तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ?
मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते
किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक
नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते
प्रतिक्रिया
9 Oct 2014 - 2:36 pm | स्पा
इकडे येऊन तुम्ही टाकलेल्या जिलब्या वाचतो
9 Oct 2014 - 2:44 pm | _मनश्री_
मस्त ………
चांगलंय तेवढाच तुमचा टाईमपास होतो ।
आणि आमच्या जिलब्या वाया जात नाहीत.........
9 Oct 2014 - 2:52 pm | सूड
लैच !! ये तो मेरे से भी सार्क्यास्टिक मारा भौ !! ;)
9 Oct 2014 - 2:54 pm | सुहास..
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ?
मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते
किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक
नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते
तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)
9 Oct 2014 - 3:07 pm | _मनश्री_
हि आयडी बदलायची आयडिया मस्त आहे .
9 Oct 2014 - 4:44 pm | बॅटमॅन
मस्तरंग????
या आयडीत काही राम नाहीये बॉ ;)
9 Oct 2014 - 5:17 pm | सूड
राम आला तर अर्थ, संदर्भ सगळंच बदलेल. ;)
9 Oct 2014 - 5:20 pm | काउबॉय
सर नाही.
9 Oct 2014 - 5:58 pm | बॅटमॅन
ते खरेय म्हणा. पण प्रत्येक जमान्यातली खट्याळ आम्रविका वेगळीच, नै? जमाना आपला आपला. ;)
9 Oct 2014 - 5:21 pm | जेपी
अश्लिल अश्लिल.
9 Oct 2014 - 5:45 pm | सूड
राम आला तर रामायणाचा संदर्भ लागेल. अश्लील काय दिसलें तुस?? ;)
9 Oct 2014 - 6:40 pm | जेपी
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव
9 Oct 2014 - 6:46 pm | बॅटमॅन
हा हा हा.
बाकी, टारझन नामक भक्त प्रल्हाददर्शनाने याचे मंगलाचरण झाले हे सांगायला हर्कत नसावी. ;)
9 Oct 2014 - 8:56 pm | काउबॉय
त्यातले तीसरे कडवे तर लैच... आवडायच ;)
9 Oct 2014 - 9:06 pm | माम्लेदारचा पन्खा
घेऊन जा रे यांना.... खूप "छमियोगिरी "चाल्लीये इथे !
9 Oct 2014 - 10:22 pm | टवाळ कार्टा
बिंडोक प्रतिसादांपेक्शा "छमियोगिरी" चालेल
9 Oct 2014 - 11:34 pm | काउबॉय
.
9 Oct 2014 - 10:54 pm | बॅटमॅन
अम्म....तिसर्या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)
9 Oct 2014 - 11:42 pm | काउबॉय
अट्टल.
9 Oct 2014 - 11:57 pm | नानासाहेब नेफळे
इतकी चौफेर मुशाफीरी करु नका मुसाफिरांनो! :lol:
9 Oct 2014 - 2:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा.
सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.
9 Oct 2014 - 3:05 pm | नानासाहेब नेफळे
मोदींचे भाषण ऐकतो, खळाळूण हसण्याचा तेवढाच एक मार्ग शिल्लक आहे.
10 Oct 2014 - 2:02 am | खटपट्या
काय नाना ?? हीतं तरी सोडा की मोदींना !!
9 Oct 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा
9 Oct 2014 - 6:28 pm | दिपक.कुवेत
का लग्न लागले आणि पंगती उठल्या कि....(ह.घे. हो)
9 Oct 2014 - 3:19 pm | माम्लेदारचा पन्खा
अगदीच कंटाळा आला तर तो चालू पण करतो....
9 Oct 2014 - 4:41 pm | प्रमोद देर्देकर
हायला मा.प. लय भारी *lol* *LOL*
9 Oct 2014 - 5:01 pm | चित्रगुप्त
मुळात उदास व्हावेच का?
छातीवर हात ठेऊन 'ऑल ईज वेल' म्हणा आणि कामाला लागा ... :))
9 Oct 2014 - 5:10 pm | जेपी
एखादा विंग्रजी चित्रपट पाहणे(सब टायटल असलेला) .
आवडीचे पेय ,चकणा =ब्रम्हानंदी टाळी
9 Oct 2014 - 5:21 pm | सुहास..
शिरियसली ...
इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !!
http://misalpav.com/node/1504
http://misalpav.com/node/1409
9 Oct 2014 - 5:39 pm | जेपी
सुहास.. असले लेखनाचे दुवे आमच्या खव मध्ये देत जावा.
लै उपकार होतील
9 Oct 2014 - 5:52 pm | विलासराव
गांजा ओढतो.
9 Oct 2014 - 7:10 pm | प्यारे१
आँ? इलासराव? हे म्या काय वाचायलोय?
आक्रितच म्हनावं की गा...
9 Oct 2014 - 7:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
आँ !!! *crazy*
विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)
9 Oct 2014 - 9:47 pm | विलासराव
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला.
विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो.
एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.
9 Oct 2014 - 6:32 pm | समीरसूर
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो.
आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)
9 Oct 2014 - 7:24 pm | पैसा
मिपावर कोणाशी तरी भांडण उकरून काढते. :-/
9 Oct 2014 - 9:24 pm | एस
नक्की कोण स्टार्ट करतं बरं?
9 Oct 2014 - 10:05 pm | पैसा
ते संपलं होतं कधी तर रिस्टार्ट करावं लागेल? =))
9 Oct 2014 - 10:12 pm | अजया
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*
9 Oct 2014 - 11:45 pm | काउबॉय
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.
11 Oct 2014 - 5:47 pm | हरकाम्या
मी कंटाळा आला की " TV " वर " hystory " वाहिनी बघतो. लै ब्येस वाहिनी हाय ती.
11 Oct 2014 - 6:23 pm | नानासाहेब नेफळे
मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत.
तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.
11 Oct 2014 - 7:33 pm | आनंदी गोपाळ
काय करता म्हटल्यावर कामधंदा काय करता त्याबद्दलचा धागा असेल असं वाटलं होतं.