कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?
सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.
बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।।
तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.
त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.
या दिवशी यमपूजा केली जाते.
यम पूजा करण्यासाठी मंत्र
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।
चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
प्रतिक्रिया
30 Oct 2008 - 5:13 am | कपिल काळे
म्हणायचा असतो.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
30 Oct 2008 - 5:15 am | कपिल काळे
<<या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.>>
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवावे किंवा भोजन करावे.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
30 Oct 2008 - 12:51 pm | बिपिन कार्यकर्ते
अदिती सुट्टीवर असल्याने तिचा प्रतिसाद तिच्यावतीने टंकतोय :)
असं का करावं? आणि नाही केलं तर?
(अवांतरः आज मी आणि माझा भाऊ आमच्या पितरांनी ठेवलेल्या घरात अर्ध जेवण बनवून घेऊन, ते घेऊन आमच्या शेजार्यांकडे जेवायला जाणार आहोत. भैय्या आपल्याला आता पाप लागणार आणि आपण नरकात जाणार! किती मजा, आपण तिथेही पुन्हा भेटू आणि धमाल करुया. आणि आम्ही दोघे आहोत तसे फारच आनंदात आहोत.)
१३_१३ सुट्टीवर असलेली अदिती