आज... थरथरत्या नाजुक पानावरच दव तुझ्या ओठांची आठवण करून देतय आणि त्याच पानाची जमिनीकडे झुकलेली कडा तुझ्या लाज-या पापण्यांची. पानामगुन हळूच डोकावणार फुल म्हणजे तर मूर्तिमंत तूच. खिड़की पल्याड उभी राहून हळूच माझ्याकडे पहाणारी.... आज ही पहाट संपूच नये अस वाटतय. कारण खळाळणा-या झा-यामधून तुझ हासु एकु येतय. वडाच्या पानांना चुकवत जमिनीवर उतरलेली सूर्याची तिरीप तुझ्या अवखळपणाची आठवण करून देते आहे. जस निघायच्या घाईतही माझे डोळे तुला शोधतात आणि हे पक्क माहीत असलेली तू उगाच कामात असल्याच भासवातेस. हाय ... हा वाहणारा वारा... तुझ्या चेह-यावर झुकणा-या बटांशी खेळतोय जणु. ही पहाट... हा निसर्ग....इथे असणारा मी.... विरणार धुक... आणि माझी वेडी आशा ... कदाचित् तू आज तरी येशील!
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 1:48 am | खटपट्या
ह्म्म्म !!
6 Feb 2015 - 2:37 am | पिवळा डांबिस
असले विचार मनात असलेला जर कुणी मिपाकर नवरा असेल तर त्याचा लकडी पुलाच्या मध्यावर जाहीर मुका घ्यायला आपण तयार आहोत!!!
=))
6 Feb 2015 - 10:49 am | सविता००१
काय हो तुम्ही......
6 Feb 2015 - 10:50 am | सविता००१
:)
6 Feb 2015 - 11:06 am | गवि
आणि मिपाकर नवरी असेल तर? दीज डेज एनी ओरिएन्टेशन इज पॉसिबल..!! ;)
6 Feb 2015 - 12:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
नवरी असेल तर मी स्वयंसेवक व्ह्यायला एका पायावर तयार आहे.
ओरिएन्टेशनच नंतर बघु.
पैजारबुवा,
6 Feb 2015 - 1:41 pm | गवि
काय हो भलतेच उद्देश तुमचे.. तिची खणानारळाने ओटी भरीन असं अपेक्षित आहे या ठिकाणी उत्तर.
संमेलनाहून आलेले दिसता..!!
6 Feb 2015 - 2:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे अरे अरे गवि,
याला म्हणतात चोराच्या मनात चांदण
म्हणुन सांगतो संम्मेलनाला जायचे टाळत जाउ नका.
पैजारबुवा,
6 Feb 2015 - 7:21 am | अजया
=))
6 Feb 2015 - 9:36 am | पलाश
अरे देवा!!!
6 Feb 2015 - 1:05 pm | मनिमौ
धन्य आहात आपण.बादवे झारर्यातुन हसु गाळून ऐकू येईल का? मला लेखिका मोजींची बहिण आहे बहुतेक.
6 Feb 2015 - 1:44 pm | सविता००१
मस्त मस्त. झार्यातलं हसू मी पण वाचलं आणि हसत होते
6 Feb 2015 - 1:19 pm | पगला गजोधर
आज 'पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न' (परत) वाचलं, अन त्यानंतर लगेचच हा लेखं वाचला, ……. छातीत कळ आली !
6 Feb 2015 - 1:44 pm | मितान
चांगला कल्पनाविलास !
7 Feb 2015 - 11:23 am | म्हया बिलंदर
थरथरत्या नाजुक पानावरच - डेक्कन नाही
पानाची जमिनीकडे झुकलेली कडा - एक हि पेठ नाही
पानामगुन हळूच डोकावणार फुल - मंडई पण नाही
खिड़की पल्याड उभी राहून हळूच.. - कर्वेनगर नाही
वडाच्या पानांना…- येरवडा पण नाही
खळाळणा-या झा-या(किंवा झऱ्या)मधून - संगमवाडी नाही
ही पहाट... हा निसर्ग - छे छे हे पुणं नाहीच
9 Feb 2015 - 6:00 am | स्पंदना
ह्या आयडीचे नाव बदलुन "ट्युब मालवणे" ठीवव्व का??
*fool*