Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः
आहे मी एक समुद्रपक्षी,
माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण,
मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त
उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त!
कार्वर म्हणतो,
Start where you are,
with what you have
make Something of it
Never be satisfied!
मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात?
माझे दोन चिमुकले पंख,
पेलतील ना हे शिवधनुष्य!
आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी!
कारण,जोडीला माझी जिद्द आहे,
आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती,
माझी मनोदेवता,माझा आतला आवाज!
नाही मला मान्य,
"बाबा वाक्यं प्रमाणं!"
नकोच मला तुमची ती मळलेली पायवाट अन् रुळलेला रस्ता,
शोधीन माझा मार्ग मीच आणि करेन तयार रस्ता!
झाडा़झुडुपांची वाटेतली संकटं
देईन तोडून ,फेकून
पण.. मला उडायचं आहे,
उंच भरारी घ्यायची आहे!
माझे भाईबंद 'कावकाव' करत आहेत,
आणि माझे सखेसुह्रद करत आहेत काळजी,
वाटू दे त्यांना गंमत आणि उडवू दे खिल्ली,
थोडी काळजी सुध्दा पण आवश्यक आहे.
माहित आहे माझंच मला,
"माझा गुरु मीच आहे,"दुसरा साथ देणर नाही,
पण मिळालीच साथ मला,मी ती नाकारणार नाही.
साथ हवी जिद्दीची,
कारण, वाट ही न परतीची!
सोबती माझा मध्येच दमला,
किंवा थकला शरीराने,
जरुर करीन मी ही संगत आणि थोडं औषधपाणी
पण मनानेच दमल्यानंतर?
उपाय नाहीच काही त्याला,
शिवाय एकच,सारखे मनात एकच घोकणे
मागचे दोर कापले आहेत, आणि
झेप पुढेच घ्यायची आहे.
क्षितीजापर्यंत दूर कक्षा माझ्या विस्तारल्या आहेत
आणि, कुंपण तोडून जायचे आहे मला,
क्षितीजाच्याही पलिकडे!
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे,
पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे!
प्रतिक्रिया
17 Dec 2007 - 2:31 pm | आनंदयात्री
आवडले. माझे शब्द वर हे पुर्ण पुस्तकच मराठीत उपलब्ध आहे.
17 Dec 2007 - 2:35 pm | विसोबा खेचर
कारण,जोडीला माझी जिद्द आहे,
आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती,
नकोच मला तुमची ती मळलेली पायवाट अन् रुळलेला रस्ता,
शोधीन माझा मार्ग मीच आणि करेन तयार रस्ता!
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे,
पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे!
वा स्वाती! अतिशय सुंदर लिहिलं आहेस!
वरील ओळी खूप आवडल्या! क्या बात है...
तात्या.
17 Dec 2007 - 7:44 pm | प्राजु
अथांग समुद्राचा किनारा मला दिसतो आहे,
पण न दिसणारा त्याचा तळ मला शोधायचा आहे!
स्वाती,
हे छानच आहे गं!
- प्राजु.
20 Dec 2007 - 1:00 pm | प्रमोद देव
कवितेतल्या भावना खूपच प्रेरणादायी आहेत.
Start where you are,
with what you have
make Something of it
Never be satisfied!
ह्या ओळींचेही भाषांतर नाही का करता येणार?
ही कविता भाषांतरीत करून स्वातीने आमच्यासारख्या निव्वळ मराठी वाचणार्या आणि समजणार्यांची खूपच छान सोय केली आहे त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदनही.
20 Dec 2007 - 1:12 pm | स्वाती दिनेश
आनंदयात्री,तात्या,प्राजु,प्रमोदकाका
अभिप्रायाबद्दल आभार!
आनंदयात्री,माझे शब्द वरील मराठी पुस्तक वाचायला हवे,आवर्जून सांगितल्याबद्दल आभार.
प्रमोदकाका,कार्वर च्या ह्या सुप्रसिध्द पंक्ती सीगलच्या बाबतीत मला चपखल वाटल्या म्हणून त्या जशाच्या तशा घेतल्या,(मूळ पुस्तकात त्या नाहीत)
स्वाती
20 Dec 2007 - 1:14 pm | विसुनाना
कविता आणि भाषांतर दोन्ही खूप आवडले.
20 Dec 2007 - 8:11 pm | स्वाती दिनेश
विसुनाना,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
स्वाती