मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’
आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :)
अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ...
जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ... अहाहा
अटलजींचे आणि पंडीत मदन मोहन मालवीय ह्यांचे समस्त (समविचारी)मिपाकरांच्यावतीने अभिनंदन आणि सविनय प्रणाम !!
__/\__
प्रतिक्रिया
24 Dec 2014 - 2:15 pm | प्रसाद१९७१
बाजपाईं बद्दल बोलायचे तर काँग्रेस ला सत्तेवर ठेवण्यात त्यांचा मोठा हात होता.
24 Dec 2014 - 2:20 pm | नाखु
या जावईशोधाबद्दल..
नंतर धागकर्त्याला आणि भा.र्.मिळालेल्यांना *i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy:
24 Dec 2014 - 4:57 pm | प्रसाद१९७१
जावईशोध नाही हो हा, विचार करुन बघा तुम्हाला ही पटेल.
मुळमुळीत इमेज करुन भाजपला कधीही जास्त मते मिळणार नाहीत ह्याची सोय केली. दुसरे कोणीही असते तर १९९९ साली बहुमत मिळाले असते. आणि ५ वर्ष जो काही कारभार केला तो काँग्रेस पेक्षा काही वेगळा नव्हता. वर प्र.म. सारखा घोटाळेबाज ह्यांचा सारथी. २००४ मधे कोंग्रेस पुन्हा निवडुन येइल ह्याची सोय केली. सोनिया गांधी तयार होई पर्यंत केअरटेकर सरकार चालवले.
त्याही पेक्षा बाजपाईंनी २००१ मधे मोदींना जो त्रास दिला आहे तेंव्हापासुन हा माणुस डोक्यात गेलाय.
24 Dec 2014 - 6:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपा वाढवण्याचे काम, १९८४च्या २/३ खासदारांपासून ते अगदी अलिकडे सरकार स्थापनेचे काम-त्यातला मुख्य वाटा अडवाणींचा(व अर्थात संघाचा). उत्तम वक्र्त्रुत्वशैली व पॉझेस घेत कविता म्हणणे हे काम वाजपेयींचे.
26 Dec 2014 - 9:16 am | नाखु
म्हणजे इंदीराजींनी भारताचे शिष्टमंडळाचे प्रमुख आणि विरोधी प़क्षातील एकमेव प्रतिनिधी म्हणून उगीच पाठवले युनोत!!
शिवाय "उत्कृष्ठ संसदपटू" हा बहुमान ही उगाच दिला या कवीला !!
कदाचीत नरसिंहरावांसारखे(जसे कान्ग्रेस्-ममोने केले) यांना अडगळीत टाकावे असे माई तुमच्या "यांचे" पण मत आहे का???
अवांतर : आज कुठल्या बुवांच्या किर्तनाला जाणार आहात!!
25 Dec 2014 - 9:40 pm | अभिजित - १
सत्येन्द्र दुबे चा गेम होन्यात पन काहि वाटा आहेच ..
24 Dec 2014 - 2:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अभिनंदन.
24 Dec 2014 - 2:18 pm | मुक्त विहारि
अभिनंदन.
24 Dec 2014 - 2:24 pm | बॅटमॅन
अभिनंदन!!!!
24 Dec 2014 - 2:44 pm | मृत्युन्जय
अभिनंदन. वाजपेयींना भारतरत्न जाहिर होणार हे तसे ओपन सिक्रेटच होते म्हणा.
24 Dec 2014 - 4:06 pm | पा पा
अभिनंदन
24 Dec 2014 - 4:17 pm | शिद
अभिनंदन.
24 Dec 2014 - 4:17 pm | शिद
अभिनंदन.
24 Dec 2014 - 4:17 pm | शिद
अभिनंदन.
24 Dec 2014 - 4:36 pm | प्रमोद देर्देकर
अभिनंदन
24 Dec 2014 - 4:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बनारस हिंदु विद्यापीठासारखे स्थापन करणारे मदनमोहन मालविय ह्यांना हा पुरस्कार आधीच मिळायला हवा होता.
वाजपेयींबद्दल काय बोलणार? राजीवला मिळाला तर ह्यांना भारतरत्न का नको? ह्या प्रश्नावर उत्तर नाही.
तेव्हा वाजपेयींचेही अभिनंदन.
24 Dec 2014 - 5:22 pm | प्रसाद गोडबोले
कधी नव्हे ते माईसाहेबांशी सहमत व्हावे लागत आहे , सर्वोच्च सन्मानाचेही ह्या लोकांनी राजकारण करुन टाकले आहे .
लिस्टमधील जवळपास सर्वच स्वातंत्र्योत्तर राजकीय नेते आणि त्यांची कारकिर्द विवादास्पद आहे .
अशाच प्रकारचे मत विकीपेडीञा वर पहाण्यास मिळते !
24 Dec 2014 - 6:40 pm | ग्रेटथिंकर
भारतरत्न वाजपेयींचे अभिनंदन.
24 Dec 2014 - 7:31 pm | बोका-ए-आझम
माईसाहेब, जवाहर आणि इंदिरेला भारतरत्न मिळाल्यामुळे राजीवला ते मिळणारच होते. राहुलला मिळणार की राॅबर्टपत्नी प्रियांकाला यावर तुमच्या ह्यांचं काय मत आहे?
बाकी वाजपेयीजींचे अभिनंदन. मालवीयजींना पुरस्कार मिळाला हेही चांगले झाले.
24 Dec 2014 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
पूर्वपंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी आणि पंडीत मदन मोहन मालवीय ह्यांचे अभिनंदन आणि सविनय प्रणाम !!
25 Dec 2014 - 9:48 pm | धर्मराजमुटके
सरकारतर्फे जाहिर होणारे सगळे पुरस्कार बंद व्हावेत आणि जनतेचा पैसा वाचवावा. ज्या कोणी महान व्यक्ती आपापले कार्य करुन मोठेपणा सिद्ध करतात ते पुरस्कारांकडे पाहून असे करत नाहि तर ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते म्हणूनच. लहान मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले तर समजण्यासारखे आहे. बाकीच्यांना याची गरज काय ?
अवांतर : पुरस्कार जाहिर झालेल्या दोन्हीही व्यक्ती कर्तुत्ववानच होत्या. केवळ त्यांच्या विरोधात हे मत नाही.
25 Dec 2014 - 11:27 pm | स्वप्नज
बाडिस. पुरस्कारांची संख्या खूप वाढलीय. त्यामुळे एखादा पुरस्कार मिळणे ही आता किरकोळ गोष्ट झालीय.