गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in जनातलं, मनातलं
7 Oct 2014 - 5:09 pm

लग्न ठरवताना काय आवश्यक असतं ,
व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी
माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला
आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला .
ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत .
पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे .
आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली
पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत ,
आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून
ब्राम्हण कुटुंबात वाढली म्हणून नकार मिळतो ,
मला एक कळत नाही लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय .......

लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या
गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?

( कृपया कुठल्याही प्रकारची टर उडवू नये ही विनंती )

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

7 Oct 2014 - 6:05 pm | सुबोध खरे

एक मूलभूत मुद्दा --
गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ?
याच कारणासाठी बहुतेक वेळा मुलीचे सौंदर्य आणि मुलाचा पगारच पाहिला जातो.
गुण प्रकट होण्यासाठी बराच काळ जावा लागतो.
माझा एक मामे भाऊ आहे त्याने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा( त्याचा प्रेम विवाह आहे) --
मी लग्न केले ते माझी बायको माझ्यावर प्रेम करते म्हणून. म्हणूनच ती माझ्या साठी बर्याच गोष्टी सहन करते. ( मी कटकट्या आहे असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे)
मला ती आवडली म्हणून मी तिच्याशी लग्न केले असते तर कायम तिच्या तालावर नाचायला लागले असते.
पण ठरवून केलेल्या लग्नात हे कसे पाहणार?

तस तर कुठलाच माणूस आपल्याला कधीच पूर्ण कळू शकत नाही
पण म्हणून केवळ सौंदर्य पाहून लग्न करण हे सुद्धा योग्य नाही ना

आणि कौटुम्बिक पार्श्वभूमी चांगली असलेले सगळेच चांगले असतात अस काही नाही

ज्ञानव's picture

8 Oct 2014 - 7:51 am | ज्ञानव

अर्ध्या तासात स्वभाव कसा कळणार.
पण मला वाटते की स्वभावापेक्षा संसारात सवयीमुळे भांडणे जास्त होतात.
मग पेपर वाचून बेड पासून संडासापर्यंत कुठेही टाकणारे महाभाग काउंटरपार्टला त्रासदायक होतात.
जेवण झाल्यावर भांडी आवरायला मदत न करणारे (आईने सवय न लावल्याने...माझा काय दोष त्यात ?!)
घरात आल्यावर चप्पल भिरकावून देणारे.

अशा बर्याच सवईमुळे भांडणे होतात आणि ती टाळता येऊ शकतात चांगल्या सवई लाऊन.

जेपी's picture

7 Oct 2014 - 6:19 pm | जेपी

+1 टु डॉक

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Oct 2014 - 6:26 pm | माम्लेदारचा पन्खा

अर्ध्या तासात फक्त पिझ्झा येऊ शकतो.... समोरच्याच्या मनाचा ठाव कसा लागणार ?

जे समजूतदार आहेत आणि लग्न ही एक जबाबदारी आहे ह्याचे भान ज्यांना असते त्यांनीच ह्याचा खरा अर्थ ओळखलेला असतो... बाकीचे सगळे अनाडी....

भिंगरी's picture

8 Oct 2014 - 1:36 pm | भिंगरी

जबरदस्त बरोबर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2014 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिर्षक पाहून "आला परत एक राजकारणावरचा लेख" असाच विचार मनात आला. तो चूक ठरविल्याबद्दल धन्यवाद !

मृत्युन्जय's picture

7 Oct 2014 - 7:16 pm | मृत्युन्जय

+ १

मृत्युन्जय's picture

7 Oct 2014 - 7:17 pm | मृत्युन्जय

मला खरे म्हणजे अजुन एक ब्राह्मणविरोधी लेख आला की काय असे वाटले.

कपिलमुनी's picture

7 Oct 2014 - 7:28 pm | कपिलमुनी

हा पण लेख तिकडे नेउन ठेवणारे महाभाग आहेत..
त्यांचा अंगणच वाकडे आहे त्याला कोण काय करणार !

_मनश्री_'s picture

7 Oct 2014 - 6:45 pm | _मनश्री_

मुळात हा अर्ध्या तासाचा मुद्दा कुठून आला
अस कोण म्हणत की मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा फ़क्त अर्ध्या तासाचा असावा
आणि ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर सुद्धा निर्णय होऊ शकतो

चर्चा करून समोरच्याची मत जाणून सुद्धा माणसाची पारख होऊ शकते
पण जर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवला तर काहीच नाही होऊ शकत

प्रसाद१९७१'s picture

7 Oct 2014 - 6:55 pm | प्रसाद१९७१

@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५ भेटीगाठी झाल्या पसंतीच्या आधी असे मानुन चालू, पण त्या सुरवातीच्या ४-५ भेटीत कळते का की माणुस कसा आहे? खरे रुप नंतरच समजते.

साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

रूप ऊंची ह्या गोष्टी पहाव्यात
पण माझ म्हणण कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आहे
जे लोक तिला ओळखतात आणि आधी पसंती दर्शवून तिच्या रूपगुणांच कौतुक करतात
आणि तेच लोक तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय हे कळल्यावर नकार देतात
त्यांच काय

सुबोध खरे's picture

8 Oct 2014 - 9:57 am | सुबोध खरे

आमच्या एक अत्यंत जवळच्या कुटुंबातील एक गोष्ट सांगतो.मुलगी सुंदर आहे. डॉक्टर आहे. मुलीचे लग्न दाखवणे वगैरे सगळे सोपस्कार झाल्यावर लग्न ठरले. मुलीचे कुटुंब मुलाचे घर पाहायलाहि गेले. मुलाने मुलीला आपल्या भावी आयुष्याची कल्पना दिली इ इ. आणि अचानक एके दिवशी मुलीच्या भावाचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू आहे या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला.
कारण मुलाची आत्या म्हणाली कि सासू चे आणि सुनेचे पटत नाही म्हणून तिच्या भावाचे घट स्फोटा पर्यंत प्रकरण आले. मग अशा आईची मुलगी तू का करून घेतो आहेस? तुला अशा छप्पन मुली मिळतील. या कारणास्तव ते लग्न मोडले. मुलीचा कोणताच दोष नसताना. आता याला काय म्हणाल?
अर्थात त्या मुलीचे नंतर काही दिवसातच एका डॉक्टरशी लग्न ठरले त्यांना हि सर्व पार्श्वभूमी माहित होती. आणि त्यांचे लग्न झाले. या गोष्टीला २२ वर्षे झाली. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत.ती मुलगी अतिशय सुखात आहे. मुलीच्या भावाचा घटस्फोट होऊन त्याचे हि दुसरे लग्न झाले आणि त्यालाही दोन मुले आहेत आणि ते सुद्धा सुखाने नांदत आहेत.

जो होता है अच्छे के लिये होता है!

फक्त माणसाने स्वत:च्या कर्मांवर व देवावर विश्वास ठेवावा हेच खरे!

महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट सगळ्या मराठी लोकाना मराठी म्हणतात. त्याना कोकणस्थ देशस्थ कर्‍हाडे मराठा कुणबी शिंपी सी के पी वगैरे काहीच समजत नाही.
अर्थात आपणही सगळ्या सरदाराना पम्जाबी म्हणतो किंवा गुजराथ मधले सगळे गुजराथी राजस्थान मधले सगळेच मारवाडी असे ट्रीट करतो.
महाराष्ट्रात त्या मुलीसाठी स्थळे बघायची असल्यास शिक्षणाला हुशारीला महत्व देणारी बरीच कुटुंबे असतात. जातपात हे नम्तर येते

काउबॉय's picture

7 Oct 2014 - 9:09 pm | काउबॉय

लग्न
ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ?
याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण
यांच महत्व शून्य ठरतंय

हो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.

_मनश्री_'s picture

7 Oct 2014 - 9:24 pm | _मनश्री_

ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही
माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण
महत्वाच आहे
पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ?
उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही
आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

घटस्फोटित अथवा नको असताना स्त्रीलिंगी अपत्य म्हणून जन्मलेल्या बहुतांश व्यक्तीना डैडी इशु असतो.(अवश्य गुगलावे हे काय प्रकरण आहे ते). व्यक्तीचे वर्तन हे संस्कार व जिन्स ठरवतात. इतर घटक आहेत पण प्रामुख्याने प्रभावी घटक हेच आहेत. घटस्फोट ही दोन हाताची टाळी आहेअसेही नाही. म्हणून हा सावधपणा असतो.

मला वाटतेय लोकांची ही मानसिकता आपण मुलीचे वैगुण्य ठरवले आहे आशा पध्दतीने इंटरप्रीट करत आहात पण ते तसे नाहिये इट जस्ट अ पार्ट ऑफ़ प्रायोरिटी.

जसे एक शिडशिड व्यक्ती व एक स्थूल व्यक्ती समान क्वाल्फिकेशन व कौशल्य असून जॉब अप्लाय करत असतील तर शक्यता बरीच जास्त आहे की शिडशिडित व्यक्ति जॉब मिळवेल.. आणि हा जाड्या व्यक्तिचा दोष नाहिये तरीही....

आणि शेवटचा व प्रॉब्लम पिरामिडचा महत्वाचा अजुन एक घटक आहे सप्लाय डिमांड इक्वेशन
घटस्फोट न झालेल्या घरातील व्यक्ति मुबलक उपलब्ध असताना काय गरज आहे आशा घरातल्या व्यक्तिशी सोयरीक घडवायची ? ही मानसिकता.

मी इतकच म्हणेंन इट्स ओके चार खड़े जास्त मारा नक्कीच यश मीळुन जाईल.

हवालदार's picture

7 Oct 2014 - 9:58 pm | हवालदार

केले असते म्हणणारे हजार तयार होतिल पण प्रत्यक्षात ठरवून होणर्‍या लग्नात एक सुध्दा मिळणे कठीण जाते याला कारण म्हणजे आप्ल्या पाल्यासाठी प्रत्येक जण Risk Management करत असतो. प्रेमविवाहाची कथा वेगळी.

_मनश्री_'s picture

7 Oct 2014 - 10:17 pm | _मनश्री_

मुळात रिस्क का वाटावी ?
सगळेजण असा विचार का करतात
कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल
कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

काउबॉय's picture

7 Oct 2014 - 10:27 pm | काउबॉय

हां विचार करतात की नाती तूटलेली असताना जगायचा सरावही या मुलीला इतरमुलींपेक्षा जास्त आहे. नाते तुटने ही सर्वात मोठी भीती जिथे ग्राहय धरली जाते तिथे याचा सराव असणे हे ती नाते तोडायची मानसिकता नसणेवर प्रचंड मात करते.

क्षमा करा मी कोणाची तरफदारी करत नसून प्रश्नांची उत्तरे हुडकतो आहे.

हवालदार's picture

7 Oct 2014 - 10:33 pm | हवालदार

हो रीस्क मॅनेजमेन्ट म्हन्ट्ले की वाईटाचा विचार पहिला. खरे ना?

_मनश्री_'s picture

7 Oct 2014 - 10:37 pm | _मनश्री_

क्षमा वेगैरे नका मागू please ,तुम्ही फक्त तुमची मत व्यक्त केली
मुद्दा असा आहे कि जरी आई वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी ती लहान पणापासून कुटुंबात वाढलेली आहे .
लहान भावंडांची काळजी घेते ,घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते
त्यामुळे कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य तिच्यात आहे

तुम्ही असे म्हणत आहात. पण जे तिला आज्जिबात ओळखत नाहीत त्यान्च्या नजरेतून विचार करा म्हणजे एवढी बोच जाणवणार नाही.

अत्रन्गि पाउस's picture

7 Oct 2014 - 10:20 pm | अत्रन्गि पाउस

गोष्टी एक starting पोइंत देतात...
लग्न जबाबदारी आहे हे ज्यांना कळले त्यांची 'रिस्क मिटीगेशन' सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही...
अंत:प्रेरणा हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्या बाबतीत (मानला तर)...
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले कि पुरणाच्या पोळीला साखर का गुळ / सोबत तूप का दुध/ सकाळचा चहा तू का मी/ अमुक भाजी चालते आवडते का नाही वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्व येऊ शकते..
आपल्या वैयक्तिक बारीकसारीक गरजा जर नीट ओळखता आल्या तर त्या स्पष्ट चर्चा करूनच पुढे गेलेले चांगले...
परंतु हे निर्णय (बघून केलेल्या लग्नात) 'जवळच्या' समजदार चारचौघांचे /ज्येष्ठांचे मत निश्चितच महत्वाचे असावे..

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2014 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

मिपाचेच एक सदस्य श्री. सुक्या ह्यांच्या ह्या प्रतिसादात खालील सुभाषित आणि त्याचा अर्थ दिला आहे...

कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम |
बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः ||

अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

काउबॉय's picture

8 Oct 2014 - 1:18 pm | काउबॉय

या सुभाषिताचा या धाग्यावर नक्की सिग्नीफिकंस काय आहे ? म्हणजे इथे चर्चा मुलीला का नकार मीळतो यावर चालु असताना मुलीकडील लोक मुलामधे काय काय बघतात याचे स्पष्टिकरण कशासाठी ?

(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2014 - 6:10 pm | प्रभाकर पेठकर

(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

धन्यवाद. मीही मिपावर इथून तिथून शिकतच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2014 - 6:09 pm | प्रभाकर पेठकर

नुकताच कवी ग्रेस ह्यांच्या कवितांवरील समिक्षा वाचून आलो होतो. त्याचा परिणाम असावा..

अर्ध्यातासात एकमेकांना काय ओळखणार? ह्या समस्येशी, जरा दूरुनच, निगडीत वरील सुभाषित आहे. जसे मुलाकडे पाहताना नवरी मुलगी, मुलीची आई, मुलीचे नातेवाईक आणि इतर ह्यांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात तसेच मुलाकडच्यांचेही मुलीकडे पाहताना असतातच नं? त्यामुळे मुलीचे कुळ पाहणारे नातेवाईक त्या कुळात घडलेल्या अनिष्ट घटनांना अधोरेखित करून मुलाकडच्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि चांगले होऊ घातलेले शुभकार्य मोडीत काढतात.
ह्या सुभाषितात व्यवहार सांगितला आहे. मुळात मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण/दोष ह्यावर उहापोह नाहीये. तो असायला पाहिजे असे माझे मत आहे. तसेच मुलाच्या आणि मुलीच्या व्यक्तीमत्त्वातील गुणदोषांइतकेच ती/तो कुठल्या वातावरणात वाढलेले आहेत ह्यावरून तिच्यावर/त्याच्यावर कशाप्रकारचे संस्कार झाले असतील ह्याचे ठोकताळे बांधले जातात. ते बरोबर असतीलच असे नाही. पण विवाह ह्या जुगारात कांही 'हलकी' पाने 'दिसत' असतील तर 'ब्लाईंड' खेळण्याचे धाडस कोणी करायला जात नाही. कारण त्यांच्या भीतीनुसार कांही विपरित घडले तर मुलाच्या/मुलीच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते. अगदीच दीर्घकाल मुलगा किंवा मुलगी लग्नावाचून तुंबले असतील तर धाडसी निर्णय घेतले जातात. पण हातात भरपूर वेळ असताना हातातील 'डाव' सोडून देऊन, लग्नाच्या जुगारातील नविन 'डावा'च्या पत्ते वाटणीची वाट पाहण्याकडे कल दिसून येतो.

आयुर्हित's picture

8 Oct 2014 - 2:28 am | आयुर्हित

मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात, नाराज होवू नका.
योग्य वेळी योग्य स्थळ भेटेलच यावर विश्वास ठेवा व आपल्याला जसे हवे तसे स्थळ शोधत रहा.
एक स्थळ असे येईल कि सर्व पार्श्वभूमी समजून घेवून तीला पसंद करेल.

भृशुंडी's picture

8 Oct 2014 - 2:44 am | भृशुंडी

लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या
गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?

प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी?
बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?

पैसा's picture

8 Oct 2014 - 11:24 am | पैसा

हल्लीच एका ओळखीच्या मुलाचे साखरपुडा झालेला असताना लग्न मोडले. कारणे २. एका ज्योतिषाने सांगितले की या मुलाची बायको हट्टी निघेल आणि सासूसुनेचं पटणार नाही. मी म्हटले की या कारणासाठी तो बिनलग्नाचा रहाणार का?

दुसरे कारण, मुलीने सांगितले की वडिलांना कर्ज आहे, पेन्शन मिळत नाही, तेव्हा लग्नानंतर त्यांची जबाबदारी आपल्याला थोडीफार तरी घ्यावी लागेल. त्यावरून मुलाकडच्या सगळ्यांची चलबिचल झाली. कारण मुलीच्या वडिलांना धंद्यात नुकसान येऊन बरेच कर्ज झाले आहे ही फॅक्ट आहे.

प्रेमलग्न असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ठरवून केलेल्या लग्नात आर्थिक जबाबदारी मुद्दाम ओढवून घ्यावी का आणि किती प्रमाणार घ्यावी हा विचार एखाद्याने केला तर ते चूक म्हणता येणार नाही. या घटनेत ज्योतिषाचे निमित्त झाले पण आर्थिक कारण जास्त सबळ ठरले असावे असा माझा अंदाज आहे.

संजय क्षीरसागर's picture

8 Oct 2014 - 11:42 am | संजय क्षीरसागर

तुम्ही विवाहित असा की अविवाहित, त्या मुलीशी लग्न केलं असतं का?
उत्तर `हो' किंवा `नाही' काहीही असेल तरी कशामुळे ?

मी नाही करू शकत कारण मी स्वतः एक स्त्री आहे
आणि माझ्या घरात सध्या तरी कोणी लग्नाचा मुलगा नाही
पण शक्य असते तर नक्कीच हो ....

स्त्री आहात हे माहिती असतं तर असं विचारायचा प्रश्नच नव्हता.

एनी वे, लग्नाच्या बाबबतीत वैयक्तिक मत विचाराल तर सगळं फक्त, एका गोष्टीवर अवलंबून आहे : त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला कसं वाटतं. एकमेकांच्या सहवासात जर दोघं रमू शकत असतील तर तो संसार सुखाचा होतो. त्यापरता दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा असंही म्हणता येईल की ती एक गोष्ट जमली की इतर सर्व गोष्टी मग आपोआप जमून जातात.

अर्थात, हे जजमंट इतकं व्यक्तिगत आहे (म्हणजे फंडा युनिवर्सल आहे, पण `कुणाच्या सहवासात मजा येईल हे ठरवणं'); की तो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यावर आंतरजालावर चर्चा कशी होऊ शकेल?

हरकाम्या's picture

8 Oct 2014 - 1:15 pm | हरकाम्या

लग्न ठरवताना " पत्रिका " महत्वाची. नवर्यामुलाच्या पत्रिकेत चांगल्या ग्रहांची भरताड हवी. भले तो स्वतः कसाही
असला तरी चालेल. त्याला आकाशातल्या ग्रहांनी नावाजले पाहिजे.सध्या मी या पत्रिकेच्या चमत्कारिक दशेतुन जात
आहे.

हाही एक बर्‍याचदा बोर्डावर आलेला विषय.

स्वभाव समजून घ्यायला चार-पाच वेळा भेटणे याने 'घाईघाईत निर्णय घेतला नाही' असं म्हणून आपण फक्त मनाची समजूत घालू शकतो. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीला आपण कितीही ओळखतो असं आपल्याला वाटत असेल तर ते फक्त 'आपल्याला' 'वाटत' असतं. एरवी कोणती व्यक्ती, कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही.

मुक्त विहारि's picture

9 Oct 2014 - 12:47 am | मुक्त विहारि

कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही....

+१

पहाटवारा's picture

9 Oct 2014 - 1:52 am | पहाटवारा

खरंतर आपल्या समाजाची बहुपेडी बांधणी अशी आहे, कि त्याच्या काहि सूतांचा जसा पडत्या वेळी आधार होतो, तसाच काहि वेळा तोच पाश होउन तुम्हाला बंधीत करतो. पाश्चात्त्य देशांत जसा स्वतःच्या जोडिदाराचा निर्णय बहुतांशी फक्त त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतो तसाच त्या निर्णयात होणार्या चुका आणी परिणाम जरी वैयक्तीक असले तरीहि त्याचे प्रमाण वाढून तो थोड्या-फार प्रमाणात एक सामाजीक प्रश्नच झाला आहे.
त्यमुळे आपल्या समाजातील या मनोभूमीका सर्-सकट बदलायला वेळच लागेल पण कुणी ना कुणी रत्न्-पारखी भेटेलच अशा अनवट पण सामाजीकदृष्ट्या थोड्या आडवळणावर असलेल्या रत्नाला !
-पहाटवारा