आल्प्सच्या वळणांवर - भाग ८ - आरं नदी आणि ग्रिंडेलवाल्ड (अंतिम)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
9 Nov 2014 - 7:28 pm

आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७

इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता. त्यामुळे फार लांबवरचा प्रवास नको असा विचार करून पहिल्या स्थानाकडे निघालो. हे होते, ट्रुमेलबाख फॉल्स (Trummelbach Falls). लाउटरब्रुनेन व्हॅली ही एकूण ७२ धबधब्यांची व्हॅली म्हणून ओळखली जाते. याच भागातील आल्प्स मधील आयगर, युंगफ़्राउ आणि म्योंश या शिखरांमधून वाहत येणारे पाणी वेगवेगळ्या टप्प्यात, मोठमोठ्या खडकांवर आदळत आपला मार्ग काढत पुढे नदीच्या पात्रात बदलते, साधारण २०००० लिटर पाणी दर सेकंदाला खाली कोसळते त्याचे कोसळण्याचे १० टप्पे म्हणजे हे १० धबधबे. आणि हे सगळे जवळून बघता यावे म्हणून काही बोगदे, पायऱ्या, रस्ते याद्वारे १९१३ सालापासून केलेली सोय ही स्विस पर्यटनाची कृपा. हिमनदीतून तयार झालेले हे जगातील एकमेव धबधबेआहेत जे पर्यटकांसाठी खुले आहेत. आम्ही राहत असलेल्या गावातून इथे यायला केवळ अर्धा तास लागला. फार गर्दीची अशी वेळ नसल्याने मोजकेच पर्यटक दिसत होते.

http://3.bp.blogspot.com/-b8htUWdS5SM/VF8dI4PTEpI/AAAAAAAAD-M/w3of_oiVi2g/s1600/DSC_0939.JPG

http://3.bp.blogspot.com/-ugmotEFHGEA/VF8dGr97FQI/AAAAAAAAD-E/vpkFLbKm7JY/s1600/DSC_0940.JPG

काही अंतरापर्यंत जाण्यासाठी एक लिफ्ट आहे अन्यथा पायर्यांनी किंवा पादचारी रस्त्याने वर चढत जाता येतं. जाताना लिफ्टने जाऊन मग पायी खाली उतरू असे ठरवून आम्ही लिफ्ट साठी थांबलो. पाच मिनिटातच लिफ्टने पाचव्या धबधब्याजवळ उतरवले आणि पाण्याच्या कोसळण्याचा महाप्रचंड आवाज येऊ लागला. पुढे पायर्यांनी आणि अंधार्या पायवाटांवरुन चालत आधी दहाव्या टप्प्यावर गेलो आणि मग प्रत्येक ठिकाणी थांबत फोटो काढत उतरायला सुरुवात केली. पाण्याचा आवाज छोट्याच्या अरुंद जागेतून पडताना अजूनच घुमत होता आणि वर पहिले तर कपारीतून आकाश दिसत होते. रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून सोडलेले प्रकाशझोत या सौंदर्यात अजूनच भर घालत होते.

http://4.bp.blogspot.com/-YtHVzzX_XIc/VF8fBlyQz7I/AAAAAAAAD-g/IIy6ZJcPo0s/s1600/DSC_0946.JPG

http://2.bp.blogspot.com/-dvK9BgCF5vg/VF8fCbwmwEI/AAAAAAAAD-o/x0UPLKFo8t4/s1600/DSC_0962.JPG

http://2.bp.blogspot.com/-It8-M0Wninc/VF8fLr3fEZI/AAAAAAAAD-4/xlA-Xrj5EYU/s1600/DSC_0967.JPG

http://1.bp.blogspot.com/-ZibkmTVgBTc/VF8fHsbBYxI/AAAAAAAAD-w/d93Iry9Ywos/s1600/DSC_0965.JPG

तासभर इथे थांबून पुढे निघालो ते आरेनश्लुष्ट (Aareschlucht) या एका घळीच्या (गॉर्ज) भेटीला. आरं ही उपनदी एकूण २९५ किमीचा प्रवास करते. या उपनदीचा सगळा प्रवास हा स्वित्झर्लंड मधूनच होतो. पुढे ही हाय ऱ्हाईन (High Rhein) म्हणजेच ऱ्हाईन नदी आणि लेक कॉन्स्टान्सच्या परिसरात जाउन ऱ्हाईन नदीत एकरूप होते. या प्रवासात पर्वतातील मोठ्या खडकांमधून वाहत असताना १.४ किमी लांब आणि २०० मीटर रुंद अशी एक घळ तयार झालेली आहे. इथे जाण्यासाठी सुद्धा बोगदे आणि पादचारी मार्ग बांधला आहे जेथून सहजपणे ही गॉर्ज बघता येते. दुपार होऊन गेली होती त्यामुळे पहिले जेवण केले. आणि मग या गुहा, बोगदे यातल्या रस्त्याने पुढे निघालो.

http://3.bp.blogspot.com/-JYmQoH_9LQw/VF9Hmfhc1LI/AAAAAAAAD_U/dm0oDaCQhaw/s1600/DSC_0018.JPG

http://4.bp.blogspot.com/-FjQNihoWwQU/VF9HeasLcpI/AAAAAAAAD_I/khkg5ZFe9Zo/s1600/DSC_0021.JPG

http://1.bp.blogspot.com/-MUpezdz3k7E/VF9Hlzz4xLI/AAAAAAAAD_Q/weyKmV6XmuA/s1600/DSC_0024.JPG

http://3.bp.blogspot.com/-ILtbHDBklv0/VF9H8KDTZLI/AAAAAAAAD_o/zXttBPlvnho/s1600/DSC_0027.JPG

http://2.bp.blogspot.com/-5m7driUDuEk/VF9IAHAla4I/AAAAAAAAD_w/MS4lIJYY2ls/s1600/DSC_0037.JPG

http://3.bp.blogspot.com/-kyKRErefzlo/VF9IE2nJHGI/AAAAAAAAD_4/MqS9hEs2Xhw/s1600/DSC_0045.JPG

एक वेगळाच अनुभव घेऊन मग जवळच असलेले राइशेनबाख फॉल्स (Reischenbach falls) कडे प्रयाण केले. शेरलॉक होम्स ने अजरामर केलेले हे ठिकाण. इथेही एक ट्रेन होती ज्याने वर जायचे होते.

http://4.bp.blogspot.com/-IWdboQG7dfI/VF9I-zhRMeI/AAAAAAAAEAE/Lj4xLAZdyMY/s1600/DSC_0012.JPG

http://3.bp.blogspot.com/-e4QCjkfkCHc/VF9KeATwTDI/AAAAAAAAEAg/eRrN2O8zG9M/s1600/DSC_0005.JPG

http://3.bp.blogspot.com/-GzNTVowtRzY/VF9Kaey5D_I/AAAAAAAAEAY/AVwJmQQqUuk/s1600/DSC_0998.JPG

विशेष अगदी खास जाऊन बघण्यासारखे असे काही हे ठिकाण वाटले नाही. तेवढे चालायचेच. दिवसभराचे कार्यक्रम संपले होते त्यामुळे हॉटेलवर परतलो.

पुढचा दिवस आलेच आणि परिसरात अविस्मरणीय ठरला आणि फिरतीचा शेवटचा दिवस उजाडला.
दुसऱ्या दिवशी परत जायचे होते. त्यामुळे एकीकडे सहल संपली अशा तर एकीकडे घरी परतायची ओढ अशा मिश्र भावना होत्या. या दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम नव्हता. त्यामुळे आरामात आवरून निघालो. पहिले स्थान होते ग्रिंडेलवाल्ड (Grindelwald). या भागातले असेच एक प्रसिद्ध गाव. निघताना पार्किंगच्या अनेक जागा बघून ठेवल्या होत्या. पण एकाही ठिकाणी जागा मिळाली नाही इतकी गर्दी होती. तीन चार वेळा प्रयत्न करूनही शेवटी ग्रुंड (Grund) हे खालच्या डोंगरावर असलेले हे गाव गाठले आणि तिथे गाडी लावली. इथून पुढे मग ट्रेनने ग्रिंडेलवाल्डला आलो. या गावात फिरताना असे दिसले की इतर ठिकाणांच्या तुलनेत खूप जास्त व्यापारीकरण झाले आहे. सगळीकडे हॉटेल्स आणि सुवेनिअर शॉप्स.

http://2.bp.blogspot.com/-ekDSK_K8GbM/VF9LLGuwfiI/AAAAAAAAEAo/43pj2gBw6aM/s1600/DSC_0568.JPG

आमच्या डोक्यात असलेले ठिकाण होते बोर्ट (Bort) ज्यासाठी ग्रिंडेलवाल्डहून गोंडोला (Gondola) ने वर जायचे होते. इथूनच अजून वर गेलो असतो तर बचाल्पझे (Bachalpsee) एक पर्वतातला तलाव आहे जो खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्यासाठी अजून वर जाउन नंतर दीड ते दोन तासांचा ट्रेक करावा लागतो. शिवाय उन्हाळ्याचा शेवट असल्याने तिथे पाणी कितपत असेल याचाही अंदाज नव्हता. आणि हातातला वेळ आणि आलेचच्या भेटीनंतर प्रवासाने आलेला थकवा यामुळे हा बेत आम्ही रद्द केला. केवळ माहितीसाठी हे एक चित्र आंतरजालावरून साभार.

http://2.bp.blogspot.com/-sXOVT5KLd34/VF9XOyhod1I/AAAAAAAAEA4/t3EDiXypiAk/s1600/800px-Bachalpsee_reflection.jpg

तिकीट काढून वर बोर्टला पोहोचलो आणि कडकडून भूक लागली होती म्हणून जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाउन पहिले एक टेबल धरले. मागच्या आठ दिवसातले सगळ्यात चविष्ट आणि उत्तम जेवण इथे मिळाले. सूर्य डोक्यावर तळपत होता. आजूबाजूची हिरवळ, गायी, घरे, फुले हे सगळे आता शेवटचा दिवस असल्याने मनभरून बघत या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि तृप्त होऊन बाहेर पडलो.

http://2.bp.blogspot.com/-Up-ArFZU7xk/VF9cD-pBZcI/AAAAAAAAEBI/bdzsMTlFcIk/s1600/food.JPG

खाली उतरताना इथे खास मिळणाऱ्या स्कूटर बाइक (Trottibike) भाड्याने घेऊन उतरायचे असे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे सायकली आणि हेल्मेट घेऊन निघालो. हे एक चित्र आन्जावरून साभार.

http://2.bp.blogspot.com/-BOHNnW8NHbo/VF9cOYfXH3I/AAAAAAAAEBQ/PEnbXHof8mg/s1600/resized_650x365_461047.jpg

आणि या आमच्या:

http://3.bp.blogspot.com/-GMUHB4ZVJyw/VF9j-DlAGhI/AAAAAAAAECw/400tqzTkqS0/s1600/DSC_0689.JPG

साधारण ४० मिनिटे लागतात असे सांगितले होते पण वेळ असल्याने दिसणाऱ्या प्रत्येक दृश्याला साठवत आम्ही दीड दोन तासात खाली उतरलो. या बाइक्सवर उभे राहायचे आणि ब्रेकच्या मदतीने उतरायचा वेग नियंत्रित करायचा. हे करताना खूप मजा येत होती. परत लहान होऊन केलेला हा बाईक प्रवास तसाच आनंद देणारा होता. दूरवर दिसणारी पर्वतशिखरे, उंचच उंच झाडी, आजूबाजूची हिरवळ, त्यावर चरणाऱ्या गायी, त्यांच्या घंटांचे आवाज, टुमदार कौलारू घरं, त्यांच्या खिडक्यातून आणि अंगणात डोलणारी फुलं हे बघत बघत, प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढत खाली उतरलो.

http://3.bp.blogspot.com/-P6P1cS_CQik/VF9dMCdZBnI/AAAAAAAAEBw/t6_2htQp1HU/s1600/DSC_0591.JPG

http://4.bp.blogspot.com/-TyMxF1J1UCY/VF9klCDSRGI/AAAAAAAAEDA/PHI2aODiYsM/s1600/DSC_0690.JPG

http://4.bp.blogspot.com/-yZkd00IXjIw/VF9k53ebuZI/AAAAAAAAEDQ/hw_tHOQUtw4/s1600/DSC_0698.JPG

http://1.bp.blogspot.com/-YD-pRDzVyhY/VF9k_veYF_I/AAAAAAAAEDc/vmhTkGFLwvc/s1600/DSC_0701.JPG

http://3.bp.blogspot.com/-P1CnW8oaYVE/VF9k_lOTkXI/AAAAAAAAEDY/LuMQ5T9QfKU/s1600/DSC_0725.JPG

http://4.bp.blogspot.com/-hVswle6PbtY/VF9lOCPvzSI/AAAAAAAAEDw/aekEH6TLUss/s1600/DSC_0756.JPG

खाली येउन सायकल परत दिली आणि घरी परतलो. सामान भरायला सुरुवात केली. संध्याकाळी पैसे घ्यायला आजी येणार होती. त्याप्रमाणे ती आली. थोड्या गप्पा झाल्या. तुम्ही परत या, तुम्हाला आवडले का आमचे हॉटेल, आमचा देश वगैरे बोलणे झाले. पैसे दिले. आम्ही उद्या सकाळी लवकरच निघू तर किली परत घ्यायला तुम्ही याल का असे विचारले असता ती म्हणाली, "नाही मी येणार नाही. तुम्ही किल्ल्या आत ठेवा आणि दार ओढून घ्या, बास." सगळे सामान व्यवस्थित आहे ना वगैरे बघायला ती येईल असे वाटले होते. पण हा आश्चर्याचा धक्का होता. निर्भयपणे असे घर दार ठेवण्याइतकी सुरक्षितता म्हणजेच या देशातील प्रामाणिक लोक आणि देशाच्या उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची साक्ष आहे असे म्हणता येईल का?

अनेक वेळा दोन्ही बाजूनी धन्यवाद देऊन झाले आणि आजी परत गेली. आम्ही या गावाचे एक शेवटचे दर्शन घ्यायला म्हणून बाहेर पडणार तर आजी परत आली. हातात एक मोट्ठे चॉकलेट होते आणि "थांबा थांबा, मी हे आणलेय तुमच्यासाठी" म्हणत तिने ते आमच्या हातात दिले आणि प्रेमाने मिठी मारली. "मला तुम्ही खूप आवडलात म्हणून हे माझ्याकडून. मला माझ्या मुलीच्या घरात सगळे शोधल्यावर हेच मिळाले, प्रवासात खा आणि आमची आठवण ठेवा. परत याल तेव्हा आमच्याकडेच या" हे सगळे बोलताना तिला अगदी भरून आलं होतं. एखाद्या अविस्मरणीय सहलीचा शेवट जेव्हा इतक्या हृद्य घटनेने होतो तेव्हा अजुन् वेगळे असे काय हवे. :) भारावलेल्या अवस्थेतच सगळे गाव परत एकदा नजरेत साठवले आणि झोपी गेलो.

सकाळी लवकरच सगळे आवरून सामान गाडीत भरले आणि निघालो. येताना परतीच्या रस्त्यावरच होते म्हणून एका गावात थांबून थुन लेकवर चक्कर मारली.

http://1.bp.blogspot.com/-T0fZYTjRuEg/VF9fjWlKREI/AAAAAAAAECE/eGSTptvlLp8/s1600/DSC_0060.JPG

http://2.bp.blogspot.com/-wk6joVqFbbs/VF9fjYmsPlI/AAAAAAAAECI/LDhQgIOZ_DY/s1600/DSC_0786.JPG

http://1.bp.blogspot.com/-Pw7q5taeMDI/VF9feuZazSI/AAAAAAAAEB8/jEwnJRKIX3k/s1600/DSC_0788.JPG

http://3.bp.blogspot.com/-fq_YUSXHTIA/VF9fsoySdVI/AAAAAAAAECc/59-eQzNCbCg/s1600/DSC_0794.JPG

http://2.bp.blogspot.com/-XOomyetlKl4/VF9fsBtwH6I/AAAAAAAAECU/sdP8ivH49Rk/s1600/DSC_0811.JPG

इथे अधिकृतपणे स्विस सहल संपली होती. 'बिस बाल्ड' म्हणजेच 'पुन्हा लवकरच भेटूया' असा संदेश देणाऱ्या पाट्या वाचताना त्याला अनुमोदन देत परतीच्या रस्त्याला लागलो. गाडी पुन्हा जर्मनीत प्रवेश करून घराच्या रस्त्याला लागली. सहलीचा प्रत्येक क्षण परत परत आठवत घरी पोहोचलो तेव्हा अतीव समाधान होते. दीड महिन्याचे नियोजन सर्थाकी लागले होते. ऑस्ट्रीया आणि इटलीतुन सुरु होत पुढे स्वित्झर्लंड मधील सात दिवस आल्प्स सतत सोबतीला होता. आठ-नऊ दिवस हे आल्प्समधील डोंगर, नद्या, झरे, फुलं, घाट, तलाव, चीज या सगळ्यानी व्यापून टाकले होते. अजून कितीतरी ठिकाणं बघायची राहिली होती. पण जे पाहिले तो अनुभव अद्वितीय होता. काही ठिकाणांचे नेहमीप्रमांचे थोडे अंदाज चुकले तर काही अजूनही परत जाऊयात म्हणून नवीन यादीत टाकले.

युरोपातील हा देश पर्यटनासाठी इतरांच्या तुलनेत एवढा प्रसिद्ध कसा, जर्मनीच्या शेजारीच असलेल्या या देशात नेमके वेगळे काय असेल, स्विसमध्ये एकदा जायलाच हवे असे वाटण्यासारखे इथे नेमके काय आहे, असे अनेक प्रश्न जाताना मनात होते. या आठ दिवसात काय दिसले? या देशाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहेच. पण ते जगासमोर आणण्यासाठी त्यानी पर्यटनावर घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या सगळ्याला उत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. प्रत्येक गावात असलेले पर्यटक मदत केंद्र, डोंगरातून वाट काढत वर शिखरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन्स, हिरवळ, उभारलेले रज्जुमार्ग, इंग्रजीतून उपलब्ध असलेली मदत, हिवाळी खेळांच्या दृष्टीने पोषक वातावरण, हे सगळेच कौतुकास्पद आहे. महायुद्धाच्या काळात आसपासच्या इतर देशांपासून हा देश नेहमीच अलिप्त राहिला हा देखील यांना मिळालेला एक प्रमुख फायदा आहे. उपलब्ध साधन संपत्तेचा केलेला उत्तम उपयोग ठिकठीकाणी दिसून येतो. निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे हे लोक त्यांच्या देशावर असलेले प्रेम प्रत्येक ठिकाणी रोवलेल्या झेंड्यानी दाखवून देतातच, पण त्यांच्या वागणुकीतून त्याची जाणीव जास्त दिसून येते. आम्ही जाण्यापूर्वी आमचा एक सहकर्मचारी म्हणाला होता, "They hate foreigners, but they love tourists". स्विस लोकांकडून जेवढे चांगले अनुभव देखील ऐकले होते तसेच काही रेसिझमचेही ऐकले होते. पण आमचा अनुभव मात्र खूपच चांगला होता. ज्यांच्या घरी राहिलो त्या आजीच्या बाबतीत तर नाहीच, पण इतर ठिकाणीही लोक हसून, आनंदाने मदत करताना दिसले. एकूण स्वित्झर्लंडमधील वास्तव्य प्रचंड आनंददायी होते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा हा देश आहे. जगातील अनेक चित्रपटांमध्ये चित्रीकरणासाठी अव्वल, अनेक पुस्तकातून आलेले वर्णन, अगदी पूर्वीपासून अनेक जगप्रसिद्ध लोकांच्या वास्तव्याने मिळालेली प्रसिद्धी ते आताही कितीतरी सेलिब्रेटी लोकांनी राहण्यासाठी निवडलेले ठिकाण, अनेक लोकांचे पैसे जिथे जगापासून लपवून ठेवले गेले आहेत, स्वच्छतेसाठी असलेली वेगळी ओळख, चीज उत्पादन आणि आल्प्स मधील पर्वतशिखरे, हिरवळ आणि तळी, नद्या आणि झरे, घाट, रस्ते आणि बोगदे अशाच कित्येक रुपातला हा देश आणि या देशाच्या सौंदर्याचे बलस्थान असलेला आल्प्स हा प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतो आणि परत परत यावेसे वाटेल असा अनुभव देऊन जातो. :)
अनेक फोटोंमधुन आणि आता या लेखमालेमधून परत परत हे सगळे क्षण काही प्रमाणात अनुभवता यावेत म्हणून केलेला हा एक प्रयत्न होता. आल्प्सच्या वळणांवरची ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली हे अवश्य सांगा.

समाप्त.

तळटीप:
१. तुम्ही सर्वांनी प्रत्येक भागावर प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केले त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. माझ्या लिखाणात आणि छायाचित्रणात नक्कीच त्रुटी आहेत याची जाणीव आहे. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.
२. संपूर्ण लेखमालेतील काही फोटो मी तर काही नवऱ्याने काढलेत. त्यामुळे फोटो सौजन्य - नवरा आणि अस्मादिक :)
३. लेखमालेत शक्य तिथे मुद्दाम इंग्रजीतून नवे दिलेली आहेत जेणेकरून कुणाला माहिती हवी असल्यास शोधायला सोपे पडेल. तरीही यातील कुठल्याही ठिकाणाविषयी अधिक माहिती हवी असल्यास व्यनि/खरड करू शकता.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

9 Nov 2014 - 8:41 pm | चौकटराजा

ही प्रवास मालिका एक मस्त अनुभव होता. आपण जो ट्रमिलबाख धबधबा पाहिला आहे,हा न पहाता परत येणे हे वेडेपणाचेच एक लक्षण म्हणावे लागेल. इथे पाण्याच्या फवार्‍यावर लाईटस टाकतात. असे त्याच्या तूनळी वरील फिल्म मधे दिसते. आपल्याला असे काही दिसले का? या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. आपल्या या प्रवासातील काही फोटो आपल्याला फोटोची चांगली नजर असल्याचे सांगतेय. आता युरोपातील आणखी एका सहलीसाठी शुभकामना !

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2014 - 12:14 am | मधुरा देशपांडे

>>>आपल्याला असे काही दिसले का?
हो इथे रंगीबेरंगी दिव्यांचे प्रकाशझोत सोडले होते. परंतु ते कॅमेर्‍यात टिपता आले नाहीत.
>>>या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे.
हे माहित नव्हते. धन्यवाद. :)

एस's picture

9 Nov 2014 - 8:56 pm | एस

सफर आवडली. या भागातले फोटो खूपच आवडले. अनेकजण वॉलपेपर म्हणून सेव्ह करून ठेवणार हे नक्की. बादवे, तुम्हां उभयतांचे फोटो का बरं नाही टाकले? आवर्जून टाका आणि लवकरच पुढील सहल येऊ द्यात.

संपुर्ण सफर आम्हा वाचकांनाही घडवुन आणलीत त्याबद्दल धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2014 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

अतिशय सुंदर सहल, प्रवासवर्णन आणि छायाचित्रे !

या देशाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहेच. पण ते जगासमोर आणण्यासाठी त्यानी पर्यटनावर घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या सगळ्याला उत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. प्रत्येक गावात असलेले पर्यटक मदत केंद्र, डोंगरातून वाट काढत वर शिखरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन्स, हिरवळ, उभारलेले रज्जुमार्ग, इंग्रजीतून उपलब्ध असलेली मदत, हिवाळी खेळांच्या दृष्टीने पोषक वातावरण, हे सगळेच कौतुकास्पद आहे.

+१०००. हा देश पाहताना जेव्हा मी हिमालयाशी तुलना करतो तेव्हा मला मी बधितलेला हिमालय जास्त भव्य (हिमालयाचे ८०००+ मीटर विरुद्ध आल्प्सचे ४०००+ मीटर) वाटतो. पण स्विस पर्यटनव्यवस्थेची बरोबरी करणारा जगात इतर कोणताही देश असेल असे वाटत नाही. तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे.

आणि म्हणूनच तुमच्या म्हणण्याला...

एकूण स्वित्झर्लंडमधील वास्तव्य प्रचंड आनंददायी होते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा हा देश आहे.

अजून +१०००.

मस्त लेखमाला ! स्वित्झरलंडची घरबसल्या एक सुखद सफर झाली. मुख्य म्हणजे तुम्ही नेहमीच्या प्रसिद्ध चोखाळलेल्या जागा आणि मार्ग सोडून स्वित्झरलंडच्या अंतरंगात डोकावून आलात ते जास्त आवडले.

पुलेप्र !

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2014 - 12:20 am | मधुरा देशपांडे

>>>तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे.
अगदी अगदी. शिल्थोर्नहुन समोरच्या युंगफ्राऊ, म्योन्श कडे बघत असताना अगदी हेच डोक्यात आले होते की याच्या दुप्पट उंचीवरचा हिमालय किती भव्य असेल. युरोपातही ऑस्ट्रीया आणि इटलीतील काही भागातला आल्प्सचा परिसर हा एवढाच किंवा काही ठिकाणी याहुनही सुंदर आहे असेही वाचुन/ऐकुन आहे. ऑस्ट्रीयन आल्प्समध्ये केलेल्या एका छोट्याशा सहलीदरम्यान हे जाणवलेही. पण पर्यटन विकास, मार्केटिंग आणि व्यवस्थापन यात स्विस बाजी मारतो आणि प्रमुख आकर्षण ठरतो.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Nov 2014 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! :clapping:

*HAPPY*

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2014 - 12:21 am | मधुरा देशपांडे

स्वॅप्स, विलासराव, अत्रुप्त आत्मा - अनेक आभार!! :)

स्पंदना's picture

10 Nov 2014 - 7:25 am | स्पंदना

शेवटचा उहापोह आवडला.
अतिशय सुंदर फोटोज अन तितकीच सुरेख लेखन शैली!!
मुख्य म्हणजे फोटोवरच बारीक वॉटरमार्किंग आवडल.

सौंदाळा's picture

10 Nov 2014 - 9:44 am | सौंदाळा

अप्रतिम लेखमाला.
सुंदर वर्णन आणि झक्कास फोटो.
पुलेशु

या शेवटच्या भागातील आजीबाईंचा हृद्य निरोप घेणं, आणि अखेरीस तुम्ही केलेलं या देशाच्या 'आदर्श पर्यटन व्यवस्थापनाचं' विश्लेषण खासच! वाचनखूण केलेली आहेच.

उदय के'सागर's picture

10 Nov 2014 - 4:04 pm | उदय के'सागर

व्वा, सुंदर वर्णन, फोटोज आणि लिखाण. हे आप्ल्सचं प्रवासवर्णन संपूच नये असं वाटत होतं :)

मदनबाण's picture

10 Nov 2014 - 4:29 pm | मदनबाण

लेखमाला आवडली. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2014 - 4:53 pm | दिपक.कुवेत

तिच्या वर्णना/फोटोसकट प्रचंड आवडली. वर एक्का साहेब म्हणतात त्या प्रमाणे स्वीसचं जर वेगळ्या अँगल ने दर्शन घडलं. त्या आजीबाईंचा फोटो आहे का? असल्यास जरुर पोस्ट कर. बघुया तरी स्वीस आजी कशी दिसते ते!

सस्नेह's picture

10 Nov 2014 - 5:02 pm | सस्नेह

अन फोटो तर डोळ्याचे पारणे फेडणारे !
संपूर्ण मालिका अत्यंत नयनरम्य झाली आहे.

संपूर्ण लेखमाला अतिशय सुंदर मधुरा !!!
खूप ओघवतं लिहिलं आहेस. फोटो पाहून तर डोळे निवले !!!!

आता पुढची सफर ?

कसली अप्रतिम छायाचित्रे आलीयेत, एक सो एक
फ्रेमिंग पण खूप छान टिपले आहे तुम्ही

जबराट

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2014 - 7:49 pm | मधुरा देशपांडे

अपर्णाताई, सौंदाळा, बहुगुणी, अधाशी उदय, मदनबाण, दिपक, स्नेहाताई, मितानतै, स्पा, सर्वांचे आभार. :)
दिपक, फोटो नाहीये आजीचा. :(

संजय क्षीरसागर's picture

11 Nov 2014 - 12:43 am | संजय क्षीरसागर

साधीशी पण तरीही उत्कंठावर्धक लेखनशैली यामुळे संपूर्ण लेखमाला सुरेख झाली आहे. मनःपूर्वक आभार!

अर्धवटराव's picture

11 Nov 2014 - 2:16 am | अर्धवटराव

लाजवाब प्रवासवर्णन. पर्यटनस्थळं तर उत्तमोत्तम आहेतच, पण ते सर्व वर्णन करण्याची शैली, फोटो, सर्वकाहि झकास.

मी अधुन मधुन मितान आणि एक्कासाहेबांची प्रवासवर्णनं वाचत असतो. मस्त रिफ्रेशींग वाटतं. त्यात आणखी एक भर पडली आता. धन्यवाद.

अनन्त अवधुत's picture

11 Nov 2014 - 3:41 am | अनन्त अवधुत

छान झाला प्रवास. तुमच्या सोबत आमची पण सहल घडवली.

वेल्लाभट's picture

11 Nov 2014 - 11:48 am | वेल्लाभट

सुपर्ब फोटोज. सुपर्ब वर्णन. सहल घडवलीत सगळ्यांना. या भागातला धबधबा ए१ !
अनेक अनेक आभार एवढे कष्ट घेऊन हे आठही भाग लिहील्याबद्दल. तुम्हाला आणि तुमच्या नव-याला फोटोग्राफीबद्दल थंब्स अप.

बर, आता पुढची ट्रीप करा कुठेतरी अशीच. म्हणजे काय, आम्हाला पुन्हा एक लेखमाला मस्तपैकी अनुभवायला मिळेल ;):P

सविता००१'s picture

11 Nov 2014 - 2:38 pm | सविता००१

माझी पण ट्रीप झाली हे सगळं वाचताना; इतकं सुरेख लिहिलं आहेस. मस्त. फोटो पण झकास!

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2014 - 4:38 pm | मधुरा देशपांडे

संजय क्षीरसागर, अर्धवटराव, अनन्त अवधुत, वेल्लाभट, सविता सर्वांचे मनःपूर्वक आभार!

सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो .. खुप दिवसांनी आलोय येथे

सुरेख सफर घडवलीस मधुरा! आता तिकडे जायला नको याचाच काय तो आनंद!

मिसळ's picture

12 Nov 2014 - 9:39 pm | मिसळ

सर्व भाग आवडले.

सुरेख लेखमाला मधुरा! आणि ओघवतं वर्णन.
मी शेवटुन पाचवा फोटो फार आवडला असं म्हणणार होते, पण परत वरचे फोटो (आणि आधीच्या भागातलेही) फोटो पाहील्यावर खूपच फोटो या कॅटेगिरीत जातील.
स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना? आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना :) ?

मधुरा देशपांडे's picture

13 Nov 2014 - 1:09 am | मधुरा देशपांडे

रेवाक्का, मिसळ, सखी धन्यवाद!
@रेवाक्का,
आता तिकडे जायला नको याचाच काय तो आनंद!
उलट आता इथे जायलाच हसे असे म्हण. नियोजनात मदतीला मी आहेच. :)
@सखी,
स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना?
स्कूटर बाइक वर बसायला नाहीच. आणि उभे राहायला पण अगदी पावलं मावतील एवढीच जागा.
आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना?
असतात ना. ही स्कूटर बाइकची सोय या एकाच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे सहसा कुणी सामान आणत नाही. इतरत्र सगळे मोठमोठाल्या बॅगा घेऊन दिसतात. आमच्यापण लहान सॅक होत्या पण स्कुटर बाईकवर त्याचा काही त्रास जाणवला नाही. :)

मिसळपाववरचे आणखी एक उत्कृष्ट लेखमाला.
नेहमीप्रमाणंच सुंदर फोटो. ह्या लेखातलं लिखाण विशेष आवडलं ह्या इतरांच्या मताशी सहमत.

मधुरा देशपांडे's picture

19 Nov 2014 - 11:49 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद. :)

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2014 - 6:11 pm | स्वाती दिनेश

लेखमाला छान झाली आहे, आवडली..
स्वाती

पिलीयन रायडर's picture

21 Nov 2014 - 9:18 am | पिलीयन रायडर

अप्रतिम मधुरा!!! फोटो फार फार सुंदर आहेत.. लेखमालासुद्धा खुप ओघवती आणि देखणी झाली आहे!!
खुप आवडली!

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2014 - 10:39 am | जयंत कुलकर्णी

मस्तच ! आलोच मी.......:-)

संपुर्ण प्रवासवर्णन आज वाचुन काढले..अतिशय सुंदर देश..सुंदर अनुभव..लिखानाची ओघवतीशैली .. प्रवास चित्रे.. निसर्ग.. या सर्वातुन पुन्हा बाहेर येवुच नये असे वाटते आहे..

मला कोठे गेले की असे वाटते आपण येतेह राहत असतो तरी किती मजा आली असती.,. असेच येतेह न जाता ही वाटुन गेले.. जग किती सुंदर आहे... निसर्गाचे कितीतरी रंगांची उधळण आपण पाहण्याचे राहिलो आहे हे ही वाटले..

परदेश वारी करण्याचा कधे योग आला तर आधी नॉर्वे ठरवला होता आणि हा ही देश लक्षात राहिन..

मनापासुन धन्यवाद.. वाचनखुण साठवलेली नसेल असा कोणताही वाचक नसेल या लेखमालेचा.

मधुरा देशपांडे's picture

1 May 2015 - 12:15 am | मधुरा देशपांडे

भरभरुन कौतुका करिता धन्यवाद गणेशा!!