'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram-...
आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता !
कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन !
हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा
आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी !
कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !!
ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !!
बस्स . बस्स . बस्स.
आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल !
आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते.
Freedom comes with responsibility .....or Consequences !
प्रतिक्रिया
18 Jun 2014 - 11:49 am | मंदार दिलीप जोशी
अनुमोदन प्रसाद :)
9 Dec 2014 - 12:37 pm | प्रसाद गोडबोले
नवीन बातमी : आत्ताच ही बातमी वाचनात आली ...
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sakshi-maharajs-ode-to-mod...
बहुत संतोष जाहला . थोरल्या महाराज साहेबांची आठवण जाहली .
अशा अनेक घटना घडत राहिल्यास खर्या अर्थाने हिंदु अस्मितेचा उदय होत आहे हे सिध्द होईल :)
14 Dec 2014 - 12:06 pm | प्रतापराव
हिंदू धर्मात मुस्लीम आले ते ठीक आहे परंतु हिंदू धर्मातून लोक मुळात दुसर्या धर्मात का जात असावेत हाच मुख्य प्रश्न आहे नि तो चिंतनीय आहे जाती व्यवस्था, उच्च नीचपणाची भावना ह्याने हा धर्म पोखरून निघालाय. २०० जन आले म्हणून आपण खुश होतोय तिकडे ओबीसी सेवासंघाचे हनमंत उपरे हे जवळपास १० लाख लोकांना बुद्ध धर्मात घेवून चाललेत.जातीव्यवस्थेतची कीड गेल्याशिवाय हिंदू धर्माला भविष्य नाही.
14 Dec 2014 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
अतिशय सहमत आहे. ही गोष्ट नीट कळल्यामुळे , मी माझ्या स्वतःकडून जात पाळणे पूर्ण बंद केलेले आहे.
14 Dec 2014 - 5:12 pm | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११११
15 Dec 2014 - 10:56 am | जेपी
आमचा पण +११११११११११
15 Dec 2014 - 1:48 pm | प्रसाद गोडबोले
हिंदु धर्मातील जातीव्यवस्था कधीच जाणार नाही . पुर्वी ब्राह्मण मराठा महार मांग वगैरे 'धर्मोक्त' जाती होत्या , आता अनारक्षित , एस्सी , एस्टी , ओबीसी , एबीसी वगैरे सरकारोक्त जाती आहेत सामाजिक न्यायासाठी . थोडक्यात हे कोंबडी आधी की अंडे आधे सारखा न सुटणारा प्रश्न आहे , कीड लागली म्हणुन कीटक नाशक मारले अन कीटक नाशक मारले म्हणुन कीड इव्होल्युशन होवुन आधी पेक्षा गंभीर झाली असे काहीसे !!
तेव्हा आपण जातीव्यवस्थेविषयी चर्चा करत बसण्यापेक्षा ती असुनही हिंदु धर्मोदय कसा होईल ह्याचा विचार करत राहिला पाहिजेल . जातीनिर्मुलनाचे काम सरकारने हाती घेतले आहेच , आपण धर्मोदयाचे काम हाती घेणे अपेक्षित आहे .
आणि बुध्द/ जैन धर्म परका नाही हे मी वारंवार म्हणत आलो आहेच त्यामुळे जर आमच्या काही बांधवांना हिंदु धर्मातुन बौध्द / जैन धर्मात गेल्याने जातिव्यवस्थेच्या बेड्यातुन सुटल्याचा आनंद होत असेल तर त्याचे मी कौतुकच करतो :)
यं शैवा समुपासते शिव,इति ब्रमहोति वेदांतिनौ ।
बौदधा बुद्रधि प्रमाण पटवः ,कर्तैति नैयायिकाः।
अर्हनित्यथजैन शासनरथाः कर्मति मीमांसकाः ।
सोयं नो वि्दघातु वांछित फलम्र् त्रैलोक्रय नाथौ हरि।।
15 Dec 2014 - 1:53 pm | प्रसाद गोडबोले
आणि हो एक महत्वाचे सांगायचेच राहिले
इथे उपरोक्त हिंदु धर्म आणि आर्य सनातन वैदिक धर्म हे दोन पुर्णपणे भिन्न धर्म आहेत असे आमचे ठाम मत आहे.
आणि आम्ही नुकतीच हिंदु धर्मातुन आर्य सनातन वैदिक धर्मात उडी मारली असल्याने हा धागा आमच्या नल & व्हॉईड होतो . :D
हिंदुधर्मीयांना भावी उत्कर्षासाठी शुभेच्छा :)
लेखनसीमा
_____________________________________________________________________________