काल इंटरनेटवर सर्फिंग करत असतांना यूट्यूबवर एक गाणं मिळालं. कानात आणि मनात रात्रभर भरून राहिलं म्हणून तुमच्याबरोबर शेयर करतोय...
कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही.
हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय स्टाईलने! थोडीफार पं. भीमसेन जोशींच्या स्टाईलची आठवण करून देणारं!
मला फार आवडलं, बघा तुम्हाला पसंत पडतंय का?
ODI Barayya
प्रतिक्रिया
15 Jan 2015 - 10:42 am | सुनील
हपिसातून आता ऐकता नाहीय. घरी जाऊन ऐकेन.
अवांतर १ - पुरंदरदास हा मूळचा महाराष्ट्रीय. पुढे कर्नाटकात स्थलांतरीत झाला, असे सांगण्यात येते. संगीताची कर्नाटक शैली ह्यानेच सुरू केली असे मानले जाते.
अवांतर २ - नुकताच एक लेख वाचनात आला होता. त्यात हिंदुस्थानी शैली ही सर्वसमावेशक असल्यामुळे त्यात सर्व जाती-जमातींतीच नव्हे तर मुस्लिमांनीदेखिल भर घातली आणि तिला सर्वांगाने बहरू दिले. याउलट, कर्नाटकी शैली मात्र दक्षिण भारतीय उच्च वर्णियांच्यांच ताब्यात राहिली. पैकी, पहिले वाक्य खरे आहे ते दिसतेच. दुसर्याबद्दल माहिती नाही.
15 Jan 2015 - 11:04 am | स्पा
सुरेखच आहे भजन
डा . लो केलंय
15 Jan 2015 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
युट्युबवरून डालो कसं करायचं ?
16 Jan 2015 - 2:52 am | मदनबाण
फायरफॉक्स वापरत असाल तर Video DownloadHelper हे अॅडऑन इनस्टॉल करुन व्हिडीयो डाउनलोड करता येइल. या अॅडऑन ने तुमचे काम होइल.एचडी व्हिडीयो डाउनलोड करण्यासाठी वेगळी पद्धत आहे.
@ पिडां काका
सुरेख भजनाचा दुवा दिल्या बद्धल आभारी आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }
16 Jan 2015 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी गुगल क्रोम वापरतो.
16 Jan 2015 - 3:17 pm | यसवायजी
additional software नको असतील तर savevid.com किंवा keepvid.com वापरा
16 Jan 2015 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी गुगल क्रोम वापरतो.
ही दोन्ही software डालो करताना क्रोम थ्रेट मेसेज देउन त्यांना ब्लॉक केले आहे असे सांगतो !
16 Jan 2015 - 3:34 pm | नंदन
हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून पहा. मीही क्रोमच वापरतो आणि हा प्रोग्रॅम डाऊनलोड करताना काही अडचण आली नाही.
(दुवा)
16 Jan 2015 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे डालो करतानाही तोच मेसेज आला. पण तसंच पुढे गेलो आणि एक व्हिडिओ यशस्वीपणे डालो पण केला !
अनेक धन्यवाद नंदन !
अनेक धन्यवाद स्पा, मदणबाण आणि यसवायजी !!!
16 Jan 2015 - 3:35 pm | यसवायजी
मी क्रोमवर या साइट वअप्रल्या आहेत. सॉफ्टवेअर डालो करायची गरज नाही. फक्त व्हिडिओ डालो करता येतात.
15 Jan 2015 - 11:22 am | पिवळा डांबिस
नेहमीप्रमाणे गरूडावर बैसोनि माझा कैवारी (नंदन, दुसरं कोण!) आला!! :)
नंदनने पुरवलेला इंग्रजी तर्जुमा खालीलप्रमाणे...
Odi Barayaa
By
Saint Purandara Dasa
Translated by
P.R.Ramachander
Raga Bhairavi
Thala Aadhi
Pallavi
Odi Barayya Vaikunta Pathi,
Ninne noduve manadhaniye
Anupallavi
Nodi muddhdi mathadi sanosakudi
Padi pogaluvenu parama purusha Hariye
Charanam
Mangalaathmaka , mohana kaya ranga,
Sangeetha lola Sad guna sheela,
Angane yarigella athi priyavanda ,
Shubanga Sri Purandara Vittala Raya Sri
English translation
Pallavi
Oh Lord of Vaikunta, please come running,
For my mind, likes to see you.
Anupallavi
I want to see you, fondle you, speak to you,
Become happy and sing your praise,
Oh divine Lord, Oh Hari
Charanam
Oh God with a great powers, oh Ranga, who is pretty,
Oh God who likes music, Oh good with good conduct
You have become very dear to every one, simply like that,
Oh God with Good body, Oh Purandara Vittala
15 Jan 2015 - 11:25 am | hitesh
दोन्ही डाउनलोडत आहे
15 Jan 2015 - 11:11 pm | रमेश आठवले
भीमसेन जोशी यांना सुरवातीला प्रसिद्धी त्यांच्या एका कन्नड चित्रपटासाठी हिंदुस्तानी शैलीत गायलेल्या- भाग्यदा लक्ष्मी बारम्मा- या गाण्यामुळे मिळाली.
https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g&list=PL50DCACCFA275BECD
15 Jan 2015 - 11:34 pm | आदूबाळ
आणि तेही पुरंदरदासाचंच भजन आहे.
19 Jan 2015 - 11:22 am | पिवळा डांबिस
अतिसुरेल आहे...
अनेक धन्यवाद!
16 Jan 2015 - 12:29 am | सव्यसाची
खूपच सुंदर भजन आहे. धन्यवाद पीडां जी.
भीमसेनजींमुळे कन्नड भजने ऐकायची सवय लागली. त्यांच्या आवाजात भजन ऐकायला कायमच चांगले वाटते. मग ते मराठी, हिंदी, कन्नड किंवा संस्कृत असो.
याआधी 'तुंगा तीरदी' आणि 'बारम्मा' ही भजने विशेष आवडली होती.
हे भजन खूपच आवडले.
16 Jan 2015 - 2:41 am | रमेश आठवले
वर भजनाच्या इंग्लिश भाषांतरा बरोबर राग भैरवी व आदि ताल असे लिहिले आहे. हे बहुधा कर्नाटकी पद्धतीच्या मूळ रचने विषयी असावे असे वाटते . गुरव यांनी मांडलेल्या भजनात मला हिंदुस्तानी पद्धतीतल्या, सुरवातीला आसावरी आणि नंतर भीमपलास यांची जाणीव झालि. या संबंधी तसेच त्यांनी वापरलेल्या ताला संबंधी कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय ?
16 Jan 2015 - 3:13 pm | सिरुसेरि
तामिळ भाषेमधले चित्रा , येसुदास यांनी गायलेले "क्रुष्णानी बेगने" हे भजन छान आहे . तसेच इलय्राराजाने संगीत दिलेले व येसुदासने गायलेले "महागणपती मनसा स्मरामी" हे गीतही खूप चांगले आहे .
16 Jan 2015 - 3:32 pm | सुबोध खरे
तेच भीमसेनजींचे भजन त्यांच्याच शिष्यांकडून पं जयतीर्थ मेवुंडी आणि पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांची जुगलबंदीत ऐका.
https://www.youtube.com/watch?v=7VQosAltaWc
16 Jan 2015 - 3:35 pm | सविता००१
क्या बात है!
19 Jan 2015 - 11:31 am | पिवळा डांबिस
वर दिलेल्या लिंकवरून भीमसेनजींच्या आवाजातलं ऐकलं.
पण तुम्ही दिलेल्या लिंकवर माझ्या इथे खूप बॅकग्राउंड डिस्टर्बन्स आणि हिसिंग येतंय त्यामुळे पूर्ण आस्वाद दुर्दैवाने घेता नाही आला. अर्थात तो माझ्या एन्डकडून आलेला प्रॉब्लेम असू शकतो...
16 Jan 2015 - 7:02 pm | यशोधरा
सुरेख!
19 Jan 2015 - 4:11 pm | पैसा
या धाग्यात दिलेल्या इतर लिंक्सवरची गाणीही फार आवडली. पंडित भीमसेन जोशी यांचं सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नेहमी ऐकते.
19 Jan 2015 - 4:20 pm | बॅटमॅन
भीमसेन जोशींचं ऐकलं असेल तर सुब्बुलक्ष्मींचं देखील ऐकून पहावं. मला व्यक्तिशः सुब्बुलक्ष्मी व्हर्जन जास्त आवडली.
https://www.youtube.com/watch?v=i9fIDapggl8
19 Jan 2015 - 4:18 pm | बॅटमॅन
अजून एक तमिऴ भजन आहे. मला खूप आवडलेले.
https://www.youtube.com/watch?v=YfvjAuw3D2w
आणि एक धम्माल मजेशीर तेलुगु गाणे. भजनाबिजनाचा वट्ट संबंध नाही, पण या निमित्ताने आठवले इतकेच. हेही माझे प्रचंड फेव्हरीट. चाल आणि व्हिडिओ दोन्ही प्रचंड मनोरंजक. आंध्रात हा पिच्चर सुप्परहिट आहे.
https://www.youtube.com/watch?v=0TSOVO2YkYM
19 Jan 2015 - 4:21 pm | बॅटमॅन
आत्ताच ओडी बारय्या ऐकले. अति उच्च _/\_
19 Jan 2015 - 4:27 pm | बॅटमॅन
गायनातलं काही कळतं अशातला भाग नाही, पण याची शैली हिंदुस्थानीछाप वाटते आहे.