काळ भैरव {काल भैरव} उजैन

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
14 Dec 2014 - 12:50 pm

१} रात्रीच्या सुमारातला मंदीर प्रवेश
K1
२} मंदीराच्या बाहेर, देवाला लागणारा मद्याचा नैवैध्य विकणारा विक्रेता.
K2
३} व्हरायट्री ऑफ ब्रँड विक्रीस ठेवलेले यावेळी पहावयास मिळाले.
K3

४}मंदीराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे गणपती बाप्पा विराजमान आहे.
K4
५} कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे.
K5
६} माझ्याकडची वाईनची बाटली पुजार्‍याला दिली, त्याने ती ताटलीत ओतुन काळ भैरवाला पाजायला सुरुवात केली.
कपाल मालिका कान्तं ज्वाला पावक लोचनम् |
कपाल घरमत्युग्रं कालये काल भैरवम् ||
K6
७} गटा-गटा मद्य पिणारा काळ भैरव !
K7

काळ भैरव उजैन :- २०११ साली माझे इंदुरात आणि सभोवतालच्या परिसरात फिरणे झाले होते... इथला परिसरात मी लहानपणा पासुन येत आहे, मग ते इंदुरचा राजवाडा असो, शिषमहल असो, महाकालेष्वर असो वा क्षिप्रा नदी... या काळभैरव मंदीरात मी अनेकदा गेलो आहे आणि या आगळ्या वेगळ्या देवा बद्धल मला कमालीचे गूढ देखील वाटत आले आहे.काळ भैरवा बद्धल अनेक प्रचलित कथा आहेत. त्यातली एक इथे वाचता येइल :-
ब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)
काळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)
शंकराची जटा उपटुन फेकल्यावर जे अष्ट भैरव उत्पन्न झाले त्यातला एक म्हणजे काळभैरव ! या देवाचे मूळ नाव भैरव परंतु याला "काळ" देखील घाबरत असल्याने याचे नाम करण काळ भैरव असे झाले.काळ भैरवाला शंकराचेच रुप समजले जाते. काशी आणि उजैन येथील काळ भैरवाचे दर्शन घेतल्या शिवात त्या त्या ठि़काणच्या शंकराचे दर्शन पूर्ण झाल्याचे समजले जात नाही.
काल भैरव अष्टक हे अत्यंत प्रभावी समजले जाते :-

ll कालभैरवाष्टकम् ll
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपंकजं । व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरं कृपाकरम् ॥
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबर । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥१॥

भानुकोटिभास्वरं भावाब्धितारकं परं । नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ॥
कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥२॥

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं । श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ॥
भीमविक्रमं प्रभुं विचित्रतांडवप्रियं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तलोकविग्रहं । भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं ।
विनिक्कणन्मनोज्ञहेमकिंकिणीलसत्कटिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं । कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं ॥
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥५॥

रत्न५पादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं । नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ॥
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥६॥

अट्टाहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं । दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं ॥
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥७॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं । काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुं ॥
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥८॥

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं । ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं ॥
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम् । प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधि नरा ध्‍रुवम् ॥९॥

याच अष्टकाचा हा सुंदर व्हिडीयो :-

कॅमेरा :- निकॉन-पी-१००
*फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
{हौशी फोटुग्राफर} ;)
मदनबाण.....

काल भैरव मंत्र

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

14 Dec 2014 - 1:10 pm | मृगनयनी

:) सुन्दर रे मदनबाण!..
अप्रतिम फोटो!!... कालभैरव-जयन्तीनंतर बरोब्बर एका महिन्याने- मार्गशीर्ष कृ. अष्टमीला कालभैरवाचे पु:नश्च दर्शन करून दिल्याबद्दल आभारी आहे!!!
मला पडलेले काही प्रश्न :- कालभैरवाचे डोळे असे खोल का आहेत? त्यात बुब्बुळ बसवलेले किंवा कोरलेले दिसत नाहीत!
आणि कालभैरव ती ओठांमध्ये दिलेली वाईन खरंच पितो का? .. :P .. की ती "प्रसाद" म्ह्णून 'दुसरी'कडे कुठे प्रवाहित होते? ;)

कालभैरव ती ओठांमध्ये दिलेली वाईन खरंच पितो का?
बघा मला अन माझ्या म्य्त्रिनीला एकच प्रश्न पड्लाय, सेम टू सेम हो की नै मृगनयनी :)
मामु अजुन फोतु का नै काढलेस रे ?

मदनबाण's picture

15 Dec 2014 - 8:12 pm | मदनबाण

ओय्य.. ट्वीटी किधर को थी ?... बोलेतो इधरकु बहोत दिन से तू दिखरेली नही थी ! आज अचानक क्या हो गाया जो रास्ता टेढा करके यहा आ गई ? ;) बाकी तू सवाल बहोत पुछती है... कोई बात नयं, अपुन तेरे सवाल का जवाब देइच डालाता हय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

खटपट्या's picture

14 Dec 2014 - 1:27 pm | खटपट्या

ऐकावं ते नवलंच !!

सतिश गावडे's picture

14 Dec 2014 - 1:30 pm | सतिश गावडे

नवल काय आहे ते लिहा भाऊ. (म्हणजे धागा वाचून चर्चा करता येईल. ;) )

खटपट्या's picture

15 Dec 2014 - 12:12 am | खटपट्या

नवल हेच की देव दारू पितोय. असं वाटतय की तो पुजारी कोणत्याही क्षणी ती बशी स्वतःच्या तोंडाला लावेल. आणि म्हणेल, "कधी पासून पाजतोय, पायजे का नको ? नको तर जा मीच पितो !!"

देवाने माणूस निर्माण केला की नाही, माहिती नाही. पण अशा घटना (वाईन पिणारा देव!) पाहिल्या की माणसाने देव निर्माण केला हे पटतं!

किसन शिंदे's picture

14 Dec 2014 - 1:58 pm | किसन शिंदे

=))

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2014 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

@की माणसाने देव निर्माण केला हे पटतं! >> +++++११११११

निलीमा's picture

15 Dec 2014 - 3:36 pm | निलीमा

*lol*

धागा शतकी-दीडशतकी खेळी करणार तर....!
आगावू शुभेच्छा आन्ना.
:)

आतिवास +९९(एक आस्तिकांसाठी राखून ठेवला आहे).
आम्ही दोनवर्षाँपूर्वी ओंकारेश्वर-माहेश्वर-मांडू-इंदूर-उजैन असे गेलो होतो. त्यावेळी हे पाहिले होते. बरीच माहितीपत्रकेही आणली. या पुरीतल्या(सप्तपुरींपैकी एक) क्षिप्रेकडे (सांडपाणी नाला)पाहून फारच निराश झालो होतो. वेधशाळाबद्दल थोडे लिहा चांगल्या स्थितीत आहे का वगैरे.

भैरवाच्या मूर्तीत वक्रनलिका (साईफन) असल्याने तो गटागटा पितो आणि खाली पात्रात सर्व ब्रैंड एकाच ठिकाणी गोळा होतात. त्याचे वाटप रात्री होत असणार.वानरांसोबत एक फोटोही काढला. ब्रैँडबद्दल अनभिज्ञ असल्याने इथेच थांबतो.

भिंगरी's picture

14 Dec 2014 - 3:07 pm | भिंगरी

भैरवाच्या मूर्तीत वक्रनलिका (साईफन) असल्याने तो गटागटा पितो आणि खाली पात्रात सर्व ब्रैंड एकाच ठिकाणी गोळा होतात. त्याचे वाटप रात्री होत असणार
भक्तांची माफी मागून विचारते,लाल भैरवाकडे मद्य पिण्याचा परवाना असेल का?

इनफॉर्समेंटवाले आले तर "घ्या रक्ताचा नमुना आणि पाठवा तपासायला"

मुक्त विहारि's picture

14 Dec 2014 - 10:43 pm | मुक्त विहारि

डिसेंबर-जानेवारी हे इंदूरला जाण्यासाठी उत्तम, हे खरे आहे का?

तसे लहानपणी इंदूर-महू-उज्जैन बघून झाले आहे.

दुर्दैवाने, इंदूर म्हटले की, आजकाल "यकू"च्या आठवणीने डोळे पाणावतात.

कवितानागेश's picture

15 Dec 2014 - 10:56 am | कवितानागेश

गमतीदार माहिती.
ते कालभैरवाष्टक फार छान आहे. म्हणायला मस्त वाटतय... :)

कालभेरव लय डेंजर दिसतोय बाकी, खोबणीतले डोळेच गायब आहेत

@ मॄग्गा
कालभैरवाचे डोळे असे खोल का आहेत? त्यात बुब्बुळ बसवलेले किंवा कोरलेले दिसत नाहीत!
आणि कालभैरव ती ओठांमध्ये दिलेली वाईन खरंच पितो का? .. Blum 3 .. की ती "प्रसाद" म्ह्णून 'दुसरी'कडे कुठे प्रवाहित होते? Wink

या काळ भैरवाच्या मूर्तीचे डोळे असेच आहेत. दिवसाला हजारो लिटर मद्य हा काळ भैरव रिचवतो... या मंदिरा भोवती मी फिरलो परंतु कुठेही मंदीराखाली जाण्याचा मार्ग दिसला नाही आणि कुठेही साठलेल्या मद्याचा वास आला नाही. गणपती दुध पितो या मधले सरफेस टेन्शनवाले कारणही इथे दिसत नाही, मद्य तोंडातुन कुठेही ओघळुन बाहेर सांडताना दिसत नाही. काही संशोधक याचा शोध लावण्यासाठी इथे आले होते म्हणे,परंतु कुठलाही निष्कर्ष काढता आलेला नाही असे म्हणतात.

@आतिवास
देवाने माणूस निर्माण केला की नाही, माहिती नाही. पण अशा घटना (वाईन पिणारा देव!) पाहिल्या की माणसाने देव निर्माण केला हे पटतं!
हे तर काहीच नाही ! तंत्र साधनेत मांस्,मद्य वर्जित नाही, तसेही शंकाराला प्रिय असणार्‍या अनेक गोष्टी विचित्र आहेत....उदा. शंकाराला चीता भस्म प्रिय आहे, शंकराला धोत्र्याचे फुल / फळ अर्पण केले जाते. { धोत्रा विषारी आहे.} तसेच तिथल्या एका शंकाराच्या पिंडीला भांगेचे लेपन देखील केलेले मी पाहिले आहे.फक्त मद्या वरुन तुम्हाला असे वाटले तर मग कामाख्या मंदीर आणि त्याच्या "प्रसादा" बद्धल कळले तर मग घॄणाच वाटेल. { देवी कामाख्याचे मंदीर तंत्र साधनेसाठी जगप्रसिद्ध आहे.}
You cannot believe in God until you believe in yourself.
इति स्वामी विवेकानंद.

@मुवि
डिसेंबर-जानेवारी हे इंदूरला जाण्यासाठी उत्तम, हे खरे आहे का?
हो डिसेंबर-जानेवारी मधे मस्त गारवा असतो. :) मस्त रबडी / पोहे / नमकिन चापायचे... आवड असल्यास मस्त भांग प्यावी ! जय बम भोले ! ;)

दुर्दैवाने, इंदूर म्हटले की, आजकाल "यकू"च्या आठवणीने डोळे पाणावतात.
अगदी... त्याच्याशी २-४ वेळाच फोनवर बोलणे झाले होते... कधी इंदुरात जाणे झाले की त्याला भेटावे असा विचार होता...पण तो कायमचाच दुरावला ! :(

@ मौ तै...
ते कालभैरवाष्टक फार छान आहे. म्हणायला मस्त वाटतय...
व्हिडीयो ऐक... सुरेख आहे. आदि शंकाराचार्यांची रचना आहे. स्तोत्र जालावरुन चोप्य पेस्त असल्याने त्यात चूक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतरत्र पाहुन पडताळणी करुन घ्यावी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 6:25 am | मुक्त विहारि

खादाडीला नक्कीच जावू.पण भांग मात्र अजिबात नको.

मदनबाण's picture

16 Dec 2014 - 10:58 am | मदनबाण

पण भांग मात्र अजिबात नको.
व्हाय व्हाय ? टेल टेल ?
एकदा हसत सुटलो तर १-२ तास हसतच बसण्याची भिती वाटते ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

खादाडीला नक्कीच जावू.पण भांग मात्र अजिबात नको.
हाय जालीम तुने तो पिच नही क्या ?

सौंदाळा's picture

16 Dec 2014 - 2:22 pm | सौंदाळा

एकदा हसत सुटलो तर १-२ तास हसतच बसण्याची भिती वाटते

अंगुर पाहिला की काय परवा? ;)

मदनबाण's picture

16 Dec 2014 - 2:28 pm | मदनबाण

स्वतः भांग सेवन केल्याने विविध अनुभव आहेत ! ;) त्यातही भांगेत तांब्याचा पैसा { जुने एक पैसाचे नाणे } उगाळुन पेयल्यास जास्त चढते असे म्हणतात... माझी भांग लस्सी प्यायची राहिली आहे... कधी संधी मिळाल्यास सोडणार नाही ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 12:02 am | मुक्त विहारि

भांग कधी घेतली नाही पण भांगे बाबत ऐकीव माहिती भरपूर असल्याने, तिची चव बघण्याची इच्छा कमी झाली आहे.

पैसा's picture

15 Dec 2014 - 11:42 am | पैसा

फोटो मस्तच! पण तिथे पूजासाहित्य विकणार्‍या गाड्यांवर अशी दारू मिळते? परवाने वगैरे काही नाही? गोव्यातून दमणला दारू नेण्यासाठी तात्पुरते परवाने बाटल्यांबरोबर विकत देतात. तसेही काही नसते? आणि हे देऊळ किती जुने आहे? म्हणजे परदेशी दारू ब्रिटिशांपूर्वी इथे नक्कीच मिळत नसणार. मग तेव्हा या कालभैरवाला काय देत होते लोक?

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 11:49 am | टवाळ कार्टा

परदेशी दारू ब्रिटिशांपूर्वी इथे नक्कीच मिळत नसणार. मग तेव्हा या कालभैरवाला काय देत होते लोक?

म्हणजे त्याआधी इथे दारुच नव्हती असे म्हणायचे आहे काय? .... कि ....जौदे

पैसा's picture

15 Dec 2014 - 1:00 pm | पैसा

सुर-असुर ही नावे सुरेवरोन आलीत हे तुम्हाला माहिती आहे का ते मला माहित नाही. पण इथे फोटो आहेत ते सगळे विदेशी दारवांचे आहेत म्हणून विचारलं. ताडी, माडी, मोसंबी नारंगी असलं काय दिसलं नाय म्हणून विचारलं. आणखी ब्रँड तुम्हालाच माहित असतील माझ्यापेक्षा. :D

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2014 - 1:15 pm | टवाळ कार्टा

हा हा हा...माहीत आहे मला

आणखी ब्रँड तुम्हालाच माहित असतील माझ्यापेक्षा.

तुम्ही गोव्यातल्या...आता यापुढे काही म्हणायला उरलेच नाही :P

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2014 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा

अब्बाबाब्बबाब्बाब्बाssss =))

मदनबाण's picture

15 Dec 2014 - 12:03 pm | मदनबाण

फोटो मस्तच! पण तिथे पूजासाहित्य विकणार्‍या गाड्यांवर अशी दारू मिळते? परवाने वगैरे काही नाही?
हो दारु अशी पूजा साहित्य विकणार्‍या गाड्यांवरच मिळते. परवान्या बद्धल माहित नाही. दारुचे इतके ब्रांड मी स्वतः पहिल्यांदाच पाहिले...आणि अर्थातच ब्रँड प्रमाणे दर सुद्धा वेगळे होते !

हे देऊळ किती जुने आहे? म्हणजे परदेशी दारू ब्रिटिशांपूर्वी इथे नक्कीच मिळत नसणार. मग तेव्हा या कालभैरवाला काय देत होते लोक?
हे शैव संप्रदायाचे स्थान आहे {मुख्यत्वे कापालिक आणि अघोर पंथीयांचे } याची बांधणी मराठ्यांनी केली असे म्हंटले जाते.तर मूळ मंदीर राजा भद्रसेनाने बांधल्याचे समजते {नक्की काळ ठावूक नाही} या अवंती नगरातील काल भैरवाचा संदर्भ स्कंद पुराणात असल्याचे समजते. जरी इथे मद्याचा नैवैद्य दाखवला असेल तरी ज्यांची दारु सुटत नाही ते लोक ती सोडवण्याची प्रार्थना करायला इथेच येतात हे विशेष !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

भिंगरी's picture

15 Dec 2014 - 12:05 pm | भिंगरी

जरी इथे मद्याचा नैवैद्य दाखवला असेल तरी ज्यांची दारु सुटत नाही ते लोक ती सोडवण्याची प्रार्थना करायला इथेच येतात हे विशेष !

???????????????????

किती जुने ?१८०० नंतरचे हे सारे उद्योग आहेत. शिंदे सरकारांनी मुसलमान सत्ता उलथवून उजैन पुन्हा सर्व बांधून दिली, राजधानी इथून ग्वाल्हेरला नेली तेव्हा अशी काही प्रथा पाडून काहींनी फायदा उठवला.

प्रचेतस's picture

15 Dec 2014 - 4:31 pm | प्रचेतस

शिंदे का होळकर?
उज्जैनचं बांधकाम इंदूरच्या अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झाले होते असे ऐकले होते. बाकी मंदिराची शैली टिपिकल पेशवेकालीन शैली आहे.

मंदिराची बांधकाम शैली "मालवा / माळवा " {Malwa} असल्याचे जालावरुन समजते...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

प्रचेतस's picture

15 Dec 2014 - 5:06 pm | प्रचेतस

उम्म्म....
मंदिराचा अंतर्भाग कसा आहे ते माहीत नाही.
मी ते प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावरून म्हटले होते जो टिपिकल पेशवेकालीन शैलीत आहे.
माळवा शैली थोडीफार इस्लामिक स्थापत्यशैलीशी नाते सांगते. कमानी, घुमट वैगरे. आतला भाग तसा असेलही.

मदनबाण's picture

15 Dec 2014 - 5:09 pm | मदनबाण

प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावरून म्हटले होते जो टिपिकल पेशवेकालीन शैलीत आहे.
सहमत... :) अर्थात मला यातले जास्त काही कळत नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

राजधानी इथून ग्वाल्हेरला नेली तेव्हा अशी काही प्रथा पाडून काहींनी फायदा उठवला.
ह्ह्म्म्म... देवळाच्या बाहेरुन कोणीही विकत घेतलेली बाटली इतर ठिकाणी नेताना दिसत नाही ! शिवाय सरकारमान्य भांग विक्रीची बरीच दुकान आहेत की त्यापुढे दारुला जास्ती मागणीही नसावी ! { अर्थात हा माझा अंदाज आहे.} त्यामुळे यातुन कोणाचा फायदा होताना तरी दिसत नाही ! देवळात / बाजारात कुठे काळ भैरव कॉकटेल विकणारेही दिसले नाहीत. ;) हा फक्त आणि फक्त प्रथेचाच भाग आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

बॅटमॅन's picture

15 Dec 2014 - 4:34 pm | बॅटमॅन

काळ भैरव कॉकटेल

काला खट्टा नामक प्रकाराची प्रेरणा ती हीच असावी काय?

काला खट्टा नामक प्रकाराची प्रेरणा ती हीच असावी काय?
हा.हा.हा... अजुन कॉकटेल पिण्याची वेळ आली नसल्याने ठावु़क नाही ! ;) बाकी भांग पिण्याचा मात्र उत्तम अनुभव आहे. ग्लासभर भांग प्यावी आणि मस्त ध्यान करावे... आहाहा... विश्वाचे भान राहत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

दिपक.कुवेत's picture

15 Dec 2014 - 4:44 pm | दिपक.कुवेत

होउन जौ द्या आता एक कट्टा....काळभैरवाच्या मंदिरात (कोण ते मदिरात म्हणतय??)

माहितीपत्रकाचा फोटोच टाकीन म्हणतो. तोपर्यँत चालू द्या. आता वल्ली सभेला आले आहेत तर थातूरमातूर फेकाफेक करून चालणार नाही. सज्जड ताम्रलेख, शिलालेख, भूर्जपत्रे, पुरातत्व खाते वगैरेचा उल्लेख करावा लागेल. 'भैरव पितो का' हा प्रश्न बाजूला पडून 'देवळाच्या स्थापत्त्यावर कोणत्या शैलीचा प्रभाव', 'शिंदे, होळकर का पेशवे' चर्चा सुरू झालेली असेल.

जवळच मंगलनाथ (एक मंगळाचे मंदिर )आहे. कुंडलीत लग्नाचा मंगळदोष असेल तर तो निवारण्यासाठी पुरोहितगण सतत तयार असतात. उजैनीतील गर्दी खेचणाऱ्या पाच मंदिरापैकी एक. हा एक मोठा चर्चा धागा होईल.

स्पंदना's picture

16 Dec 2014 - 5:03 am | स्पंदना

नवीन माहीती.
जोवर कोणी उठुन माझ्या काळभैरवाचच राज्य आहे म्हणत नाही तोवर त्या देवाला फारसा धक्का लावायच काही कारण नाही. श्रद्धा पर्सनल असते, अन जर ती पर्सनल रहात असेल, तिचा उदो उदो करुन ती दुसर्‍यांवर ठसवायचा जोरदार प्रयत्न नसेल, तीच खरी अस दुसर्‍यांना मानायला लावायच दडपण नसेल तर असो बापडा देव तो, जो मद्य पितो!!
(आजच सिडनेत अश्याच श्रद्धावानांच काहूर पाहून आपल्या श्रद्धेबद्दल निवांत असलेली) अपर्णा

मुक्त विहारि's picture

16 Dec 2014 - 6:21 am | मुक्त विहारि

+ १

आपल्याला कोणीतरी संकटातून सोडवेल या आशेवरच बरेच धार्मिक उपचार केले जातात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2014 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुकताच मित्रांबरोबर या कालभैरवाला भेटून आलोय. आठवणी ताज्या केल्यात धन्स. वेगवेगळ्या ब्र्यांडसचा नैवद्य काळभैरवाला दिल्यानंतर राहीलेला प्रसाद बाल बच्चांसह कुटुंबात चखल्या जात होता तेव्हा प्रभुची लिला अगाध आहे याची प्रचिती तिथे आली होती. देवा तु खरंच महान आहेस. आय लव यु सो मच. (आमच्यातला एक रसिक मित्र 'सर, हा डु माल असेल' असे म्हणायला विसरला नै, याच्याकडे ट्रीपमधे सिग्नेचर होतं ते संपल नव्हतं ना म्हणुन )
IMG_20140817_131812

अशी मंदिरं आणि असा प्रसाद असलेली मंदिरं जगभर उभारली पाहिजेत आणि आपला एक भक्तांचा 'बैठा संप्रदाय' निर्माण केला पाहिजे. आपल्याही दिंड्या, वगैरे निघाल्या पाहिजेत असा कै च्या कै विचार चमकुन गेला. :)

-दिलीप बिरुटे
(काळभैरवाच्या प्रसादाचा भक्त) ;)

मदनबाण's picture

16 Dec 2014 - 11:05 am | मदनबाण

अशी मंदिरं आणि असा प्रसाद असलेली मंदिरं जगभर उभारली पाहिजेत आणि आपला एक भक्तांचा 'बैठा संप्रदाय' निर्माण केला पाहिजे.
नारायण ! नारायण ! सॉरी सॉरी जय काळ भैरव जय काळ भैरव ! बघा बघा... प्रा डॉ...चक्क डबल बॅरल चे समर्पण करुन तुम्ही मंदिर उभारणे आणि संप्रादय निर्माण करण्याचा विचार करु लागला आहात ! एका दर्शनानेच इतका काया पलट झाला ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 11:25 am | टवाळ कार्टा

दिंड्यांमधले लोक "लेझिम" खेळत आहेत असे चित्र डोळ्यांसमोर तरळले =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2014 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

अश्या दिंड्यांमधले लोक ले'झिम नाही "झुम बराबर झुम..." खेळतात ;)

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 3:30 pm | टवाळ कार्टा

झुम बराबर झुम... >>

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2014 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला असं काही म्हणायचं आहे काय ?...