श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
प्रतिक्रिया
26 Jan 2015 - 11:08 am | खटपट्या
मी "ट्राय अगेन" वर क्लिक करुन बघतो. काय होईल ते होईल. ठीकै ??
26 Jan 2015 - 11:13 am | पैसा
ओक्के!
26 Jan 2015 - 11:16 am | खटपट्या
पहीली माणसं दीसत होती आता तर दगड दीसतायत :)
26 Jan 2015 - 11:19 am | प्रचेतस
हो ना राव.
वास्तविक दगड मला खूप आवडतात पण आज मात्र मूडाफ करून टाकला राव त्यांनी.
26 Jan 2015 - 11:21 am | खटपट्या
26 Jan 2015 - 11:28 am | खटपट्या
नर्मदेतले गोटे हलायचे नाव घेत नाहीयेत.
26 Jan 2015 - 11:19 am | पैसा
=)) तुम्हाला झोप येईपर्यंत चालू ठेवा.
26 Jan 2015 - 5:16 pm | बहुगुणी
मंडळी,
दोन प्रवासांमधल्या 'खिडकी'त मिपा-प्रवेश करून पाहिलं तर हा घोटाळा झालेला दिसला, पण मी प्रेक्षक म्हणून प्रवेश केल्यावर बाकीचे एकूण-एक सर्व डाव व्यवस्थित चालू दिसताहेत, फक्त हाच डाव 'गोंधळला' आहे असं दिसतंय. परस्परांवर तुमचा विश्वास असेल (आमचा आहे!) तर दोघांनीही हा डाव सोडून द्या (बरोबरी/ रिझाईन) आणि नव्याने डाव सुरू करून पुन्हा त्याच खेळी करता येतात का ते पहा.
मी पुन्हा किमान २४ तासांसाठी गायब असेन (तसंही हा जो काही प्रकार आहे तो माझ्या अल्प-मेंदूच्या बाहेरचा आहे, त्यामुळे मी वरच्या सूचनेपेक्षा काही वेगळं सूचवू शकेन ही शक्यता नाहीच!), पण उर्वरित सामन्यांसाठी शुभेच्छा!
26 Jan 2015 - 12:58 pm | आनंद
मला एक गोष्ट अजुन कळ्लीच नाहिए. www.chess.com सारखी फेरारी असताना आपण ह्या प्रिमयर पदमिनी स्टाइल साइटी वर का खेळत आहोत.वरच्या साईटी वर आपआपल्या नावाने लॉगइन करुन सामने खेळता येतील.
आणि काही घोळही होणार नाहित.( वरच्या साइटीचा माझा काहीही संबंध नाही.)
26 Jan 2015 - 5:25 pm | बहुगुणी
आनंदराव, चेस.कॉम विषयीचा तुमचा निरोप मी पाहिला होता, पण तो बराच नंतर आला, त्याआधी खूप वेळ घालवून माझ्या अल्पमतिप्रमाणे जमेल तशी खुडबूड करून मी मला सहज मिळालेल्या या पटाचा वापर करून धागा सुरू केलेला होता. मिपावरून न हलता इथल्या इथेच खेळाडूंना खेळता आणि प्रेक्षकांना पहाता यावं असा मुख्य उद्देश होता. तसं Inframe वापरून चेस.कॉम वर खेळता येत असेलही.
तुम्ही म्हणताय तसं चेस.कॉम याहून खूप सोपं असेल याबद्दल शंका नाही, यापुढच्या स्पर्धा त्यावर घेऊ शकू, त्यादृष्टीने तुम्ही धागा नक्की टाका. सहभाग घ्यायला नक्की आवडेल.
13 Feb 2015 - 11:18 am | ब़जरबट्टू
www.chess.com सारखी फेरारी असताना आपण ह्या प्रिमयर पदमिनी स्टाइल
:=) :=) वारल्या गेलो आहे..
chess.com पंखा - बजरु..
27 Jan 2015 - 5:52 pm | असंका
....काय ठरतंय?
28 Jan 2015 - 3:35 pm | प्रसाद गोडबोले
मी काय म्हणतो ...
वल्ली आणि खटपट्या ह्यंनी वेळेत डाव पुर्ण न केल्या बद्दल त्यांना स्पर्धेतुन बाद करण्यात यावे अन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात यावा :D
28 Jan 2015 - 3:37 pm | पैसा
:ROFL:
28 Jan 2015 - 6:01 pm | पैसा
प्रगो आणि राजेश के ची अर्धी राहिलेली मॅचपण पूर्ण करायला हरकत नाही!
28 Jan 2015 - 5:45 pm | MaheshW
माझी सगळ्या खेळाडूना आशी विनंती आहे कि जर तुम्ही स्पर्धेत भाग घेत असला तर आपल्या अमूल्य वेळेतुन स्पर्धेसाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. जेणे करून स्पर्धा वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण होईल.
28 Jan 2015 - 6:00 pm | पैसा
संपूर्ण सहमत. आणि पुढच्या वेळी हा वेळेचा गोंधळ टाळण्यासाठी वेगळ्या टाईम झोनच्या दोघांची गाठ फायनलपर्यंत पडणार नाही असा ड्रॉ तयार करू.
31 Jan 2015 - 3:30 am | बहुगुणी
की वल्ली, प्रगो, राजेश के, खटपट्या सगळेच मैदानातून गायब झाले?
31 Jan 2015 - 5:18 am | खटपट्या
मी भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी खेळण्यास तयार आहे.
@वल्लीदा - तुम्हाला जमेल का.
प्रोब्लेम सोल्व झाला असेल अशी आशा करुया.
31 Jan 2015 - 11:43 am | प्रचेतस
नाही ना.
हापिसात बोलावलाय राव दोन्ही दिवस. :(
31 Jan 2015 - 2:51 pm | पैसा
खटपट्या आणि प्रगो खेळून टाका तुम्ही फायनल!
31 Jan 2015 - 3:26 pm | विअर्ड विक्स
प्रगो डाव लावायाच्याआधी घोषणा करा …। प्रेक्षक म्हणून मला डाव बघायचाय
1 Feb 2015 - 3:00 am | खटपट्या
प्रगो, मी रविवारी सकाळी कधीही तयार आहे..
1 Feb 2015 - 10:34 am | खटपट्या
अहो प्रगो, कधी खेळूया ??
31 Jan 2015 - 10:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सुंदरा मनामधे भरली रे.......डिब्ज!!! डिब्ज!!!
3 Feb 2015 - 1:18 am | खटपट्या
मी भारतीय वेळेनुसार कधीही सकाळी खेळायला तयार आहे.
किंवा शनिवारी रविवारी कधीही...
12 Feb 2015 - 10:24 pm | खटपट्या
भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी ९:०० वाजता अंतीम सामना पक्का केलेला आहे.
12 Feb 2015 - 10:50 pm | बहुगुणी
प्रेक्षकहो:
लॉगिनः MiPa3
पासवर्डः Watch
14 Feb 2015 - 8:48 am | खटपट्या
मी तयार आहे. प्रगो तुम्ही तयार असाल तेव्हा सांगा.
14 Feb 2015 - 10:03 am | प्रसाद गोडबोले
डाव सुरु
14 Feb 2015 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार
डाव रंगतदार होणार असे दिसते आहे.
आतापर्यंत दोघांच्या सहा सहा चाली झाल्या आणि दोघांचे एक एक प्यादे मारले गेले.
खटपट्या यांनी वजीर बाहेर काढला आहे तर प्रगोंचा उंट मोहीमेवर निघाला आहे.
पैजारबुवा,
14 Feb 2015 - 11:21 am | असंका
प्रगो चांगलेच काटाकाटीवर उतरलेत...चार प्यादी, आणि वजीरही उडवला आहे प्रतिपक्षाचा!
14 Feb 2015 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले
पण खटपट्या हे त्यांचा आयडी सार्थ करीत आहेत ...
ये डाव मुझे दे दे खटपट्या ... नै .... ये डाव मुझे दे दे खटपट्या... नै ... असं काहीसं चाललय =))
14 Feb 2015 - 10:16 am | असंका
स्पर्धकांना शुभेच्छा!!
14 Feb 2015 - 12:08 pm | असंका
प्रगो यांचे अभिनंदन....!!
14 Feb 2015 - 12:10 pm | खटपट्या
अभिनंदन प्रगो.
प्रगोंनी मला ५ ते ६ चालींआधीच चेकमेट करायला पाहीजे होते. एवढा वेळ का लावला प्रगो ??
14 Feb 2015 - 12:15 pm | बहुगुणी
जी ८ चा हत्ती राजाने सोडून दिला तेंव्हाच मॅच दुष्मनीवरून दोस्तीवर उतरली होती :-)
खेळीमेळीतल्या खेळाबद्दल अभिनंदन!
14 Feb 2015 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले
खटपट्या , जेवत असल्याने शेवटच्या काही चाली करायला जास्त वेळ लागला .
बहुगुणी , डावाच्या पटावर समोरचा हार मानत नाही तोवर दोस्ती कधीच नसते ... तो जी ८ चा हत्ती मी जर राजा ने खल्ला असता तर स्टेल्मेट होवुन डाव बरोबरीत निघाला असता ! खटपट्या त्याचाच प्रयत्न करत होते बहुधा !
असो.
आता दोस्ती !! =)
14 Feb 2015 - 12:11 pm | बहुगुणी
उत्तम लढतीबद्दल खटपट्या आणि प्रगो या दोघांचेही अभिनंदन!
14 Feb 2015 - 12:17 pm | असंका
+१ अगदी अगदी...
दोघांचेही अभिनंदन...वर्ल्ड कप सोडून मिपावरचं बुद्धीबळ बघत बसल्याचं सार्थक झालं!!
14 Feb 2015 - 12:24 pm | प्रसाद गोडबोले
no khatapatya prago
1 e4 c5
2 d4 cd4
3 Qd4 Nc6
4 Qd1 e5
5 Nc3 Bc5
6 Qg4 g6
7 Qg3 d6
8 Bd2 Nf6
9 h3 Bb5?!
10 Qa3 a6
11 o-o-o Be6
12 f4 Qa5
13 a6 Bxa6
14 ba6 Qa6+
15 Kb1 Nb4
16 Bc4 BxBc4
17 Rc1 Ba2+
18 Ka1 Bd5+
19 Kb1 Nxe4
20 Ne2 Rc8
21 Qe4 Bxe4
22 fxe Qb3+
23 Ka1 Nc2+
24 Rc2 Qc2
इथुन पुढे खेळी लिहिल्या नाहीत .
सर्व प्रेक्षक संपादक खटपट्या ह्यांचे आभार !
बहुगुणी ह्यांचे विशेश आभार इतकी नावीन्यपुर्ण सन्कल्पना मिपावर राबवल्या बद्दल =)
धन्यवाद
14 Feb 2015 - 12:32 pm | खटपट्या
मझ्यातर्फे सर्व प्रेक्षक, संपादक आणि बहूगुणी यांचे आभार.
पैसाताई यांचे विशेष आभार.
14 Feb 2015 - 12:51 pm | बहुगुणी
Score sheet:
1. e2-e4 c7-c5
2. d2-d4 c5-d4
3. d1-d4 b8-c6
4. d4-d1 e7-e5
5. b1-c3 f8-c5
6. d1-g4 g7-g6
7. g4-g3 d7-d6
8. c1-d2 g8-f6
9. h2-h3 c5-b4
10. g3-e3 a7-a6
11. e1-c1 c8-e6
12. f2-f4 d8-a5
13. a2-a3 b4-a3
14. b2-a3 a5-a3
15. c1-b1 c6-b4
16. f1-c4 e6-c4
17. d1-c1 c4-a2
18. b1-a1 a2-d5
19. a1-b1 f6-e4
20. g1-e2 a8-c8
21. e3-e4 d5-e4
22. f4-e5 a3-b3
23. b1-a1 b4-c2
24. c1-c2 b3-c2
25. e5-d6 e8-g8
26. d6-d7 c8-d8
27. d2-h6 d8-d7
28. h6-f8 g8-f8
29. h1-c1 c2-b3
30. c3-e4 b3-a4
31. a1-b2 a4-e4
32. c1-c2 e4-g2
33. h3-h4 g2-g4
34. e2-c1 g4-h4
35. b2-a3 b7-b5
36. c1-b3 d7-d3
37. a3-b2 h4-b4
38. c2-c1 b4-b3
39. b2-a1 d3-d2
40. c1-c8 f8-g7
41. c8-g8 g7-f6
42. g8-g6 f6-e7
43. g6-e6 b3-e6
44. a1-b1 e6-e1
30 Mar 2015 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले
जितं मया
तसे ऑनलाईन स्पर्धेतील अंतिम डाव होवुन बरेच दिवस झाले होते पण सेमी फायनल मधे वल्ली ह्यांनी बाय दिला होता , त्यामुळे आम्हाला आमचा विजय अपुर्ण वाट्टत होता .... पण काल वल्लींसोबत दोन डाव खेळलो आणि जिंकलो ... म्हणुन लागलीच लालपंथाच्या प्रथेप्रमाणे जाहिरात करत आहे
=))
30 Mar 2015 - 1:41 pm | प्रचेतस
खी खी खी. =))
31 Mar 2015 - 12:13 am | खटपट्या
आभीणंदण..
परत कधी होणार आहेत स्पर्धा ???
31 Mar 2015 - 10:51 pm | पैसा
बहुगुणींना वेळ होईल तसे किंवा कोणीही पुढाकार घेऊन चालू करा की!
31 Mar 2015 - 8:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाबिणंदन. लाल सलाम =))
25 Oct 2023 - 2:27 am | स्वरुपसुमित
उत्तम