ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 9:59 am

श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.

या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

16 Jan 2015 - 11:36 pm | बहुगुणी

ब्राव्हो!

बहुगुणी's picture

16 Jan 2015 - 11:18 pm | बहुगुणी

The program is set so that the first person to log in and challenge gets white chess board by default; तो प्रोग्रॅम अर्थातच मिलान मिक्लावसिक यांनी केलेला आहे, त्यामुळे मी योजलेले 1White आणि 1Black हे पासवर्ड्स नावालाच आहेत. ज्यांना पांढरी मोहोरी हवी असतील त्यांनी आधी लॉगिन करून चॅलेंज करणं गरजेचं आहे. पण टॉस च्या ऐवजी लॉगिन करण्यातली अनिश्चितता हीच नशिबाची खेळी म्हणून वापरायला लावणं मला सोपं वाटलं.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:35 pm | प्रचेतस

Score sheet:
1. d2-d4 d7-d5
2. c1-e3 b8-c6
3. b1-c3 g8-f6
4. d1-b1 c8-f5
5. g1-f3 e7-e6
6. f3-g5 f8-b4
7. a2-a3 b4-a5
8. g2-g3 f6-e4
9. h1-g1 e4-g5
10. e3-g5 d8-g5
11. b2-b4 a5-b6
12. h2-h4 g5-g4
13. f2-f3 g4-d4
14. g3-g4 d4-c3
15. e1-d1 f5-g6
16. g1-g3 c3-d4
17. d1-c1 d4-e3
18. c1-b2 b6-d4
19. c2-c3 g6-b1
20. a1-b1 e3-d2
21. b2-b3 d2-c3
22. b3-a2 e8-c8
23. f1-h3 c3-d2
24. a2-b3 a7-a6
25. f3-f4 b7-b5
26. b1-h1 d2-b2

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 11:42 pm | प्रसाद गोडबोले

हे नोटेशन कळत नाहीये

पैसा's picture

17 Jan 2015 - 8:42 pm | पैसा

पांढर्‍यांच्या बाजूने १ ते ८ rows आणि a b c d कॉलम्स असा excel sheet समजून बघ. आधी पांढरा आणि मग काळा अशा सगळ्या चालींच्या जोड्या आहेत.

पैसा's picture

17 Jan 2015 - 8:49 am | पैसा

१) योगी९०० वि. प्रा.डॉ. दिलीप बिरुटे
२) खटपट्या वि. आनंद

@ बहुगुणी: कालच्या सामन्यांपैकी राजेश के हजर होते. त्यांना पुढे चाल द्यावी का? आणि दुसरा गजानन वि सत्कुल सामना रद्द झाल्याने पुढच्या फेरीत प्रतिस्पर्ध्याला आपोआप पुढे चाल मिळेल. त्याचप्रमाणे विअर्ड विक्स यांना पुढे चाल मिळेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jan 2015 - 10:06 am | ज्ञानोबाचे पैजार

मला पण गम्मत म्हणुन खेळुन बघायचे आहे.
कसा खेळु? आणि कोणा बरोबर?

पैजारबुवा,

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:18 am | पैसा

मिपा९९ म्हणून रजिस्टर करा आणि चॅलेंज द्यायला कोणी सापडतय का बघा.

बजरबट्टू मॅच सुरू झाल्यानंतर पुढे उपस्थित राहू न शकल्याने विअर्ड विक्स यांना पुढे चाल द्यावी.

ज्ञानोबाचे पै जार यांना राजेश के यांच्याशी नन्दादीप यांचा आय डी (MiPa11, पासवर्ड 1White) वापरून मॅच खेळू द्यावी पण ती आजच संपली पाहिजे.

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:30 am | पैसा

पैजारबुवा Rajesh K यांना कॉण्टॅक्ट करा लौकरात लौकर!

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jan 2015 - 10:36 am | ज्ञानोबाचे पैजार

मिपा ११ नावाने लॉगीन केले आहे

पैजारबुवा

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jan 2015 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

राजेश के यांचा आयडी मिपा १२ आहे ना?

ते बोर्डावर दिसत नाहीत.

पैजारबुवा,

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:48 am | पैसा

आज कधी येतील माहित नाही. त्यांना व्यनि केला आहे. तोपर्यंत सराव म्हणून इतर कोणी सापडतय का बघा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jan 2015 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

मिपा ९९ म्हणुन आयडी घेतला आहे.

अरे कोई है? ए भाय मेरे साथ कोई खेलो भाय...

पैजारबुवा,

पैसा's picture

17 Jan 2015 - 11:26 am | पैसा

राजेश के आणि पैजारबुवांची मॅच सुरू झाली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती वाजता म्याच खेळणार ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Jan 2015 - 1:25 pm | पैसा

व्यनि पाठवून बघा जरा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगी९०० ला व्य.नि. टाकलाय.. वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Jan 2015 - 1:58 pm | पैसा

Rajesh K जिंकले आहेत. ज्ञानोबाचे पैजारबुवांना एका मिटिंगला जावे लागले आणि किती वेळ लागेल हे माहीत नसल्याने त्यानी रिझाईन केले. एक तास खेळून फक्त २ प्यादी दोघांनी गमावली होती. जोरदार मॅच सुरू होती! दोघांनाही धन्यवाद आणि Rajesh K यांचे अभिनंदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2015 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

राजेश के यांनी सुरेख खेळ केला. मी पांढरी मोहरी घेउन खेळत होतो.

राजेश यांनी अत्यंत योजनाबद्ध खेळ करत मला बचावात्मक खेळ करायला भाग पाडले. त्यांच्या अनेक चाली अशा होत्या की त्यांना उत्तर देण्यासाठी मला बराच विचार करावा लागला.

सामना अर्धवट सोडायला लागला त्याच दु:ख नक्कीच आहे. पण पुर्ण झाला असता तरी कदाचीत निकालात काहीच फरक पडला नसता.

राजेश यांना पुढील सामन्यांसाठी हार्दीक शुभेच्छा.

या निमित्ताने बहुगुणी यांचे सुध्दा आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमधुनच आम्हाला हा आनंद मिळाला. आणि दुसरे आभार पैसाताईंचे. त्या वेळातवेळ काढुन अत्यंत उत्साहाने परिक्षकाची भूमिका निभावत आहेत.

पैजारबुवा,

पैसा's picture

17 Jan 2015 - 2:05 pm | पैसा

mipa101 कोण आहे?

प्यारे१'s picture

17 Jan 2015 - 2:12 pm | प्यारे१

मी.

पैसा's picture

17 Jan 2015 - 2:14 pm | पैसा

मग स्पर्धेत भाग घ्यायचा होता ना! नन्दादीपबरोबर खेळणार असलात तर अजून विचारा! गजानन आणि सत्कुलची मॅच कॅन्सल झालीय.

स्पर्धेत भाग घेण्याइतपत जमत नाही.
आत्ता जस्ट लॉगिन केलं नि मिपा०२ उपलब्ध आहे म्हणून खेळायला सुरुवात केली.

नन्दादीप ना व्यनि करायचा का? लॉगिन दिसत नाहीत.

पैसा's picture

17 Jan 2015 - 2:20 pm | पैसा

सकाळी होता. व्यनि पाठवून वेळ ठरवली तर येईल ऑनलाईन. कारण बहुतेकांना व्यनिचं नोटिफिकेशन असतं.

आतिवास's picture

17 Jan 2015 - 3:44 pm | आतिवास

मिपा १२ आहेत का?
(मिपा ६२)

प्यारे१'s picture

17 Jan 2015 - 5:43 pm | प्यारे१

Mi ani ativas hyancha saamna houn ativas hya vijayi zalelya aahet. Congrats! (Out of competition asali tari can be considered)

पैसा's picture

17 Jan 2015 - 7:23 pm | पैसा

पण आतिवास यांचे नाव वल्लीबरोबर खेळण्यासाठी आधीच ड्रॉ मधे आहे. त्यामुळे हा सामना स्पर्धेत घेता येणार नाही. असाच उत्साहाने मॅचेस खेळत रहा. पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी!

खटपट्या आणि माझा सामना आज रात्री १०.०० आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा आणि योगी९०० चाही बुद्धीबळ सामना रात्री दहा वा. आहे. प्रेक्षकांनी येण्याचे करावे.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Jan 2015 - 7:25 pm | पैसा

सर्वांना शुभेच्छा!

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2015 - 8:26 pm | प्रसाद गोडबोले

सर , जमल्यास चाली वेगळ्या एक्सेल शीट मध्ये लिहुन नंतर मिपावर टाका .
मेर्व्हिक च्या कोड मधील नोटेशन फार कन्फ्युजिंग आहे ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

17 Jan 2015 - 9:34 pm | खटपट्या

मि मिपा ५१ या आयडी ने लॉग ईन केले आहे. ० चा १ करुन रीफ्रेश बटन दाबून तयार आहे. आनंद यांना फोन केला आहे. ते थोड्याच वेळात लोग ईन करतील. तोपर्यंत मला कोणी चॅलेंज करणार नाही ना ?

पैसा's picture

17 Jan 2015 - 9:37 pm | पैसा

प्रेफरन्स बदलून वाढवा

पैसा's picture

17 Jan 2015 - 9:55 pm | पैसा

खटपट्या आणि आनंद MiPA51 MiPA52 यांचा सामना सुरू झालाय. दोघांनाही शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी वाट पाहतोय. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगी९०० चला. मला लै वाट पाहावी लागलीय. जिंका किंवा जिंकु द्या.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

17 Jan 2015 - 10:49 pm | पैसा

प्रा.डॉ. बिरुटे आणि योगी९०० यांचीही मॅच मगाशीच सुरू झालीय आणि दोन्ही मॅचेस जोरात सुरू आहेत!

योगी९००'s picture

17 Jan 2015 - 11:51 pm | योगी९००

प्रा डॉ जिंकले...त्यांचे अभिनंन्दन ...!!!

पैसा's picture

17 Jan 2015 - 11:52 pm | पैसा

MiPA41 योगी९०० यांनी सामना सोडला. त्यामुळे प्रा.डॉ. दिलिप बिरुटे विजयी. सरांचे हार्दिक अभिनंदन!
Score sheet:
1. e2-e4 e7-e5
2. d2-d3 d7-d6
3. g1-h3 c8-h3
4. g2-h3 g8-h6
5. f1-e2 h6-g8
6. e2-h5 g7-g6
7. h5-g4 h7-h5
8. g4-f3 d8-h4
9. f3-g2 b8-c6
10. b1-a3 e8-c8
11. c1-e3 c8-b8
12. c2-c4 h4-f6
13. d1-a4 a7-a6
14. b2-b4 c6-d4
15. b4-b5 d4-f3
16. g2-f3 f6-f3
17. h1-f1 c7-c5
18. b5-a6 b7-a6
19. a1-b1 b8-c7
20. a4-a6 c7-d7
21. b1-b7 d7-e6
22. e3-g5 d8-d7
23. b7-b6 f3-h3
24. a3-b5 h3-d3
25. a6-c8 d3-e4
26. e1-d2 g8-e7
27. b5-c7 e6-f5
28. c8-d7 f5-g5
29. d7-d6 e4-f4
30. d2-e1 f4-c1
31. e1-e2 c1-c4
32. e2-e1 c4-c1
33. e1-e2 c1-c4
34. e2-e1 c4-c3
35. e1-d1 h8-g8
36. f1-g1 g5-h6
37. c7-d5 c3-d4
38. d1-e1 d4-a1
39. e1-e2 a1-g1
40. d5-f6 g8-h8
41. d6-e5 e7-f5
42. b6-b7 f5-d4
43. e2-d3 g1-f2
44. b7-f7 f2-c2
45. d3-e3 d4-f5
46. e3-f3 c2-d3
47. f3-g2 f5-h4
48. g2-f2 d3-f3
49. f2-e1 h4-g2
50. e1-d2 f3-f2
51. d2-c3 f2-f3
52. c3-c4 f3-f1
53. c4-d5 g2-e3
54. e5-e3 g6-g5
55. e3-e6 f1-g2
56. f6-e4

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2015 - 11:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योगी९०० बरोबरच्या डावात मजा आली. योगीनं मानसिक थकवा आणला. एकदा तर चेक देऊ देऊ मला प्रचंड घायाळ केलं. चाल खेळायला संधीच देईना. अखेर घोड्याची एक त्यांची चुकीची चाल माझ्या पथ्यावर पडली आणि मला डाव सोपा झाला. आभार.योगी. तुमच्याशी बोलून आनंद वाटला. वाट्सपवर असूच. शुरा. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

17 Jan 2015 - 11:56 pm | प्रचेतस

सामना भलताच रंगलेला दिसतोय. आणि बराच वेळ चाललेला दिसतोय.
प्रा. डॉं. चे अभिनंदन.

पैसा's picture

17 Jan 2015 - 11:57 pm | पैसा

मात्र वल्लीची खरी मॅच उद्या आहे आतिवासबरोबर. काल प्रॅक्टिस झाली.

योगी९००'s picture

17 Jan 2015 - 11:58 pm | योगी९००

मला ही मजा आली...माझी एकच चुक नडली नाहीतर अजूनही डाव चालला असता...

खरेतर प्रा डाँचा खेळ माझ्यापेक्शा खुपच उजवा होता. त्यांनी मला ती चुक करायला भाग पाडली हे म्हणणे इष्ट वाटते.

स्पर्धा नाही, पण कुणी आहे का आत्ता खेळायला हजर?
(मिपा ६२)

प्रचेतस's picture

18 Jan 2015 - 12:02 am | प्रचेतस

मी येतो.
आपला उद्याचा सामना आताच खेळवला तर कसं?

उद्या रैवारी मी मोकळा सापडणं अवघड आहे.

आता कुणी खेळण्यास इच्छुक असेल तर मी लॉग इन होऊ शकतो.

आहे का कुणी?

आतिवास's picture

18 Jan 2015 - 12:02 am | आतिवास

आपण खेळायचं का परत? :-)
(दुसरं कुणी नसेल तर!)

प्रचेतस's picture

18 Jan 2015 - 12:03 am | प्रचेतस

हो. मी लॉग इन झालोय. मिपा ६१ ने :)

चालेल - अधिकृत सामना. पण पंच आहेत का हजर?

पैसाताई दिसतेय हजर सदस्यांत.

पैसा's picture

18 Jan 2015 - 12:08 am | पैसा

१८ तारीख सुरू झालीय इथे. खेळा तुम्ही लोक. मला झोप आली की मी झोपते. स्कोअर आणि रिझल्ट वल्ली टाकेल शेवट.

प्रचेतस's picture

18 Jan 2015 - 12:24 am | प्रचेतस

हुश्श.
जिंकलो ब्वॉ.
आतिवासताईंनी सुरुवातीसच किल्लेकोट करुन डावात रंगत आणली होती. मजा आली खेळात.

आता दुसर्‍या फेरीत आमची लढत बिरुटे सरांबरोबर. :)

आतिवास's picture

18 Jan 2015 - 12:26 am | आतिवास

अभिनंदन आणि शुभेच्छा.

पैसा's picture

18 Jan 2015 - 12:24 am | पैसा

वल्लीचे हार्दिक अभिनंदन!
Score sheet:
1. e2-e4 e7-e5
2. c2-c3 b8-c6
3. a2-a4 g8-f6
4. f1-d3 f8-c5
5. g1-f3 d7-d6
6. e1-g1 c5-b6
7. a1-a3 d6-d5
8. e4-d5 d8-d5
9. d3-c4 d5-d6
10. f1-e1 c8-e6
11. c4-e2 e8-c8
12. f3-g5 d6-c5
13. e2-b5 c5-f2
14. g1-h1 e6-d5
15. e1-f1 f2-g2

पैसा's picture

18 Jan 2015 - 11:39 am | पैसा

कालच्या या सामन्यात थोडा वाद निर्माण झाला. आपल्याला चाली करता येत नाहीत असा खटपट्या यांचा व्यनि आला त्यानंतर २ चाली त्यांच्या आयडीने केल्या गेल्या. तोपर्यंत खटपट्या यांची परिस्थिती मजबूत दिसत होती. मात्र यानंतरच्या अनाकलनीय चाली तिसर्‍याच कोणीतरी खटपट्या यांच्या आयडीने लॉग इन करून केल्या असे सकृद्दर्शनी वाटत आहे. बहुगुणी यांच्या सल्ल्याने वादग्रस्त चालीपासून पुढे मॅच खेळायची विनंती दोघांनाही केली. खटपट्या त्याला तयार आहेत मात्र आनंद यांची त्याला तयारी नाही. त्यामुळे त्यावेळची सामन्याची परिस्थिती पाहून सामना खटपट्या यांना बहाल करण्यात आला आहे.

रंगत असलेल्या सामन्यात कोणी ढवळाढवळ करू नये म्हणून यापुढे खेळत असलेल्या सर्व आयडींचे पासवर्ड्स बदलून खेळाडूना व्यनिद्वारे कळवावेत किंवा बदलायला मार्गदर्शन करावे अशी बहुगुणी यांना विनंती.

बहुगुणी's picture

18 Jan 2015 - 1:09 pm | बहुगुणी

मंडळी,

आतापर्यंत बहुतांशी खेळीमेळीच्या वातावरणात चाललेले सामने तसेच पुढे सरकावेत म्हणून याआधी मी निर्धारित केलेले MiPaX असे यूजर नेम आणि openly visible passwords न वापरता यापुढे प्रत्येक खेळाडूने खेळाडू-विशिष्ट यूजर नेम (उदाहरणार्थः "पैसा") आणि नवीन पासवर्ड हा रजिस्ट्रेशन दुवा वापरून निर्माण करावेत आणि मग तक्त्यात फक्त नवे युजर नेम्स टाकावेत.

खटपट्या's picture

18 Jan 2015 - 1:25 pm | खटपट्या

नवीन यूजर नेम बनवून तक्त्यामधे शेअर केले आहे.

आतिवास's picture

18 Jan 2015 - 3:03 pm | आतिवास

मी आतिवास या नावाने रजिस्ट्रेशन केले आहे. मिपा ६२ चे सर्व पेंडिंग सामने रद्द करावेत ही विनंती.

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, मृत्युंजय आपल्या सामन्याची वेळ ठरवूया का?

पैसा's picture

18 Jan 2015 - 2:23 pm | पैसा

दोघानाही शुभेच्छा! मृत्युंजय याना व्यनि पाठवून वेळ ठरवून घ्या आणि इथेच वर बहुगुणी यांनी दिल्याप्रमाणे आपले युजरनेम खेळाच्या साईटवर रजिस्टर करून इथे कळवा.

पैसा's picture

18 Jan 2015 - 2:26 pm | पैसा

१५ तारखेच्या गजानन आणि सत्कुल या दोघांनीही लॉग इन केले नसल्याने त्यांच्याबदली दुसरे कोणी आतापर्यंत भाग न घेतलेले आज खेळू इच्छित असतील तर इथे सांगून सामना पुरा करा. अन्यथा राजेश के यांना दुसर्‍या फेरीत बाय मिळेल.

FIRST time use paasword ने login केल्यावर तो कसा बदलावा. मदतीची गरज आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2015 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

पहिल्यांदा लॉगीन केल्या नंतर रजिस्ट्रेशनच्या वेळी जो पासवर्ड दिला होता तोच वापरावा.
परत पासवर्ड बदलण्याची गरज नाही.

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

19 Jan 2015 - 12:19 am | प्रसाद गोडबोले

वियर्ड विक्स ,

आपला सामना कधी घ्यायचा ? कोणत्याही दिवशी रात्रि ९.३० भा.प्र.वे नुसार मला जमण्या सारखे आहे !

मला कळवा नक्की =)

विअर्ड विक्स's picture

19 Jan 2015 - 10:21 am | विअर्ड विक्स

आज रात्री ९. ३० नंतर मला चालेल.

विअर्ड विक्स's picture

19 Jan 2015 - 10:24 am | विअर्ड विक्स

आज रात्री ९. ३० नंतर मला चालेल. ९. ३० ला log in करेन मी. confirm करा जरा. कितीवेळा bye ने पुढची चाल घ्यायची ? एकदा तरी होउदे हाणामारी.

प्रसाद गोडबोले's picture

19 Jan 2015 - 9:26 pm | प्रसाद गोडबोले

मी अजुनही ऑफीसातच आहे :( आज जमणार नाही :(

उद्या चालेल ?

विअर्ड विक्स's picture

19 Jan 2015 - 9:45 pm | विअर्ड विक्स

वोक्के

विअर्ड विक्स's picture

19 Jan 2015 - 9:47 pm | विअर्ड विक्स

9.30 pm tomorrow ok ?

ब़जरबट्टू's picture

20 Jan 2015 - 11:33 am | ब़जरबट्टू

विअर्ड विक्स चांगले खेळा... :)

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 8:19 pm | प्रसाद गोडबोले

मी हापिसातुन निघालोय . ९:३० ला ऑनलाईन होवुन तुम्हाला व्यनि मेसेज करतो किंव्वा इथे प्रतिसाद टाकतो .

विअर्ड विक्स's picture

19 Jan 2015 - 9:51 pm | विअर्ड विक्स

पुढच्या फेरीसाठी आयोजकांनी मोहोरी वर्ण ठरवून द्यावा. भांडणाला वाव नको.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 9:42 pm | प्रसाद गोडबोले

मी आलोय ओनलाईन .

मला कोणतीही चालेल काळी वा गोरी असा मी भेदभाव करत नाही !

पण मागील डावात माझ्याकडे गोरी असल्याने ह्या डावात काळी घेणे उच्इत !!

मृत्युंजय, आपल्या सामन्याची वेळ भारतीय वेळे नुसार ७.०० वाजता ठरवत आहे. आपले मत कळवावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 10:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणी स्पर्धा म्हणुन नव्हे तर सहज गम्मत म्हणुन खेळेल का आज रात्री? ९.३० नंतर. व्यनी करा कोणी इच्छुक असेल तर.
तेवढीचं प्रॅक्टीस पण होईलं.

पैसा's picture

19 Jan 2015 - 10:30 am | पैसा

दुसरा धागा आहे तिथे रात्री विचार, आतिवास बरेचदा असतात, नाहीतर अजून कोणी मिळेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 10:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वोक्के!!!

प्रचेतस's picture

19 Jan 2015 - 11:48 am | प्रचेतस

मी बहुधा रात्री १०:३० नंतर खेळू शकेन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 1:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चालेलं :)...व्यनि करा मोकळे असाल तर. मी घरी आल्यावर अकाउंट रजिस्टर करिन.

पैसा's picture

19 Jan 2015 - 10:33 am | पैसा

मृत्युन्जयकडून काही उत्तर न आल्याने महेश यांना पुढे चाल देण्यात येत आहे. आजच्या दुसर्‍या फेरीच्या मॅचेस सुरू करायला हरकत नाही.

खटपट्या's picture

19 Jan 2015 - 11:32 am | खटपट्या

श्री महेश,
आपण कधी खेळूया ? मला भारतीय वेळ सांगा. भारतीय वेळेनुसार रात्री सामना खेळणे अशक्य आहे, कारण मी ऑफीसमधे असणार. भारतीय वेळेनुसार दिवसा कोणत्या वेळी खेळू शकतो ते कळवा.

आपण सुचवल्या प्रमाणे, भारतीय वेळेनुसार दिवसा मी ऑफिस मध्ये असणार. त्या मुळे वेळेच गणित थोड कठीणच आहे.तरी हि पाहुया सुवर्णमध्य सापडतो का?. तक्त्या प्रमाणे आपला सामना २० जानेवारी दिला आहे जर आपण भारतीय वेळे नुसार दुपारी २.०० वाजता सामना सुरु केला तर आपण खेळू शकता का?

खटपट्या's picture

19 Jan 2015 - 12:20 pm | खटपट्या

भारतीय वेळेनुसार दुपारी २ म्हणजे इथे रात्रीचे १२:३० होतील. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ ला जमेल का?

सकाळी ९ वाजता २० जानेवारीला तरी शक्य नाही. पण आयोजकांची हरकत नसल्यास आपण हा सामना २१ जानेवारीला भारतीय वेळे नुसार ११.०० वाजता खेळू शकतो.

खटपट्या's picture

19 Jan 2015 - 8:19 pm | खटपट्या

पैसाताई चालेल का?

पैसा's picture

19 Jan 2015 - 9:01 pm | पैसा

दोघानाही जमेल अशा वेळेत मॅच २१ ला पूर्ण करा म्हणजे झालं.

खटपट्या's picture

19 Jan 2015 - 10:04 pm | खटपट्या

महेश,

आपला भ्रमणध्वनी मला व्यनी केलात तर आपण बोलून ठरवू.