माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार
युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार
ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार
काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार
समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार
शरीरात आजही काचा
शस्त्रक्रियांनी आजही बेजार
तुमच्या फुकाच्या गहिवराने
जखमा मनाच्याही नाही भरणार
चालवली बस आम्ही तेव्हा
कवितांमधुनीही दाखविले प्यार
सुरा खुपसला पाठीमध्ये
कारगिलचा तो आठवा वार
मग आले दहा नराधम
बरसल्या पुन्हा गोळ्या फार
लहानगे कोवळी जीवही होते ना
झेलत रक्तरंजित अत्याचार?
लहान, तरूण, वृद्ध, आणि महिला
क्षणात संपले इहलोकी अवतार
नाही दिसल्या मेणबत्त्या तेव्हा
पण वाटले पेढे कुंपणा पार
डोळे सातत्याने होती ओले
फुलतो रोमरोमात अंगार
आठवता ते अकाली मृत्यू अन्
अगणित झालेले बलात्कार
त्यांच्या शाळा त्यांचे शिक्षण
शिकवत नाहीत भारतप्यार
तयार होती तिथे निरंतर
सैनिक जिहादी करण्या अत्याचार
येतोच कसा तुम्हा उमाळा
विसरुन ते जहरी फुत्कार
माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
आतापर्यंत सहन करित आलो
हाच संयम आणि हेच संस्कार
अस्थानी गहिवराच्या शब्दांचे भाले
आम्ही आता नाही झेलणार
प्रतिक्रिया
23 Dec 2014 - 6:19 pm | मंदार दिलीप जोशी
लहान मुले, मग ती कोणत्याही राष्ट्राची असो, अशा प्रकारे मेली म्हणून पहिलेछूट दु:खाची प्रतिक्रिया उमटणे व त्यांच्यासाठी कळवळणे हे नैसर्गिक आहे व माणुसकीला धरुन आहे. माझा आक्षेप या भावनिक प्रतिक्रियेच्या अतिरेकाला मात्र निश्चितपणे आहे. आपल्या घरातली व्यक्ती गेली तर दोन दिवसात माणूस ताळ्यावर येऊन कामाला लागतो. मात्र आज बघायला गेलं तर आठवडा झाला तरी सोशल मिडियावर जी रडारड चालू आहे ती पाहून माझे परदेशी पत्रमित्रही स्तिमित झाले आहेत. "रात्री झोप लागत नाही" काय, "जेवण जात नाही" काय, डिस्प्ले/प्रोफाईल पिक्चर काळे करणे काय, एक ना दोन असंख्य आचरटपणाचे नमूने दिसत आहेत.
23 Dec 2014 - 6:20 pm | मंदार दिलीप जोशी
या घटनेच्या दोन-तीन दिवस नंतर ISIS च्या अतिरेक्यांशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांनी १५० महिला व मुलींना ठार मारले, ही बातमी आजही कुणाच्या गावीच नाही. त्याबद्दल कुणालाही दु:खच नाही असे दिसत आहे. इराक व परिसरात अशा हत्या रोज होत आहेत, त्यात लहान कोवळी मुले देखील आहेत. येझदी नामक जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण मेणबत्त्या सोडा कुणाला पत्ताच नाही. याचे एक कारण म्हणजे आपल्याला रडारड करायला किंवा द्वेष करायला एखादं ग्लॅमरस कारण लागतं. हिटलर हे त्याचं अगदी ढळढळीत उदाहरण आहे. ज्युंच्या हत्या व द्वेष हे युरोपातल्या प्रत्येक देशात झालेले आहे, पण त्याबद्दल कुणीही फारसे लिहीताना व बोलताना दिसत नाही. तसे बोलणे गैरसोयीचे आहे हा भाग सोडा, पण शेवटी ग्लॅमराइज कोण तर हिटलरच झाला. लोकांना शिव्याशाप द्यायला एक ग्लॅमरस टार्गेट मिळाले. तर या बाबतीत बाकी सगळे विसरुन लोक पाकिस्तानात घडलेल्या गोष्टीवर गळे काढू लागले, तर ते असो.
23 Dec 2014 - 6:20 pm | मंदार दिलीप जोशी
स्वतःचे मूल गमावल्याच्या दु:खावेगात माणूस कधी कधी वाहवत जाऊन चार शब्द अधिक-उणे बोलतो हे मान्य. पण तुमचे लहानगे मूल गेलेले असताना अतिरेक्यांना शिव्याशाप देतानाही त्या अम्मी-अब्बांच्या डोस्क्यात "ही आपलीच मुले होती ना, अमेरिका किंवा भारतातली मुले तर नव्हती ना" अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात, तेव्हा हे उदाहरण (३) (अ) बरोबर किंवा वेगळे घेतल्यासही अपवादात्मक नव्हे तर प्रातिनिधिक ठरते. त्यामुळे या घटनेबाबत सुरवातीला निर्माण झालेले दु:ख व सहानुभूती नष्ट होते.
23 Dec 2014 - 6:20 pm | मंदार दिलीप जोशी
या घटनेची तूलना २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याशी करणार्यांची कीव करावीशी वाटते. तो हल्ला एका शांतताप्रिय देशावर पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. तर पेशावरच्या शाळेत झालेला हल्ला हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासूर त्यांच्यावरच उलटलेला असल्याने असली तूलना संतापजनकच नव्हे तर आचरट आणि बालीशही आहे.
24 Dec 2014 - 6:07 am | मुक्त विहारि
भेटल्यावर बोलूच.
व्यनि करतो.
26 Dec 2014 - 4:39 pm | मंदार दिलीप जोशी
...का आज सारे गप्प
http://misalpav.com/node/29839