रंगात रंगलो मी - रंगाविना

चौकटराजा's picture
चौकटराजा in कलादालन
26 May 2012 - 4:46 pm

रसिक मित्रहो,
नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली.
मग आपल्या घरी पी सी आला रे आला . दडपून ग्राफिक एडीटर घाबरत घाबरत टाकले. काही दिवसात आडवा मेनू उभे टूलकिट समजू लागले. वाई येथे असताना मित्राच्या चहाच्या दुकानातून चहाची खोकी आणली होती .तोडून मोडून त्याचे लाकडी कॅनव्हास ( ?) तयार केले होते . ऑईल पेंट पुण्यातून " व्हीनस" मधून आणले.होते हुसेनच्या, जेपी सिंघाल च्या कॉप्या आईल मधे मारल्या. होत्या .

मग रंगाचा खर्च नको , लीन्सिड तेल नको, टरपंटाईन नको अशी सोय संगणकावर आली.
हे चित्र त्याचा उपयोग करून काढले आले.मूळ चित्र जॉन फर्नांडिस या कलाकाराचे आहे.
२००३ साली कलर मॉडेल्स, ब्रश डायनामिक्स, ब्रश टीप , साईज , हार्डनेस, या बाबत मी "ढ"
असताना हे चित्र काढले आहे. त्यासाठी ज्या अनामिक व्हिजुअलाझर नी मूळ आज्ञावली बनविली त्यांचा मी शतशः आभारी आहे.
Left

कलामौजमजारेखाटन

प्रतिक्रिया

आबा's picture

26 May 2012 - 5:56 pm | आबा

सुरेख !

अमृत's picture

26 May 2012 - 6:05 pm | अमृत

पेंटींगमधलं जास्त कळत नाही पण तुम्ही चितारलेलं चित्र खरच उत्तम. माझा _/\_

अमृत

कान्होबा's picture

26 May 2012 - 7:28 pm | कान्होबा

फोटो कुठे गेले हो चौकट राजा?

प्रचेतस's picture

26 May 2012 - 7:32 pm | प्रचेतस

अप्रतिम.
कसे काढले ते सांगाल?

५० फक्त's picture

26 May 2012 - 9:19 pm | ५० फक्त

मियां, हमा क्या कैते, तुमा आमा खाओ तो, कोयां काय कु मोज रहे, तुमना लगानेके क्या झाडा, पिछेमें.

घरके बोलर्‍हा मैं, नयतर तुमा दुसराच कुच तो समजनेका ओर लोगा आते मेरे को मारने फुक्कट में.

सिझन खल्लास हो रा, बारिशा पडने लगी तो बंद करा भला क्या, नै तो भार आने को नक्को बोलेंगे घुसलखानेसे, हां.

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2012 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर's picture

27 May 2012 - 12:21 am | संजय क्षीरसागर

आणि कोणतं सॉफ्टवेअर वापरून कसं काढलं ते पण कळवा

मोहनराव's picture

27 May 2012 - 11:53 pm | मोहनराव

लै भारी!

मदनबाण's picture

28 May 2012 - 9:27 am | मदनबाण

सुरेख... :)

संजय क्षीरसागर's picture

28 May 2012 - 12:58 pm | संजय क्षीरसागर

चौरा बघा काय झालय ते

चौकटराजा साहेब, चित्र खरच दिसत नाही आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2012 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

चित्राला कुठल्या हलकटाची नजर लागली का काय ? दिसत नाही की चित्र.

असो..

तुम्ही काढलेत म्हणजे नक्की राजा रवी वर्म्याच्या तोडीचेच असणार म्हणा. त्यामुळे आमचा 'अप्रतिम' हा प्रतिसाद चित्र न बघताच दिला असून देखील स्विकारावा.

चौकटराजा's picture

28 May 2012 - 3:42 pm | चौकटराजा

काहीना तांत्रिक कारणाने चित्र दिसत नाहीय काहीना दिसतेय . ज्याना दिसत नाही त्यांच्यासाठी लिंक - http://i1074.photobucket.com/albums/w408/arunbarve/adiwasi-2009-withcutl...
दरम्यान प्रतिसादाबद्द्ल अत्यंत आभारीय !

कवितानागेश's picture

28 May 2012 - 4:33 pm | कवितानागेश

हे कसे काढले त्याची माहिती कृपया पायरीपायरीनी द्याल का?

चौकटराजा's picture

28 May 2012 - 5:29 pm | चौकटराजा

हे एक कॅलेंडर होते ते पीसी समोर लावले. फोटोशॉप मधे फिक्का रंग निवडून बारीक ब्रश निवडला व स्केच काढून घेतले. मग ब्रश हे टूल वापरून प्लेन रंग भरले. स्मज टूल वापरून शेडींग केले. चुकले तेथे इरेझर टूल वापरले. त्या चित्रात जे कट दिसतात ( रिम लाईटस) ते डॉज टूल वापरून केले. बाकी झाडाच्या खोडावरच्या लाईन्स या बारीक टीपचा ब्रश वापरून रेखल्या . हाय काय नाय काय !

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2012 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा

@ त्याची माहिती कृपया पायरीपायरीनी द्याल का? >>> "म्हणजे मलाही काढता येइल" हे वाक्य राहिले का? ;-)

सर्वसाक्षी's picture

29 May 2012 - 9:57 am | सर्वसाक्षी

राजेसाहेब,

अफलातुन कलाकृती. फार आवडली.

जयवी's picture

30 May 2012 - 4:49 pm | जयवी

अ प्र ति म !!!!!!!!!!!!
चेहेरा फारच मोहक आलाय :)

सौरभ उप्स's picture

17 Jun 2012 - 3:26 pm | सौरभ उप्स

highlights अजुन स्पष्ट आले असते तर अजुन भारी zaal अस्त...

चौकटराजा's picture

1 Feb 2013 - 4:01 pm | चौकटराजा

मागची पाने चाळता चाळता हा धागा दिसला. माझाच आहे. त्यानंतर काही जण मिपाकर झाल्याने त्यांच्या आस्वादार्थ वर काढीत आहे.

II श्रीमंत पेशवे II's picture

1 Feb 2013 - 4:16 pm | II श्रीमंत पेशवे II

अतिशय छान .

सस्नेह's picture

1 Feb 2013 - 7:00 pm | सस्नेह

ओहो..! अगदी सुरेख. 'पेंटिंग' टच खासच !

अभ्या..'s picture

2 Feb 2013 - 12:51 am | अभ्या..

राजासाब हे चित्र २००३ मध्ये म्हण्जे फोटोशॉप ७ वापरुन असेल बहुतेक. अत्यंत मस्त रिझल्ट आलाय. त्यातल्या त्यात हिरव्या कापडाचे टेक्श्चर आणि हायलाईट अप्रतिम. बेळगावचे जॉन फर्नांडीस आपल्यात नाहीत सध्या पण त्यांचे डेमो बघितले आहेत. त्यांच्या चित्रात एक प्रकारचा गोडवा असायचा चेहर्‍यावर. (नवनीत मधली लहान मुलांची चित्रे त्यांचीच असत) तो अगदी तसाच उतरला आहे तुमच्या चित्रात. अगदी अप्रतिम चित्र.

चौकटराजा's picture

18 Nov 2014 - 8:21 pm | चौकटराजा

खास नव्या आय डी नी पहावी म्हणून २००३ मधे फोटोशॉप वापरून केलेले चित्र. मूळ कलाकार जॉन फर्नांडिस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2014 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

चौरांचा नवा पैलू समजला ! *ok*

चित्र सुंदर आहे हेवेसांन :)

प्यारे१'s picture

18 Nov 2014 - 8:53 pm | प्यारे१

चौराकाका,

वाईचं मित्राचं चहाचं दुकान किसन वीर चौकातलं का काय हो?

चित्र भारी आलंय हे वे सां न ल. :)

चौकटराजा's picture

19 Nov 2014 - 6:08 am | चौकटराजा

वळकलं बरूबर ! सत्या शेंडेचं !

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 1:59 pm | प्यारे१

गुड गुड!

एस's picture

18 Nov 2014 - 9:21 pm | एस

डिजिटल आर्ट आवडलं. मूळ चित्रही पहायला आवडेल. अशा पद्धतीने फक्त मायक्रोसॉफ्ट पेंट हे बेसिक सॉफ्ट्वेअर वापरून केलेल्या मोनालिसाचा व्हिडिओ आठवला. लिन्क मिळाल्यास डकवतो.

याआधी हा धागा पाहिला नव्हता, चित्र अप्रतिम आलंय.

आता २०१४ मध्ये हेच चित्र तुम्ही upgraded Photoshop किंवा इतर तुमचा आवडता प्रोग्रॅम वापरून कसं काढाल ते पहायची उत्सुकता आहे.

खटपट्या's picture

19 Nov 2014 - 8:18 am | खटपट्या

जबरा आलंय चीत्र.

मियां.. इसको बोलते हे क्रिएशन

क्या बात क्या बात !!!!

स्वीत स्वाति's picture

19 Nov 2014 - 10:38 am | स्वीत स्वाति

खरेच खुप सुन्दर

बबन ताम्बे's picture

19 Nov 2014 - 11:06 am | बबन ताम्बे

पिक्सारा पण वापरून पहा एकदा.

आता काही नवे , काही नवीन नाव घेऊन आलेले जुने यान्च्या साठी हे पहा !

फुटूवाला's picture

1 Sep 2019 - 9:26 am | फुटूवाला

मी जवळपास १२ वर्षांपासून फोटोशॉप वापरतो. दुकानदारीही त्यातच. पण असं काही करणे मला अजिबात शक्य नाहीये. कडक सॅल्यूट. __/\__