ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 9:59 am

श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.

या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!

प्रतिक्रिया

असंका's picture

20 Jan 2015 - 6:34 pm | असंका

काहीच अपडेट नाहीत का? आज कुठल्या मॅचेस आहेत कुणी सांगेल का?

प्रचेतस's picture

20 Jan 2015 - 6:39 pm | प्रचेतस

आज मी आणि प्रा. डॉ.

कधी चालू करायची सर?

प्रचेतस's picture

20 Jan 2015 - 8:03 pm | प्रचेतस

बिरुटे सर आणि माझा डाव सुरु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2015 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीनं एकतर्फी अवघ्या बावीस चालीत माझ्यावर मात केली. मला अजिबात खेळायची संधी दिली नाही. मी प्याद्या पुढे सरकवून वल्लीला मैदान दिलं आणि एकापेक्षा एक सरस वार करत वल्लीने अवघी एक प्यादी गमावत माझे पाच मोहरे घेत मला लिलया गारद केलं. वल्ली केवळ भन्नाट खेळलाय. मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल.

वल्लीला पुढील स्पर्धकासोबत खेळण्यासाठी शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 1:08 am | प्रसाद गोडबोले

मला वाटतं या स्पर्धेचा विजेता वल्लीच असेल

हे म्हणजे
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।78।!

ह्याचा सारखं झाल =))

प्रचेतस's picture

20 Jan 2015 - 8:30 pm | प्रचेतस

संपला डाव.
मस्त रंगतदार झाला.

आता आमचा पुढचा डाव कुणाबरोबर?

स्कोअर शीट

Score sheet:
1. e2-e4 e7-e5
2. d2-d3 b8-c6
3. b1-a3 g8-f6
4. g1-h3 f8-c5
5. a3-c4 c5-b6
6. a2-a3 d7-d6
7. h3-g5 c8-g4
8. f2-f3 g4-h5
9. g2-g4 h5-g6
10. h2-h3 d6-d5
11. e4-d5 f6-d5
12. f1-g2 d8-e7
13. f3-f4 e5-f4
14. e1-f1 e7-g5
15. d1-e1 d5-e7
16. h3-h4 g5-c5
17. b2-b4 c5-d4
18. a1-b1 e8-c8
19. c2-c3 d4-d3
20. e1-e2 d3-b1
21. e2-e1 g6-d3
22. e1-e2 b1-c1

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 9:49 pm | प्रसाद गोडबोले

मिप २ ने आमचे आगमन झाले आहे...

सेनयोरुभयो मध्ये रथं स्थापयमेच्युत !!

विअर्ड विक्स's picture

20 Jan 2015 - 9:54 pm | विअर्ड विक्स

I am online my ID is viks

पैसा's picture

20 Jan 2015 - 9:56 pm | पैसा

परवा झाला तसा घोळ नको. दुसरा कोणीतरी मिपा२ म्हणून लॉग इन करायचा!

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 10:07 pm | प्रसाद गोडबोले

अरेरे

आमचा डाव सुरु झाला . असो . आता काही घोळ होणार नाही अशी अपेक्षा करुयात

विअर्ड विक्स's picture

20 Jan 2015 - 9:57 pm | विअर्ड विक्स

MIPa 2 challeng me as I can not see your name in my list. Mipa 2 showing online within 30 minutes. check the no. of challenges.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 10:02 pm | प्रसाद गोडबोले

ओक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2015 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोघांनाही शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

बहुगुणी's picture

20 Jan 2015 - 10:51 pm | बहुगुणी

मीही पाहतोय, दोघांनाही शुभेच्छा!

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले

विक्स ,

आज डाव संपवायचा आहे की उद्या कन्टिन्यु करायचाय ? *PARDON*

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 11:41 pm | प्रसाद गोडबोले

प्रत्येक खेळाडूस प्रत्येक चालीसाठी दोन मिनिटे मर्यादा असेल, आणि प्रत्येकी जास्तीत जास्त ४० चालीत सामना संपवावा लागेल, म्हणजे एकूण १६० मिनिटांत (अडीच तासाहून थोड्या आधिक वेळात) प्रत्येक सामना संपेल.

प्रत्येक सामना त्या-त्या दिवशीच्या ड्रॉ नुसार खेळाडूंच्या सोयीने भारतीय प्रमाण वेळेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्याच दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत संपला पाहिजे.

पैसा's picture

20 Jan 2015 - 11:42 pm | पैसा

३ तास एकूण देते तुम्हाला

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 12:08 am | प्रसाद गोडबोले

अरे बापरे ...
पैसा ताई , तिथल्या घड्याळात काही तरी प्रोब्लेम आहे .
आमचा डाव २१.४९ सुरु झालाय म्हणजे आत्ता जवळपास २ तास होवुन गेलेत तरीही तिथल्या घड्याळात मी २० मिनिटे आणि विक्स ने ४५ मिनिटे घेतली आहेत असे दिसत आहे ...

पैसा's picture

21 Jan 2015 - 12:12 am | पैसा

ते रिफ्रेश केल्यापासूनचा वेळ मोजत आहे बहुतेक. तिथल्या घड्याळाची वेळ फॉलो करा.

पैसा's picture

20 Jan 2015 - 11:41 pm | पैसा

अरे मला पण झोप येतेय! असाच पेन्दिन्ग ठेवलात तरी चालेल. मात्र दुसर्‍या कोणी MiPa2 म्हणून लॉग इन केले तर पुन्हा आतापर्यंतच्या चाली खेळाव्या लागतील. डाव कुठे पेंडिंग ठेवलाय ते लक्षात असू द्या म्हणजे झालं.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 11:45 pm | प्रसाद गोडबोले

विक्स राव काय करत आहात ? मागल्या चालीपासुन तुम्ही तब्बल २० मिनिटे घेतली आहेत ....

अवांतर इकडे आमच्या घरी युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालीये , "नुकताच आग लावा तुमच्या त्या मिपाला " असा बाँब पडलाय...*mamba*

पैसा's picture

21 Jan 2015 - 12:26 am | पैसा

विअर्ड विक्स, अर्धा तास राहिला तुमचा!

मी झोपते आता! दोघांनाही शुभेच्छा! काही प्रॉब्लेम झाला तर बहुगुणी यांना व्यनि करा! शुभरात्री.

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 12:58 am | प्रसाद गोडबोले

Moves viks prago
1 e4 e6
2 e5 c5
3 Nf3 Nc6
4 d4 cxd4
5 Nxd4 Qa5+
6 c3 Qxe5+
7 Be2 NxNd4
8 cxNd4 Bxb4+
9 Nc3 Qc7
10 Bd2 a6
11 o-o Nf6
12 a3 Be7
13 Rc1 Qd8
14 Bf3 d5
15 Ne2 Bd7
16 Nf4 o-o
17 Re1 Qb6
18 Bc3 Bd6
19 Nh5 NxNh5
20 BxNh5 Rfc8 !?
21 Re3 g6
22 Be2 Qd8 !?
23 Qd2? Bf4!
24 g3 Bxe3
25 Qxe3 Qf6
26 Kh1 Rc7

विक्स ह्यांनी हाच डाव उद्या खेळु / पुर्ण करु असे सुचवले आहे , मला हरकत नाही

मॉडरेटर्स ची हरकत नसल्यास हा डाव उद्या पुर्ण करता येईल .

काय राव, मी तिकडे वाट पहात बसलो ना पटाकडे डोळे लावून! काहीच हालचाल दिसेना म्हणून इथे पहायला आलो..! बरं झालं!

काही हरकत नाही, उद्या पुढे खेळा. शुभरात्री!

पैसा's picture

21 Jan 2015 - 10:10 pm | पैसा

कधी सुरू करताय पुढे?

विअर्ड विक्स's picture

21 Jan 2015 - 11:09 pm | विअर्ड विक्स

will be just loggin in now

विअर्ड विक्स's picture

21 Jan 2015 - 11:40 pm | विअर्ड विक्स

waiting....... Let me know when you will be available? Its already 11.40 pm.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 7:24 pm | प्रसाद गोडबोले

आज संपवुन टाकु

मी येतो ओनलाईन !!

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 9:30 pm | प्रसाद गोडबोले

मी लॉगिन झालोय .

विक्स तुम्ही २७ वी खेळी किन्ग जी १ केली आहे का ? अर्थात राजा परत आधीच्या जागी घेतला आहे का ?

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले

27 Rac8

ही खेळी खेळुन लढाईला परत सुरुवात केली आहे =))

पैसा's picture

23 Jan 2015 - 12:02 am | पैसा

व्यनिला काही उत्तर पण नाही. २३ तारीख सुरू झाली. अजून अर्ध्या तासात आले नाहीत तर सामन्याचा निकाल प्रगोच्या बाजूने.

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 11:08 am | खटपट्या

महेश डब्ल्यु आणि माझा सामना सुरु झाला आहे. पंच कोण आहेत?

महेश खूप छान खेळले. माझा विजय झाला.

MaheshW's picture

21 Jan 2015 - 12:13 pm | MaheshW

अभिनंदन!!!

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 12:16 pm | खटपट्या

धन्यवाद महेश, आपण खूप छान खेळलात. मजा आली. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला.

MaheshW's picture

21 Jan 2015 - 12:29 pm | MaheshW

प्रत्यक्षात भेट हि होईल.

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 12:32 pm | खटपट्या

हो हो जरूर भेटू. तिकडे कट्टे होत असतात त्यांना हजेरी लावत जा. १५ फेब्रुवारीला मिपा संमेलन आहे. जमले तर भेट द्या. मुविंच्या संपर्कात रहा. :)

पैसा's picture

21 Jan 2015 - 3:28 pm | पैसा

खटपट्यांचे अभिनंदन आणि महेश याना पुन्हा खेळासाठी खूप शुभेच्छा!

Score sheet:
1. e2-e4 b7-b6
2. b1-c3 b8-c6
3. g1-f3 e7-e5
4. f1-c4 f8-b4
5. e1-g1 g8-f6
6. d2-d3 b4-c3
7. b2-c3 d8-e7
8. f3-g5 e8-g8
9. a2-a4 c8-b7
10. d1-f3 c6-d8
11. c1-a3 c7-c5
12. f3-h3 h7-h6
13. g5-f3 d7-d5
14. e4-d5 b7-d5
15. f1-e1 d5-c4
16. d3-c4 d8-c6
17. f3-d2 a8-d8
18. a3-c1 a7-a5
19. h3-g3 d8-d6
20. d2-e4 f6-e4
21. e1-e4 d6-d1
22. e4-e1 d1-e1

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले

३००

पैसा's picture

21 Jan 2015 - 4:12 pm | पैसा

उंट देऊन सत्कार नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2015 - 3:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहुगुणीचं अभिनंदन. उपक्रम आणि तिनशेचा आकडा पार केल्याबद्दल. :)
(चांगलं उद्योगाला लावलं भो तुम्ही बसल्या बसल्या)
-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 9:38 pm | खटपट्या

बाबौ !! पुढचा सामना वल्लीशेठबरोबर आहे.
वल्लीदा, कधी खेळायचे ?

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 9:39 pm | प्रचेतस

आता म्हटल तरी तयार आहे मी

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 9:57 pm | खटपट्या

बाप्रे !! आता हापीसात आहे. उद्या तुमच्या सकाळी जमेल? म्हणजे माझी आजची रात्र..

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 9:58 pm | प्रचेतस

सकाळी नै ना जमणार. :(
सध्या कचकून कामे हैत हापिसात.

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 10:28 pm | खटपट्या

ओके मग भारतीय वेळेनुसार शनीवारी सकाळी खेळूया का?

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 10:35 pm | प्रचेतस

हो.
शनिवारी जमेल.

खटपट्या's picture

21 Jan 2015 - 11:58 pm | खटपट्या

ओके भारतीय वेळेनुसार मी शनीवारी सकाळी तुम्हाला फोन करतो.

पैसा's picture

23 Jan 2015 - 11:56 am | पैसा

प्रगो आणि राजेश के दुसरी सेमी फायनल आज, उद्या कधी खेळताय?

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 12:18 pm | प्रसाद गोडबोले

आजच आजच !

उद्या पासुन बीझी ...उद्या सातार्‍याला चाललोय . परवा सज्जनगडावर . तेरवा परत पुण्याला .

राजेश राव , आजच खेळु , मी साधारण ९ वाजता ओनलाईन होवु शकतो !

नऊ वाजता खूप उशीर होतो. सायंकाळी सातला जमेल काय ?

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

७.३० साठी प्रयत्न करतो .
( इतक्या लवकर निघता येत नाही ऑफीसातुन :( )

Rajesh K's picture

23 Jan 2015 - 1:48 pm | Rajesh K

७.३० चालेल

मि हजर आहे. तुम्ही आलात कि सांगा.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 8:54 pm | प्रसाद गोडबोले

उशीर झाल्याबद्दल क्षमस्व !

ओनलाईन झालो आहे !

तुम्हाला पाढर्‍या सोंगट्या दिल्या आहेत ...

माझा प्रगो बरोबर सामना सुरु झाला आहे. रेफ्री कोण आहे???

पैसा's picture

23 Jan 2015 - 9:04 pm | पैसा

मय हूं.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 9:33 pm | प्रसाद गोडबोले

तुफ्फान चाललाय डाव !!

राजेश ह्यांच्या कडे माझ्या प्रधानाच्या बदल्यात एक बिशक आणि दोन नाईट्स आहेत ...

एन्डगेमला मजा येणार !!

पैसा's picture

23 Jan 2015 - 9:39 pm | पैसा

खरंच मस्त! दोघांनाही शुभेच्छा!

बहुगुणी's picture

23 Jan 2015 - 10:02 pm | बहुगुणी

गेल्या काही मिनिटांत काही हालचाल दिसली नाही राजेश के यांच्याकडून, काय झालं?

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 10:06 pm | प्रसाद गोडबोले

Rajesh K 11 min ago मिटवा Block
एक काम आले आहे. डाव सोडून जावे लागत आहे. क्षमस्व.

आता पंचांनाच निर्णय द्यावा लागेल असे दिसत आहे ((

प्रसाद गोडबोले's picture

23 Jan 2015 - 10:11 pm | प्रसाद गोडबोले

३२ व्या चाली अखेरची स्थिती

Rajesh K Prago
1 e4 Nf6
2 Qf3 e5
3 Bc4 Bc5
4 c3 Nc6
5 a4 Na5?
6 Ba2 Be7
7 b4 Nc6
8 d3 d6
9 h3 o-o
10 g4 Be6
11 g5 Nd7
12 h4 Ba2 ?!
13 Ra2 a6
14 Ne2 b5 ?!
15 a5 Qe8 ?!
16 h5 g6
17 hg6 fg6
18 Qh3 Qf7
19 QNd7 QRa2
20 Na3 Nxa5
21 Qxe7 Rf7
22 QxRf7 ? QxQf7
23 Be3 Qa2?!
24 Rh2 Qf3
25 Be3 d5
26 Ng2 Qf7
27 Nc2 dxe4
28 dxe4 Qc4
29 Kd2 Rd8+
30 Kc1 Qf1+
31 Bb2 QxNg1
32 Rh3 Qg4

पैसा's picture

23 Jan 2015 - 10:24 pm | पैसा

परत येणार नाही म्हटलय का? तर त्याने डाव सोडला (रिझाईन केला) असं होईल. आजच्या दिवसात जर तुम्ही पुढे सुरू करणार असलात, तरी काही प्रॉब्लेम नाही.

प्रचेतस's picture

23 Jan 2015 - 10:23 pm | प्रचेतस

मी आणि प्रगो प्र्याक्टिस म्याच सुरु

प्रगोंची स्थिती माझ्यापेक्षा चांगली आहे. मि पराभव स्वीकारतोय. अभिनंदन. :)

पैसा's picture

24 Jan 2015 - 1:16 pm | पैसा

प्रगो पण ऑनलाईन दिसतोय. अजून पूर्ण करता का? चांगली चालली होती मॅच. राजेश, तुमच्या आणखी मॅचेस बघायला आवडतील!

प्रसाद गोडबोले's picture

25 Jan 2015 - 11:30 pm | प्रसाद गोडबोले

खटपट्या वल्ली सेमी फायनल चे काय झाले ?

फायनल ला कोण ?

या विकांतामध्ये वल्लीदांना अजिबात वेळ नव्हता. येत्या विकांताला वल्ली वेळ काढणार आहेत.

पैसा's picture

26 Jan 2015 - 12:00 am | पैसा

चेष्टा करताय काय? =)) उद्या स्पर्धा संपवायची आहे. बहुगुणी वैतागले असतील!

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 12:07 am | खटपट्या

आता मी काय करू. वल्लींना फोन केल्ता मी. :) पण त्याना जमत नाहीये सद्यातरी

पैसा's picture

26 Jan 2015 - 12:26 am | पैसा

उद्या सकाळी तुम्हाला जमत असेल तर बघा. नाहीतर वल्ली तुम्हाला बाय देईल. काल, परवा राजेश के पण छान खेळत होते. त्यांना अचानक जावे लागले. मग त्यांनी सामना सोडला. जर उद्या सकाळी वल्लीला जमत नसेल तर तुम्ही आणि प्रगो फायनल खेळा. पुढच्या स्पर्धेला जास्त दिवस ठेवून खेळवू.

भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी मी कोणाशीही खेळण्यास तयार आहे. वल्ली काय म्हणतायत ते बघावे लागेल. प्रगोंना कोणती वेळ चालेल?

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 7:52 am | खटपट्या

मी तयार आहे. लवकर सुरु केल्यास बरे. उद्या हाफीस आहे.

खटपट्या, तुम्ही आता आहात काय?
जमत असेल तर आता डाव टाकूयात.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 10:39 am | खटपट्या

ओके करतो लॉग ईन !!

प्रचेतस's picture

26 Jan 2015 - 10:40 am | प्रचेतस

मी Valli नावाने लॉग इन केले आहे.
तुमचा आयडी ani आहे का?

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 10:49 am | खटपट्या

मी khatpatya2 या नावाने लोग इन आहे

प्रचेतस's picture

26 Jan 2015 - 10:50 am | प्रचेतस

सुरु करा राव खटपट्या.
तुमची पांढरी मोहोरी आहेत.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 10:58 am | खटपट्या

मी पुढची चाल खेळल्यावर मला एरर आली आणि एका कुटुंबाचे चित्र स्क्रीन्वर आले.
आता काय करायचे ???

प्रचेतस's picture

26 Jan 2015 - 11:00 am | प्रचेतस

मलाही हीच एरर आलीय.

मॉडरेटर काय म्हणतात पाहूयात.

पैसा's picture

26 Jan 2015 - 11:02 am | पैसा

५ मिनिटानी ट्राय करत रहा. नाहीच तर रात्री लवकरात लवकर पुढे सुरू करू.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 11:01 am | खटपट्या

Please send me an email to let me know that this error happened and describe what were you trying to do. You can start again here.

abcd

हे असे काय तरी येतेय स्टार्ट अगेन वर क्लीक केल्यावर सामना परत सुरु होणार पहील्यापासुन की आहे तिथुन ?

प्रचेतस's picture

26 Jan 2015 - 11:02 am | प्रचेतस

अगदी अगदी,
हेच येतंय मलापण.
फोटू मात्र वेगवेगळे यायलेत.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 11:03 am | खटपट्या

:) :)

पैसा's picture

26 Jan 2015 - 11:03 am | पैसा

khatpatya2 to move
असा मेसेज येतोय. म्हणजे आधीच्या चाली आहेत.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 11:04 am | खटपट्या

ट्राय अगेन वर क्लीक करु का?

पैसा's picture

26 Jan 2015 - 11:07 am | पैसा

मला ते गोर्‍या लोकांचे फोटोच येताहेत एकामागोमाग! कॅशे क्लीन केला. परत लॉग इन केलं.

परत थोड्या वेळाने बघत राहू.

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 11:03 am | खटपट्या

ओके कोण आहेत आज मॉडरेटर ? पैसाताई ?

पैसा's picture

26 Jan 2015 - 11:04 am | पैसा

बहुगुणी दिसले नाहीत आज.