काळ भैरव {काल भैरव} उजैन

मदनबाण's picture
मदनबाण in मिपा कलादालन
14 Dec 2014 - 12:50 pm

१} रात्रीच्या सुमारातला मंदीर प्रवेश
K1
२} मंदीराच्या बाहेर, देवाला लागणारा मद्याचा नैवैध्य विकणारा विक्रेता.
K2
३} व्हरायट्री ऑफ ब्रँड विक्रीस ठेवलेले यावेळी पहावयास मिळाले.
K3

४}मंदीराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे गणपती बाप्पा विराजमान आहे.
K4
५} कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे.
K5
६} माझ्याकडची वाईनची बाटली पुजार्‍याला दिली, त्याने ती ताटलीत ओतुन काळ भैरवाला पाजायला सुरुवात केली.
कपाल मालिका कान्तं ज्वाला पावक लोचनम् |
कपाल घरमत्युग्रं कालये काल भैरवम् ||
K6
७} गटा-गटा मद्य पिणारा काळ भैरव !
K7

काळ भैरव उजैन :- २०११ साली माझे इंदुरात आणि सभोवतालच्या परिसरात फिरणे झाले होते... इथला परिसरात मी लहानपणा पासुन येत आहे, मग ते इंदुरचा राजवाडा असो, शिषमहल असो, महाकालेष्वर असो वा क्षिप्रा नदी... या काळभैरव मंदीरात मी अनेकदा गेलो आहे आणि या आगळ्या वेगळ्या देवा बद्धल मला कमालीचे गूढ देखील वाटत आले आहे.काळ भैरवा बद्धल अनेक प्रचलित कथा आहेत. त्यातली एक इथे वाचता येइल :-
ब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)
काळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)
शंकराची जटा उपटुन फेकल्यावर जे अष्ट भैरव उत्पन्न झाले त्यातला एक म्हणजे काळभैरव ! या देवाचे मूळ नाव भैरव परंतु याला "काळ" देखील घाबरत असल्याने याचे नाम करण काळ भैरव असे झाले.काळ भैरवाला शंकराचेच रुप समजले जाते. काशी आणि उजैन येथील काळ भैरवाचे दर्शन घेतल्या शिवात त्या त्या ठि़काणच्या शंकराचे दर्शन पूर्ण झाल्याचे समजले जात नाही.
काल भैरव अष्टक हे अत्यंत प्रभावी समजले जाते :-

ll कालभैरवाष्टकम् ll
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपंकजं । व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरं कृपाकरम् ॥
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबर । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥१॥

भानुकोटिभास्वरं भावाब्धितारकं परं । नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ॥
कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥२॥

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं । श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ॥
भीमविक्रमं प्रभुं विचित्रतांडवप्रियं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तलोकविग्रहं । भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं ।
विनिक्कणन्मनोज्ञहेमकिंकिणीलसत्कटिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं । कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं ॥
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥५॥

रत्न५पादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं । नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ॥
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥६॥

अट्टाहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं । दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनं ॥
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥७॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं । काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुं ॥
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं । काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥८॥

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं । ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं ॥
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनम् । प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधि नरा ध्‍रुवम् ॥९॥

याच अष्टकाचा हा सुंदर व्हिडीयो :-

कॅमेरा :- निकॉन-पी-१००
*फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरटोन मधे फरक पडतो.
{हौशी फोटुग्राफर} ;)
मदनबाण.....

काल भैरव मंत्र

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 4:41 pm | टवाळ कार्टा

गणेशा झालाय माझा :(

खटपट्या's picture

16 Dec 2014 - 11:30 pm | खटपट्या

माझाही !!

योगी९००'s picture

16 Dec 2014 - 12:15 pm | योगी९००

अप्रतिम !!... कालभैरवाचे दर्शन करून दिल्याबद्दल आणि माहिती बद्दल आभारी आहे!!!

बाकी (का कोणास ठावूक?) मला काळभैरव थोडाफार "जादू" सारखा वाटला.

मदनबाण's picture

16 Dec 2014 - 12:20 pm | मदनबाण

बाकी (का कोणास ठावूक?) मला काळभैरव थोडाफार "जादू" सारखा वाटला.
हा.हा.हा... जादूला आवडणारे संगीत वाजवुन पहा तर... काय माहित दारा समोर जादू भैरव प्रकट व्हायचा ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

योगी९००'s picture

16 Dec 2014 - 12:45 pm | योगी९००

मला असे म्हणायचे होते की काळभैरव असे नाव वाचल्यावर जो उग्र चेहरा नजरेसमोर येतो तसे न होता या काळभैरवाचा चेहरा जादूसारखा प्रेमळ वाटला...

अत्रुप्त आत्मा's picture

16 Dec 2014 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

@काळभैरव थोडाफार "जादू" सारखा वाटला. >>> =)))))

पिलीयन रायडर's picture

16 Dec 2014 - 12:49 pm | पिलीयन रायडर

फोटो पाहुन जरा भीती वाटली... मुली मुली जाउन आलो तर ठिके ना??

टवाळ कार्टा's picture

16 Dec 2014 - 1:15 pm | टवाळ कार्टा

"प्रसाद" घ्या .... मग कसलीच आणि "कोणाचीही" भीती वाटणार नाही =))

फोटो पाहुन जरा भीती वाटली... मुली मुली जाउन आलो तर ठिके ना??
अजिबात नाही... वरती झी-न्यूजचा व्हिडीयो पाहुन तिथे जाणार्‍या लोकांविषयी अंदाज येइल. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:-
Oil, coal and iron ore at financial crisis levels
The Global Financial Crisis: A Turning Point
Memories of financial crisis fading as risks rise

प्रचेतस's picture

16 Dec 2014 - 9:30 pm | प्रचेतस

भैरवाच्या इतक्या रौद्र आणि सुंदर मूर्ती आहेत की त्यांच्यापुढे उज्जैनचा कालभैरव अतिशय साधा वाटतो.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 12:09 am | मुक्त विहारि

आपला कालभैरव उज्जैनला प्रसाद घेतोय.उगाच रौद्र रूप घेवून कशाला कुणी प्रसाद घेइल?

संजीव नाईक's picture

23 Dec 2014 - 7:00 pm | संजीव नाईक

माता पाताल भैरवीचे मंदिर आहे आणि दत्त मंदिर सुद्धा

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2021 - 3:17 pm | चौथा कोनाडा

भारी धागा ! काही प्रतिसाद वाचून करमणूक झाली !
आमची उज्जैनला इतक्या घाईत फेरी झाली की या "दिव्य" स्थानाला भेट द्यायचीच राहिली, तीर्थ प्राशनाचा योग चुकला !

रच्याकने, आता ट्रीप सीझन सुरू झाला आहे. उज्जैन आणि जवळपासच्या स्थानाना भेट देण्यासाठी उत्तम !