पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
10 Sep 2014 - 10:25 am | इरसाल
हिंदुस्तानी* असुन घरात पाकिस्तानी सिरीयल्स पाहिल्या जात आहेत. तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे. कुठेही उत्तान भडकपणा नाहिए.
10 Sep 2014 - 10:34 am | भिंगरी
कलेला जात धर्म इ.ची बंधने नसावीत.
10 Sep 2014 - 11:24 am | आदूबाळ
पाकिस्तानी मराठी शिरियला असतात काहो कवितातै?
10 Sep 2014 - 1:19 pm | काळा पहाड
हे चॅनल बंद करायला हवं. कुठल्याही पाकिस्तानी गोष्टी ला सपोर्ट करणं हा राष्ट्रद्रोह आहे. तिथे पाकिस्तान भारतीय सैनिकांची मुंडकी तोडतोय आणि आपण त्या देशाशी अजूनही युद्ध स्थितीत आहोत हे विसरून आमचे लोक त्यांची सिरियल बघत बसतायत. बाकी कलाकारांना देशाची बंधनं नसतात, दोन्ही कडचे लोकांना वैर नसतं वगैरे म्हणजे निव्वळ बावळट्पणा आहे (http://www.rediff.com/news/report/average-pakistani-doesnt-like-india-su...). जरा ती झापडं काढा आणि त्या सियाचीन ग्लेसियर वर वजा चाळीस डिग्रीवर खडा पहारा देणार्या आणि मरणार्या सामान्य सैनिकांनी हे ऐकलं तर काय वाटेल याचा विचार करा. यूसलेस.
10 Sep 2014 - 2:12 pm | hemants.gokhale
आप्ल्य सेरिअल्स बोरे आहेत हे खरे पन तरि पाकिस्तनि पहु नाका हो..
10 Sep 2014 - 2:16 pm | कविता१९७८
झी वाल्यांचीच वाहीनी आहे ना , आणि सीरीयल्स मधे आक्षेपार्ह असे काही नाहीये.
10 Sep 2014 - 2:34 pm | काउबॉय
तर पाकिस्तानी सिरिअल जरुर बघा.
10 Sep 2014 - 3:10 pm | काउबॉय
पाकिस्तान शत्रु आहे पण त्यातून काही आपल्या भल्याचे अनुभवायला मीळत असेल तर एका मर्यादेपर्यंत सावधपणे होउदे खर्च.
10 Sep 2014 - 3:17 pm | प्रसाद१९७१
तुम्ही जो खर्च करता आहात तो पाकीस्ताना त जातो आहे. आणि पाकीस्तानात गेल्यावर त्यातला काही भाग भारताच्या विरुद्ध वापरला जाणार आहे.
10 Sep 2014 - 3:31 pm | काउबॉय
लोक भारतीय/अभारतीय कलाकारांच्या पण पायरेटेड सीडी घेतात ना ? तो पैसा खरा भारताविरोधी जातो.
10 Sep 2014 - 3:34 pm | काळा पहाड
नाही नाही, बघाचहो तुम्ही त्या 'सकस' सिरियल्स.
10 Sep 2014 - 3:38 pm | काउबॉय
या अर्थ शास्त्राच्या नियमाचा अवश्य अभ्यास करा. कपाळात गोट्या जातील अशी सत्ये समोर येतील
10 Sep 2014 - 4:16 pm | काळा पहाड
पण ते सगळं करायला आपण राजकारणी थोडेच आहोत? आपण देशावर प्रेम असण्याची कल्पना करणारे कॉमन मेन आहोत. आपल्या राग लोभाच्या कल्पना या कायम शुभ्र पांढर्या किंवा शुभ्र काळ्या अशाच असणार. जवानांच्या रक्ताने माखलेला गॉगल घालून या सिरियल पहायला आपलं मन मेलेलं थोडंच आहे?
10 Sep 2014 - 6:03 pm | काउबॉय
पायरटेड सीडी विकत घेणे अथवा त्या लोकांच्या होस्ट वरून डाउनलोड करून बघणे जीवंत मनाचेच लक्षण आहे की....
चालुद्या.
10 Sep 2014 - 6:11 pm | काउबॉय
निवडक पाकिस्तानी सिरिअल अधिकृतपणे बघाव्यात याचे समर्थन केलेले नाही.
10 Sep 2014 - 6:13 pm | काळा पहाड
पण मी अशा पायरेटेड सीडी बघाव्यात किंवा डॉट पीके साईट वरून डाऊनलोड कराव याचं समर्थन कुठं केलंय? उलट मी तर दुसर्या बाजूने प्रतिवाद करतोय.
10 Sep 2014 - 6:35 pm | काउबॉय
त्यानुशंगाने भारतीय सिरियलच्या तुलनेत काही चांगले बघायला मिळत असेल तर ते बघावे इतकेच अभिप्रेत करणारे प्रतिसाद लिहले आहेत.
10 Sep 2014 - 7:06 pm | काळा पहाड
सांस्कृतिक सभ्यतेची माझी कल्पना मुंडकं कापून घेण्यापेक्षा थोडी वेगळी आहे. तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना की हा पाकिस्तान वेगळा आणि तो मुंडकं कापणार्यांचा वेगळा? तुम्हाला ते आवडत असेल ते तुम्ही अनुभवून पाहणं ही तुमची मर्जी.
10 Sep 2014 - 6:51 pm | भिंगरी
भारतीय वाहिनीवरच त्या पहात आहेत,
असं असेल तर त्या दाखवल्या का जातात?
बंदीच घालावी ना मग सरकारने.
10 Sep 2014 - 2:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुमच्या वर्णना नुसार ह्या मालिकांमध्ये "तहजीब" वर भर दिलेला दिसतो! आपल्याकडे भाषे मुळे ही निर्मिती मुल्य ह्रास होते असे एक मला प्रामाणिकप्णे वाटते, उदा. स्टार प्लस वर एखादी डेली सोप आहे, त्यात बेस प्लाट हां एका मराठी परिवारा भोवताली फिरतो पण त्यात तो अभिनय करणारे एक्टर्स एक्ट्रेस हे नॉर्थ/साउथ/ईस्ट इंडियन असणार! त्यामुळे निर्मात्यास त्या चुकीच्या एक्सेंट चे ज्ञान असते, ते कवर अप करायला मग , गणेश पुजनाचे भड़क चित्रण, कृत्रिम हाव भाव उसासे इत्यादी भरती होतात
10 Sep 2014 - 2:49 pm | इरसाल
मतपरिबर्तन झाले आहे.
परराष्ट्रमंत्र्यांना मी खुले पत्र लिहायचे ठरवले आहे. यापुढे त्यानी कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला, भले तो साधा किंवा कलाकार असो, व्हिसा-बिझा दिला* तर त्यांची खैर नाही.
यापुढे दुसरी शपथ अशी की गणपती, नवरात्री, दिवाळी वगैरे साठी चायनिस* डेकोरेशन किंवा तत्सम सजावटीच्या वस्तु वापरणार नाय.
मिपावर कोणाकडे चायनिज कंपनीचा मोबाईल असेल तर त्यांनी माझ्यापासुन सांभाळुन रहावे. बादमे नय बोल्नेका कि बताया नय कर्के !
10 Sep 2014 - 2:50 pm | प्रसाद१९७१
कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्यांना, आणि त्यात काम करणार्यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार. आणि इथे कविता ताई पाकीस्तानी सिरियल बघुन टाळ्या वाजवणार.
जगातल्या कुठल्याही देशात हे घडणार नाही.
10 Sep 2014 - 3:36 pm | आदूबाळ
जकातीचा रेट काय असतो? ५%च्या खालीच असावा.
10 Sep 2014 - 3:41 pm | काळा पहाड
असा रेट नाहिय, पण साधारणपणे २.५%. खुम्स २०% पर्यंत असते पण पाकिस्तान सुन्नी असल्यानं ती तिथं नसावी. (आभारः गूगल बाबा)
10 Sep 2014 - 3:36 pm | कविता१९७८
टोच्या भाउ मायबोलीकर का???
10 Sep 2014 - 3:37 pm | कविता१९७८
टोच्या भाउ मायबोलीकर का हा प्रतिसाद प्रसाद १९७१ ह्यांना आहे.
10 Sep 2014 - 3:55 pm | मदनबाण
४ दिवस सासुचे ही पूर्वी इ-टीव्ही मराठीवर दाखवली जाणारी आणि कित्येक वर्ष चालुन शेवटी मोठ्या कष्टाने बंद झालेली मालिका पाकिस्तानात उर्दु भाषांतरित करुन दाखवली जावी, अशी मागणी आता केली पाहिजे. जेणे करुन अटकेपार मराठी मालिका गेल्याचा आनंद साजरा करता येइल ! ;)
बाकी चालु द्या...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources
10 Sep 2014 - 3:57 pm | रवीराज
अल कायदा ची शाखा भारतात चालू होणार आहे म्हणे, मग काय .....चालू द्या पाकिस्तानी सीरियल,आपण आहोतच की मरायला, चुकलो(बघायला)
10 Sep 2014 - 5:03 pm | आसुड
कोणी मरो अथवा जगो आम्हास काय त्याचे ??? १५ ऑ. आणि २६़जाने. या दिवशी आम्हि देशप्रेम व्यक्त करतोच ना ...मग आम्हि या सिरियलि बघणारच...
10 Sep 2014 - 5:10 pm | कविता१९७८
ही वाहीनी भारतीय आहे की , सरकारच्या संमतीनेच चालत असावी म्हणुन काय हे सर्व देशप्रेमी नाहीत, एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?
10 Sep 2014 - 5:19 pm | प्रसाद१९७१
एका सीरीयल चे सुत्र संचालन कीरण खेर करतात त्या सुद्धा देशप्रेमी नाहीत का?>>>> देशप्रेमा बद्दल माहीती नाही पण मूर्ख आहेत, किंवा मिळणार्या पैशासाठी अक्कल गहाण ठेवली आहे.
वाहीनी भारतीय असली म्हणुन काय झाले. त्यानी चुक केली , ती आपण करायला पाहीजे का? ती वाहीनी बघु नका आपोआपच बंद होईल.
10 Sep 2014 - 5:23 pm | कविता१९७८
प्रसाद भाउ १९७१ , तुम्ही टोच्याभाउ मायबोलीकर आहात का?
10 Sep 2014 - 5:52 pm | प्रसाद१९७१
हो मीच तो. नाहीतर तोच प्रतिसाद कसा दिला असता.
10 Sep 2014 - 5:58 pm | कविता१९७८
मग १५० वर्षे ज्या ब्रिटीशांनी भारतीयांवर राज्य केले, त्यांचे अतोनात हाल केले , स्वांतंत्र्यासाठी भारतीयांचे जीव गेले त्यांच्या देशात म्हणजे इंग्लंडमधे तुम्ही सध्या स्थायिक आहात, नोकरी / व्यवसाय करत आहात., मग तुम्ही ही देशप्रेमी नाहीत का?
10 Sep 2014 - 6:32 pm | पिंपातला उंदीर
एक हि मारा पर क्या सोल्लिद मारा ; )
10 Sep 2014 - 6:48 pm | काउबॉय
+1
10 Sep 2014 - 7:36 pm | प्रसाद१९७१
असलोच तर नक्की देशप्रेमीच असीन. इथे पैसे कमवुन भारता पाठवणे हा भारताला फायदाच आहे. ( जसे तुमचे पाकीस्तानी लोक सीरीयल काढुन पाकीस्तानचा फायदा करत आहेत ). माझी युकेत रहाण्यानी पाकीस्तानात पैसा जात नाही.
देशप्रेम वगैरे ठेवा बाजुला एकवेळ, कमीतकमी आपल्या नातेवाईक/ मित्र मंडळींची तरी काळजी करा. तुमचे पाकीस्तानचे कौतुक दुसर्या मार्गानी गळ्याशी येइल.
तुमच्या लाडक्या पाकी लोकांनी सीमेवर गोळीबार केला/शेलींग केले अश्या बातम्या पेपर ला वाचल्या तर ह्या सीरीयल आठवा एकदा.
10 Sep 2014 - 8:05 pm | कविता१९७८
मी पाकीस्तानाचे कौतुक केलेलेच नाही फक्त जिंदगी या भारतीय वाहीनीवर लागणार्या पाकीस्तानी मनोरंजनात्मक सीरीयल्स चे कौतुक केलेय , पाकीस्तानी लाडके आहेत असा तुम्हीच ओढुन ताणुन चुकीचा अर्थ काढु पाहत आहात
10 Sep 2014 - 8:33 pm | बहिरुपी
तसेही आता यु.के. भारताचे शत्रुराष्ट्र नाहिये.
10 Sep 2014 - 9:30 pm | पिंपातला उंदीर
अस कस प्रसाद राव ? तुमचा प्रतिसाद एकदा पडताळून बघा कि . तिथे तुम्ही हा मुद्दा मांडला होतात
कविता ताई आणि त्यांच्या सारख्यांनी ह्या पाकीस्तानी सीरियल बघितल्या मुळे, त्या सिरियल काढणार्यांना, आणि त्यात काम करणार्यांना जास्तीचे पैसे मिळणार. त्यातले १०-२० टक्के तरी ती लोक पाकीस्तनातील
मदरश्यांना दान करणार आणि त्यात शिकणारी मुले भारताच्या सैनिकांना मारणार.
आता तत्कालीन ब्रिटीश सरकार ने किती भारतीयांना ठार मारलं . जालियानवाला हत्याकांड विसरलात का ? भगत सिंग , सुखदेव , राजगुरू यांची फाशी विसरलात का ? आणि असे असंख्य भारतीय ? का तुम्ही करता त्या गोष्टीना देशप्रेमाचा गहन अर्थ लाभतो . ; )
10 Sep 2014 - 10:49 pm | काळा पहाड
अचानक भगतसिंग राजगुरू आठवायला लागले, राजीव गांधी इदिरा गांधी सोडून. बीजेपी जॉईन केली की काय?
11 Sep 2014 - 5:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुमचे एक बरे आहे.
तुम्ही केला की चमत्कार, इतरांनी केला की बलात्कार !!
11 Sep 2014 - 5:10 pm | बॅटमॅन
'चतुर' भाषण आठवले. ;)
11 Sep 2014 - 5:14 am | स्पंदना
माझं वेगळ मत...
ते येउन भारताच्या जीवावर कमवुन लुटुन गेले ना?
मग आम्हीही थोडाफार फायदा घेतो आहोत. का नाही?
हो आम्ही ब्रिटीश लोकांच्या सोयी सुविधांचा फायदा घेत त्यांच्या नाकावर टिच्चुन कमावणार. तो पैसा भारतियांचा आहे आणि भारता मधल्या नातेवाईकांसाठी वापरणार.
10 Sep 2014 - 6:45 pm | सुहास..
आम्ही इथ चालु आहेत त्या बघत नाही ..तर या पाकड्यांच्या कधी बघायचो ...नाही ते कलेला प्रांत ई. नसतो वगैरै हे सिएसटी ला बोंबलुन सांगा बर एकदा ....
10 Sep 2014 - 7:03 pm | रवीराज
आपला लुटलेला पैसा परत आणण्यासाठी तर प्रसाद भाउ तिकडे इंग्लंड्ला गेलेत,
आपण बघु सीरियल....पाकडी, आपण जाज्वल्य देशाभिमानी नै का ?
10 Sep 2014 - 8:19 pm | प्यारे१
झी कुणाचं चॅनेल आहे बरं? आणि सीरियल बघितल्यानं सर्व्हिस प्रोवायडरला पैसे जातात ना जे काय जात असतील ते?
माझ्या मते झी मिडल इस्टमध्ये सुरु झालेलं पहिलं भारतीय चॅनेल असावं. मिडल इस्टमधून बर्याच ठिकाणी पैसे जातात. देशकार्यासाठी आणि देशविघातक कार्यासाठी देखील.
बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली.
10 Sep 2014 - 8:39 pm | सुहास..
बाकी सीरियल बघून देशकार्य होतं अथवा नाही हे वाचून अम्मळ मौज वाटली. >> आणी ते बघुन खुप मोट्ठ अस देश कार्य होते की काय ? किमान पाकड्यांच्या , सर्व पातळी वर निषेध ( आणि वाळीत टाकणे ) करणे, (त्यात त्यांची थोबाड ही न बघण) हे भारतात जन्म झाला म्हणुन मी माझ कर्तव्य समजतो .....
नोट : आम्ही झी नावाच चॅनेल ही आणि सर्वार्थाने दोन चार गरजेपुरत्या न्युज सोडल्या तर टिव्ही पुढे डोळे लावुन बसत नाहीत ...अर्थात असे सिरियलजन्य कार्यक्र्म आणि त्यांना बघणार्या, आणी बघुन इमोशनल होणार्या, अलकाकुबलीय वर्गाने आपले धागाचरण अनाहिता एवजी या बोर्डावर लावले हे पाहुन अम्मळ मौज वाटली ..
10 Sep 2014 - 8:31 pm | रेवती
हा धागा पाहून तूनळीवर एक भाग पाहिला. अगदी पूर्वीच्या जुन्या मालिकांसारखा वाटला. आवडला. एकंदरीतच मालिका पाहण्याचा पेशन्स नसल्याने ही मालिकाही पाहीली जाणार नाही.
11 Sep 2014 - 10:28 pm | मुक्त विहारि
बर्याच जणांकडे बराच फावला वेळ आहे म्हणायचा...
इथे, एक लेख लिहीतांना, वेळेचे गणित सोडवता येत नाही, असो....
23 Dec 2015 - 12:38 pm | मराठी कथालेखक
जिंदगीवर ही नवीन मालिका १४ डिसेंबरपासून सुरु झालीये. ही पाकिस्तानी नाही भारतीय आहे (पंजाबमधली कथा दाखवली आहे).
कथा विषय अत्यंत धाडसी आहे. कदाचित अनेकांना आवडणार नाहीच. पण मालिका चांगली वाटतेय. जिंदगीच्या वेबसाईटवर सगळे भाग पाह्ता येतील.
वेगळे काही (कदाचित न पटणारे, धक्कादायक असे ) बघण्याची तयारी असेल तर नक्की बघा.