रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Oct 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि

जाणकारांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत..

टवाळ कार्टा's picture

2 Oct 2014 - 10:51 pm | टवाळ कार्टा

RD-350 Vale dangaa karu shakataat ka ya dhagyaavar :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2014 - 11:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एन्फ्लिड वाल्यांचा कायम हेवा वाटत आलेला आहे.

बहुगुणी's picture

2 Oct 2014 - 11:27 pm | बहुगुणी

धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?)

सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) )

असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

खटपट्या's picture

3 Oct 2014 - 12:53 am | खटपट्या

सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद.
गाडी घेण्याचे नक्की झाले आहे.
मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ?
मला इलेक्ट्रा आवडली आहे.
आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.

कपिलमुनी's picture

4 Oct 2014 - 6:25 pm | कपिलमुनी

घ्या . इंजिन मधे बदल आहेत .
बरेच लोक सांगतात सेम इंजिन आहे पण तसा नाहिये डीटेल्स सांगतो मिळवून

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Oct 2014 - 11:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे.
बाकी चालू दे.

असेल...असेही असेल...

(कळफलक बडवणार होतो, पण.....टाळलेच...)

आयुर्हित's picture

7 Oct 2014 - 2:36 am | आयुर्हित

कृपया http://www.misalpav.com/comment/520365#comment-520365 वाचावा.

एस's picture

3 Oct 2014 - 11:51 am | एस

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत

गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?

कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही

अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो?
ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?
क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?
ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?
इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?
फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का?

वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल.

इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.

काउबॉय's picture

3 Oct 2014 - 12:52 pm | काउबॉय

अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं?
म्हणजे कसला आनंद मिळतो? ------

-- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री).

ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल
आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात
का?---
--- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये.

क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय
अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात.
त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?---
--- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये.

ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे
उल्लंघन करत आहोत
अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते
का?----
-- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला.

इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे
कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस
गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?---
--- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे.

फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर
मॉडीफाय न करता चालवल्यास
त्यातली शान कमी होते का?
- यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.

एस's picture

3 Oct 2014 - 2:41 pm | एस

धन्यवाद!

सामान्यनागरिक's picture

7 Oct 2014 - 1:06 pm | सामान्यनागरिक

ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे.
जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! '

बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2014 - 1:18 pm | टवाळ कार्टा

बुलेटसमोर RX-100 म्हणजे हत्तीसमोर चित्ता \m/

वेल्लाभट's picture

27 Nov 2014 - 12:12 pm | वेल्लाभट

लोल प्रतिसाद !

जरा अतिसंवेदनशील होतंय का?

बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो.

पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही.

बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.

एस's picture

3 Oct 2014 - 3:55 pm | एस

धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Oct 2014 - 5:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

जरा अतिसंवेदनशील होतंय का

दवणीय म्हणतात त्येला!!!!

"वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल

जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो?
हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात.
त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?
अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि.
कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का?
रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच.
त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?
मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही.

काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.

प्रशांत हेबारे's picture

19 Sep 2015 - 12:56 pm | प्रशांत हेबारे

आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे

आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते.

लगे रहो !!

आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे.

भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2014 - 7:35 am | अत्रुप्त आत्मा

@मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला >>> किती ते सांगा की!

आयुर्हित's picture

4 Oct 2014 - 10:50 am | आयुर्हित

रॉयल इनफिल्ड ही luxury आहे
luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense.

पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही.

मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2014 - 12:50 pm | llपुण्याचे पेशवेll

मायलेज ४० चे तर अगदी मिळतेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Oct 2014 - 10:22 am | कैलासवासी सोन्याबापु

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे
(अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)

आयुर्हित's picture

5 Oct 2014 - 12:52 am | आयुर्हित

@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते

याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा.

माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात.
एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.

खटपट्या's picture

5 Oct 2014 - 4:04 am | खटपट्या

अवो आयुर्हीत सायेब, _/\_
स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल.
८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Oct 2014 - 9:29 am | कैलासवासी सोन्याबापु

नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे

तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची?

असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे.

http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत.
व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की!

BIDISHA DEY
Head - Corporate Communications
Eicher Motors Ltd.
#96, Sector 32,
Gurgaon - 122 001,
Haryana, India
Phone No.: +91-124-4415600
Mailto: bdey@eicher.in

आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.

विजुभाऊ's picture

4 Oct 2014 - 6:11 pm | विजुभाऊ

बुलेट की सवारी......शान की सवारी.
बुलेट ची जी मजा आहे ती स्प्लेंडर वगैरे मधे नाही

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 9:00 am | प्रभाकर पेठकर

माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते.
रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Oct 2014 - 9:31 am | कैलासवासी सोन्याबापु

रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन इंडीयात मिळत नाही राव!! बाहेर मिळते ती सिविलिअन्स ना.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2014 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll

एलेक्ट्रा फॉरेस्ट ग्रीन मिळते भारतात

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2014 - 11:52 am | पिवळा डांबिस

मस्त गाडी!!!
एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती!
नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!!
मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!!
कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :)
असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!!
:)

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर

पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!!

बायकोपेक्षा 'साली' वर प्रेम जास्त.

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2014 - 12:27 pm | पिवळा डांबिस

प्रेम जास्त असंच काही नाही...
पण हळहळ तर रहातेच ना!!!!
;)

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 1:54 pm | प्रभाकर पेठकर

हळहळ तर फारच वाटते हो.... *sad* . *sad*

हम्म्म्म्म्म्म... लेट ही सही.लेलो ना बुलेट्ट.....

इनिगोय's picture

7 Oct 2014 - 8:38 am | इनिगोय

बुलेट! आवाज ही काफी है!

बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ !

बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं?

तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2014 - 12:57 pm | llपुण्याचे पेशवेll

थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत.

क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.

कपिलमुनी's picture

7 Oct 2014 - 12:07 pm | कपिलमुनी

नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ?
माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB .

तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?

सामान्यनागरिक's picture

7 Oct 2014 - 1:00 pm | सामान्यनागरिक

हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !

विजुभाऊ's picture

7 Oct 2014 - 1:22 pm | विजुभाऊ

ही घ्या बुलेट विकायची आहे.

सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद.

मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!)

भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत.

३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते.

भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही.

३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी.
ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही.

मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो.
(पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.)

रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा.

आता माझ्या काही शंका..

१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.)

२) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..?

३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..?

४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Oct 2014 - 6:30 am | कैलासवासी सोन्याबापु

मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)

१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.)
फार काही फरक नाही......

२) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..?
तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो......
मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर....

३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..?
गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे...

४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?
आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे....
२१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....

मोदक's picture

9 Oct 2014 - 12:49 pm | मोदक

१) ओक्के..

२) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..?

३) ओक्के.

४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी.
(माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.)

प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)

कपिलमुनी's picture

9 Oct 2014 - 1:01 pm | कपिलमुनी

१. क्लासिकच बरी
२. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच)
३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;)

४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा

आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका

मोदक's picture

9 Oct 2014 - 1:30 pm | मोदक

धन्यवाद...

ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..?

ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?