आल्प्सच्या वळणांवर - भाग ३ - स्टेलव्हिओ पास ते विल्डर्सविल

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
13 Oct 2014 - 3:13 am

आल्प्सच्या वळणांवर - भाग १ , भाग २

हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात. त्यांना हसून हात दाखवला आणि गाडीत बसलो.

http://4.bp.blogspot.com/-ZetDkRUtr-0/VDqWKh6LIAI/AAAAAAAADa0/k_2Cs-D8st0/s1600/DSC_0189.JPG

आधल्या दिवशीच्याच उम्ब्रेल पास या घाटातून पुढे अजून वर जायचे होते. थोडी धडकी भरली होतीच. गणपती बाप्पाला, गजानन महाराजांना नि अजून आठवतील त्या सगळ्यांना साद घातली आणि निघालो. अफाट पर्वत आणि दऱ्या, मधेच एखादा छोटासा तलाव, जवळजवळ ३६० अंशांच्या कोनात वळणारी आणि चढत जाणारी वळणे आणि सोबतीला गाणी. हा तेवढा प्रसिद्ध पास नसल्याने तशी गर्दी कमी होती पण सायकलस्वार, बाईकर्स आणि काही गाड्या अधूनमधून दिसत होत्या. या भागात झाडी फारशी नव्हती. काही ठिकाणी इथे धबधबे असावेत असा अंदाज येत होता पण उन्हाळ्याचा शेवट असल्याने कदाचित पाणी फारसे नव्हते.

http://3.bp.blogspot.com/-jTk_TtZgrFE/VDqWhzdTBEI/AAAAAAAADbA/1UT7k8EglTY/s1600/DSC_0197.JPG

http://3.bp.blogspot.com/-2LxzCT1TCF4/VDqXcfWwUdI/AAAAAAAADbc/tqdfXuv-Vxg/s1600/DSC_0219.JPG

http://1.bp.blogspot.com/-Z8OyS4FyJvM/VDqXDXYyEeI/AAAAAAAADbM/5l4PeYRb-Gk/s1600/DSC_0211.JPG

इथे स्विस आणि इटली या देशांची इथे सीमा आहे. इथून इटलीत प्रवेश!

http://4.bp.blogspot.com/-j40jFv8V0PU/VDqXFI4B6EI/AAAAAAAADbU/SYsO8hLqbZY/s1600/DSC_0214.JPG

http://1.bp.blogspot.com/-yHKAXTYByfA/VDqXds82gpI/AAAAAAAADbk/d47TOIglErM/s1600/DSC_0213.JPG

उम्ब्रेल पास - शेवट आणि स्टेलव्हिओ पास - सुरु

http://4.bp.blogspot.com/-MQVdi2xN0Js/VDqYFTK-qlI/AAAAAAAADbs/MUScSA4J_2U/s1600/DSC_0233.JPG

इथे एखाद्या फाट्यावर असतात तशी काही दुकाने होती, सुवेनिअर विकायला अनेक लोक होते, काही टपरीवजा हॉटेल्स, गाडीवरचे खाद्यपदार्थ विक्रेते, काही मोठी रेस्टॉरंट्स आणि तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या. काही लोक त्यांच्या गाड्या इथे पार्क करून सायकलने पुढे जाण्याच्या किंवा ट्रेकिंगच्या तयारीत होते.

एकूण २२ किलोमीटरचा हा रस्ता २७५८ मीटर उंचीपर्यंत पोहोचवतो. १८२० ते १८२५ या पाच वर्षात हा बांधला गेला. कार्लो दोनेगानी असे या रस्त्याच्या कामातल्या मुख्य अभियंत्याचे नाव होते. या पासचे मुख्य वैशिष्ट्य असे की यात एकूण ४८ हेअरपिन टर्न्स (मराठी ?) आहेत जे जगभरातील ड्रायव्हर्स, सायकलस्वार, बाइकर्स यांच्यासाठी आव्हानात्मक पण अविस्मरणीय म्हणून ओळखले जातात. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, रोड शोज इत्यादीसाठी हा प्रसिद्ध आहे. जगातील काही खास रस्त्यांमध्ये आवर्जून नाव घेतला जाणारा असा हा स्टेलव्हिओ पास.

http://2.bp.blogspot.com/-GLLVKlHMqeo/VDrW4M5-qKI/AAAAAAAADec/4rf-SVj3yYc/s1600/DSC_0238.JPG

आम्ही चालत चालत पुढे जिथून खालचा हा पास दिसतो त्या ठिकाणी गेलो.

http://2.bp.blogspot.com/-PyVhWatXox8/VDqYsMYQuHI/AAAAAAAADb8/S9m8q0RBsus/s1600/DSC_0245.JPG

धडकी भरवणारा रस्ता. जेवढे फोटोत दिसताहेत त्यात फक्त सुरुवातीचे काहीच आहेत. पुढे असेच २-३ मोठे डोंगर उतरत ४८ पूर्ण होतात. या प्रवासादरम्यान व्हिडीओ घेण्याचे केविलवाणे प्रयत्न निष्फळ ठरले.

http://3.bp.blogspot.com/-d-91ZtxYZWc/VDrfv44JggI/AAAAAAAADes/LiycDKiRVN0/s1600/DSC_0258.JPG

http://4.bp.blogspot.com/-SBDq5mH5xzU/VDqYzEXqZoI/AAAAAAAADcM/CnAmMoQF7kk/s1600/DSC_0252.JPG

इथे गाडीने उतरतोय म्हणून आम्ही टेंभा मिरवित असतानाच आम्हाला लाजवणारे अनेक अफाट लोक इथे होते जे सायकलने किंवा काही पायी चढत येत होते. चालत येणार्यांकडे पायात स्केटसदृश काहीतरी आणि हातात स्टिक्स होत्या ज्याच्या आधारे ते चढत होते.
तरुण, वयस्कर, बाइक्स वाले, अगदी जुन्या जुन्या खास जपलेल्या गाड्या ते फरारी, पोर्शे, लाम्बोर्गीनी सारख्या अत्याधुनिक स्पोर्ट्स कार पर्यंत सगळ्यांनाच या पास ने भुरळ घातलेली दिसत होती. अजून एक विशेष आवडले ते हे, की या सगळ्यात महिलांची उपस्थिती सुद्धा तेवढीच होती. अगदी षोडशवर्षीय तरुणींपासून तर साठीच्या आज्यांपर्यंत अनेक जणी दिसल्या. :)

http://1.bp.blogspot.com/-_YgMayJolDU/VDrK1LlIeWI/AAAAAAAADck/TDXPfLiINYk/s1600/DSC_0298.JPG

http://4.bp.blogspot.com/-n71BBZ9awEQ/VDrLFBKRqEI/AAAAAAAADcs/shUjERkGf24/s1600/DSC_0302.JPG

http://3.bp.blogspot.com/-1gnIv0_fmHc/VDrg9e5xHDI/AAAAAAAADe0/IBjGsaY8TIg/s1600/walk.jpg

चार तीन दोन एक करत उतरलो एकदाचे खाली. डोकं अजूनही गरगरतय असं वाटत होतं. शेवटच्या ठिकाणी दिसलेली काही घरं आणि हॉटेल्स आणि गाड्या.

http://1.bp.blogspot.com/-I7fZ1oVQyQg/VDrP_tzprzI/AAAAAAAADdY/ESz6hkhhDMk/s1600/DSC_0330.JPG

कितीतरी वेळाने हा असा सरळसोट रस्ता बघून हायसे वाटले अगदी.

http://1.bp.blogspot.com/-1KGOvLhs_IY/VDrL6-bG89I/AAAAAAAADc8/SKOhJSHcW-c/s1600/DSC_0337.JPG

http://4.bp.blogspot.com/-5adpbldhEI8/VDrMstqx82I/AAAAAAAADdE/R_eX9kkZxgM/s1600/DSC_0342.JPG

पुन्हा इटलीतून स्विस मध्ये प्रवेश झाला. आजूबाजूच्या शेतात गायी चरताना दिसल्या, त्यांच्या गळ्यातील घंटांचे आवाज दूरवर येत होते. स्विसमध्ये आलोय याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली.

http://3.bp.blogspot.com/-dfPHMs4INPc/VDrqvn0g-BI/AAAAAAAADfQ/7a55IiZGEAM/s1600/DSC_0356.JPG

http://3.bp.blogspot.com/-rzapYJ1PtMo/VDrq_FHy67I/AAAAAAAADfY/jNrTWZUUw2A/s1600/DSC_0353.JPG

ऑफेन पास आणि फ्ल्युएला पास हे दोन पुढचे पासेस परत असेच पर्वत रांगांमधून जात होते. प्रत्येक ठिकाणी पर्वतांवरील खडक, माती, रंग यातला बदल दिसत होता.

http://2.bp.blogspot.com/-XTtX9vWnENc/VDrRfhI5i7I/AAAAAAAADds/dHHEKC16J6M/s1600/DSC_0396.JPG

फ्ल्युएला पास मध्ये एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली आणि चार पाच छोटी तळी होती. भूक लागली होती. इथेच थांबून सोबत आणलेला डबा दगडांच्या टेबल खुर्चीवर खाऊन पुढे मार्गस्थ झालो.

http://2.bp.blogspot.com/-pGk07YP2cPk/VDrkI-TdsgI/AAAAAAAADfA/ktd1OqlhAII/s1600/DSC_0422.JPG

http://1.bp.blogspot.com/-szEDHPNmKTc/VDrRf40IQUI/AAAAAAAADdw/KtJWpGea764/s1600/DSC_0415.JPG

स्विस लोकांचे झेंड्याचे प्रेम ठिकठीकाणी दिसून येते. अगदी सायकलपासून तर अशा एकाकी जागी ते सगळीकडे झेंडे रोवतात.

http://1.bp.blogspot.com/-8o1ZfPkIyRc/VDrRtgPQJHI/AAAAAAAADd8/grs5J0_X8wQ/s1600/DSC_0446.JPG

बाईकर्सच्या उत्साहाला उधाण आले होते.

http://2.bp.blogspot.com/-Wfb2NOosSp0/VDrRuL5NfcI/AAAAAAAADeA/yxzUHokyRwE/s1600/DSC_0452.JPG

हा रस्ता दावोस (Davos) या प्रसिद्ध गावातून जात होता. इथे थांबण्या इतका वेळ नसल्याने फक्त गाडीतूनच काही देखावे टिपले. एक्का काकांनी दावोस बद्दल इथे लिहिले होते.

http://2.bp.blogspot.com/-8CU_g0ypWWs/VDrLUBicbEI/AAAAAAAADc0/N0FqLI-9USY/s1600/DSC_0461.JPG

पुढे झुरीचकडे जाणारा महामार्ग लागला आणि थोडे हायसे वाटले. या रस्त्याने जाताना दिसणारी पर्वतरांग
बास्टायची आठवण करून देत होती. त्या भागात जे लिहिले होते की "अठराव्या शतकात स्वित्झर्लंड मधले दोन कलाकार त्यांच्या काही कामासाठी जेव्हा या भागात आले, तेव्हा त्यांना दूरवर हे डोंगर दिसले. हा निसर्ग आणि हे डोंगर त्यांना त्यांच्या मायभूमीशी साधर्म्य साधणारे वाटले. म्हणून त्यांनी या परिसराला आधी जर्मन स्वित्झर्लंड नाव दिले. कालांतराने त्याची ओळख सॅक्सॉनी हे या राज्याच्या नावावरून सॅक्सॉन स्वित्झर्लंड अशी झाली" ते का असावे याचा अंदाज आला. एकूण पर्वतांची रचना तशीच होती. पण दिवसभरातील थकव्याने फोटो काढण्याचा उत्साह संपला होता.

झुरीच लेक, लुत्सेर्न लेक असे काही मोठे तर अनेक छोटे तलाव आणि त्यातील निळे पाणी सतत लक्ष वेधून घेत होते. बराच वेळ एक नदी एका बाजूने वाहात होती. बोगदे तर संपता संपत नव्हते. एक झाला की दुसरा सुरु. काही अगदी अर्धा किलोमीटरचे तर काही अक्खा पर्वत वरपासून तर खालपर्यंत उतरणारे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हा रस्ता असला तरीही आता प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. अर्थात मध्ये काही ठिकाणी थांबायचा मोह आवरत नव्हता.

http://4.bp.blogspot.com/-2mLdCWTMGMg/VDrVee9qrtI/AAAAAAAADeQ/8wylqAznfIk/s1600/DSC_0502.JPG

अखेरीस ६:३० च्या आसपास विल्डर्सविलला पोहोचलो. गावातून दुरून युंगफ्राऊ, आयगर आणि म्योंख ही तीन शिखरे दिसत होती. गल्लीबोळांतून थोड्या शोधाशोधीनंतर हे घर सापडलं आणि बघूनच प्रवासाचा थकवा पळाला.

http://2.bp.blogspot.com/-w4GwilRBc6E/VDrNEf1WqfI/AAAAAAAADdM/EWw6JhqZWpo/s1600/DSC_0096.JPG

एका आजीने दार उघडले. तिच्या मुलीचे हे घर होते पण त्यांचे कुटुंब बाहेरगावी गेल्याने ती किल्ली देण्यासाठी थांबली होती. सुखद पण खूप थकवणारा प्रवास झाला होता, त्यामुळे विश्रांतीची नितांत गरज होती. हवामानाचा अंदाज बघता दुसऱ्या दिवशी आमच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यास हरकत नव्हती, पिट्झ ग्लोरिया आणि परिसर लवकरच…

क्रमशः

प्रतिक्रिया

सुरेख वर्णन आणि चित्रे! कशाचे कौतुक करावे ते समजत नाही.
वळणांचे रस्ते, हिरवळ, टुमदार घरे असे सगळेच आवडले.

फक्त ते '१८० च्या कोनात वळणारी आणि चढत जाणारी वळणे' नजरेसमोर आणणे जमले नाही. आपल्याला बहुतेक ३६० च्या कोनात म्हणायचे असावे.

रेवती's picture

13 Oct 2014 - 5:27 am | रेवती

:) २७० .

मधुरा देशपांडे's picture

13 Oct 2014 - 11:37 am | मधुरा देशपांडे

हो बरोबर. योग्य बदल केला आहे. धन्यवाद :)

कंजूस's picture

13 Oct 2014 - 5:28 am | कंजूस

सर्वच छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2014 - 6:04 am | श्रीरंग_जोशी

अगोदरचे दोन भाग वाचून ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्यापेक्षाही अधिक सुंदर फटु अन वर्णन आहे.

ते घर,रस्ते,निसर्ग सगळंच विलोभनिय!मजा येते आहे सुंदर फोटो पाहात वर्णन वाचायला.पुलेशु.

मुक्त विहारि's picture

13 Oct 2014 - 8:30 am | मुक्त विहारि

मस्त....

वेल्लाभट's picture

13 Oct 2014 - 10:32 am | वेल्लाभट

प्रेमात पडण्यासारखी जागा ! केवळ विलोभनीय.... केवळ विलोभनीय !
सुरेख फोटो आणि वर्णन. येत राहूदे.....
लिस्ट करतोय कुठे कुठे जायचं राहिलंय त्याची.

स्पा's picture

13 Oct 2014 - 10:35 am | स्पा

ट्रीट फॉर आईज

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 10:37 am | दिपक.कुवेत

फोटो आहेत. फारच सुरेख.

एस's picture

13 Oct 2014 - 1:58 pm | एस

वाचतोय. मस्त फोटो आणि वर्णन...

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 2:19 pm | प्यारे१

___/\___

आह्ह्ह्ह्ह! अप्रतिम. शब्द खुंटले.

(आपलं काश्मीर असंच आहे काय?)

सविता००१'s picture

13 Oct 2014 - 2:31 pm | सविता००१

मस्त लिहिलं आहेस गं. खूप सुरेख. वाचतेय.........

चौकटराजा's picture

13 Oct 2014 - 2:35 pm | चौकटराजा

सुरेख फोटो. एकूणात सप्टेंबर मधे गवत तांबूस पिवळे दिसते का ? आपण जे गाव रहायला निवडलेय ते इंटरलाकेन पेक्षा स्वस्त आहे म्हणतात . खरी बात काय ? आयगरची भिंत डोळ्यास भिती घालते काय ? बाकी असला वळणाचा रस्ता मढी ते रोहटांग या मार्गावरही आहे. पण पूर्ण बेभरवशाचा ! ड्रायव्हरची कसोटी पहाणारा ! असाच एक रस्ता इटलीतील कॅप्री येथेही
असल्याचे मीना प्रभू यांच्या पुस्तकात दिसते.

मधुरा देशपांडे's picture

13 Oct 2014 - 5:23 pm | मधुरा देशपांडे

हो एकुणात असे तांबूस पिवळे गवत दिसते असे म्हणता येईल, पण तरीही बदलत्या हवामानामुळे दरवर्षी थोडा बदल होऊ शकतो. आम्ही जिथे राहिलो ते इंटरलाकेन पेक्षा थोडे स्वस्त हा एक मुद्दा आहेच, इंटरलाकेन नक्कीच महाग आहे. दुसरा असा की आजूबाजूच्या काही गावांमध्ये गाडी नेता येत नाही. म्हणून मग हे ठरवले. आयगरच्या भिंतीविषयी पुढच्या दोन भागात माहिती आणि फोटो येणार आहे तेव्हा अधिक लिहिते. एक दिवस विरुद्ध बाजूने दुसऱ्या एका शिखरावरून तर एक दिवस जवळचाच एक ट्रेक करताना अशी दोन वेळा बघण्याचा योग आला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

नागमोडी घाटरस्ता लैच अवडल्या गेला आहे..
फोटू आणि वर्णनपण लाइकण्यात येत आहे. :)

मधुरा अप्रतिम चालु आहे टुर. खुप छान फोटो. पुढचा भाग लवकर टाक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2014 - 4:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम वर्णन आणि फोटो.

स्विट्झर्लंडचे सौंदर्य अविस्मरणिय आहेच पण त्यांची स्वच्छता, टापटीप आणि व्यवस्थापनकौशल्यही मनावर खूप प्रभाव पाडते.

पुढचे भाग भराभर टाका हेवेसांन :)

विलासराव's picture

13 Oct 2014 - 5:23 pm | विलासराव

झकास!!!!!!

इशा१२३'s picture

13 Oct 2014 - 8:52 pm | इशा१२३

मस्त वर्णन आणि सुरेख फोटो...

अभिरुप's picture

14 Oct 2014 - 2:19 pm | अभिरुप

अतिशय सुंदर प्रवास वर्णन....तेही ओघवत्या शैलीमध्ये....
पु.भा.शु.

मदनबाण's picture

14 Oct 2014 - 2:56 pm | मदनबाण

सुरेख वर्णन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Oct 2014 - 2:43 am | निनाद मुक्काम प...

प्रवास वर्णन आवडले.
फोटो चांगले आले आहेत ,
आमच्या घरातील सज्जातून आकाश निरभ्र असेल तर दूरवरील आल्प ची शिखरे दिसतात, अनेकदा जाणे होते, मात्र माझ्या कुटुंबाला त्यात काय पाहायचे एवढे ,त्यापेक्षा इंडिया पाहूया असे म्हणून तिच्यामुळे माझे समग्र स्विस दर्शन करायचे राहिले.
अगदी खरे सांगायचे तर तेथील व ऑस्ट्रिया मधील आल्प भागात फिरतांना सुरवातीला मंत्र मुग्ध करणारी हिरवळ व देहभान हरपून टाकणारे हे देखावे पुढेपुढे मला निरस वाटू लागले, तोच तोच पणा जाणवू लागला,
मुंबईत लहानाचा मोठा झालो म्हणून कि काय माझी नजर प्रवास करतांना नेहमी माणसे शोधत असायची, मुंबई .लंडन व अजून कुठेही जेथे माणसे आपल्याच विश्वात दंग होऊन सुसाट पळत असतात तेथे गेल्यावर मन रमते,. का कुणास ठाऊक स्विस चे हे निसर्ग सौंदर्य एका सुंदर तसबिरी कृत्रिम वाटते, त्यातील एकांत
आणि विलक्षण शांतता हृदयात उगाचच अनामिक धडधड वाढवते.
आयुष्यात एकदा पाहावे व दुसर्‍या पाहण्यास आवर्जून सांगावा असा हा देश.
तेथील बहुतांशी लोकांच्या माहितीत नसलेली पर्यटन स्थळे शोधून काढण्यास आल्प्स च्या अनवट वाटा शोधण्यात पण एक गंमत आहे.

पुन्हा सुंदर .. रस्ते ... तळी आणि घरे पण खुप्प देखनी आहेत.. निरव शांतता बस्स..
असे वाटते आहे जावे आणि तासंन तास हा निसर्ग आपल्या डोळ्यात कैद करावा ... कायमचा.

अवांतर : इस्पिक एक्का यांच्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.. मध्यंतरी खुप दिवस नसल्याने हे काही काही माहीत नाही. असेच सर्व शोधत आहे... आणि वाचत आहे