९० मिनीटाचा उपवास …

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 11:53 am

ए , " एलिझाबेथ म्हणजे काय रे ?"

ते एका राणीचे नाव आहे !

हो, पण अर्थ काय ?

एलिझाबेथ म्हणजे, टिकाऊ !

टिकाऊ ?

हो , ती खूप वर्ष टिकली ना !!

" दगड ! दगड ! दगड ! दगड ! "
ekadashee

एलिझाबेथ एकादशी या सिनेमातील हा संवाद. अशा अनेक संवादाने, लहान मुलांसहित सर्वांच्या उत्तम अभिनयाने नटलेला, सरळ,सोपा कौटुंबिक सिनेमा " एलिझाबेथ एकादशी" !

एकादशी म्हणले की आठवतात ते वर्षातल्या दोन महत्वाच्या एकादशा . अर्थात पंढरपुरचा विठूराया आणि एकादशीचे अतूट नाते. वर्षातील दोन महत्वाच्या एकादशीपैकी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक गुंफले आहे

ekadashee

सिनिमाच्या सुरवातीची काही मिनिटे " श्रीहरीच्या " सकाळच्या पूजेच्या दृश्याने होते . यावेळेचे पंढरीच्या राजाचे जे दर्शन चित्रीत केले आहे ते केवळ अप्रतीम. अभ्यंग स्नान ते आरती फारतर २-४ मिनिटे पण त्या विठूरायाचे जे दर्शन मिळते ते खरोखरच सुरेख. संपुर्ण सिनेमाचे चित्रीकरण, विषय पंढरपूरशी संबंधीत असूनही हा देवळातील विठोबा सिनेमात दिसतो तो फक्त सुरवातीला. त्यानंतर अगदी शेवटी नेहमीप्रमाणे सिनेमाचा शेवट गोड होतो(चमत्कार होऊन)तो होण्यासाठी दिग्दर्शक परत या विठोबाकडे येत नाही ही मोठी जमेची बाजू . नाहीतर विठूरायाला साकडे घालून, मोठे मोठे संवाद म्हणून चित्रपटाची लांबी १० - १५ मिनिटाने तरी लांबवता येणे सहज शक्य होते . असो

एका गरीब कुटुंबातील आई, आजी, छोटा मुलगा ( ज्ञाना ) त्याची बहिण ( झेंडू उर्फ मुक्ता ) यांचे हे कथानक . घरातल्या घरात मशीनवर कपडे विणून चरितार्थ चालवणारी आई , तिचे हे मशीन कर्जाची परतफेड न केल्याने जप्त होते. पैसे भरण्याची अंतीम तारिख दिल्यानंतर , आणि किती पैसे भरल्यावर हे मशीन परत मिळेल हे सांगितल्यावर संपुर्ण कुटूंब कसा प्रयत्न करते याचे हे कथानक ..

ekadasheee

ज्ञाना, झेंडू , गण्या आणी इतर मित्र यांचा सहजसुंदर अभिनय, प्रासंगिक विनोद , उत्तम संवादलेखन हा या सिनेमाचा आत्मा

हा सिनेमा मला एका दृष्टीने वेगळा वाटला ते म्हणजे श्रध्दा आणि शास्त्र यांचा घातलेला योग्य मेळ. पांडूरंगा बरोबरच संत न्यूटन यांचे विचार ही इथे दिले गेले आहेत. सिनेमात अवास्तावी धार्मिकता , अंधश्रध्दा दाखवणे सहज शक्य होते पण ते टाळण्यात यश आले आहे आणि ही मोठी जमेची बाजू . प्रामाणिक प्रयत्न,विश्वास आणि कृती तुम्हाला अपेक्षित यश देते हे इथे मुलाना समजून देण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे

ekad

ek


" एलिझाबेथ एकादशी " च्या संपूर्ण टीम चे त्यासाठी अभिनंदन

मराठी सिनेमाला संजीवनी देण्यासाठी हा सिनेमा पहिला ' श्वास ' ठरो या शुभेच्छा

आजकाल सिनेमा संपल्यानंतर एक ( प्रसिध्द ) गाणे दाखवणे ही हिंदी सिनेमाची पध्दत याही सिनेमात आहे . तेंव्हा पिक्चर संपला रे संपला की लगेच जाऊ नका. ज्ञाना , गण्या आणि झेंडु ने या गाण्यातही धमाल केली आहे ती बघूनच जावा ।
al

हा ९० मिनीटाचा एकादशीचा उपवास तुम्हाला नक्कीच २१ एकादशीचे पुण्य देईल ही आशा

आता परीक्षण म्हणले की १० पैकी या सिनेमाला किती गुण द्याल ? असा प्रश्ण आला
मी तरी १० पैकी ८ गुण देईन
२ मार्क का काटले? माहित नाही पण मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत ना भौ …।

परीक्षक ) अमोल केळकर
सी ५, ३३, ०:२, सेक्टर ५
सीबीडी बेलापूर , नवी मुंबई
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com

aa

कलामाध्यमवेध

प्रतिक्रिया

एस's picture

17 Nov 2014 - 11:58 am | एस

थोडक्यात, पण मस्त परीक्षण. ९० सेकंदात संपलेसुद्धा वाचून!

चित्रपट पाहण्यात येईलच.

बोका-ए-आझम's picture

17 Nov 2014 - 12:19 pm | बोका-ए-आझम

पूर्णपणे सहमत! पण मी ९ गुण देईन! मला आवडलेली गोष्ट म्हणजे पटकथा. एकदम बांधेसूद असल्यामुळे चित्रपट कुठेही इकडेतिकडे हलत नाही. हरिश्चंद्राच्या फॅक्टरीनंतर परेश मोकाशींनि परत एकदा सिक्सर मारलेली आहे!

स्पंदना's picture

17 Nov 2014 - 12:32 pm | स्पंदना

बांधेसूद!!!

आता नेटवर येण्याची वाट पहाणे आले...
सुरेख अन सुबक परिक्षण!!

सस्नेह's picture

17 Nov 2014 - 6:51 pm | सस्नेह

सुरेख अन सुबक परिक्षण!!

असेच म्हणते
चांगल्या मराठी चित्रपटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसते !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Nov 2014 - 5:09 am | निनाद मुक्काम प...

च्यायला
नेटवर अनिवासी लोकांसाठी खास प्रदर्शित का नाही करत
पैसे भरून पहिल्याच आठवड्यात पाहू की

ह्या चित्रपटात ज्यांनी आजी ची भुमिका केलीय त्या वनमाला किणीकर आम्हाला ९-१० वी इंग्रजी शिकवायला होत्या. :)
पिच्चर बघायला अजून गेलो नाहिये पण जायची इच्छा जरूर आहे.

थोडक्यात पण छान परिक्षण..

चांगाला आहे चित्रपट मी पाहिलाय.तुम्हीपण पहा.

विटेकर's picture

17 Nov 2014 - 2:34 pm | विटेकर

आवडले !

एस's picture

17 Nov 2014 - 4:37 pm | एस

'एलिझाबेथ एकादशी' या नावाचे सुलेखन किती सूचक आहे!

प्रचेतस's picture

17 Nov 2014 - 10:40 pm | प्रचेतस

अगदी खरेच.

नावावरून सिनेमा पहायची फार उत्सुकता लागली आहे . नक्की पाहीन !!

प्रसाद१९७१'s picture

17 Nov 2014 - 6:25 pm | प्रसाद१९७१

तुमच्या रात्री अपरात्री अनोळखी प्रदेशातुन ( तेही नक्षलवादी ) प्रवास करण्याच्या धाडसाचे कौतुक करु का टीका करु हे कळत नाही.

तुम्ही वर्णन मात्र चांगले लिहीले आहे. वाचायला मजा आली. बरोबर, फोटो आणी नकाशे असते तर जास्त मजा येइल.

आदूबाळ's picture

17 Nov 2014 - 6:35 pm | आदूबाळ

पोस्टकोड चुकलं काय हो? ;)

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2014 - 9:32 pm | स्वाती दिनेश

परीक्षण वाचून उत्सुकता वाढली आहे, कधी बघता येईल याची वाट पाहणे आले..
स्वाती

प्रचेतस's picture

17 Nov 2014 - 10:41 pm | प्रचेतस

परिक्षण आवडले.

मुक्त विहारि's picture

18 Nov 2014 - 3:15 am | मुक्त विहारि

+ १

पाषाणभेद's picture

18 Nov 2014 - 4:26 am | पाषाणभेद

चित्रपट पाहिला. उत्तम आहे.
एक समजले नाही. मफलर घातलेल्या माणसाकडे त्या महागड्या बांगड्यांचे खोके कसे जाते? (दंगल होते तेव्हा जाते हे मान्य पण मग जाते कसे? म्हणजे तो माणूस जाणूनबुजून उचलेल तरच त्याकडे जावू शकते, अन्यथा नाही.)

नंतर त्याच माणसाला उपरती होवून तो बांगड्या द्यायला येतो.

अन त्या आधी तोच माणूस २० रूपयांच्या बांगड्या घेण्यासाठी पैसे देतो पण बांगड्या नेत नाही. हे काय आहे? त्याची मुलगी आता हयात नसते काय?

या दोन लिंक लागत नाही राव.

बाकी चित्रपट सर्व अंगाने छान आहे. कृपया पायरेटड किंवा सीडीवर न बघता थिएटरमध्येच बघा. मजा येते.

थॉर माणूस's picture

18 Nov 2014 - 9:53 am | थॉर माणूस

अप्रतिम वगैरे नाही, पण नक्कीच एक चांगला चित्रपट. मुख्य म्हणजे कुठेही अती मेलोड्रामा, मोनोलॉग्ज किंवा जड जड संवाद वगैरे नाहीत. सध्या उपलब्ध असलेले चित्रपटांचे पर्याय बघता एकादशी पहाणे केव्हाही चांगले. ;)

स्पॉयलर अलर्ट...
त्याने दोनशेचा बॉक्स घेतलेला असतो पण पहिल्यावेळप्रमाणेच यावेळेससुद्धा दुकानावर अचानक गर्दी वाढते आणि त्या गोंधळात दोनशे ऐवजी तीन हजारचा बॉक्स त्या माणसाकडे जातो. त्याच वेळेस दुसरे जोडपे सुद्धा एक बॉक्स खरेदी करते आणि एक अजून माणूस काही बांगड्या घेतो. तितक्यात दंगा सुद्धा सुरू होतो ज्यात दुकानाचे नुकसान होते आणि तीन हजारचा एक बॉक्स गायब झाल्याचे माऊलीच्या लक्षात येते. अर्थात तो शेवटच्या दोन लोकांकडेच बॉक्स गेल्याचा अंदाज बांधतो आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो.
असं मला तरी वाटलं...

>>>त्याची मुलगी आता हयात नसते काय?
चित्रपट हा प्रश्न सोडवत नाही, तो तितकासा महत्वाचा वाटला नसावा बहुतेक. कारण त्याने मुळ कथेत तशी काही value addition होत नव्हती. बहुतेक त्याची मुलगी हयात नसावी किंवा वारीत हरवली असावी (म्हणून तो वारी ला येतो?) मला वाटतं त्या पात्राचे काम केवळ योगायोग दाखवण्याचं आहे.

मदनबाण's picture

18 Nov 2014 - 9:03 am | मदनबाण

परिक्षण आवडले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

सिरुसेरि's picture

18 Nov 2014 - 12:02 pm | सिरुसेरि

परेश मोकाशी यांचा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमाही खुप चांगला होता . तसेच त्यांचे "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी" , "संगीत लग्नकल्लोळ" हे नाट्य प्रयोगही कल्पक आणी मजेदार होते .

नाखु's picture

18 Nov 2014 - 12:31 pm | नाखु

(आटोपशीर) परिक्षण
पाहण्यात येइल.
तसाही लेकीने लकडा लावलाय मागे.

स्वीत स्वाति's picture

18 Nov 2014 - 2:01 pm | स्वीत स्वाति

तेच म्हणते नेमके आणि आटोपशीर परीक्षण
…आनि मराठी सिनेमा तर पाहायला कधीही तयार ...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

18 Nov 2014 - 4:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अध्यात्म आणी शास्त्र याची सांगड घालणारी वाक्यं फार छान आहेत.विशेषतः शेवटी.मुलांच्या वडिलांचे शास्त्रप्रेम मुलापर्यंत छान झिरपले आहे.त्याला अध्यात्माची जोड मिळुन मोठी होणारी मुले समाजातील उपेक्षीत गणिकेच्या मुलातही सहज मिसळताना बरे वाटते.मला फार भावला हा चित्रपट.

अमोल केळकर's picture

18 Nov 2014 - 5:34 pm | अमोल केळकर

एकदम सहमत...

अमोल केळकर

HJS demands withdrawal of ‘Elizabeth Ekadashi’ from upcoming IFFI-Goa screenings

कुणाच्या धार्मिक भावना कधी आणि कशामुळे तथाकथित रूपाने दुखवल्या जातील ह्याचा नेम नाही राहिलेला आजकाल!

आसुड's picture

2 Dec 2014 - 5:31 pm | आसुड

मस्त हो अमोलभौ ....थेट्रात जाऊन शिनेमा बघायची ईच्छा निर्माण केलीत तुम्हि....