पयला पयला प्यार

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
28 Oct 2008 - 2:05 pm

बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते.
मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस.
'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं
मी सुसाटलो
९३२२ १७ ३३ १४
सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू.

'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.'
सूर्‍या आला

'क रं बाला क बोल्तोस?

'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.'
'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा. चल तुला रातीची मूंबय दाकवतो.'

मंगलवार - संद्याकाली सात वाजता सूर्‍या हजर. मीनी पन नवी न शर्ट न प्यांट घातली न दोगव नींगालू.

रीक्शान बसलू . 'ए चल जल्दी. पनवेल मे जानेका हाय. ' सूर्‍या रीक्शावाल्याव वरडला

बर्‍याच येलान पनवेल आला.
'वो सर्कल का बाजुमे खडा करो' सूर्‍या
आमी ऊतरलो.
समोरच बार व्हता
झीरो च्या गूलपांच तोरन लावलवत, म्हाराजा स्टाईल वाचमन व्हता न नाव व्हत ' चांदनी बार ऍंड रेस्टोरन्ट'

'सूर्‍या जल्ला लय भारी बार दीसतोय'
'आर नीस्ता बगीत क रहातोय . आत जाउ चल'

वाचमन न कडक सलाम ठोकला न दरवाजा ऊंगडला.
आत बगतो त काय
ही गुलपं, ह्या लायटी, हा मोटा लाउडस्पीकर न सगलीकड छनछन छनछन.
डोलच भिरभिरल, जराश्यान डोल चोलीत बगीतल त सगलीकड पोरीच पोरी. काय उब्या त काय नाचतान. जेआयला हा त डान्स बार.

'साब इधर आईये' वेटर न येक टेबल दाकवल.
'नय नय हम उस कोनेमे बैठेगा' सूर्‍या म्हनाला
समोरची जागा सोरुन सुर्‍या कोपर्‍यात क बसला ते कल्लच नाय

'दो कींगफीशर स्ट्रांग' सुर्‍यान ऑर्डर दिल्ली न सगलीकड नजर फिरवली.
मना त काय सुचतच न्हवत. तेवड्यात सुर्‍यान धा ची नोट चीमटीत पकरली न यका पोरीला खुन केली.
ती आयटम जवल आली न दोगांना शेकँड केला. जल्ला काय फटाका व्हता

'आप बहूत दिन बाद आये हो. हमारी याद नही आती क्या ?'
'ये हमारा दोस्त हाय. उसका बडडे मनाने के लीये आया हय. तुम कैशी हय?' सुर्‍या.
'अच्छी हूं. '
'मै गाना लगाताय जरा अच्छा नाच दिकाना'

'वेटर ~~ काला कौआ लगाव' सुर्‍यान फर्माईश केली

काला कौआ काट खायेगा सच बोल .. सूरू झाल नी ती आशी काय नाचाय लागली क माजा डोकाच आउट झाला
मी भिरभिरून हिकर तिकर बगाय लागलो न ती दिसली.

यका कोपर्‍यात चीप उबी व्हती, यकटीच, सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू.
अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती. डोले फाडून मी हावरटासारका तीच्याकड बगीत व्हतो पन ती आपल्याच धुनकी मदी आरशात बगुन केस उडवीत व्हती

सूर्‍यान माजेकड बगीतल. 'आवरली क र ? ' मी मान खाली घातली. ' आर तेजाआयला कना लाजतस कना लाजतस र? धा ची नोट चीमटीत पकर न बलीव तीला.'
'आर आस कस ? रागवल ना ती.'
'आर बाबा कना रागवल ? पैशासाटीच नाचतान त्या'.

मी धा ची नोट चीमटीत पकर ली न घाबरत घाबरत हलवली
तीन बगीतल न माजेकड आली हलूच हसली. मी येड्यागत बगीत रहालो. सूर्‍यान चीमटा कारला तसा भानावर आलो.

'तेरा नाम क्या हय ?'
'रेश्मा'
'कीधरसे आयी हय'
'कलकत्ता से'
'ये कलकत्ता कीधर आया'
'आर आसल ईंदापूर चे फुर तूला क कराचा र ?' सूर्‍यान मना जागेवर आनला
'तू रोज ईधर आती क्या'
'हां. रोज आती'
'मै बी आयेगा'

त्या दिशी कोंबडीचे पिसावर बसुनच घरी गेलो
राती झोप नाय, नीस्ता तलमलत व्हतो. दुसर्‍या दिशी सूर्‍याला न सांगता यकटा गेलो.
तीला बलीवल. तिचा हात हातात झेतला.
'मेरेकु रातमे नींद नही आयी. शिर्फ तू ही तू दिकती थी आंखो के सामने'
'कूछ बी मत बोलो हां झुटे कहीके.' तीन लटक्या रागान मूरका मारला. मी खल्लास
'सच्ची. तेरी कसम'
'मै तेरेको ईतनी अच्छी लगती ?'
'फीर. सारी दूनीयामे तेरे जैशी खूबसुरत कोई नही. लेकिन तूम ईतनी अच्छी हो तो ईधर कायको आती है ?'
'क्या बताउ तूम्हे मेरी कहानी. मेरा छोटा भाई बी मार है. उसके ईलाज के वास्ते आना पडता है. घरमे कमानेवाला कोई नही. मजबूरी है.'

मना खुप वाईट वाटला. परस्तीती काय कराला लावील ते समझाचा नाय. मी खीश्यातून पाच हजार रुपये काडले.
'ये रख दो. और बी लाके देगा. जब तक मिथुन तेरे साथ है टेंशन नहि ले नेका क्या.'

येका आठवड्यात बा चे तीस हजार गायब झाले. कशे त कूनालाच कल्ला नाय

'फ्रायडे को मेरा बडडे है. तूम आयेगा ना.' येके दिशी रेश्माने ईचारल
'क्या बोलती तू ? तेरा बडडे और मै नहि आयेगा ऐसा हो सकता क्या ? '
'तु ईधर आ हम बडडे मनायेंगे और कीधर तो बाहर जायेंगे घुमने को.'
'पक्का ?'
'तेरी कसम' रेशमान माजे गल्याला हात लावला
परत कोंबडीचे पिसावर बसलो.

आता बडडेला जावाचा त काय बाय झेउन जावाला नको ? पन क झेवाचा. असा गिफ्ट झेतला पायजेन क ती खुश झाली पायजे. कायव समझना
९३२२ १७ ३३ १४
'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.'
सूर्‍या आला
'क झाला र मिथन्या ?'
सगली श्टोरी सांगीतल्याव सूर्‍या ताडकन उडाला
'जेआयला येवडी परगती केलीस न मना म्हाईत नाय ? तूजा तूच बग काय त.'
'आर बाबा चुक झाली मापी कर पन तीला गिफ्ट काय झेवाचा त सांग'
बर्‍याच मिनतवारीनंतर सुर्‍या शांत झाला
'हे बग तूझा झंगट मनापासन आसल त येकादी भारी साडी झे. '
'बर पन तू चल माजेबरोबर दुकानात. मना साडी झ्याला जमाच नाय.'

सुर्‍याबरोबर गेलो न यक भारी साडी झेतली. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.

'आर पन येक आडचन हाय. ही साडी झेउन मी घरी कसा जाउ ? वाट लागल माजी. असा कर ही तूज्या कडच ठेव. मी फ्रायडे ला येउन झेवुन जाइन'
ठरला. साडी चांगली गिफ्टपॅक करून सुर्‍याचे घरी ठेवली.

आनी येकदाची आली फ्रायडे ची संद्याकाल
मी चांगले नवीन कपडे घातले न सुर्‍याकड आलो.
तो वाटच बगीत व्हता. मी झटकन त्याजेकडशी साडी झेतली न रिक्शात बसुन नींगालो.
वाचमन न कडक सलाम ठोकला न दरवाजा ऊंगडला.
रेश्मा आज मस्तच दिसत व्हती. तीला झेउन कोपर्‍यातल्या टेबलावर बसलो.
'हपी बडडे टू यू '
'थंक्यू. मै कैसी लग रही हूं ?'
'कैशी क्या यकदम रापचीक '
'मेरे लीये क्या लाये हो मेरी जान.'
'ये देख.' मी साडी दाकवली. 'मगर येक शर्त हय. ये साडी पहनके मेरे साथ आनेका.'
'ओके बाबा मै पहनके आती.'
साडी झेउन रेश्मा आत गेली. मी आनलेल्या साडीत रेशमा कशी दिसल हया ईचारात गूंगलो

धाडकन माज्या डोक्यावर कायतरी आपटल. मी वर बगीतल
रेश्मा रागान लाल लाल झालीवती.
'साले, भिकारी की आवलाद, मेरे लीये फटी पूरानी साडी लाया तू, भडवे जा और तेरी मा को पहनाना और वापस ईधर दिखा तो हड्डी तूडवाके रख दुंगी हरामी'
आनी काय काय शीव्या देत व्हती. मी साडीवर नजर टाकली. फाटलेली, वीरलेली, मलकट. मना काय कलना. कूत्र्याचे **सारका तोंड करून घरी आलो.
अपमान गिलुनघरात पडून रायलो.
चार दिवसांनी घराभायेर पडलो न नाक्यावर शिगारेट पीवाला गेलो
समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 2:27 pm | सखाराम_गटणे™

धन्यवाद सांगा सुर्‍याला.

मस्तच

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2008 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाल्या, काही म्हण, बाकी ष्टो-या काल्पनिक वाटणा-या काल्पनिक वाटू दे !
पण असते त्याला वास्तवाची जोड, बार,सु-या, काला कौवा काट खायेगा.....

अन्

अपमान गिलुनघरात पडून रायलो.
चार दिवसांनी घराभायेर पडलो न नाक्यावर शिगारेट पीवाला गेलो
समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.

फक्त जबरदस्त !!!

ब्रिटिश's picture

29 Oct 2008 - 7:54 pm | ब्रिटिश

दादुस , काल्पनीक कई नाय
फक्त अदलाबदली
सुर्‍या मीच व्हतो न मिथन्या दूसरा कोनतरी

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 2:28 pm | विसोबा खेचर

खल्लास रे, साला मार डाला...

साला, सुर्‍यानं तुला फसवला रं. त्याला पोकल बांबूचे फटके देऊन जाम माराचा क बोल! :)

सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू.

ओहोहोहो...! मार डाला... :)

क रं बाला तुला कत्रीनाला भेटाचा क बोल! झेऊन जाईल मी तुला. जाम चिकना फटाका हाय बोल! :)

आपला,
तात्या तरे,
अंजूरफाटा.

टारझन's picture

28 Oct 2008 - 2:28 pm | टारझन

जेआयला .. आक्का लेखांन हासवला न शेवट येकदम वंगाळ झाला राव !!! पण येक गोस काय पटली नाय बाला !! तु आक्के ३० हाजार गायप क्येले न तिला धिले ... तवा ती खुष ,.,,, न यका साडीन असला अपमान .. बरं झालं .. तुह्या पाया खाली केळ्याच साल आल्यालं .. पक्का घसर्ला नाय मुन बरं ... कतरिना वादळ आसतंय रं ...

लै झकास लिवतंस बग . मला आगरी यत नाय . पण वाचाला मजा यती !! आजुन यिवदे !!

अवांतर : त्ये तिस लाखान काय उरलं कं नाय ?

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
आम्ही जालिय दशमुर्खांना फाट्यावर मारतो, तेंव्हा अरे बघता काय सामिल व्हा

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 2:30 pm | सखाराम_गटणे™

माझ्या मते शेवट चांगला झाला.
बार वाल्या पोरीच्या नादी लागुन बरेच बरबाद झालेले मी पाहीलेत.

अंगवस्त्र, अंगवस्त्राप्रमाणे ठेवावे, उगाच महावस्त्र बनवु नये.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

ब्रिटिश's picture

28 Oct 2008 - 2:40 pm | ब्रिटिश

>>तु आक्के ३० हाजार गायप क्येले न तिला धिले ... तवा ती खुष ,.,,, न यका साडीन असला अपमान ..

यक म्हन्जे ती बाई
दूसर ती बारवाली

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

टारझन's picture

28 Oct 2008 - 3:31 pm | टारझन

अरं ब्रिटिशा,
तां कल्ला .. पटकन दुसरा-दुसरा प्यार लिव !! आन् त्ये तीस लाखाचं काय झालं ? उरलेत का काही ?

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 4:53 pm | सखाराम_गटणे™

>>आन् त्ये तीस लाखाचं काय झालं ?
डान्स बार बंद झाले दुसरे काय?

अवांतरः ही आमची शेवटची स्वाक्षरी.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत. आम्ही फालतु आठयाळ, राखुंड्या लोकांकडे लक्ष देत नाही.
योग्य वेळी आम्ही त्यांना कात्रजचा घाट दाखवु.

घाटावरचे भट's picture

28 Oct 2008 - 2:32 pm | घाटावरचे भट

अ फ ला तू न ! ! ! ! !

छोटा डॉन's picture

28 Oct 2008 - 3:33 pm | छोटा डॉन

असेच म्हणतो ...
प्रकार आणि भाषा लै भारी ...
अजुन येऊ द्यात, डान्स्बार नव्हे स्टोर्‍या ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

रामदास's picture

28 Oct 2008 - 2:35 pm | रामदास

एकदम ओरीजीनल गोष्ट.
जाम मजा आली वाचताना.
आण्खी लिही राजा.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2008 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते

लगे रहो, मिथुनभाय. मजाच आली राव.

रोडटच, गूलपं .... बर्‍याच दिवसांनी ऐकले हे शब्द... मस्तच.

बाला, तू झकास लिवतंय रं, असाच ल्हित र्‍हाव...

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

28 Oct 2008 - 2:42 pm | अनिल हटेला

सही रे बाला !!!

सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू

येउ देत दुसरा - दुसरा प्यार पन लवकर !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुनील's picture

28 Oct 2008 - 3:16 pm | सुनील

बारचं वर्णन एकदम झ्याक! गोष्ट तर खरी वाटावी इतपत वास्तववादी.

काय रे, एव्हढे ३० हजार देऊन एकदापण बाहेर नाय नेली? कॉस्ट बेनिफिट ऍनलिसिस करा की राव जरा!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक प्रभू's picture

28 Oct 2008 - 5:43 pm | विनायक प्रभू

छान कथा
मला पय्ल्याला ३० पैसे पण खर्च झाला नव्हता.

टारझन's picture

28 Oct 2008 - 5:59 pm | टारझन

मला पय्ल्याला ३० पैसे पण खर्च झाला नव्हता.
सगळ्यांवर थोडी प्रभुकृपा असते हो !! बाकी ३० पैसे पण नाही ? अहो किमान ५ रुपये तरी ? छे .

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
आम्ही जालिय दशमुर्खांना कोणत्याही घाटात फाट्यावर मारतो ..तर बघता काय सामिल व्हा

विनायक प्रभू's picture

28 Oct 2008 - 6:03 pm | विनायक प्रभू

वरुन मलाच गिफ्ट मिळली

लेका किती हसवशील? पोटात गोला आला की रे.पुढचा बरथडे कधी रे बाल्या...आम्हि पन येणार...
वेताळ

प्राजु's picture

28 Oct 2008 - 7:01 pm | प्राजु

श्टोरी... लयभारी.
शेवटही एकदम अनपेक्षित. लेखनाच बाज अतिशय खिळवून ठेवणारा आहे. शेवटपर्यंत वाचेपर्यंत उत्सुकता टिकून राहते आहे.
आवडले लेखन. फक्त लवकर लिहा पुढचे भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वर्षा's picture

28 Oct 2008 - 10:43 pm | वर्षा

खूपच छान. अजून येऊ देत अशाच कथा
-वर्षा

चतुरंग's picture

28 Oct 2008 - 10:57 pm | चतुरंग

अरं क लिवलंय क लिवलंय! हासून मेलं रं! =)) =)) =))
सुर्‍या झालं चोरावर मोर! पोकल बांबूनं मारला क तेला? ;)

चतुरंग

मीनल's picture

28 Oct 2008 - 10:59 pm | मीनल

आयला.
बेस हाय रं.
आदी कंदीच वाचल नवत.
माल लई झ्याक!

मीनल.

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 5:10 am | मदनबाण

वा.. रं बाला का छान लिवलस तु...

(आगरी दोस्त)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

ऋषिकेश's picture

29 Oct 2008 - 8:13 am | ऋषिकेश

=))
भ न्ना ट !!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2008 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

आपल्याला जाम आवाल्ड बुवा!
प्रकाश घाटपांडे

दत्ता काळे's picture

29 Oct 2008 - 12:08 pm | दत्ता काळे

ष्टोरी वाचता ना लईच मूड लाग्ला व्हता, पुन्यांदा वाच्ली...

समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.

हा ! हा ! . . .

नंदन's picture

29 Oct 2008 - 12:41 pm | नंदन

>>> सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू.
अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती
=)) =)) =))

>>> त्या दिशी कोंबडीचे पिसावर बसुनच घरी गेलो
=)) =))

सही लिहिलंय, बॉस.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

29 Oct 2008 - 7:56 pm | यशोधरा

>>सही लिहिलंय, बॉस.

अगदी!! मस्तच!

रेवती's picture

29 Oct 2008 - 8:26 pm | रेवती

त्या मुलीनेच हाकलला म्हणून नाद तरी सुटला.
पण सुर्‍याचं वागणं चांगलं नव्हतं.
दुसरोंके साथ बातां : सुर्‍या हा एकप्रकारे मिथूनचा नाद सोडवायला निमित्त झाला. म्हणजे तो मित्रंही नाही व शत्रूही नाही.

रेवती

सखाराम_गटणे™'s picture

29 Oct 2008 - 8:31 pm | सखाराम_गटणे™

सहमत

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

पक्या's picture

30 Oct 2008 - 12:19 am | पक्या

लाजवाब. मजा आली वाचताना.

>>अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती
हे तर जबराच

झकासराव's picture

31 Oct 2008 - 1:45 pm | झकासराव

यकटीच, सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान>>>>> =))
सोबतो खरा बाला तु :)
समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.>>>> =))
सुर्‍याने केला गेम..

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao