कसं जमतं तुला
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
किती सहज, हे तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भावना घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना थरथर, मन उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
छान
लि हीत र हा.
खूप छान !!
वा वा मस्त
स्वागत!
सुचेता तै...मिपावर तुमचे
मस्त...
सुरेख आहे कविता! आवडली.
वाळवंटात हिरवळ ,दंग्यात
छान कविता!
समंजस कविता
धन्यवाद
मस्त सुचेता, छान कविता
आवडेश...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climbलिहित रहा गं.आता थांबु नको
आवडली.
कविता
छानच... लिहीत रहा...
आवडली....