"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते. चार क्षण विसावा मिळतो.
विसाव्याचे हे क्षण चिरंतन स्मरणात रहावेत म्हणून टिपले आहेत मी.
ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.
प्रतिक्रिया
30 Oct 2008 - 12:17 pm | अनिल हटेला
क्या बात है !!!
कुठल्या ठिकाणाची आहेत ही प्रकाश चित्रे ?
१ले ४ थे ५ वे तर अप्रतीम ....
२ रे आणी तीसरे कोकणातले असावे असे वाटते...
शेवटचे चित्र मात्र कन्फ्युजन आहे ......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Oct 2008 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विसाव्याचे क्षण लै भारी !!!
१,४,५ ला पैकी च्या पैकी मार्क :)
30 Oct 2008 - 1:54 pm | बेसनलाडू
(नैसर्गिक)बेसनलाडू
30 Oct 2008 - 2:01 pm | विसोबा खेचर
नानासाहेब,
सुंदर, मनोहारी प्रकाशचित्रे..!
तात्या.
30 Oct 2008 - 2:12 pm | स्वाती दिनेश
विसाव्याचे क्षण फार सुरेख आहेत. डोळ्यांना 'सुख वाटे.. ' झाले.
स्वाती
30 Oct 2008 - 2:49 pm | सहज
सुंदर फोटो..... सार्थक.
विसुनाना तुम्ही व्यक्त केलेल्या मताशी संपुर्ण सहमत.
30 Oct 2008 - 2:58 pm | प्रमोद देव
नानासाहेब सगळीच छायाचित्रं अप्रतिम आहेत.
30 Oct 2008 - 3:24 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी खरच ! काही काळ या निसर्गचित्रांनी विसावलो.
प्रकाश घाटपांडे
30 Oct 2008 - 6:56 pm | शितल
सर्वच फोटो अप्रतिम काढले आहेत.
:)
30 Oct 2008 - 7:27 pm | सूर्य
चित्रे सहीच आहेत. कोणती ठिकाणे आहेत ही?
- सूर्य.
30 Oct 2008 - 9:32 pm | प्राजु
विसुनाना,
हॅट्स ओफ टू योर फोटोग्राफी..
कोण्तं जास्ती आवडलं हे सांगणं कठीण आहे..
ग्रेट!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Oct 2008 - 9:42 pm | ऋषिकेश
"तिसर्या डोळ्याची" कमाल आवडली!
मस्त प्रकाशचित्रे!
-(निवांत) ऋषिकेश
30 Oct 2008 - 9:42 pm | लिखाळ
वा !
सर्व फोटो छान आहेत.. पाहुन प्रसन्न वाटले :)
-- लिखाळ.
31 Oct 2008 - 4:33 am | मदनबाण
विसुनाना सर्व फोटो छान आहेत..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
31 Oct 2008 - 4:33 am | मदनबाण
विसुनाना सर्व फोटो छान आहेत..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
31 Oct 2008 - 5:01 am | केशवराव
विसुनाना, प्रकाश चित्रे आवडली. मन प्रसन्न झाले.
31 Oct 2008 - 9:48 am | यशोधरा
सुरेख प्रकाशचित्रे! ठिकाणांची नावे दिलीत तर खूपच छान होईल.
31 Oct 2008 - 10:28 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदरच आहेत ही प्रकाशचित्रे. पण, कुठे काढली वगैरे थोडी माहिती द्या ना जमली तर...
बिपिन कार्यकर्ते
31 Oct 2008 - 10:30 am | सुक्या
बहुतेक महाबळेश्वर आहे. नीडल प्वाइंट दिसला म्हनुन सांगतो. सुरेख प्रकाशचित्रे
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
31 Oct 2008 - 10:48 am | झकासराव
सगळेच फोटु आवडले नाना. :)
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao
31 Oct 2008 - 12:48 pm | डॉ.प्रसाद दाढे
नानामहाराज फोटू खूप आवडले, कुठले आहेत हो?
31 Oct 2008 - 1:39 pm | राघव
खूप सुंदर प्रकाशचित्रे :)
पहिले सगळ्यात जास्त आवडले!!
मला वाटते ही प्रकाशचित्रे महाबळेश्वरची आहेत. चु.भू.द्या.घ्या.
मुमुक्षु
31 Oct 2008 - 3:53 pm | अभिरत भिरभि-या
पहिले व शेवटचे सर्वात खास. ठिकाण महाबळेश्वर आहे ?
31 Oct 2008 - 6:32 pm | विसुनाना
प्रतिक्रिया देणार्यांचे आणि प्रकाशचित्रे पाहणार्यांचे आभार.
महाबळेश्वरच आहे.