आणी एक चांगला प्लॉट घेतला,दुसरा अश्याच प्रकारे पयशे जमा करुन त्या प्लॉटचा डेव्हलपर झाला.
पण आधीच घाण झालेल्या गंगेत हात धुवताता अडकुन पडले.२०१२ झाल आणी प्लॉटवर उभ्या होत असलेल्या ईमारतीला ग्राहकच मिळाना गेल .दोघही वेतागले...एकमेकांना दोष देऊ लागले..एकमेकांच तोंड बघणे ही सोडुन दिले.पहिला दुसर्‍याला शिव्या घालयचा आणी दुसरा पहिल्याला.
भांडण कोर्टात गेल..अर्धवट बांधलेल्या ईमारतीला सिल लागल..आता ती इमारत टवाळखोरांचा अड्डा बनली आहे.दिवसा रिकाम टेकडे तिथे बसुन मॉरल पोलीसिंग करतात आणी रात्री....
(समाप्त)

जाता जाता: लेखाचा आणी शिर्षकाचा काही संबध नाही,तसाही लेख फालतु आहे..आणी काही भाग इतरत्र प्रकाशित *biggrin* .

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

5 Feb 2015 - 12:05 pm | प्रसाद१९७१

उत्तम लेख आणि माहीतीपूर्ण सुद्धा.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 12:06 pm | मुक्त विहारि

जेपी, अब एक कट्टा तो बनता ही है....

तुषार काळभोर's picture

5 Feb 2015 - 12:14 pm | तुषार काळभोर

दुष्काळ,प्याकेज, पवार, जोशी, सबप्राईम, दलाल पथ आणि.....

क्लिंटन's picture

5 Feb 2015 - 12:23 pm | क्लिंटन

काय तुम्ही जेपी? सबप्राईम क्रायसिस वगैरे वाचून वाटले की माझ्या अत्यंत मर्यादित इंटरेस्टशी संबंधित लेख असावा म्हणून बाह्या सरसावून तयार झालो तर निघाले वेगळेच काहीतरी :)

विजुभाऊ's picture

5 Feb 2015 - 12:52 pm | विजुभाऊ

ओ ते साहेब म्हण्जे पवार नाय. इलासराव हैत

तुषार काळभोर's picture

5 Feb 2015 - 1:53 pm | तुषार काळभोर

म्या ते ज्येपीरावांच्या मागच्या दुष्काळी धाग्यावरनं (पवार अन् जोशी) म्हनलो व्हतो...

पदम's picture

5 Feb 2015 - 1:34 pm | पदम

+१००% सहमत.

विशाखा पाटील's picture

5 Feb 2015 - 2:22 pm | विशाखा पाटील

मस्त! सूक्ष्म अर्थशास्त्र का काय ते म्हणतात ते हेच :)

hitesh's picture

5 Feb 2015 - 3:17 pm | hitesh

छान

रेवती's picture

5 Feb 2015 - 7:15 pm | रेवती

वाचतिये तुमचे लेख पण प्रतिक्रिया काय द्यायची? अशा लोकांचे संसार आणि व्यवसाय चालवायला बरेच लोक जरुरीचे असतात. एकदाच सीएम साहेबांच्या मित्र फ्यामिलीने यांच्या वरदहस्ताने लोकांना जमीनी खरेदी विक्रीत कसे लुबाडले त्याची कथा पेप्रात आलेली वाचलीये. बाकी यांची राजेशाही आयुष्ये सर्वज्ञात आहेतच.

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2015 - 7:32 am | श्रीरंग_जोशी

कं लिवलंय, कं लिवलंय...

तिकडचेच आणखी एक दबंग राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाका.

जेपी's picture

12 Apr 2015 - 6:14 pm | जेपी

प्रकाटाआ

अहो, स्पष्ट नावं घेऊन लिहिलं तरी आम्हाला कळायला वेळ लागतोय, तिथं टोपणनावाने लिहिल्यावर, कथा लिहिल्यावर काय कळणार? बरं पण निदान निरोप करून हा मनुष्य कोण हे तरी कळवाल की नै? हा लेख वाचल्यापासून सिनेमात दाखवतात तसे मोठे गेट उघडते व एक गाडी जमिनीखाली अचानक गायब होते असे डोळ्यासमोर येते.

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2015 - 12:01 am | श्रीरंग_जोशी

ते राजकारणी दोन हातांनी मोटरसायकल उचलायचे. आता कदाचित वयोमानानुसार जमत नसेल.

त्यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थेट विरोधी उमेदवारालाच किडनॅप केले होते.

विधानसभा निवडणुक लढवताना मतदानाच्या अदल्या दिवशी टँकरद्वारे देशी दारू गावोगाव पाठवायचे.

मध्यंतरी बरेच दिवस तुरुंगात होते. त्यांचा सुपुत्र तेव्हा राज्यसरकारमध्ये राज्यमंत्री होता.

हे सर्व मी ऐकलेले कारनामे आहेत. जेपीला याहून अधिक ठाऊक असेल.

तुषार काळभोर's picture

7 Feb 2015 - 1:40 pm | तुषार काळभोर

ते राजकारणी दोन हातांनी मोटरसायकल उचलायचे. आता कदाचित वयोमानानुसार जमत नसेल.

ह्याच्यावरून कळलं!!

मागे सकाळच्या सप्तरंगमध्ये पण लेख आला होता यांच्या विषयी.

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा

मल व्यनी कर्ता का नाव...मी कधी ऐकले नाही याबद्दल

रेवती's picture

7 Feb 2015 - 6:30 pm | रेवती

मी पण नाही.

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2015 - 10:45 pm | श्रीरंग_जोशी

हे महाशय आपल्या सर्वांच्या आवडत्या पक्षात आहे ज्या पक्षाने गेली १५ वर्षे राज्यातली सर्व महत्वाची मंत्रालये हाताळून राज्याला एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला हे राज्यात मंत्री असताना मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दुबईला अनेक फोन झाल्याचे प्रकरण गाजले होते.

हाडक्या's picture

7 Feb 2015 - 10:53 pm | हाडक्या

पद्मसिंह पाटील. काय राव तो वोल्डेमॉर्ट असल्यासारखे सगळे "He-Who-Must-Not-Be-Named" असे बोलत बसलाय ब्वा.. ;)

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2015 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

*clapping*

अत्रन्गि पाउस's picture

13 Jun 2015 - 12:39 am | अत्रन्गि पाउस

थरकाप उडवणारे सत्य आहे ...
...लोकशाही आहे म्हणे आपल्याकडे ...

रेवती's picture

8 Feb 2015 - 7:32 pm | रेवती

ओक्के.

सिरुसेरि's picture

6 Feb 2015 - 11:13 pm | सिरुसेरि

पैसा मिळवणे आणी त्या पैशाचा उपभोग घेता येणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत .

मस्त .. क्रायसिस जास्त आवडले

अर्धवटराव's picture

7 Feb 2015 - 2:04 am | अर्धवटराव

:)
या साहेबांचा अगदी जीगरी दोस्त विरुद्ध दिशेला जाणार्‍या नावेत बसुन शेम टु शेम मासेमारी करायचा म्हणायचं काय ?

संवेदनशील, माहितीपूर्ण लेख.आवडला.

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:02 am | पैसा

कथा कुणाची व्यथा कुणा!

सर्व प्रतिसादकांचे आभार.

संदीप डांगे's picture

13 Jun 2015 - 1:07 am | संदीप डांगे

चांगलं लिहिलंय जेपी. थोड्या-फार फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात हीच स्थिती नव्हती काय? आमच्या अकोल्यात तर अगदी बॉल अँड म्युझिक गेम सुरू होता. म्हणजे संगीत सुरु असतांना याच्या हातातून बॉल त्याच्या हातात पास करणे. दोन वर्षांआधी अचानक मुझिक थांबले आणि ज्यांच्या हातात बॉल शेवटी आला ते सगळे लटकलेत. मूळ १००० रुपये किंमतीची जागा ५००० ला विकल्या गेली आणि तीच जागा कुणी आता ४००० लाही घ्यायला तयार नाही. ३ लाखात घेतलेला फ्लॅटची आज तोंडी किंमत १८ लाख आहे. पण खरेदीदार नसल्याने ती किंमत शून्यच आहे. विक्रेता किंमत कमी करु शकत नाही. खरेदीदार घेऊ शकत नाही. व्यवसाय ठप्प.

हा मस्त चाललेला गेम बघून जे शेवटी शेवटी उतरले त्यांचाच सॉल्लीड गेम झाला.

वडील गेल्या २० वर्षांपासून इस्टेट ब्रोकरचं काम करतायत. परिस्थिती फार जवळून पाहिली आहे. तुम्ही दलालस्ट्रीट जे सांगीतलंय ते अगदी तंतोतंत आहे. वडील २००८-९ च्या सुमारास खूप मागे लागले होते की मी मुंबई सोडून इथे यावं. काय तर म्हणत अरे, इथे शेंबुडसुद्धा न पुसता येणारे फटाफट लाखोंच्या डील मारतायत. तू हाताशी आलास तर भरपूर पैसा कमावू. मी त्यांना म्हटलं ही सूज आहे. हा पैसा जसा येईल तसा जाईलही. आणि तेच झाले. सगळे मी मी म्हणणारे गपगुमान बसलेत. पैसा ज्या वेगाने आला त्या वेगाने गेलाही.

जगप्रवासी's picture

13 Jun 2015 - 11:18 am | जगप्रवासी

चांगलं लिहिलंय

काळा पहाड's picture

14 Jun 2015 - 11:31 pm | काळा पहाड

पुण्यात काय परिस्थिती आहे? परवा मटा च्या एक्झीबिशन ला गेलो होतो. तेव्हापासून बिल्डर्स चे बरेच फोन येतायत. क्राय क्रावं ब्रं?

संदीप डांगे's picture

14 Jun 2015 - 11:52 pm | संदीप डांगे

खरंच खरेदीची इच्छा असेल तर आताच जितका पाडता येईल तितका भाव पाडून घ्या. घेण्याची तयारी/गरज दाखवा. चेकबुक सोबत घेऊन फिरा. सुपर-डुपर ऑफर्स विथ स्कीम्स मिळतील. म्हणजे आता १ लाख भरा, पजेशन नंतर इएमाय वैगेरे. काही लोक तर इतके फ्रस्टेट झाले आहेत की काहीही करायला तयार आहेत. पण ही मजा येत्या दीड वर्षासाठीच, त्यामुळे जे काय करायचंय ते आता सहा महिन्यात केलं तर फायदा आहे. २००८-२०१२ सारखा नाही, पण योग्य अ‍ॅप्रीसिएशन मिळेल. आता बिल्डर विकण्यासाठी काहीही करेल हाच प्लस पॉइंट आहे. तेवढं लीगल बाजू पाहुन घेणे. इमारत बांधत असलेली हवी. बंद कंस्ट्रक्शन किंवा एम्प्टी लॅंडमधे गुंतवणूक करू नये. फसण्याचे १०० टक्के चान्सेस आहेत. तसे असेल तर बिल्डरना न सांगता सोमवारी-मंगळवारी अचानक साईटवर धाड टाकून पाहणी करावी. पूर्ण पैसे तयार असतील तर रेडीपजेशन हा उत्तम पर्याय आहे. निव्वळ गुंतवणूक म्हणून रीअल-इस्टेट मधे पैसे गुंतवायचे असतील तर किमान ७ वर्षे पैशाकडे पाहू नये. पण गुंतवणूकीसाठी अतीव धोकादायक क्षेत्र आहे हेही सांगू इच्छितो.