एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे.
नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही.
पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही.
वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही.
सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही.
पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही.
भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही.
आपल्याला जे साध्य होत नाही त्या गोष्टीला कमी लेखले तरीही ज्याने ते साध्य केले आहे त्याचे महत्त्व कमी होत नाही. ज्या त्या व्यक्तीचे महत्त्व हे त्या व्यक्तीच्या कर्माने सिद्ध होते. या जगात प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात असते. आणि आपण कमी लेखले म्हणून कोणत्याही व्यक्तीचे महत्त्व कमी होत नाही. या जगात कुणीही परिपूर्ण नसतो. त्यामुळे व्यक्तींना कमी लेखून आपण एक प्रकारे स्वत:लाच कमी लेखत असतो आणि सर्व व्यक्तींना बनवणाऱ्या परमेश्वरालाच कमी लेखत असतो.
प्रतिक्रिया
10 Dec 2014 - 11:09 am | टवाळ कार्टा
कितीही जिल्ब्या आल्या त्यामुळे मिपाचा दर्जा कमी होत नाही :)
10 Dec 2014 - 11:13 am | मुक्त विहारि
कितीही वेळा हाकलून लावले तरी....
अनावश्यक हिताचे इश स्तवन करणारेही डू आयडी कमी नाहीत.
10 Dec 2014 - 11:27 am | टवाळ कार्टा
=))
नवीन मुक्ताफळ बघीतले का?
10 Dec 2014 - 11:30 am | मुक्त विहारि
+२
10 Dec 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
बहुतेक "मी पयला" कंपू जास्त भडकाऊ होता म्हणून "मी पयला" असे लिहिले की प्रतिसाद गायब व्हायचा :D
10 Dec 2014 - 11:43 am | मुक्त विहारि
तेव्हढाच टाइमपास...
पण कुणालाही न दुखवता...
बाद्वे...
आपण आपली इथे भंकस करत बसलोय आणि ते संपादक कात्री घेवून आले तर?
धागा काय... धाग्याचा विषय काय? आणि आपण प्रतिसाद काय देतोय?
10 Dec 2014 - 11:48 am | टवाळ कार्टा
ते पण खरेच :(
10 Dec 2014 - 11:59 am | मुक्त विहारि
आज खूप दिवसांनी टाइमपास करायला मज्जा आली.
चल जातो झोपायला....
आज परत रात्र पाळी...
सध्या तरी रात्रपाळीचा रखवालदार म्हणून रोजंदारीवर काम करत आहे.
आपले ४ पैसे गाठीला मारायचे आणि यायचे.
रात्रभर व्हॉटस अप आणि मिपा...
सकाळी बायकोबरोबर स्काय-पी...
आयला आमची कंपनी आम्हाला व्हॉटस अप आणि मिपा-मिपा खेळण्यासाठी पैसे देते.
त्यामुळे सोनारांचे एक वाक्य पटले.
"भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही."
आता आमचे व्हॉटस अप आणि इतर कर्माचे फळ म्हणून बहूदा नारळ मिळेल. (तसाही तो मार्च अखेरीपर्यंत मिळणार आहेच.)
10 Dec 2014 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा
अहो हे फेसबुक नाही होssssssssssssssssssssssssssssssssss :-/ नका ती वि४ मौक्तिके इकडे उधळू...
घ्या तांब्या आणि जा पाहू वावरात! =))
उगा छळ मेला! :-/
10 Dec 2014 - 3:43 pm | प्यारे१
सात्विक संताप म्हणतात तो हाच काय? ;) =))
10 Dec 2014 - 4:42 pm | योगी९००
भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही.
भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही.
हा भाग्या कोण हो? उगाचच वस्त्रहरण नाटकातले "भाग्या भागवणे ये ये ये ये" हे आठवले.
10 Dec 2014 - 10:54 pm | सतिश गावडे
मलाही हेच विचारायचे होते. मी ठळक छापात टंकण्यासाठी त्या दोन ओळी चोप्यही केल्या होत्या.मात्र ते महत्कार्य तुम्ही आधीच केलेले आहे. :)
धागाकर्त्यासः
यात ते कर्म करताना व्यक्तीने फळाची अपेक्षा केली असल्यास किंवा नसल्यास व्यक्तीच्या महत्वावर काय परीणाम होतो?
10 Dec 2014 - 11:49 pm | पिवळा डांबिस
ठ्ठोऽऽऽ!!!!
=))
10 Dec 2014 - 9:23 pm | स्वप्नज
कसे काय सुचतात हो तुम्हाला इतके मस्त विचार? अप्रतिम. शब्दच नाहीत
-(मिपा आणि चेपु वेगवेगळे समजणारा) स्वप्नज