दर्शनता!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Nov 2014 - 10:54 pm

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी.

सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.

कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!

काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!

काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी,
कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी.

धडा कधी हा संपत नाही कैसे मजला मी सांगू???
समजो तेंव्हा तसे बापडे चला आज येथे थांबू. :)
=================================
अतृप्त..

शांतरसकविता

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

6 Nov 2014 - 3:06 am | खटपट्या

चांगलीय !! आवडली !!

स्पंदना's picture

6 Nov 2014 - 4:03 am | स्पंदना

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.

धन्य!! अगदी असेच म्हणेन.

पाषाणभेद's picture

6 Nov 2014 - 7:47 am | पाषाणभेद

वा गुरूजी आज चांगलीच मारलीय तुम्ही मजल. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2014 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो पा.भे. :)

प्रचेतस's picture

6 Nov 2014 - 8:50 am | प्रचेतस

सुरेख कविता ओ गुर्जी.

नाखु's picture

6 Nov 2014 - 8:53 am | नाखु

विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.

मिसळपाव धोरण मध्ये ठळक अक्षरात लावावे म्हणजे "ट्"ला "ट" जिलब्यांपासून मिपाकर आणि जिल्बी कवीही वाचतील.

मूळ अवांतर.
बुवांचे स"कस" काव्या बद्दल अभिनंदन.

बॅटमॅन's picture

7 Nov 2014 - 2:57 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो.

एक नंबर ओ आत्मूस.

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Nov 2014 - 9:05 am | माम्लेदारचा पन्खा

पान खाये बुवा हमारो....सांवली सूरतिया, होट लाल लाल..... ;-)

विवेकपटाईत's picture

6 Nov 2014 - 9:15 am | विवेकपटाईत

दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी.

आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2014 - 9:17 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो पा.भे. :)

सगळीकडे पा भे? आँ??

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2014 - 10:44 am | अत्रुप्त आत्मा

गोंधळाचे राजकारण!

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. :)

स्पा's picture

6 Nov 2014 - 1:08 pm | स्पा

तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये

=)) बरीच बरीये

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2014 - 1:32 pm | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या नेहमीच्या धाटणीच्या कवितांपेक्षा बरीये. >>> अगदी बरोब्बर! आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय! :)

>>आपल्या प्रतिसादावरूनंही तेच सिद्ध होतय!

बर्‍याला बरंच म्हणतो हो, 'चांगल्या' कविता, 'चांगल्या' पाककृती यावरचे प्रतिसाद तुमच्या नजरेतून निसटलेले दिसतायेत. तेवढंच कशाला, तुमच्या भावविश्वाच्या धाग्यावरचेही प्रतिसाद नजरेखालून घातलेत तर असं सिद्ध करत बसायची वेळ यायची नाही पुढल्या वेळी !!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2014 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

अपेक्षित !

.
.
.
.
.
.
वाह्व्वा!
.
.
.
.
.
धन्यवाद!

मदनबाण's picture

6 Nov 2014 - 11:17 am | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik

अजया's picture

6 Nov 2014 - 1:53 pm | अजया

आवडली कविता!

psajid's picture

6 Nov 2014 - 2:37 pm | psajid

खूप छान कविता ! आवडली एकदम !

सतिश गावडे's picture

6 Nov 2014 - 9:07 pm | सतिश गावडे

सुंदर !!!!

मुक्त विहारि's picture

7 Nov 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि

मस्त..

सुर्या गार्डी's picture

7 Nov 2014 - 11:41 pm | सुर्या गार्डी

झक्कास ।।।

पैसा's picture

8 Nov 2014 - 11:24 am | पैसा

कविता आवडली. मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले. दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2014 - 11:40 am | अत्रुप्त आत्मा

@ मात्र दर्शनता या शब्दाशी जरा अडखळलले.
दर्शनीयता, दर्शनीय, दृश्यात्मकता, दृश्य असे काही म्हणायचे आहे का? >>> नाही..! सदर काव्यातल्या पहिल्या ओळीचा थोडा आधार घेतो आणि सांगतो.

@दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, >>> दर्शनता ..,म्हणजे मी माझ्या नजरेनी एखाद्या गोष्टीकडे/विषयाकडे..(सदर विषयाच्या अनुषंगानी पहायचं झालं तर..मला उमगलेल्या काव्य..या विषयाकडे..) कसा पाहतो??? ती दृष्टी..म्हणजे दर्शनता! :)

क्या बात .. क्या बात .. क्या बात.

सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.

काव्य आवडले खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प