ह्या प्रकाराला ’पोस्टमॉडर्नोत्तर काव्य’ म्हणतात म्हणे. म्हटलं आपणही पाडून बघावी एक पोएम. तर ताजी ताजी पाडलेली ही रेसिपी चाटुनि आता बघणे.
डार्केस्ट क्लाउडी राती
लैपटॉप मांडी असतो
लेटेस्ट कोणती मूव्ही
मी लगेच आयमडिबतो*
टॉरेंट साइटी जाता
मी हज़ार नावे बघतो
वेचून क्लीन टॉरेंटा
सीडणारि* तेची धरतो
डाऊनलोडुनी घेतो
बँडविड्थ सारी युझुनी
रात्रीच पाहुनी मूव्ही
गूगलून घेतो अजुनी
पिंगूनि मित्र तो बोले
’पाहिलास मूव्ही अमका?’
देऊन आणखी लिंका
आणवेल मोठा झटका
’येईल तो नवा सीझन्*’
’एपिसोड आला बघ रे’
यूट्यूब वर चाले गाणी
बँडविड्थ सारी विसरे
डाऊनलोडण्याची ही
सूटणार नाही व्यसने
टॉरेंट-कुंपणी ’स्वामी’
थांबवाल आता चरणे?
-- स्वामी संकेतानंद,
नवी दिल्ली,
१३-०९-२०१४
--------------------------------------------------------
कठीण शब्दांचे अर्थ( हे लैच शाळकरी होतंय, पण.......)
आयमडिबणे = imdb.com वर सिनेमाचे रेटिंग/रिव्ह्यू/प्लॉट समरी बघणे
सीडणारि = चांगला seed count असणारी टॉरेंट
सीझन = इंग्रजी मालिकांचे पर्व.
प्रतिक्रिया
29 Jan 2015 - 2:31 pm | काळा पहाड
जल्ला काय जम्ला नाय हां.
2 Feb 2015 - 9:07 am | स्वामी संकेतानंद
प्रायोगिक काव्य असल्याने आवडणे, न आवडणे सापेक्ष आहे. चालायप्रति:)
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
29 Jan 2015 - 2:50 pm | अनुप ढेरे
वाहवा.... आवल्डी कविता...
29 Jan 2015 - 2:50 pm | सुहास झेले
हा हा हा ... झक्कास !!
29 Jan 2015 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
=)))))
स्वामिज्जी की म'हान रचनांएं। =))
29 Jan 2015 - 9:14 pm | पैसा
लै भारी! रेशिपी सगळी ईटली. आणि लाईकली सुद्धा!! =)) बाकी ब्रॉडब्यांड कुंपणीचा असेल तर त्या कुंपणी चरणे बर्याच जणांना परवडते. स्वतःचे पैशे कोण बर्नायला सिटलाय?? =))
2 Feb 2015 - 9:11 am | स्वामी संकेतानंद
स्वत:चे पैसे बर्नायला पण सिटतात हो. शौक बडी चीज है!
30 Jan 2015 - 9:25 am | विशाल कुलकर्णी
झक्कास बे :)
30 Jan 2015 - 3:58 pm | बॅटमॅन
सकलटॉरेंटयूजरहृदयगाथाच की हो. _/\_
30 Jan 2015 - 4:03 pm | वेल्लाभट
क्लासच ! खल्लासच !
2 Feb 2015 - 9:11 am | स्वामी संकेतानंद
हेहे.. बरोबर.. :)
30 Jan 2015 - 4:11 pm | अजया
लाइकली आहे टाॅरेन्टगाथा!
2 Feb 2015 - 9:11 am | स्वामी संकेतानंद
धन्यवाद मंडळी ! _/\_