श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सव, सनीवेल, कॅलिफोर्नीया अमेरिका

स्वाजो's picture
स्वाजो in जनातलं, मनातलं
16 Jan 2015 - 10:24 am

॥ गण गण गणात बोते ॥

श्री गजानन महाराज अमेरिका परिवारातर्फे श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव सनीवेल, कॅलिफोर्नीया येथे १४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ साजरा केला जाईल. श्री गजानन महाराज परिवारातर्फे ह्या सोहळ्याचे आपणा सर्वांना मनापासून निमंत्रण आहे. ह्या उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्री महाराज पालखी सोहोळा, 'पादुका-दर्शन' (श्री पुंडलीक भोकरे ह्यांना दिलेल्या पादुकांची प्रतिकृती) आणी 'नामस्मरण सत्र'. उत्सवाची सांगता भंडार्‍याने होईल. बे एरीयातील भक्तगणांकडून जमवलेल्या 'शिध्यातून' महाप्रसाद रांधला जाणार आहे. बे एरीयात प्रथमच 'श्री महाराज प्रगट दिन' आयोजीत केला आहे. आपणा सर्वांच्या उत्साही आणी सक्रिय सहभागाने हा उत्सव यशस्वी आणी स्मरणीय होईल. कृपया खाली दिलेल्या दुव्यावर नाव नोंदणी करा.

RSVP LINK : http://tinyurl.com/gajanan2015

॥ जय गजानन ॥

pragat din utsav

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

16 Jan 2015 - 10:36 am | राजाभाउ

अरे वा !
गण गण गणात बोते

बबन ताम्बे's picture

16 Jan 2015 - 11:09 am | बबन ताम्बे

ब-याच गाड्यांच्या काचेवर लिहीलेले असते !

हां मलाही हे जाणून घेण्यात विन्ट्रेस्ट आहे. (मला शुद्धलेखनाची चूक वाटली होती)

सतिश गावडे's picture

17 Jan 2015 - 2:26 pm | सतिश गावडे

इथल्या पोष्टीनुसार .‘गण गण गणात बोते’, या शब्दाचा अर्थ

‘शेगावचे संत गजानन महाराज हे नेहमी मधून-मधून ‘गण गण
गणात बोते’, असा मंत्र म्हणत असत. एका शिष्याने
महाराजांंना त्याचा अर्थ विचारला. गजानन महाराज म्हणाले,
‘‘पहिला ‘गण’ म्हणजे जीव किंवा जीवात्मा, दुसरा ‘गण’ शब्द
म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द ‘गणात’ म्हणजे ‘हृदयात’. ‘बोते’ म्हणजे पहा, बघा. ‘गण गण गणात बोते’,
याचा अर्थ ‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,
परमेश्वराला बघ.’ –

हा वरील दुव्यावर दिलेला अर्थ आहे. मला कळलेला अर्थ नव्हे.

आदूबाळ's picture

17 Jan 2015 - 4:01 pm | आदूबाळ

हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,
परमेश्वराला बघ

असं एन्क्रिप्ट न करता म्हणाले असते तर मज पामराला चटकन कळलं असतं. असो. धन्यवाद!

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2015 - 5:06 pm | नगरीनिरंजन

ते एका विशिष्ट उंचीवर पोचलेले होते म्हणून असं बोलायचे. सरळ-सरळ बोलले तर पोचलेल्या माणसात आणि सामान्य माणसात फरक काय राहिला?
असो. हा अर्थ त्यांनी कोण्या भाग्यवंताला समजावून सांगितला त्याचे नाव कोणाला माहित आहे का?

hitesh's picture

18 Jan 2015 - 5:07 pm | hitesh

बोते म्हणजे पहा !

कुठल्या भाषेत?

येप, मला पण भाषा कोणती हे जाणून घ्यायला आवडेल. संस्कृत वाटत नाही, पाली किंवा अर्धमागधी?

बॅटमॅन's picture

19 Jan 2015 - 7:37 pm | बॅटमॅन

मलाही जाणून घ्यायची इच्छा आहे.

हिंदीमध्ये "बीज बोते है" तसेच मला वाटायचे की इथे गणात गण "बोते है".. बाकी खरे खोटे त्यांनाच ठाऊक.

नगरीनिरंजन's picture

21 Jan 2015 - 8:19 am | नगरीनिरंजन

मला तर "बोते" हा दुसर्‍या शब्दाचा अपभ्रंश वाटायचा आणि त्या वाक्यात काही अक्षरे मिसिंग आहेत असे वाटायचे.
पण शेवटी हा श्रद्धेचा मामला असल्याचे लक्षात आल्यावर मी तो विचार सोडला. आपण अर्थ शोधून काही उपयोग नाही. श्रद्धा असेल तर मुळात असे (किंवा कोणतेच) प्रश्नच पडत नाहीत.
तसंही शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा समूह. आपण देऊ तो त्याला अर्थ. नाही का?

सामान्यनागरिक's picture

19 Jan 2015 - 5:24 pm | सामान्यनागरिक

वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर प्रथम शिर्डीला जा आणी नंतर शेगावला जा. आणि फरक अनुभवा.
बाकी सनीवलच्या उत्सवाला शुभेच्चा!

अरे वा. बराच विस्तार झालाय की संप्रदायाचा.

ऋषिकेश's picture

21 Jan 2015 - 9:49 am | ऋषिकेश

हो ना!
पाचेक वर्षांपूर्वी शेगावच्या संस्थानात आमच्या तत्कालीन ऑफिसने "SAP" सारखी महागडी व आकाराने भली मोठी सिस्टिम इम्प्लिमेंट करून दिली होती तेव्हाच लक्षात आले होते म्हणा

विटेकर's picture

16 Jan 2015 - 2:11 pm | विटेकर

मनुष्यजात सकळ| हें स्वभावता भजनशीळ| जाहलें असे केवळ| माझ्याचि ठायीं ||६७||
या माऊली वचनाची आठवण झाली !!!
गण गण गणांत बोते!!

मदनबाण's picture

17 Jan 2015 - 3:21 am | मदनबाण

|| श्री गजानन जय गजानन ||
_/\_

मदनबाण.....

अर्धवटराव's picture

17 Jan 2015 - 3:43 am | अर्धवटराव

हे सर्व उत्सव वगैरे का करतात पब्लीक...

बाकि महाराजांच्या कृपेची अनुभुती आलेले (आणि तसा दावा करणारे) शेकड्याने सापडतील. मला पर्सनली जे अनुभव आले ते नेमके काय आणि कसे होते हे अजुनही कळलं नाहिए.

हा प्रश्र्न म्हणजेच एक मोठा काथ्या-कुटाचा विषय आहे....

आमची बायको गजानन महाराजांची भक्त तर आम्ही मिसळ-पाव भोक्ते.

ती त्यांचा प्रकट-दिन साजरा करते तर आम्ही चार मिपाकरांना जमवून कट्टा साजरा करतो.

ती प्रसाद भक्षण करते तर आम्ही पक्षी-तीर्थ.

थोडक्यात काय तर मनुष्य हा समाज-प्रिय प्राणी.

कूणाला साधू-संतांच्या मेळाव्यात आनंद वाटतो तर कुणाला समविचारी जनांच्या बरोबर संवाद करण्यात.

बघा पटत असेल तर, नाहीतर सोडून द्या.

पटत असो किंवा नसो, एखादा कट्टा करायला तर तुमची हरकत नसावी.

अर्धवटराव's picture

17 Jan 2015 - 8:28 pm | अर्धवटराव

हमे तो सिर्फ बहाना चाहिए... :)

मुक्त विहारि's picture

17 Jan 2015 - 8:50 pm | मुक्त विहारि

आम्हाला पण कट्टा करायला एखादे कारण हवेच असते...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Jan 2015 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गण गण गणात बोते _/\_

hitesh's picture

18 Jan 2015 - 5:11 pm | hitesh

हा आमचा प्रकटदिन

दिपक.कुवेत's picture

19 Jan 2015 - 7:06 pm | दिपक.कुवेत

मग तुम्हि काय बघता तुमच्यात??

खुद में रब दिखता है, यारा मैं क्या करूँ असं म्हणायचं असेल बहुधा.

आजानुकर्ण's picture

19 Jan 2015 - 7:41 pm | आजानुकर्ण

१२ फेबला नवीन (डू) आयडी घेणार काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) सौ.कौ. प्रकटदिन पण आहे त्या दिवशी असं ऐकलयं

पिवळा डांबिस's picture

20 Jan 2015 - 11:18 pm | पिवळा डांबिस

आयला, हे लोण सनीवेलपर्यंत आलं का?
अरे कुठे नेऊन ठेवलायत बे-एरिया माझा!!!
:)

सिद्धार्थ ४'s picture

21 Jan 2015 - 7:03 am | सिद्धार्थ ४

गजानान महाराज म्हणजे पेशव्यांच्या घरातील एक सदस्य म्हणे.

सुनील's picture

21 Jan 2015 - 8:34 am | सुनील

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे, गजानन महाराज हे विख्यात मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी Bee यांचे बंधू.

कुणी अधिक माहिती दिली तर बरे.

बाकी चर्चेत भाग घेण्याची पात्रता नाहीच! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2015 - 7:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गजानन महाराज थेट क्यालिफोर्नियात गेले... व्वा. आनंद वाटला. आता कोण नावं ठेवणार आमच्या देशाला. :)

देवा, गजानना सुख, समृद्धी मान सन्मान, संपती, माझं प्रेम, हाय फाय भारी बंगला येऊ दे भो.
बोलो गजानन महाराज की जय.

(संक्षी दिसत नै तो पर्यंत देव देव करुन घेतो, नै तर प्राध्यापकांनी असे देव देव करणं कसं चुकीचं आहे, यावर पन्नास उपप्रतिसाद दिले असते. संक्षी या लवकर)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 8:47 am | अत्रुप्त आत्मा

@संक्षी या लवकर>> =)) संक्षिप्त प्रतिक्रीया! =))

पां डुब्बा! ... बोलिव रे लवकर तुझ्या सरांना! :D
पांडूनी बोलिवलं की येतात- ते! =))

होबासराव's picture

22 Jan 2015 - 7:40 pm | होबासराव

शेगाव (वर्‍हाड)

vikramaditya's picture

22 Jan 2015 - 7:57 pm | vikramaditya

निदान काहीतरी मुद्दा घेवुन वाद तरी घालत राहतात (की रहायचे?)

पण वरील बरेचसे चेष्टेखोर प्रतिसाद पाहुन साधारण तोच प्रकार वाटला. असो - मि पा च्या भाषेत " चालु द्या."

(कॄपया वैयक्तिक घेवु नये.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2015 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षीची मी कधीच चेष्टा करत नै, त्यांचे काही वाद प्रतिवाद मला नेहमीच आवडतात.

-दिलीप बिरुटे

अमोल केळकर's picture

23 Jan 2015 - 3:58 pm | अमोल केळकर

' गजानन विजय' या पोथीत एकूण २१ अध्यायाची ध्वनिफीत ( रोज १ ) इथून डाउनलोड करता येईल

अमोल केळकर

अमोल केळकर's picture

23 Jan 2015 - 4:01 pm | अमोल केळकर

माझ्यामते प्रकट दिन ११ फेब्रुवारीला आहे, सदर लिंक मधे तारिख १५ फेब्रुवारी दर्शवते

अमोल केळकर

आजानुकर्ण's picture

23 Jan 2015 - 7:48 pm | आजानुकर्ण

भारत-अमेरिका प्रवासाचा कालावधी लक्षात घेता भारतापेक्षा वेगळा दिवस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेगाव-मुंबई प्रवास, नंतर विमानोड्डाण, सिंगापूर्मार्गे वेष्ट कोष्टात आगमन. जेटलॅग व विश्रांतीकाळ असे सर्व लक्षात घेता १४-१५ तारीख योग्य वाटते.

श्रीरंग_जोशी's picture

23 Jan 2015 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकेतील भारतीयांचे सार्वजनिक उत्सव वीकांताला साजरे केले जातात.

उद्या आमच्या स्थानिक मंडळाचा संक्रांतिनिमित्त कार्यक्रम आहे.

स्थानिक गणेशोत्सवात स्थापना जरी गणेश चतुर्थीला (जो वार असेल तो) संध्याकाळी होत असली तरी विसर्जन वीकांतालाच केले जाते. कालावधी विषमसंख्या ५ / ७ / ९ राहील याची काळजी घेतली जाते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Feb 2015 - 3:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज प्रकटदिन सोहळा. फोटोमधे उत्सवमुर्ती नीट दिसत नाहीयेत कारण समोरच्या बाजुने अतिशय प्रखर प्रकाश होता. आणि माझा फोटोग्राफीचा आनंदी आनंद आहे

Gajanan Maharaj

q

paalakhi

गजानन महाराजांची पालखी

a

सौ. स्वाती पाटील आणि सौ. उमा नाचोणकर ह्यांनी काढलेली अतिशय सुंदर रांगोळी.

रुक्मिणी अगदी नीट रेखाटलीये, विठ्ठल आणखी व्यवस्थित करता आला असता.