लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले
प्रतिक्रिया
17 Sep 2014 - 10:05 am | स्वप्नांची राणी
मी पयली....!!!
17 Sep 2014 - 10:38 am | गवि
सैल टीशर्ट जीन नेलपोलिश, मोबाईल..
ही कसली आई.. छे.. छे.. छे..
ही आई नथी छे..
माता न ही वैरिणी.
बिचारी ती चिमुरडी..
17 Sep 2014 - 11:35 am | मृत्युन्जय
हाहाहा. च्यायला गवि तुम्ही कधीपासुन उपरोधिक लिहायला लागलात? *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
17 Sep 2014 - 11:40 am | गवि
उपरोधिक ? स्त्रियांनी सैल टीशर्ट घालण्याच्या मी नेहमीच विरोधात आहे... ;-)
17 Sep 2014 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मीही हल्ली बाजार आणि मॉल मधे जिन्स घातलेल्या अनेक आयांना पाहतो, तो किती तरी शॉर्ट टॉप
आणि लहान मुलांना बाजारात घेऊन चाललेली ती खरेदी.
त्या जीन्सवाल्या आईचं मुलाकडे लक्ष नै. मला तर अशी आई सहनच होत नै.
हे सर्व होतंय बाजारातल्या फळांवरील रासायनिक खतांमुळे. बाकी कै नै.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 12:26 pm | गवि
आणि पेप्सी कोकाकोलातील कीटकनाशकेही तितकीच जबाबदार. एकूण मूल्यं घसरलीत.
17 Sep 2014 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोकोकोला आणि पेप्सीवरुन आठवलं. शक्यतो जीन्सवाल्या स्त्रीया तोंडाला बाटली लावून ते पेय पितांना सर्रास दिसतील पण सहावारी आणि नऊवारी नेसणा-या स्त्रीया शक्यतो तसं करतांना दिसत नाही, (असेल तर जाहिराती सोडून वरीजनल फ़ोटो टाका) कारण सामाजिक भान त्यांनीच टीकवून ठेवलं आहे. नैतिक मुल्यांचा -हास होतो तो जीन्समुळे, नेलपॊलीश, लिप्ष्टीक, मुळे. हातातल्या काचेच्या बांगड्या गेल्या आणि ब्रासलेट आल्या. जीन्सवाल्या आयांना काचेच्या बांगड्यांची लाज वाटते. खरी संस्कृती आणि जी काही शिल्लक मूल्य टीकली आहेत ती केवळ नऊवारी सहावारी साड्यांमुळेच. आजही खेड्यापाड्यातल्या ’आया’ मुळेच संस्कृती टीकून आहे. ( चार वारी आणि पाचवारी साडी असते पण सालं ती नेसता येत नै म्हणे) जिन्सच्या ऐवजी चारवारी आणि पाचवारी घातल्या असत्या तरी आई नावाची संस्कृती टीकली असती असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 12:57 pm | रुमानी
काय हे काय चालु आहे?
आई नावाची संस्कृती कपड्यानवर आधरीत नै ये असे मला वाटते...!
बकि तुमचे चालु देत..! :)
17 Sep 2014 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वारे वा. असं कसं चालु दे....! आयांची कै जवाबदारी नै का ?
(फ.मु.शिंदे यांची माफी मागून आई नावाच्या सुंदर कवितेची मोडतोड करतोय)
आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
जीन्स घातलेलं गाव असतं !
बाजार करायला जाते नऊवारी सह तेव्हा
जाणवत नाही,
आता नसली कुठंच तरीही
नाही म्हणवत नाही
मिपा पांगते
प्रतिसादांचे बाजार उठतात
उदास धाग्यात
उमाळे दाटतात.
आई असतो
एक जिन्सचा धागा
चिमुरड्यासह बाजार करणारी
समईतली जागा
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे बस....इतकंच म्हणायचं आहे.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 1:17 pm | बॅटमॅन
जीन्स घातली की डीएनेमधले आईपणाचे जीन्स नष्ट होतात की काय =))
17 Sep 2014 - 1:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा परिणाम होतोच होतो ना.
वडापावच्या ऐवजी पिझ्झा खावा वाट्तो ते केवळ जीन्समुळेच.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 1:25 pm | बॅटमॅन
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!
17 Sep 2014 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सनातनमध्ये लेखरायटर म्हणून शोभाल बघा. आवडल्या गेले आहे!
=))
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 1:24 pm | रुमानी
बाप जीन्स,प्यांट, बरमुडा मधे वावरतोय मग कै बाप नावाची संस्कृती किवा बापाचे संस्कार कमी झाले तर..!?
धोतर घालनारेच बाप फक्त बाप (वडिल) संस्कृती टीकवनार तर...! :)
17 Sep 2014 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचं असंच आहे, आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. ;)
=))
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 2:11 pm | बॅटमॅन
हाहाहाहाहा, संस्कृतीला बापांनी कधीच वार्यावर सोडलेय म्हणजे. अन सर्व जबाबदारी आईवर सोपवून उंडारायला मोकळे की काय?
17 Sep 2014 - 4:22 pm | प्रमोद देर्देकर
ठोSSSठो!
17 Sep 2014 - 12:58 pm | पोटे
तोंडाला लावली बाटली की लगेच संस्कृती बाटली ?
17 Sep 2014 - 4:37 pm | सुहास..
भाषांतर करुन घ्या ब्वा !!
I look around and wonder why do people look at a married woman differently??
She might look better dressed, maybe wearing an ornament or two, that mark her married..
But she's still a girl at heart, sindoor and bindi don't make her a woman..
She may be still learning how to run a home, she still might be struggling taking care of not just herself but two and more people, she might not always like to hear 'what does your husband do'..
Marriage doesn't suddenly turn a girl into a woman..
For that matter having kids doesn't necessarily do the same either..
Celebrate who she really is, celebrate the child in her..
She may be anyone around you, ur friend, ur sister, ur mother, a total stranger..
She's not supposed to be responsible for innumerous things, countless chores, it's just her desire for perfection that she does what she does..
This is for every wonderful woman I know..
Grow up..
But take your own sweet time & let the li'l girl in you live forever..
And for the men-
Cherish her, spoil her and most importantly let her 'be herself'..
She wasn't born to take care of you, it's her heart that makes her do so.
18 Sep 2014 - 11:45 pm | असंका
हे आपण लिहिलंय?
अप्रतिम!!
22 Sep 2014 - 3:30 pm | बॅटमॅन
फेस्बुक फॉर्वर्ड आहे तो.
22 Sep 2014 - 3:40 pm | प्यारे१
सुहास.. नं वर
>>> कोणे एकेकाळी हे लिहिले होते ..
लिहीलंय त्यामुळं नीट समजत नाहीये.
वाश्या, तुझंच आहे का हे?
19 Sep 2014 - 11:14 am | नाव आडनाव
लई आवडलं!
20 Sep 2014 - 10:38 pm | चौथा कोनाडा
एकदम सुंदर ! एक नंबर !!
17 Sep 2014 - 10:44 am | काळा पहाड
या नॉर्थ इंडियन वाल्यांना फटके देवून हाकललं पाहिजे.
17 Sep 2014 - 10:47 am | स्वप्नांची राणी
मी प्रयत्न करतेय चांगली आई बनण्याचा पण त्या वरच्या पयल्या आईने काय घातलं होतं हेच स्पष्ट होत नाहीये...श्शी बाई...
17 Sep 2014 - 10:53 am | पैसा
आहे का तुझ्याकडे? नसली तर शिवून घे. झाशीची राणी, ताराराणी, कित्तूरची राणी सगळ्याजणी नौवारी नेसून लढाया करत होत्या. माहित आहे ना?
18 Sep 2014 - 9:20 am | पिवळा डांबिस
शिवून? छे छे!!!
शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!!
आमची आजी ही नेहमीच्या वापरात नऊवारी नेसायची...
आमची आई आणि पत्नी ह्या नेहमीच्या वापरात नसल्या तरी गोव्याला देवाला गेल्यावर (देवाला गंडवायला!!) नऊवारी नेसत..
पण ती अखंड सलग नऊवारी! शिवलेली तोतया नऊवारी नव्हे!!!!
:)
18 Sep 2014 - 11:37 am | पैसा
ओ पिडां काका, ते तुमच्या जमान्यातलं वायलं! ह्या आताच्या पोरींना नौवारीची घडी तरी करता येणारे का? तरी बिचारीला कसंही चांगली आई व्हायचंय म्हणून उपाय सांगितला! तर हे आले सौस्क्रुतीरक्षक धावून!
18 Sep 2014 - 2:48 pm | सूड
>>शिवलेली नऊवारी ही तो नऊवारीच नोहे!!!!
प्रचंड सहमत !! हल्ली शिवलेले कद वैगरे वापरायची पण फ्याशन आलीये, प्रचंड गचाळ दिसतं ते!!
18 Sep 2014 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> +++१११ अश्येच म्हन्तो!
हाडं सोडून लोंबणार्या कातडीसारखं..कायच्याकाय!
18 Sep 2014 - 10:04 pm | पिवळा डांबिस
हा हा हा!!! :)
ज्योताय, तुझ्याही आधीपासून, मिपाच्या जवळजवळ जन्मापासून मिपावर आहे मी. पण मला "सौस्क्रुतीरक्षक" पदवी देणारी तू पहिलीच, आणि बहुदा एकमेव!!!
हे म्हणजे, पट्ठे बापूरावाला त्याच्या एकसष्टीला 'किर्तनकेसरी' असा किताब देण्यापैकी आहे!!! ;)
18 Sep 2014 - 10:08 pm | प्यारे१
आयला, तुमची एकसष्ठी आली पण???????? ;) (की होऊन गेली? )
18 Sep 2014 - 10:09 pm | पिवळा डांबिस
तुला बोलावीन हां!!! :)
18 Sep 2014 - 11:34 pm | सूड
दासबोधाचा पारायण ठेवतास महो?
20 Sep 2014 - 10:11 am | पिवळा डांबिस
होय, अजाणतेपणान तरूणपणी पारायणां केली आणि मग जाणतेपण आल्यावर फेकून दिलो!!!
अजून सखोल चर्चा करूशी वाटल्यार नवो वेगळो स्वतंत्र धागो काढ!!!!
17 Sep 2014 - 10:51 am | पैसा
पण कहर, तुमच्या आईकडे बहुधा वेळ भरपूर उपलब्ध होता, पैसे थोडे कमी असतील. या जीन्स घालणार्या आईकडे पैसे जास्त असतील, पण ती कदाचित ती १२ तास नोकरी करत असेल. मात्र बाजारात जाऊन भाजी आणते आहे ना! मुलांना-बाकी घरच्यांना जमेल तेवढं नीट खायला घालायची भावना तीच असते!
जीन्स घातली आणि नीटनेटकं राहिलं म्हणून ती घराकडे दुर्लक्ष करत असेल असा सरसकट विचार करू नये!
17 Sep 2014 - 10:59 am | काळा पहाड
अरे पण त्यामुळी बाकीच्या गरीबांचं जीणं महाग होत आहे ना! यांना वेळ नसतो बार्गेनिंग करायला त्यामुळे हे भैया लोक सांगतात घ्यायचं तर घ्या नाही तर या साळकाया माळकाया आहेतच खरेदी करायला. आम्ही सांगितलं का १२ तास नोकरी करायला? बर घराची पूर्ण खर्चाची जबाबदारी घ्यायची धमक आहे का? तर ती पण नाही. फक्त ती सो कॉल्ड टाइट जीन्स आणि लूज टीशर्ट विकत घेवून (तिथेपण बार्गेनिंग न करता तिथे पण महागाई करत) उधळण्यासाठी बाकीच्या समाजानं भोगायचं का?
17 Sep 2014 - 11:45 am | पैसा
तुम्ही कशाला सांगाल हो! या बायांनाच अकला नाहीत हे खरं. :P यांचे नवरे हापिसात बसून मिपावर चकाट्या पिटत असणार आणि या चाल्ल्या पोराला सोबत घेऊन बाजारात भाज्या आणायला! कुणी सांगितलंय हे करायला नाही का! नवर्यालाच सांगायचं बाबारे, तू एकतर पोराला तरी सांभाळ, स्वयंपाक तरी कर, भाज्या तरी आण, नाहीतर मला सुखाने घरात बसू दे! हाकानाका!
बाकी आमचे काही आंतरजालीय मित्रवर्य म्हणतात की या लोकांमुळेच अर्थव्यवस्था सुधारते आहे. काय ब्रं क्रावं?
17 Sep 2014 - 12:22 pm | काळा पहाड
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा समान विकास असं नव्हे बरं. अर्थव्यवस्था सुधारणारच की हो सिस्टीम मध्ये लिक्विडिटी वाढली की, त्यात काय नवल? पण त्यामुळे श्री. अंबानींचा फायदा वाढतो फक्त, तुमचा माझा नव्हे.
17 Sep 2014 - 10:59 am | गवि
एक स्त्रीच असल्या कपड्यांना नीटनेटके म्हणून उघड समर्थन करताना पाहून शरमेने मान खाली गेली. स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणतात ते पुन्हा पटले.
अहो असे कपडे घालून नेलपोलिश लावणारी अन दुधीत नखही न खुपसू इच्छिणारी बाई स्वत: घरी स्वैपाक करत असणे शक्य आहे का?
सर्वकाळ किटीपार्ट्यांत मग्न असणार अन ती कच्चीबच्ची कामवाल्या बाईच्या हातची बेचव दुधीची भाजी किंवा घरी मागवलेल्या बाजारु पिझ्झ्याचे तुकडे मोडत टीव्ही पाहात आईची वाट पाहात बसणार..चिमणीची पिल्लं घरट्यात वाट पाहतात तशी.
तुम्हाला आत काहीच कालवत नाही?
17 Sep 2014 - 11:11 am | पैसा
गवि, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझं हृदयपरिवर्तन झालं. आजपासून मी बाजारात निदान दोन तास घासाघीस केल्याशिवाय भाजी विकत घेणार नाही. तसेच वस्त्रांमधे बदल करायचा प्रयत्न करीन. (बादवे वल्कले कुठे मिळतात हो? वल्कलम साडीचा पत्ता सांगू नका. तो मला माहित आहे. :P ) लिपस्टिक नेलपॉलिश फेकून देईन. आणखी काय राहिलं?
(खुद से बातां: हो, वल्लीच्या दगडाच्या दर्पण सुंदर्या पण नटण्यामुरडण्यात कित्ती वर्षं घालवतात बघा! आम्हीच काय घोडं मारलंय?)
17 Sep 2014 - 4:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुलींची खरेदी या आधीही किमान ५ तासाच्या आधी उरकते ह्यावर विश्वास ठेवायला मी तयार नाही. =))
17 Sep 2014 - 5:52 pm | स्वप्नांची राणी
तु वल्कले घालणार...मग रावण तुला पळवणार
दोन बाप्यात युद्ध लावणार....रामायणात महाभारत घडवणार निश्चीत!!
17 Sep 2014 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विदा नै ये कोणता पण मला जीन्स वाल्या स्त्रीया घरात मन लावून काम करीत असतील असे वाट्तच नै.
जीन्स वाल्या स्त्रीयांना सतत दुस-याच्या घरचं कौतुक असतं. दुस-याचं फर्नीचर, गाडी,बंगला, सुख सोयी सुविधा.
यात रमलेले असल्यामुळे किंवा स्वप्नाळु वृत्तीमुळे त्यांना आपलं घर झाडुन घ्यायचंही जीवावर येतं.
सहावारी नौवारी नेसलेल्या स्त्रीयांचं असं नसतं ! त्यांची स्वप्न छोटी असतात आणि घरावर त्यांचं लै प्रेम असतं. (विदा नै पण असं वाटतं )
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 1:03 pm | बॅटमॅन
प्राडॉ, पुलंनंतर तुम्हीच बघा विनोदात =))
20 Sep 2014 - 12:22 am | प्रसक
कुठल्या जगात वावरता तुम्ही????
आजच्या स्त्रिया जीन्स घालतात हे मान्य आहे. बाहेर काम करण्यासाठी नऊवारी कशी सोईस्कर होईल याच स्पष्टिकरण आहे का काही तुमच्याकडे?
संपादीत.
20 Sep 2014 - 12:52 am | सूड
सार्क्याजम कळतां मरें तुका? ना जाल्यार वगी रांव!!
20 Sep 2014 - 10:12 am | यसवायजी
४ वर्षं झाली यांना मिपावर. तरीपण "नया हय यह" ;)
रच्याकने,हे 'वगी रांव' काय अस्तंय राव?
20 Sep 2014 - 10:18 am | पिवळा डांबिस
कोकणीतलं 'वगी रंव'
म्हणजे मराठीत 'गप बस'
-पिवळाशास्त्री डांबिस
कोकणी-मराठी भाषांतरकार
(नांवे नोंदवा, नांवे नोंदवा, नांवे नोंदवा: आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!!)
20 Sep 2014 - 10:30 am | यसवायजी
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली.
बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय.
@ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))
22 Sep 2014 - 3:51 pm | सूड
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!!
हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)
17 Sep 2014 - 10:54 am | सुबोध खरे
साहेब,
काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता.
एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.
17 Sep 2014 - 11:53 am | कहर
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?
17 Sep 2014 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे.
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 12:59 pm | कहर
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।
17 Sep 2014 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना.
बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :)
-दिलीप बिरुटे
17 Sep 2014 - 1:53 pm | कहर
:)
17 Sep 2014 - 10:55 am | विजुभाऊ
पैसा ताई च्या मतांशी सहमत.
काळा पहाड. कशावरून हो ती नॉर्थ इंडीयन असेल?
17 Sep 2014 - 11:08 am | काळा पहाड
तो भैया हो.
बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.
17 Sep 2014 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्या कोणाची?
हे सौ टका पटले ! :) ;)17 Sep 2014 - 4:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.
17 Sep 2014 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)
17 Sep 2014 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
यांचे
17 Sep 2014 - 9:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))...
बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की,
'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.
17 Sep 2014 - 10:08 pm | सूड
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात.
प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्यासदृश दिसणार्या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.
17 Sep 2014 - 10:48 pm | काळा पहाड
तिनं मराठी शिकणं यात वाईट काहीच नाही.
18 Sep 2014 - 12:51 am | बॅटमॅन
या प्रसंगाचे साक्षीदार होतो आम्ही. :)
18 Sep 2014 - 6:57 am | होकाका
१००% सहमत!
Marketing करणार्या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.
17 Sep 2014 - 11:05 am | स्मिता श्रीपाद
धागा १००+ गाठणार तर....
चालु दे....
17 Sep 2014 - 11:17 am | स्पंदना
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे.
या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?
17 Sep 2014 - 11:32 am | गवि
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे..
बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत.
मुलांकडून काय अपेक्षा करणार ?
17 Sep 2014 - 1:29 pm | विजुभाऊ
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत.
रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.
17 Sep 2014 - 1:38 pm | गवि
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.
17 Sep 2014 - 1:49 pm | विजुभाऊ
.
हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती.
मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे.
आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते.
आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....
17 Sep 2014 - 11:46 am | अनुप ढेरे
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
17 Sep 2014 - 1:31 pm | विजुभाऊ
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.
18 Sep 2014 - 12:20 am | धन्या
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत.
बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.
17 Sep 2014 - 2:42 pm | समीरसूर
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?
पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो.
त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्यावर हसू ठेवणार्या बायकांना सलाम! :-)
या पार्श्वभूमीवर नवर्यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.
17 Sep 2014 - 2:46 pm | बॅटमॅन
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.
17 Sep 2014 - 2:50 pm | प्रभाकर पेठकर
त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे.
अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत.
म्हणजे, बा
17 Sep 2014 - 2:56 pm | समीरसूर
नक्कीच आहेत. पण घराचा गाडा ओढणार्या बायकांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असावे.
17 Sep 2014 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर
सहमत आहे. पण नवर्यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे).
नवर्याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्या बायकाही कमी नाहीत.
17 Sep 2014 - 6:31 pm | कंजूस
याच विचाराला धरून मालिकेत चादर कोणी बदलायची याची चारजणी बारी लावतात.
17 Sep 2014 - 7:43 pm | शिद
मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच बिनडोक मालिका - होणार सून मी ह्या घरची.
20 Sep 2014 - 4:10 pm | खबो जाप
मला काहीच आठवत नाही हो ……
17 Sep 2014 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्यावर हसू ठेवणार्या बायकांना सलाम!
आपलाही सलाम
18 Sep 2014 - 4:43 pm | सुहास पाटील
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !!
खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?
17 Sep 2014 - 3:00 pm | कहर
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?
खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी
17 Sep 2014 - 3:02 pm | अनुप ढेरे
http://www.misalpav.com/node/28713
या धाग्यावर त्याच्यावरूनच रण पेटलय की...
17 Sep 2014 - 3:04 pm | समीरसूर
खरोखर उत्तर मिळणार असेल तरच चर्चेला अर्थ आहे
बाप्येच बडबडणार असतील तर प्रत्येक शब्द व्यर्थ आहे...
17 Sep 2014 - 3:07 pm | गवि
स्वत:साठी घालतात हो.. तुमाला झंटलमन लोकाना एवढेही कळत नाय?
17 Sep 2014 - 3:15 pm | बॅटमॅन
लक्ष वेधून घेण्यासाठी कपड्यांचा वापर करावा लागतोय म्हणजे लैच वाईट दिवस आले असावेत बहुधा.
17 Sep 2014 - 5:31 pm | कवितानागेश
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल.
१. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण)
२. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.)
३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.)
४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा)
५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा)
६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!)
७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं)
८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी)
अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..
17 Sep 2014 - 7:46 pm | सुहास..
हा हा हा हा हा हा
अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील.. >>>
येवु दे अजुन !
18 Sep 2014 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सही रे सही !
-दिलीप बिरुटे
20 Sep 2014 - 11:50 am | मंदार कात्रे
+१
20 Sep 2014 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते.
यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)
17 Sep 2014 - 11:40 am | सस्नेह
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत !
बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?
17 Sep 2014 - 11:48 am | टवाळ कार्टा
शीतावरुन भाताची परिक्षा
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?
17 Sep 2014 - 11:56 am | कहर
ट्रेलर पाहून सिनामाची गुणवत्ता ठरवणाऱ्या नवीन पिढीसाठी अज्जिबात नाही
17 Sep 2014 - 12:09 pm | पोटे
मॉलमध्ये असे वागतात का ?
17 Sep 2014 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
च्यायला,
सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला.
पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो.
तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते.
पैजारबुवा,
17 Sep 2014 - 12:26 pm | सस्नेह
17 Sep 2014 - 12:33 pm | टवाळ कार्टा
=))
21 Sep 2014 - 2:32 am | सुहास झेले
अगदी अगदी =))
17 Sep 2014 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना:
हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)
17 Sep 2014 - 1:11 pm | प्रभाकर पेठकर
>>>>आता तुम्चं तुमीच सांभाळा !
आमचं आम्ही नेहमीच सांभाळतो, बरं! काळजी नसावी.
17 Sep 2014 - 12:56 pm | मनीषा
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:
कहर झाला आता .
त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .
17 Sep 2014 - 1:19 pm | अनुप ढेरे
माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला?
17 Sep 2014 - 1:19 pm | बॅटमॅन
नाही नाही. माँर्डंन.
17 Sep 2014 - 1:58 pm | मनीषा
. माँर्डंन
हा हा तेच ते
17 Sep 2014 - 1:55 pm | मनीषा
माँडंर्न
हे कसं म्हणायचं?
17 Sep 2014 - 2:13 pm | बॅटमॅन
म्हणायचं नाही, फक्त अनुभवायचं =))
17 Sep 2014 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते ट्रेड सिक्रेट हाय. त्या समजण्यासाठी 'मोजी'भौंची शिकवणी लावायला लागते ! :)
17 Sep 2014 - 1:06 pm | कवितानागेश
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी.
भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)
17 Sep 2014 - 1:55 pm | कहर
बस्स …. फक्त तुम्हालाच समजले । :)
17 Sep 2014 - 5:48 pm | स्वप्नांची राणी
खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..
17 Sep 2014 - 6:03 pm | सूड
आवरा!!
20 Sep 2014 - 9:56 am | कानडाऊ योगेशु
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!
17 Sep 2014 - 1:14 pm | बॅटमॅन
इतके नियम धडाधड मोडणार्या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?
17 Sep 2014 - 1:27 pm | काळा पहाड
17 Sep 2014 - 2:13 pm | बॅटमॅन
हे चित्र बघून काही रोचक टिप्पण्या कराव्याशा वाटताहेत, पण संमं पंख लावणार त्या प्रतिसादाला म्हणून थांबतो. :)
17 Sep 2014 - 2:22 pm | टवाळ कार्टा
व्यनी करावा ही विणंती विशेष
17 Sep 2014 - 2:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा
जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा
पैजारबुवा
(फोटु अंजा वरुन साभार)
17 Sep 2014 - 2:19 pm | बॅटमॅन
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!
17 Sep 2014 - 2:30 pm | ज्ञानोबाचे पैजार
आता तु मेला बेट्या
पैजारबुवा
(परत एकदा फोटु अंजा वरुन साभार)
17 Sep 2014 - 2:37 pm | बॅटमॅन
आयो...मेलो मेलो मेलो...हे बॅटमोबिल, मुझे पळा ले रे बाबा पळा ले..
17 Sep 2014 - 5:02 pm | इरसाल
ती ललना नाही तो लल्लन असावा. (चुभु देघे. ज्यायला ते माकड की माकडीन हे किलेर झाले तर हा तोडगा काढता यावा)
17 Sep 2014 - 1:16 pm | कवितानागेश
हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी पाच किलो मिरची घेतली??? :P
...............
लोणचं घालेल की धुरी देइल? एक्स्पर्ट्स कोमेन्ट्स प्लीज.
17 Sep 2014 - 1:18 pm | बॅटमॅन
यांपैकी काहीच नाही. ओएलेक्स किंवा ईबेवर विकून टाकेल =))
17 Sep 2014 - 1:34 pm | विजुभाऊ
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे?
तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल
रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.
17 Sep 2014 - 3:30 pm | सूड
पांढरं तिखट पुण्यात कुठे मिळतं म्हणे?
17 Sep 2014 - 6:15 pm | विजुभाऊ
स पेठेत. ज्ञानप्रबोधिनी जवळ विचारा. नक्की मिळेल
17 Sep 2014 - 6:21 pm | गवि
किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत आणि कोणकोणत्या वारी?
..ते विसरलात सांगायचे.
17 Sep 2014 - 6:31 pm | बॅटमॅन
आणि नेमक्या कुठल्या शब्दांत?
झालंच तर प्रत्येक प्रश्नाला अलौड असलेला कमाल वेळ किती?
तेही राहिलंच की.
19 Sep 2014 - 10:58 am | विजुभाऊ
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास.
इतका पत्ता बास झाला का?
आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.
19 Sep 2014 - 11:15 am | काळा पहाड
हत्ती गणपतीजवळ होकायंत्र कुठे मिळते का?
17 Sep 2014 - 3:13 pm | सुहास पाटील
५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची . कधी बाजारात जाता कि नाही
17 Sep 2014 - 3:31 pm | सूड
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची
काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!
17 Sep 2014 - 3:27 pm | भावना कल्लोळ
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.
17 Sep 2014 - 4:21 pm | इरसाल
पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.
तिला काय तिचाच खर्डा होणार.
17 Sep 2014 - 4:31 pm | भिंगरी
बाबौव ...........
किती धावाधाव होईल?
17 Sep 2014 - 6:22 pm | विजुभाऊ
पाच किलो मिर्ची सामुदायीक धुरी देण्यासाठी उपयोगी पडेल
17 Sep 2014 - 1:18 pm | जेपी
काय खंग्री धागा आणी चर्चा चालु आहे.
धाग्यावर येत राहिन.
=))
17 Sep 2014 - 2:23 pm | सस्नेह
घाला हो कुणीतरी एक फर्मास विडंबन ..
17 Sep 2014 - 3:20 pm | पिंपातला उंदीर
आलि लहर केला कहर
17 Sep 2014 - 3:31 pm | सूड
आयडी बाकी नावाला जागला हो!! ;)
17 Sep 2014 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा
क ह र आहे एकं-दरीत! =))
17 Sep 2014 - 4:12 pm | अजया
अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं नख भैयाला दाखवुन दाखवुन भाजी घेतली,लांबुनच दाखवुन पण पोराने एकदम चवीने खाल्ली हो!!काय हा कहर?!!