✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेवणाची चव

क
कहर यांनी
Wed, 09/17/2014 - 09:04  ·  लेख
लेख
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे. काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना" बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले bazar
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53778 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

असेच वाटले होते पण खात्री

यसवायजी
Sat, 09/20/2014 - 10:30 नवीन
असेच वाटले होते पण खात्री करुन घेतली. बाकी पिडांकाका, तुमच्याकडे शिकवणी लावण्यास अपुन तय्यार हय. @ सुलभ दर >> हा शबुद फकस्त एकाच ठिकाणी वाचून सवय हाय त्यामुळे :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द

सूड
Mon, 09/22/2014 - 15:51 नवीन
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द सुलभ दरात शिकविले जातील!! हायला अपशब्द !! मग तर शिकायलाच पाह्यजे. शिकवणी कधीपासून ते बोला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

साहेब,

सुबोध खरे
Wed, 09/17/2014 - 10:54 नवीन
साहेब, काळा चष्मा काढा. एक काळ असा होता जेंव्हा आपण मिळवत असलेल्या पगाराचा मोठा हिस्सा हा अन्नधान्याच्या खरेदीत जात असे. आता परिस्थिती तशी नाही. चार ठिकाणी विचारून आणि चौकशी करून आपण फारतर दहा रुपये वाचवाल म्हणजे महिन्याला तीनशे.एवढे पैसे तर आपण मिसळपाव च्या रुंद पट्ट्यासाठीचा वापरता/फुकट घालवता. एके काळी या तीनशे रुपयांची किंमत दहा हजारा एवढी होती. आमच्या घराजवळ एक दोन भाजीवाले आहेत जे उत्तम दर्ज्याची भाजी ठेवतात भाव थोडा जास्त असतो पण निवडून घ्यायची गरज नाही. आमची आई एके काळी आपण म्हणता तशी चिकित्सा करीत भाजी विकत घेत होती पण आता ती म्हणते कि कुठे कटकट करायची चार पैसे जास्त गेले तरी चालतात.भाजी किडकी खराब निघाली असे होत नाही. आमची आई जुन्या पिढीतीलच आहे ( वय ७०+) आणि तिने चेहेर्याला पावडर सोडून कोणतेही प्रसाधन लावलेले नाही कि साडी शिवाय कोणताही पेहराव केलेला नाही. आमच्या आईच्या जेवणाची चव आजही तशीच आहे.
  • Log in or register to post comments

तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल

कहर
Wed, 09/17/2014 - 11:53 नवीन
मान्य आहे कि तुमच्या घराजवळील भाजीवाले चांगली भाजी देतात … पण जर कधी तुमच्या आईने बाजारातून निवडून भाजी आणली आणि तुमच्या त्या भैय्या भाजीवाल्याने भाजी दिलि तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कहर करताय राव तुम्ही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/17/2014 - 12:30 नवीन
भैय्या वाल्यालाच प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण त्याने धावपळ वाचवली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

राव मै क्या बोल रहा हू तुम

कहर
Wed, 09/17/2014 - 12:59 नवीन
राव मै क्या बोल रहा हू तुम क्या बोल रहे हो। मी भाजीके बारेमे बोल रहा हू । मै आई के बारेमे बोल रहा हू ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेरे को भी नै समझरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/17/2014 - 13:40 नवीन
मै भी तो आईकेच बारे मे बोल रहा हु. आई की धावपळ भैय्याने बचायी है ना. बाकी थ्यांक्स..! अर्धा सुटीचा दिवस आपल्यामुळे छान गेला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

(No subject)

कहर
Wed, 09/17/2014 - 13:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा ताई च्या मतांशी सहमत.

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 10:55 नवीन
पैसा ताई च्या मतांशी सहमत. काळा पहाड. कशावरून हो ती नॉर्थ इंडीयन असेल?
  • Log in or register to post comments

तो भैया हो.

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 11:08 नवीन
तो भैया हो. बाकी ती बाई मराठीच असणार. भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? बहुधा नवश्रीमंतांपैकी असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

भैया लोकांशी हिंदीतून

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/17/2014 - 12:49 नवीन
भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्‍या कोणाची? हे सौ टका पटले ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

णाही. भैय्या दिसला की माझी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/17/2014 - 16:54 नवीन
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)). सगळ्यांनी प्रयत्न करुन बघा. हिंदी बोलायचचं नाही भैय्याशी आणि लुंगीवाल्यांशी. फायदे दोन आहेत, एक म्हणजे मराठीत बोलल्याचं समाधान आणि दुसरं म्हणजे ह्या लुंग्या-सुंग्याना मोडकं-तोडकं का होईना पण मराठी मधे बोलायला लावल्याचं समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/17/2014 - 17:57 नवीन
भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आपण शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी रिक्षावाले, टॅक्सीवाले यांचे मोडकेतोडके हिंदी बोलातात त्याचा नक्की राग येतो. "अरे बाबा, मी मराठी बोलतोय. तूही मराठी आहेस. तेव्हा हिंदीवर अत्याचार करण्याऐवजी माझ्याशी मराठीतच बोल." असे म्हतले तरी एखाद्या मराठी वाक्यानंतर त्यांची गाडी परत तुटक्या हिंदीकडेच जाते असा अनुभव आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

यांचे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/17/2014 - 17:58 नवीन
यांचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यांना हिंदीत बोलु द्यायचं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/17/2014 - 21:39 नवीन
त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. =))... बाकी मधे एकदा मुंबईला जाताना एक लुंगीछाप टी.सी. होता. तो मा़झ्यासमोरच्या एका मराठी माणसाला म्हणाला की, 'तुम मराठी लोग मुफ्त मे मिला तो कुत्ता भी खा जायेगा'. त्याची शुद्ध मराठीतुन अक्कल काढली होती. लुंगी सुटायची वेळ आली होती त्याची. साले माजुरडे बाहेरुन येऊन आपल्यालाचं शिव्या देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं

सूड
Wed, 09/17/2014 - 22:08 नवीन
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. आपण मराठीतचं बोलायचं. थोड्या वेळानी झक मारत मराठीत बोलतात. प्रचंड सहमत!! मागे एकदा भाज्याची लेणी बघून लोकलने येताना उत्तरभारतीयीणीनं असंच डोकं सटकवलं होते. चार शब्द ऐकवल्या वर 'अब ऐस्सी मराठ्ठी सिख के जाऊंगी यहॉं से के बस देखते रेना' असा तोंडाचा पट्टा तिच्या नवर्‍यासदृश दिसणार्‍या प्राण्याकडे आकुर्डीला उतरेस्तवर सुरु ठेवला होता तिने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तिनं मराठी शिकणं यात वाईट

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 22:48 नवीन
तिनं मराठी शिकणं यात वाईट काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

या प्रसंगाचे साक्षीदार होतो

बॅटमॅन
गुरुवार, 09/18/2014 - 00:51 नवीन
या प्रसंगाचे साक्षीदार होतो आम्ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

१००% सहमत!

होकाका
गुरुवार, 09/18/2014 - 06:57 नवीन
१००% सहमत!
णाही. भैय्या दिसला की माझी म्हराठी अस्मिता जागी होते. मग तो मोडक्या-तोडक्या मराठीत आणि मी शुद्ध मराठीमधे अशी कसरत चालु होते. =)).
Marketing करणार्‍या पोरापोरींचा फोन आला की मी शुद्ध मराठीत बोलायला सुरुवात करतो. त्यांना सांगतो की मला फक्त मराठीच कळतं. त्रासदायक असे अर्घे फोन आपसूक बंद होतात. तसंच restuarants, malls मध्ये. कष्टमवर असल्याने त्यांना झक्कत मराठीत बोलावंच लागतं आणि ते सुद्धा चेहेरा गोड ठेवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धागा १००+ गाठणार तर....

स्मिता श्रीपाद
Wed, 09/17/2014 - 11:05 नवीन
धागा १००+ गाठणार तर.... चालु दे....
  • Log in or register to post comments

आमच्याकडे आई कध्धीच भाजी

स्पंदना
Wed, 09/17/2014 - 11:17 नवीन
आमच्याकडे आई कध्धीच भाजी आणायची नाही. नेहमी बाबाच आणायचे. या चिमुरडीचे बाबा का बरे भाजी आणात नाही आहेत? किती बर त्या आईने करायचं? आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला?
  • Log in or register to post comments

बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे

गवि
Wed, 09/17/2014 - 11:32 नवीन
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे बाप..स्नानसंध्या, परवचा , संस्कार यांची जबाबदारी धुडकावून क्लबात दारु पीत बिझनेस वाढवत बसायचे.. बाहेर बापाच्या चपला वाजल्या की पोरांची डोकी अभ्यासाच्या पुस्तकात जात.. ती बापांची पिढी आता गेली. आता बाप लोक दारु पैसा अन लाचखोरीच्या मार्गाला लागलेत. मुलांकडून काय अपेक्षा करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 13:29 नवीन
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप लोक तसलेच. उगाच नाही पब आणि बाप या दोन्ही शब्दांत सारखीच अक्षरे आहेत. रमा आणि मार तसेच मर आणि रम या शब्दांचेही तसेच नैका. आपल्या संस्कृतीने भाषेवर सुद्धा कित्त्त्त्त्त्त्त्ती छाआआआआआआन संस्कार केलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विजुभाऊ, मुळात पाश्चात्य

गवि
Wed, 09/17/2014 - 13:38 नवीन
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य देशांनी आपल्या देशाची नवी कोवळी पिढी मुळातूनच पोखरण्यासाठी हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे कोक, पेप्सी, जंकफूड,

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 13:49 नवीन
हे कोक, पेप्सी, जंकफूड, पिझ्झे, मद्यसंस्कृती, तोकडे कपडे या गोष्टी इकडे पाठवल्या आहेत हे षडयंत्र कोणाच्याच लक्षात येत नाही हे आजच्या भारताचे दुर्दैव
. हे आजचे नाही. पुरातन काळी सोमरस वैग्रे असायचे. त्यावेळेस तर मोठमोठ्ठे ऋषी देखील सोमयाग करायचे. यज्ञाच्या नावाखाली बार्बेक्यू करायचे. तोकडे कपडे तर आपल्या सारख्या देशाला नवे नाहीत. आपली मुळी वल्कल संस्कृती होती. मोंगल आले आणि त्यानी त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे आपल्यावर लादले. अन्यथा आपले बहुतेक पुरण पुरुष अर्धवस्त्र असायचे. आपण आपला दैदीप्यमान इतिहास विसरलो हीच आपली मोठ्ठी घोडचूऊऊऊऊऊऊऊक आहे. अन्यथा त्या पाश्चात्य देशांतील भुरट्या गोष्टीनी कशाला आपल्याला काही झाले असते. आपल्या संस्कृतीतील गांजा ( सोमवल्ली) , अफू , भांग या पुढे तंबाखु / विदेशी दारू क्षुल्लकच की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे

अनुप ढेरे
Wed, 09/17/2014 - 11:46 नवीन
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 13:31 नवीन
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे संस्काराचा भाग का आहे?
हे काय बोलणं झाल्लं भौ. श्रावणीला पंचगव्य खाणे हा देखील संस्काराचाच भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आमच्या संस्कृतच्या मास्तरीण

धन्या
गुरुवार, 09/18/2014 - 00:20 नवीन
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण बाईंनी वर्षभर रामरक्षा घोकून घेतली होती. संस्कार बिंस्कार होणे खुप दुरची गोष्ट आपण जे घोकतोय त्याचा अर्थ काय असावा हे ही कधी कळले नाही. आम्ही कधी सार्थ रामरक्षा वाचली नाही, मास्तरीण बाई कधी अर्थ समजावून देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. बरं लोक म्हणतात तसे उच्चार स्पष्ट होतात, जीभेला वळण लागते वगैरे म्हणतात तसेही काही झाले नाही. "आत सज्जा धनुषा विशूष स्पूशा" वगैरे म्हणताना जीव अगदी मेताकुटीला यायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हाहाहा...

समीरसूर
Wed, 09/17/2014 - 14:42 नवीन
>>> आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. तिने गचाळ राहुन चालत नाही. वर तिने कमवुन आणलेलं स्वतःच बाजारात जाउन विकत आणुन घरच्यांना खायला घालायच. बाबा काय बरे करत असतील? कोठे मित्रांबरोबर अड्डा जमवला असेल? की कोठे बार मध्ये पित बसले असतील? घरी रामरक्षा वगैरे संस्कार हे बाबालोक करत असतील का? भाजी आणताना सुद्धा त्या बाळाची जबाबदारी तिच्या बापाने घेउ नये? कोणी सांगितलय प्रोजेक्ट अन फिजेक्ट करायला? पटलं. विशेषतः बोल्डमधलं जास्त पटलं. पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं. पण पुरुषांपेक्षा घरातल्या बायका (कमवत्या असल्या तर अधिकच आणि कमवत्या नसल्या तरीही कमवत्या नवर्‍यापेक्षा नक्कीच जास्त) नवर्‍यापेक्षा जास्त कामे करतात असे मला वाटते. नवरा कामावर गेला म्हणजे त्याची ९-१० तास बर्‍याच कटकटीच्या कामांतून सुटका होते. शिवाय कामाच्या ठिकाणी मन रमावे असे बरेच काही असते. कँटीन, गप्पा, इंटरनेट, वातानुकुलन, छान छान दिसणार्‍या मुली/बायका, त्यांच्याशी थोडे मनाला गुदगुल्या करणारे फ्लर्टिंग, चहा-बिडीचे हक्काचे ब्रेक्स, लंचटाईममधला टाईमपास, वगैरे. आमच्या कंपनीत शुक्रवारी पोरींना अक्षरश: ऊत येतो. कंपनीचे नियम आहेत म्हणून नाहीतर पोरी वन पीस बिकीनीतच आल्या असत्या (हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय?). असो. त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. आणि ही कामे खरोखर किचकट आणि कंटाळवाणी आहेत. कमवती बायको असेल तर तिची तर कमालच आहे. घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! :-) या पार्श्वभूमीवर नवर्‍यांनी घरातल्या काही कामांना हातभार लावणे आणि बायकोला थोडा दिलासा मिळेल असे वागणे ही काळाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पण बायकांनादेखील हँडसम, पाच

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 14:46 नवीन
पण बायकांनादेखील हँडसम, पाच आकडी पगार असणारा, शहरात राहणारा, किमान एक फ्लॅट नावावर असणारा नवरा हवा असतो हे ही खरं.
हे पाहिजे असणं नैसर्गिक अन सेक्सी बायको पाहिजे असणं म्हणजे हावरटपणा आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

नवरेही करतात.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/17/2014 - 14:50 नवीन
त्यामानाने बायकांचे आयुष्य थोडे कटकटीचे असते. स्वयंपाक, मुले, घराची स्वच्छता, बाजार, भाजी, मुलांचा अभ्यास, त्यांच्या विविध स्पर्धांची तयारी, चहा-नाश्ता, पाहुण्यांची सरबराई, कुठे काही तुटले मोडले ते दुरुस्त करणे, घरातल्या प्रत्येकाला आवडेल असा स्वयंपाक करणे आणि वागणे, बोलणे, घरात कलह न होऊ देणे, नातेवाईकांचे समारंभ लक्षात ठेवणे, आवश्यक फोन्स करणे...यादी खूप मोठी आहे. अगदी हिच सर्व कामे, नोकरी करून आणि कुरकुर न करता, करणारे अनेक नवरे (माझ्यासकट) पाहिलेले आहेत. म्हणजे, बा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मेजॉरिटी

समीरसूर
Wed, 09/17/2014 - 14:56 नवीन
नक्कीच आहेत. पण घराचा गाडा ओढणार्‍या बायकांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/17/2014 - 16:59 नवीन
सहमत आहे. पण नवर्‍यांच्या कित्येक वाईट सवयी त्यांना त्यांच्या बायकांनीच लावलेल्या असतात. (माझ्या काळा बद्दल बोलतो आहे). नवर्‍याने हातात कुंचा घेऊन कचरा काढणे, स्वयंपाक करणे, बायकोच्या कपड्यांच्या घड्या घालणे, गिरणीत दळण नेणे/आणणे, भाजी आणणे आदी अनेक कामांना कांही बायका विरोध करतात. 'आमच्या ह्यांना अगदी माझ्या हातचा गरम गरम स्वयंपाकच लागतो.' 'आमच्याकडे तिन्ही वेळेला ताज्या गरम गरमच पोळ्या पानात पडाव्या लागतात.' वगैरे वाक्य अगदी अभिमानाने मिरविणार्‍या बायका पाहिल्या आहेत. मुलांना (मुलग्यांना), नवर्‍यांना चुकीच्या पद्धतीने लाडावून ठेवणार्‍या बायकाही कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

याच विचाराला धरून मालिकेत

कंजूस
Wed, 09/17/2014 - 18:31 नवीन
याच विचाराला धरून मालिकेत चादर कोणी बदलायची याची चारजणी बारी लावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच

शिद
Wed, 09/17/2014 - 19:43 नवीन
मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच बिनडोक मालिका - होणार सून मी ह्या घरची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मला काहीच आठवत नाही हो ……

खबो जाप
Sat, 09/20/2014 - 16:10 नवीन
मला काहीच आठवत नाही हो ……
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

+१ प्रतिसाद आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/17/2014 - 14:51 नवीन
>>>>घरातल्या स्त्रीने नेहमीच एका मर्यादेत वागणे-बोलणे अपेक्षित असते. शिवाय घरातल्या पुरुषांची अरेरावी सहन करावी लागते ते निराळेच. निमूटपणे इच्छा नसतांना नवर्‍याच्या हो ला हो म्हणावे लागते. निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच. एवढं सगळं करून चेहर्‍यावर हसू ठेवणार्‍या बायकांना सलाम! आपलाही सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित

सुहास पाटील
गुरुवार, 09/18/2014 - 16:43 नवीन
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित असतेच !! खरे कि काय? कि आजकाल बायकाच घरातले सगळे निर्णय घेतात फक्त व्यवहार सोडून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही नाही कळले हे

कहर
Wed, 09/17/2014 - 15:00 नवीन
हे मला कळले नाही अजून कधीच, असे कपडे घालण्यामध्ये मुलींचा नेमका काय उद्देश असावा? म्हणजे डीप नेक किंवा सौष्ठव दाखवणारे कपडे घालणे याचा उद्देश काय? कुणी सांगू शकेल काय? खरे तर मलाही नाही कळले हे… याच्यावर चर्चा व्हायलाच हवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

http://www.misalpav.com/node

अनुप ढेरे
Wed, 09/17/2014 - 15:02 नवीन
http://www.misalpav.com/node/28713 या धाग्यावर त्याच्यावरूनच रण पेटलय की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

:-)

समीरसूर
Wed, 09/17/2014 - 15:04 नवीन
खरोखर उत्तर मिळणार असेल तरच चर्चेला अर्थ आहे बाप्येच बडबडणार असतील तर प्रत्येक शब्द व्यर्थ आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

स्वत:साठी घालतात हो.. तुमाला

गवि
Wed, 09/17/2014 - 15:07 नवीन
स्वत:साठी घालतात हो.. तुमाला झंटलमन लोकाना एवढेही कळत नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

लक्ष वेधून घेण्यासाठी

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 15:15 नवीन
लक्ष वेधून घेण्यासाठी कपड्यांचा वापर करावा लागतोय म्हणजे लैच वाईट दिवस आले असावेत बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अनेक उत्तरे खरी आहेत.

कवितानागेश
Wed, 09/17/2014 - 17:31 नवीन
कदाचित प्रत्येकीचं उत्तर वेगळं असेल. १. प्रचन्ड उकाडा- त्यामुळे फार कपडे सहन होत नाहीत. (सरळ कारण) २. हल्ली तसेच मिळतात. फॅशन आहे. शिम्पी तसेच शिवतो. (लाटेत वाहाणं.) ३. अमकीतमकी हिरॉईन हेच घालते. (हे सगळ्यात मोठं कारण.) ४. बॉयफ्रेन्डला आवडतं. (वेडेपणा) ५. ज्याला बॉयफ्रेन्ड बनवून घ्ययचय, त्याला आवडेल असं वाटतं. (अजून एक वेडेपणा) ६. लोक लक्ष देतात (?). मस्त वाटतं. (नाहीतर घरात कुणी लक्षच देत नव्हतं!) ७. मी किती सुंदर दिसते! ते दाखवायलाच हवं. (स्वतःला वस्तू समजून मिरवणं) ८. लोक बघत बसतात. त्यांना गंड्वता येतं.( हुशारी/लबाडी) अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हा हा हा हा हा हा

सुहास..
Wed, 09/17/2014 - 19:46 नवीन
हा हा हा हा हा हा अशीच अजून पुष्कळ कारणं मिळतील.. >>> येवु दे अजुन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१ प्रतिसाद आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/18/2014 - 08:05 नवीन
सही रे सही ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सहमत!

मंदार कात्रे
Sat, 09/20/2014 - 11:50 नवीन
आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आजकाल प्रत्येकाला कमावती

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/20/2014 - 12:19 नवीन
आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते. यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

अहो मग तुम्हीच जात जा ना

सस्नेह
Wed, 09/17/2014 - 11:40 नवीन
अहो मग तुम्हीच जात जा ना भाजी खरेदीला ? क्वालिटी भाजीपण मिळेल अन वेळही मस्त जाईल जीन्स टीशर्ट बघत ! बायकांनीच भाजी खरेदी करायचं पेटंट घेतलंय का ?
  • Log in or register to post comments

शीतावरुन भाताची परिक्षा

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 11:48 नवीन
शीतावरुन भाताची परिक्षा
ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची.
हे म्हणजे त्या भाजीवाल्याचे नुस्कान नाही का? आधीच कोणितरी नख खुपसलेली काकडी/दुधी कोण घेणार?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा