..का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?
तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?
तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!
ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?
ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?
माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली
प्रतिक्रिया
26 Dec 2014 - 4:41 pm | एस
कविता आवडली.
ह्या प्रश्नावर भारतीय समाजात तितकी चलबिचल झाली नाही याचे एक कारण म्हणजे बोडोंचा प्रश्नही त्यांच्या बाजूने समजण्यासारखा आहे. बोडो जमाती आज त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्यांक ठरण्याच्या मार्गावर आहे. आसामच्या उत्तरेकडील या भागात खालील आदिवासी आणि बांगलादेशातून घुसलेले बेकायदेशीर लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. अर्थात हा एक मुद्दा झाला. ह्या प्रश्नाचे इतरही असंख्य पदर आहेत. आणि अशा अमानवीय दहशतवादाची जितकी निर्भत्सना करावी तितकी कमीच आहे.
26 Dec 2014 - 4:42 pm | मंदार दिलीप जोशी
सहमत आहे.
29 Dec 2014 - 7:51 pm | बहुगुणी
सहा वर्षांपूर्वी मी इथे लिहिलेल्या 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या एका स्फुटाची आठवण झाली. स्वॅप्स म्हणताहेत तशी ही बहुपदरी समस्या आहे, त्यातील सीमेपलिकडून होणारं स्थलांतर (आणि दहशतवाद्यांची आवक) ही समस्या कित्येक वर्षे unresolved आहे, त्याविषयी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये २००८ मध्ये एका हताश ऑफिसरने हे म्हंटलं होतं:
"While all attention was on Mumbai and the western frontier, no additional resources were deployed in the east. We did our best to nab as many as we could but many more could have got away through the extremely porous border," a senior officer said.
Only about 550 km of the border with Bangaldesh in Bengal has been fenced. Of the remaining, nearly 267 km is a natural riverine boundary.
मला वाटतं भारतीय समाज, आर्मी आणि राजकीय नेतृत्वाने आपली मानसिकता बदलण्याबरोबरच आपल्या आर्मी व सरकारने प्राधान्याने सच्छिद्र पूर्व सीमेचा बंदोबस्त करणं अतीव गरजेचं आहे.
26 Dec 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी
बाहेरच्या लोकांनी असे कृत्य केले तर संताप दाखविता येतो आणि सहानुभूतीही दाखविता येते. पण आपल्याच लोकांनी असं केलं तर दोन्ही दाखविता येत नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ!
26 Dec 2014 - 10:02 pm | मुक्त विहारि
पण,
सध्या तरी आमचा ह्या विषयाला राम राम.
आणि
इतर कुणाचा असो अथवा नसो, आमचा तरी मोदी सरकार वरती अद्याप विश्र्वास आहे.
29 Dec 2014 - 3:32 pm | hitesh
तुमच्या विश्वासाचं पानिपत न होवो ही सदिच्छा !
29 Dec 2014 - 8:11 pm | सूड
अहिंया डूआयडी विश्वासनी वात करे छे!! *mosking*
29 Dec 2014 - 8:16 pm | काळा पहाड
तुमच्या घरवापसीचं टाईमटेबल कधीचं ठरलंय म्हणे?
29 Dec 2014 - 8:17 pm | काळा पहाड
मी बातम्या (थोड्या जास्तच) रेग्युलरली बघतो. ही बातमी मला कुठेच पहायला मिळाली नाही. काय कारण असेल?
30 Dec 2014 - 10:01 am | hitesh
काँग्रेसच्या काळात सगळ्या बातम्या समजत होत्या.
मोदी आल्यापासुन दंगल , युद्धे याच्या बातम्या फारशा येत नाहीत. आसाम घडत असताना सगळे मेडियावाले भारतर्त्न भाज्पेयीना आरती ओवाळत होते
30 Dec 2014 - 12:25 pm | काळा पहाड
काँग्रेसला विसरा आता. राहूल आणि सोनिया "आत" जाणार आहेत. राहिलेल्या काँग्रेस नेत्यांना भाजप घरवापसी करून प्रवेश देणार आहे. बाकी आसामचा प्रश्न काँग्रेसमुळेच निर्माण झालाय. त्याचा, काश्मीरचा अशा गोष्टींचा हिशेब चुकता करणं बाकी आहेच.
30 Dec 2014 - 12:59 pm | टवाळ कार्टा
रोफ्ल
30 Dec 2014 - 1:46 pm | hitesh
नानाचा डायलॊग आठवला."बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे...."
नमोभक्तांच्या कानाची काळजी वाटते आहे.
30 Dec 2014 - 2:26 pm | काळा पहाड
मी नमोभक्त नाहिये हो. (सध्याचे) गांधी (आणि वड्रा) विरोधी आहे. त्यासाठी मला नमो चालतील, केजरीवाल चालतील. मुलायम चालतील.
अपवादः ममता बॅनर्जी (हिच्या ऐवजी राहुल गांधी सुद्धा चालतील).
30 Dec 2014 - 1:53 pm | पैसा
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही. तुम्ही एकगट्ठा मतदान करून सरकारे बदला, पण दुसरा येतो त्याच्याकडे पाहिले तर आधीचा परवडला म्हणायची पाळी येते कारण कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्यापेक्षा तसाच चिघळत ठेवणे याना व्होट बँकेसाठी आवश्यक वाटते. धन्य तो आमचा महान भारत अन धन्य ते आमचे पुढारी.
30 Dec 2014 - 2:31 pm | मदनबाण
आपल्या तात्कालिक सोयीसाठी दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार न करणारे राजकारणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत असए प्रश्न विचारणे आणि हताश होणे याशिवाय आपल्या हातात काही नाही.
+१००
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09
The U.S. Debt Continues To Climb
30 Dec 2014 - 4:57 pm | विशाल कुलकर्णी
गंमतच आहे. शेजारी बळी पडलेल्या लेकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक इथे आपल्या घरात बळी गेलेल्या लोकांबद्दल चकार शब्द का काढत नाहीत असे विचारणारे तथाकथीत देशभक्त लोक 'तिथे पाकिस्तानने जे पेरले त्याची फळे ते भोगताहेत, त्यांच्याबद्दल काय सहानुभूती बाळगायची' असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतःमात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडात बळेी गेलेल्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्यांनाच दोष देणारा दिसतोय
30 Dec 2014 - 6:29 pm | hitesh
तीच तर हिंदुत्ववाद्यांची गंमत आहे... पाकिस्तानी माता जेंव्हा आक्रोशकरताना बोलल्या की ही मुले भारताची किंवा अमेरिकेची होती का ? तेंव्हा त्यात हिंदुत्ववाद्यांना भारतद्वेष दिसला. अतीव दु:खाच्या वेळी आपलंच मूल का बळी गेलं शेजार्याचं का नाही , असे विचारले तर तो म्हणे भारतद्वेष झाला.
स्वतःच्या मुलाचं हित शाबुत ठेउन दुसर्याच्या मुलांचा बळी जा वा ही इच्छा म्हणे अॅब्नॉर्मल ! स्वताच्या पोराला राजा करण्यासाठी दुसर्याच्या पोराला वनवासात घालणार्या , स्वतःच्या पोरासाठी नवर्याच्या मांडीवरुन सवतीची पोरं उठवणार्या बायका कुठल्या धर्मातल्या ? हे बघायला मात्र यान्ना वेळ नाही !
3 Jan 2015 - 1:26 pm | ग्रेटथिंकर
*yahoo*
19 Jan 2015 - 5:30 pm | मंदार दिलीप जोशी
जामोप्या, दिसली अक्कल
19 Jan 2015 - 5:30 pm | मंदार दिलीप जोशी
अगदी या कवितेचा सुरसुद्धा दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानातल्या त्या हत्याकांडाबद्दल सहानुभूती बाळगणार्यांनाच दोष देणारा दिसतोय.>>
अर्थात तसा तो आहेच. आणि तोच आहे. का नसावा? आपल्या लोकांच्या हत्या दिसत नाहीत आणि पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल पुळका आहे अशा भंपक लोकांच्या वृत्तीवर प्रहार करणे हाच उद्देश आहे मुळात कवितेचा.
असे विचारताना, होत असलेल्या दहशतवादाबद्दल सरसकट सर्व पाकिस्तानींना जबाबदार ठरवताना, स्वतः मात्र इथल्या दहशतवाद्यांबद्दल मात्र चकार शब्द काढत नाहीयेत. >>
हे कसं काय बुवा ठरवलंत? ते अतिरेकीही वाईटच. दुसरं म्हणजे भारत सरकार पूर्वोत्तर रा़ज्यांच्या परवडीबद्दल जबाबदार असेलही, नव्हे आहेच, पण अतिरेकी निर्माण, प्रोत्साहन आणि ट्रेनिंगचे काम भारताने आजवर कधीही केलेले नाही. तेव्हा भारताच्या बाबतीत सरसकटीकरण करताच येणार नाही. तिसरं, असंख्य ठिकाणी निषेध व्यक्त केलेलाच आहे. पण खरी गंमत म्हणजे पाकिस्तानात घडलेल्या घटनेबद्दल गळे काढणारेच लोक आसामच्या हत्त्याकांडाबाबत मौन बाळगून आहेत..