दुष्काळ आणी पॅकेज: काही किस्से ३ (अंतिम)

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
4 Feb 2015 - 11:06 am

भाग १ भाग २
==================================================================================
वेळ:- मागच्या काळात कधी तरी..
एके काळी 'गरीब ग्राहकानां अन्न परवडावे' या मिषाने सरकार पध्दतशीरपणे शेतीमालाचे भाव पाडत असे.लेव्ही लावणे.तसेच मोक्याच्या वेली स्वतःची कोठारे उघडुन पुरवठा वाढवणे,आपल्या शेतकर्‍यांवर निर्यात बंदी लादणे आणी प्रसंगी तोटा सोसुन शेतमाल आयात करणे.. असे मार्ग सरकार वापरात असे.त्याकाळी शेतकर्‍याला उत्पादन खर्चसुद्धा भरुन निघणार नाही इतका
कमी भाव मिळत असे.अशा विशीष्ट तोट्याला 'निगेटीव्ह सबसिडी 'म्हणतात.
या सगळ्या विरुद्ध एका माणसाने हमिभाव मिळवुन देण्यासाठी आंदोलन उभे केले.मुळात तो माणुस शेतकरी नव्हता..
पण कुणी तरी आपल्या साठी उभे राहतय हे कळाल्यावर शेतकरी त्याच्या मागे एकवटला.हमिभावाचे आंदोलन यशस्वी झाले.
हे यश एकवटलेल्या शेतकर्‍याचे होते.पण त्या माणसाला हे स्वत:चे यश वाटले.आसपास असनार्‍या भाट आणी तोंडपुंज्या लोकांनी त्याच्या या भ्रमात भर टाकली.त्या माणसाच्या डोक्यात हवा गेली आणी त्याला सत्तेची स्वप्न पडु लागली.

त्या माणसाचे नाव होते ..शरद जोशी.
==================================================================================
वेळ:- वरचीच...
याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक माणुस वर वर येत होता.सत्ते साठी कुठल्याही पातळीला जाण्याची त्याची तयारी
होती.प्रसंगी पाठीत खजींर खुपसायची ही त्याची तयारी होती.त्याच्या बोलण्यात आणी गप्प राहण्यात काही तरी गुढ असायच.

त्या माणसाच नाव होते..शरद पवार.
================================================================================
वेळ-तेव्हांपासुन आतापर्यंत...

शरद जोशी च्या मागे एकवटलेला शेतकरी चांगली व्होटबँक होऊ शकतो हे चाणाक्ष शरद पवारांच्या लक्षात आले.
जोडीला प्रमोद महाजन नावाचा आणखीन एक राजकारणी मिळाला.दोघांनी मिळुन शरद जोशीला सोबत घेतले.
त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी...'पुलोद"..सरकारचा प्रयोग केला.
पुलोद चे पुढे काय झाले हे सर्वांना ठावुकच आहे.कालांतराने शरद जोशी बाजुला फेकले गेले.प्रमोद महाजन यांना शेतकर्‍यांना
आपल्या बाजुला वळवता आले नाही.साहजीक शेतकरी एकाच व्यक्ती मागे गेला.शरद पवार.
पण जसा जसा काळ पुढे गेला तसा शेतकर्‍याचा आपल्या नेत्यावरील विश्वास उडु लागला.शरद पवारांना आपल्या मागील व्होटबँक टिकवण्यासाठी काही तरी करणे गरजेचे होते..

यातुन सुरु झाला पॅकेज चा खेळ...
================================================================================

जाता जाता- पुर्वी शेतकरी म्हणल की नांगर घेतलेला माणुस आठवायचा..आता फासावर लटकलेला आठवतो.
३ दिवसापुर्वी एका तरुण शेतकर्‍यांने अवघ्या ३२ हजांरासाठी आत्महत्या केली.
१२ वर्षात ६० हजार कोटी (निट वाचा) ची पॅकेज जाहीर झाली. ८० हजार कोटी सिंचनावर खर्च झाले.
यातले १० % जरी योग्य पोहचले असते तरी त्या शेतकर्‍याचा जिव वाचला असता.
याचा दोषी कोण ? याचा विचार केला तर नजरे समोर येतात पॅकेज चा खेळ करणारे राजकारणी,शेतकरी मरतोय तर मरु द्या आमच दुकान चालल पाहीजे म्हणणार्‍या शेतकर्‍यांच्या संघटना आणी या सगळ्यात भरडत जाणार शेतकरी...

(समाप्त)

( हा माझा शेती विषयक ईथे शेवटचा लेख.कारण शेतीवर भाष्य करायचा अधिकार काही काळापुरता स्थगित करत आहे.)

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 11:23 am | मुक्त विहारि

अजून लिहा...

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:42 pm | जेपी

..

जे लिहिले ते खरेच असल्याने प्रतिक्रिया देऊन जास्त चर्चा वाढवण्यात काहीच अर्थ नाही.

अहो जेपी साहेब, बहुतेक लोकं सहमत असतील तुम्ही लिहिलय त्याबद्दल तर प्रतिक्रिया तशा कमीच येणार ना.

तुम्ही अगदी व्यवस्थितपणे काय म्हणतात ते "बलिनेत्र्भंंजक" तसे अगदी लिहिलेय. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की कुठलाही अभिनिवेश नाही.

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:43 pm | जेपी

...

सुनील's picture

5 Feb 2015 - 8:57 am | सुनील

तेवढं महाजनांचं नाव घेतलं नसतत (फक्त पवारांचच घेतलं असतत) तर, धो धो प्रतिक्रियांचा पाऊस पडला असता.

पण पवारांच्या जोडीला महाजनांनादेखिल बसवल्यामुळे, धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय, अशी अवस्था झालीय बर्‍याच मंडळींची! ;)

(त्यामुळे 'पोटेंशल' असूनही धागा धावत नाहीए!)

टीप - लेखाच्या सत्यासत्यतेबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही कारण त्यात पुराव्यासाठी कुठलाच विदा नाही.

टवाळ कार्टा's picture

6 Feb 2015 - 11:27 am | टवाळ कार्टा

मी फक्त वाचन किती झाली यावर लक्ष ठेवुन आहे.

तु नुस्ते धागा परत परत उघडत राहिलास तरी वाचनसंख्या वाढते ;)

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:44 pm | जेपी

...

आदूबाळ's picture

4 Feb 2015 - 12:24 pm | आदूबाळ

छानच लिहिलांय.

बॅटमॅन's picture

4 Feb 2015 - 12:48 pm | बॅटमॅन

इस्कू बोल्ते अस्ली लेख.

नाखु's picture

4 Feb 2015 - 1:56 pm | नाखु

ह्यो लेखक जिंदगानीत राजकारनात यायच्या लाय्कीचा न्हायी. खरंखुर लिहीतोस क्काय ल्येक्या !

पिंगू's picture

4 Feb 2015 - 1:39 pm | पिंगू

जे लिवलयं त्ये खरच हाय..

गजानन५९'s picture

4 Feb 2015 - 3:54 pm | गजानन५९

मस्त लिहिलंय भाऊ

वाचलाय लेख, पण काय बोलायचे? कौतुक एकाच गोष्टीचं वाटलं की तुम्ही नावे घेऊन लिहिलयत सरळ!

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2015 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

लक्ष्यभेद - एकच शब्द पुरेसा आहे या लेखनावर प्रतिक्रियेसाठी.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 10:31 pm | मुक्त विहारि

प्रतिसादांकडे बघू नका.

उघडावी अनुभवांच्या शिदोरीची गांठ,
उत्तम मिपाकरांची होईल भेट,
दोन-चार प्रतिसादांची होइल चर्चा,
सोडू नये आपली दिनचर्या...

बाबा म्हणे....

अर्धवटराव's picture

5 Feb 2015 - 4:39 am | अर्धवटराव

शरद द्वयांना, त्यातही पवारांना उगाच विनाकारण आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलय.
शेती उत्पादनं जन सामान्यांना परवडणारी ठेवणं सत्ताधार्‍यांना आजही कंपल्सरी आहे. व शेतीचा बेभरोशेपणा देखील आज जसचा तसा आहे. मग त्यातुन एकीकडे एकाधिकार खरेदी, कृउबास, आणि दुसरीकडे शेतकर्‍याला पॅकेज याशिवाय गत्यंतर काय? दोन परास्पर विरोधी हितसंबंधांना सांभाळताना तारेवरची कसरत करावीच लागणार. आपल्या स्वार्थासाठि म्हणुन पॅकेज निर्मीती कोणि केली नसेल.
शेरकर्‍यांच्या व्होटबँकेची ताकत ओळखणे, तिला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यात गैर काय? आणि खरच पॅकेजचा सर्व पैसा पवारांनी हडप केला असेल तरी शेतकरी त्यांच्या मागे इतकी वर्ष उभा राहिला नसता.

वरचा लेख भुतकाळाचा आढावा होता अस समजा.आता वर्तमान काळात येतो.
शरद द्वयांना, त्यातही पवारांना उगाच विनाकारण आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलय.
शरद जोशी पुन्हा संघटनेत सक्रिय झाले आहेत.पंरतु आता जोशीसाहेब अगदी वेग़ऴ्या गोष्टीला 'निगेटीव्ह सबसिडी म्हणुन शेतकर्‍यात चुकीचा समज पसरवत आहेत.अनुदाने देण्याची आपली पद्धत ही उत्पादन खर्च भरुन निघावा व तोटा होऊ नये यासाठी आहे,म्हणजेच ति सबसिडी आहे. याऊलट बड्या देशात जेथे करदात्यांची संख्या प्रंचड आहे आणी तुलनेने एक टक्का असलेल्या शेतकर्‍यांना भरमसाठ बक्षीसी देणे परवडते. त्यांची बक्षीसी ही 'सुपर सिडी' आहे,आणी आपल्या शेतकर्‍यांना जाणारी तुटनिवारक मदत ही 'सबसिडी आहे.त्यामुळे शरद जोशीचे आंदोलन चुकले आहे.

शरद पवारांनी काही दिवसापुर्वी दोन मागण्या केल्यात. पहिली शेतकर्‍यांचे कर्ज माफ व्हावे,
पण याचा फायदा मुठभर लो़कानां आणी त्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी बँकाना होईल.
दुसरी मागणी,हमीभाव न देऊ शकणार्‍या साखरकारखाण्यांवर गुन्हे दाखल करु नयेत.कारण त्यावर ही पवांराचें नियत्रंण आहे.

शेती उत्पादनं जन सामान्यांना परवडणारी ठेवणं सत्ताधार्‍यांना आजही कंपल्सरी आहे. व शेतीचा बेभरोशेपणा देखील आज जसचा तसा आहे. मग त्यातुन एकीकडे एकाधिकार खरेदी, कृउबास, आणि दुसरीकडे शेतकर्‍याला पॅकेज याशिवाय गत्यंतर काय? दोन परास्पर विरोधी हितसंबंधांना सांभाळताना तारेवरची कसरत करावीच लागणार. आपल्या स्वार्थासाठि म्हणुन पॅकेज निर्मीती कोणि केली नसेल.
यासाठी तारेवरची कसरत कराय्ची गरज नाही,फक्त सुवर्ण मध्य साधायची गरज आहे.
शरद जोशींच्या मागणी प्रमाणे कांदा १०० रु.किलो होऊ शकत नाही आणी,शरद पवारांसाठी मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ऊस लावता येणार नाही.गरज आहे दर कोसावर बदलत जाणार्‍या शेतीला आणी शेतकर्‍याला सम्जुन घेण्याची.

शेरकर्‍यांच्या व्होटबँकेची ताकत ओळखणे, तिला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यात गैर काय?
यात गेर काहीच नाही फक्त त्याला व्होट बँक समजु नये.त्याला काहीतरी विधायक वळण देण गरजेचे आहे.

आणि खरच पॅकेजचा सर्व पैसा पवारांनी हडप केला असेल तरी शेतकरी त्यांच्या मागे इतकी वर्ष उभा राहिला नसता.
पवाराच्या मागचा शेतकरी केव्हांच गेलाय.त्यांचा मराठवाडा,विदर्भ आणी आता पश्चीम महाराष्ट्रात आधार सुटत चाललाय.
त्यामुळे आता कोकणी बाणा म्हणत तिकडे लक्ष देत आहेत.

तळटीप- माझा लेख आणी प्रतिसाद ,माझ्या वाचनावर आणी रोजच्या पाहण्यावर आधारीत आहे.पुरावयासाठी कुठालाही विदा देऊ शकत नाही.

नाखु's picture

6 Feb 2015 - 9:51 am | नाखु

मी देतो थेट माहीती..
त्यांनी एकमेका साह्य करू केलं तर चालत

उष्ट्राणामच विवाहेषु मंत्रान गायन्ति गर्दभाः
परस्परं प्रशन्सन्ति अहो रूपं अहो ध्वनिः
आणि पत्रकार आपलेच गमु साहेब.

सुनील's picture

6 Feb 2015 - 10:13 am | सुनील

सुभाषित चपखल. फक्त उष्ट्राणामच ऐवजी फक्त उष्ट्राणाम असे हवे (अनुष्टुभाचा मिटर चुकतो, असे वाटते)

चुभुद्याघ्या.

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:50 pm | जेपी

...

यशोधरा's picture

5 Feb 2015 - 5:13 am | यशोधरा

ह्म्म..

पैसा's picture

5 Feb 2015 - 11:58 am | पैसा

परखड लिहिलंय. एक लहानशी शंका आहे. सिंचनावर खर्च दाखवला जातो तो नेमका कुठे जातो? एवढा मोठा भांडवली खर्च असेल तर त्यातून बंधारे बांधणे, शेततळी तयार करणे, तलाव साफ करणे काहीतरी व्हायला हवे ना?

सिंचनावर खर्च दाखवला जातो तो नेमका कुठे जातो? एवढा मोठा भांडवली खर्च असेल तर त्यातून बंधारे बांधणे, शेततळी तयार करणे, तलाव साफ करणे काहीतरी व्हायला हवे ना?
याचे उत्तर थोडस किचकट आहे.तरी प्रयत्न करतो. थोडे मुद्दे समजुन घ्यावे लागतील.
९५ सालाआधी पाटबंधारे आणी सिंचनाची काम विभागाअतंर्गत चालायची.युतीच्या काळात या मधे बदल करुन कामे बाहेरील ठेकेदारांना देण्यात आली.उद्देश होता..कृष्णा खोर्‍यातील पाणी मुदतीत अडवुन घेण्यासाठी कामाचा वेग वाढवणे.
नंतर युतीचे शासन गेल्यावर आघाडी सरकारने या तरतुदीचा गेरवापर केला.त्यांना विदर्भाचा अनुशेष भरुन काढायच कारण मिळाल.एक ना धड असे भांरभार प्रकल्प विदर्भात चालु झाले.
दरवर्षी ७ ते ८ हजार कोटी प्रकल्पासाठी खर्च होतात पण ते पुरेसे नाही.कारण पुर्ण निधी एकाही प्रकल्पाला नाही मिळत.
==============================================================================
प्रकल्प चालु होतानाच मर्जीतील ठेकेदाराला काम दिल जात ,या मागे भरभक्क्म टक्केवारीही घेतली जात.साहजिकच ठेकेदार
प्रकल्प पुर्ण न करता,त्याची किमंत कशी वाढेल हे पाह्तो.आघाडी काळात पाटबंधारे,सिंचन आणी अर्थ खाते कुनाकडे होते हे सांगायची गरज नाही.
यासोबत पवांरानी ९५ सालापुर्वी सगळा सिंचनावरील निधी पश्चीम महाराष्ट्राकदे वळवला त्यातुन विदर्भाचा अनुशेष निर्माण झाला.
==============================================================================
जाता जाता- टोल सारख्या चांगल्या तरतुदीचा आघाडी सरकराने असाच गेर वापर केला आणी रस्त्यांची वाट लागली.

पैसा's picture

6 Feb 2015 - 11:12 am | पैसा

या खर्चाचा हिशेब मागण्यासाठी आणि एकेक योजना पूर्ण व्हावी म्हणून कोणीतरी, विशेषत्वाने शेतकरी संघटना वगैरे कोर्टात जाऊ शकत नाहीत का? कारण बहुतेकवेळा कोर्टाने निकाल दिल्यावरच सर्कारी यंत्रणा हलते.

विशेषत्वाने शेतकरी संघटना वगैरे कोर्टात जाऊ शकत नाहीत का?
जाऊ शकते, पण कुठलीही संघटना अजुन तरी गेली नाही आणी जायची शक्यता कमीच आहे.
काही माणस व्यक्तिगत कोर्टात गेली आहेत्,काही प्रकल्प या पद्धतीने पुढे सरकले आहेत.
उदा- गोसीखुर्द प्रकल्प.३०वर्षांपासुन रखडला आहे.मुळची केकपट वाढली आहे. आता हा प्रकल्प चार वर्षात पुर्ण करावा लागेल

पैसा's picture

6 Feb 2015 - 11:23 am | पैसा

उशीरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो.

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:53 pm | जेपी

...

श्रीरंग_जोशी's picture

6 Feb 2015 - 8:24 pm | श्रीरंग_जोशी

अमरावतीचे प्रा. बि. टी. देशमुख हे पदवीधर मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार होते. विधानपरिषदेमध्ये त्यांनी वर्षानुवर्षे सिंचनातील अनुशेषाविरुद्ध आवाज उठवला. सत्ताधारी फक्त सरांची भाषणे अभ्यासपूर्ण असतात असा शेरा मारून सोडून द्यायचे.

जेपी - अभ्यासपूर्ण विवेचनाबद्दल आभार.

प्रकल्प चालु होतानाच मर्जीतील ठेकेदाराला काम दिल जात ,या मागे भरभक्क्म टक्केवारीही घेतली जात.साहजिकच ठेकेदार
प्रकल्प पुर्ण न करता,त्याची किमंत कशी वाढेल हे पाह्तो.आघाडी काळात पाटबंधारे,सिंचन आणी अर्थ खाते कुनाकडे होते हे सांगायची गरज नाही.

७-८% कॅश घेतली जायची आधी. मग फाईल वरुन खाली सरकायची तसतसे पैसे वाटत जायचे. मग उरलेल्या पैशात काम चालु करायचे. मग करारात आधीच हुशारीने पेरलेल्या तरतुदींप्रमाणे बजेटमधे करोडोंची वाढ करुन घ्यायची.

बांद्रा-कुर्ला पुलाचे काम ३००-४०० कोटींचे होते आधी. पुर्ण होईपर्यंत १५०० कोटींपेक्षा जास्त खर्च झाले.असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2015 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळे वाचले. विसरायचा प्रयत्न करतोय.

इरसाल's picture

5 Feb 2015 - 3:21 pm | इरसाल

मागे एकदा झी सिनेमावर सुशील कुमार शिंदेंवर एक सिनेमा पहाण्यात आला त्यात शरद पवारांच्या पात्राबद्द्ल जो काही प्रकार दाखवला मी अक्षरशः एक गोधडी भिजवली अश्रुंनी. मला रडुच आवरले जात नव्हते. काय उगा लोक शिंतोडे उडवतात झालं.

भेंडी लयच भयानक

अभिजीत अवलिया's picture

6 Feb 2015 - 7:22 am | अभिजीत अवलिया

Sahi chirfaad keliy.

व्यक्ति-पर मतांबद्दल माहिती नाही पण लेखनातील सजगता आणि तळमळ जाणवली.

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:56 pm | जेपी

...

जेपी's picture

7 Sep 2015 - 5:01 pm | जेपी

यानंतर काय घडतय हे हे लिहीण्याआधी पुनरावलोकनसाठी धागा वर काढत आहे.

नुकतेच साहेबांनी जाहीर सभा वगैरे घेउन या वर्षीचा दुष्काळ सर्वात तीव्र कसा आहे अशी प्रचाराची तयारी चालू केल्याचे कळते. जरी वस्तुस्थिती भीषण असली तरी सिंचन घोटाळा आणी आजवर एकुणात जल संधारणावर झालेला खर्च याचा जाब मागितला तर काय उत्तरे मिळतील?

नमकिन's picture

9 Sep 2015 - 2:02 pm | नमकिन

माझे काका (स्वर्गीय), मामा (दोघे) प्रत्यक्ष, बाबा अप्रत्यक्ष (चुलत भावाला थेट मार्गदर्शन) शेतकरी असून माझे कार्यक्षेत्र शेतीस निगडीत आहे. कृषि पाईप, ठिबक सिंचन, शेत तळी साठी अंथरायचा कागद, शेतमाल बांधण्याचे प्लॅस्टिक कागद बनवण्याचे यंत्रसामुग्री उत्पादन /विपणन हे माझे कार्यक्षेत्र.
तर असा थेट शेती/शेतकरी/पाऊस/शेतमालाचे उत्पादन व शेतकरी बांधवांची मिळकत इ. इ. चा प्रभाव जाणुन या धाग्यावर मत मांडतोय/माहिती पुरवतो.
नुसतीच बिकट नाही तर भयानक अवस्था आहे सध्या. बरं कसे, तर कोरडवाहू शेताचे क्षेत्रफळ जास्त आहे याबाबत कुणाचेही दुमत नसावे म्हणजे "लागत ज्यादा उपज कम", महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश (मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद ते पार वर वाशिम, परभणी इ इ. हा वाढतंच चाललाय (त्यातंच भर म्हणून अवेळी पाऊस-जानेवारी, मार्च मधील गारपीट) अस्मानी संकट गडद होत चाललेय. शेतमजुर मिळेनासे झालेत, कमी बेभरवशाचे उत्पन्न कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरतोय. नेमकं पीक हाताशी येण्याच्या वेळेस अवकाळी पाऊस शेतक-याला आयुष्यातुन उठवतोय.
शेतमाल पुरवणारे कारखानदार सबसिडी चे पैसे सरकार कडून वेळेवर मिळत नाहीं म्हणून बनविण्यास अनुत्सुक (ISI ) प्रमाणित एेवजी ज्यात नफा व भेसळ जास्त असते असे उत्पादन शेतक-याला नाईलाजाने खरेदी करावे लागते. बरं नुसते खरेदी करुन भागते का तर नाहीं, पुढे ते शेतात लावायचे तर मजुर /यंत्र अनुप्लब्ध, उपलब्ध असले तरी (भाड्याने) हंगामात मिळेलंच याची काही शाश्वती नाहीं. कारण नेमक्या तेवढ्याच कालावधीत सर्वांना तेच काम असते व यंत्र/चालवणारे अव्वाच्या सव्वा आगाऊ भाडे मागणार. वीजेचा लपंडाव म्हणजे लाचारीचा कळस, सरकार वीज देणार उपकार केल्यासारखे रात्री ८-१०-१२-२-४ वा कधीही (सक्तिची रात्रपाळी), कुटुंब कल्याण योजनेच्या प्रसारामुळे घरात फुकट राबणारे मनुष्यबळ कमी, गडी काय शेतात वीजेच्या वेळापत्रकानुसार (जे बेभरवशाचे-दोघे-वीज व गडी), स्थानिक राजकारण, गटतट, हेवेदावे, सरकारी कर्मचारी कडुन शेतक-याच्या अज्ञानाचा फायदक घेऊन केलेले सात बारातील फेरफार, भावकीतील नावे चढवणे/वगळणे याचे प्रलंबित तंटे/खटले (नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अनेक मालक पण कागदोपत्री वारसा सिद्ध करायचा तर इतर वारसदारांकडुन विरोध /असहकार) मग मदतीस पात्र/अपात्र च्या यादीत नावे घुसवणे त्यासाठी पुढारी पिल्लावळची मनधरणी, जात-पात, जीर्ण होत जाणारी घरे, जमिनीची घटत जाणारी उत्पादन क्षमता, वाढते क्षार, ७००-१२०० फूट खोल गेलेली भूजल पातळी असे १ ना हजर प्रश्न ज्याची तयार उत्तरं उपचाराची गोळी कुणाकडेच नाहींत.
आजची शाळा (काही पदवीधर) शिकलेले शेतीच्या कामास अनुत्सुक व कुचकामी, करायचा दबाव आला तर बनचुके, शेतकरी जावई नको म्हणनारे सदस्य /नातेवाईक, शिक्षणाने/TVने वाढलेले सामाजिक /आर्थिक भान व सलणारी विषमता, यामुळे वाढते नैराष्य परिणाम प्रचंड पराभूत/हतबल मानसिकता आणि शेवट आत्महत्या.

अमित मुंबईचा's picture

10 Sep 2015 - 1:01 pm | अमित मुंबईचा

वास्तववादी आढावा