प्रेम म्हणजे प्रेम असतं...

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
4 Sep 2014 - 2:50 pm

रमा-माधव !

.

....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. मग ती इतिहासातली पात्रं असली तरी प्रेम हे प्रेमच असतं. एखाद्या निर्मात्या दिग्दर्शकाला अशा प्रकारचा ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट करावासा वाटणं त्यातही जिथे प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे अशा मराठीत करावासा वाटणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. (कृपया ध्यानात घ्या हे रमा-माधव या चित्रपटाचे परीक्षण नाही. तो माझा अधिकारही नाही. चित्रपट पाहिल्यावर सामान्य प्रेक्षक म्हणून मनात आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे)

.
रमाबाई-माधवराव पेशवे

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे उत्तम सेट्स, वेशभुषा. खर्च करताना कुठेही हात आखडता घेतलेला नाही. हे जाणवत राहतं. मृणाल कुलकर्णी यांची अभिनयाची सुरुवात स्वामीमधील रमेच्या व्यकतिरेखेने झाली. इतक्या वर्षानंतरही त्यांचे त्या भूमिकेचे चिंतन थांबलेले नाही. ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

या चित्रपटामधे इतिहास आहे, पण हा ऐतिहासिक चित्रपट नाही. युद्ध आहे, पण हा युद्धपट नाही. राजकारण आहे, पण हा राजकीय चित्रपट नाही. ही प्रेम कहाणी आहे. तिला संदर्भ इतिहासाचे आहेत.

आलोक राजवाडे, पर्ण पेठे हे रमा-माधव. अमोल कोल्हे, श्रुती मराठे हे सदाशिवराव भाऊ पार्वतीबाई ही पात्र निवड अगदी योग्य आहे.

खूप कष्ट घेऊन चित्रपट बनवला असला तरी हा चित्रपट सगळ्यांच्या मनाची पकड घेइल असे नाही. कारण काही चित्रपट सगळ्यांसाठी नसतात. काही चित्रपटांसाठी मनाची एक वेगळी तयारी लागते. प्रत्येकाची चित्रपटाकडून वेगळी अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येकाला या चित्राकडून काही मिळालं असं होणार नाही. परिणामकारकतेच्या बाबतीत चित्रपट कमी पडतो.

यात अनेक प्रसंग येतात. पण चित्रपटाचं नेमकं सूत्र काय हे कळत नाही. कुठलाही प्रसंग नीटपणे दाखवला जात नाही. तो पटकन कट केला जातो आणि दुसरा प्रसंग येतो. प्रसंगांची विजोडपणे जोडलेली मालिका आहे. त्यात सलगता नाही. पाहणार्‍याच्या विचार प्रक्रियेतही त्यामुळे व्यत्यय येत राहतात. त्यामुळे दिग्दर्शकाला नेमकं काय दाखवायचं आहे हे एखाद्या चोखंदळ प्रेक्षकालाच खूप शोध घेतल्यानंतर समजू शकतं. जे दाखवायचं आहे तो भाग अगदी शेवटी शेवटी येतो. ते प्रसंग हेलावून टाकणारे आहेत. एकाग्रतेने पाहणारे अनेक प्रेक्षक डोळे पुसताना दिसतात. सती प्रथेवर टिका वगैरे ठीक आहे पण माधवानंतर माधवाशिवायच्या जगात अजिबात राहू नये असं जर रमेला वाटलं असेल तर ती भावना समजून घेतली पाहीजे.

प्रतिक्रियावादी सुधारकांना मात्र यात सती प्रथेवर टिका करण्याची नामी संधी चालून आलेली आहे. हा चित्रपट आला नसता तर आपल्या सुधारकीपणाचे प्रदर्शन ते कसे बरे करू शकले असते !

सध्याच्या काळात मराठीमधे गीत-संगीत उत्तम असण्याची अपेक्षा कुणी धरत नाही. हा चित्रपटही अपवाद नाही. यातली गाणी चुकूनसुद्धा लक्षात राहत नाहीत.

टि व्ही चॅनेल्सवर मराठी सण समारंभ अति भपकेबाजपणे दाखवण्याची पद्धत आहे. इथेही तसेच काही प्रसंग आहेत. त्यामुळे त्याकाळच्या स्त्रिया केवळ भोंडला, हळदी कुंकू यात गुंतून पडलेल्या होत्या असा समज होण्याचा संभव आहे. वास्ताविक त्या काळात अनेक कर्तुत्ववान स्त्रिया होवून गेल्या. उदाहरणे अनेक सांगता येतील.

जोडीदाराच्या जाण्यानंतर राहीलेल्या जोडीदाराला जगण्याची अजिबात इच्छा उरू नये. असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावरून का कोणास ठावूक गोनीदांच्या 'शितू'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संधी मिळाल्यास गोनीदांच्या नातीला आम्ही याबाबत जरूर विचारणार आहोत.

हिंदीतला सल्तनत किती जणांनी पाहीला, अबोध किती जणांनी पाहीला ? हे चित्रपट चालले नसले तरी यामधून जुही चावला, माधुरी दिक्षीत अशा अभिनेत्री मिळाल्या. त्याचप्रमाणे रमा-माधवमधून आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे असे कलाकार मिळाले. असे म्हणावे लागेल...

.
पार्वतीबाई

-होणार सून मी त्या घरची...
पडद्यावरची कहाणी पडद्यापुरती सिमित न राहण्याचे सध्याचे दिवस आहेत. पाहू या रमा-माधव हा चित्रपट प्रत्यक्षातल्या कोण कोणत्या कहाण्यांना जन्म देतो !

.
आलोक राजवाडे, पर्ण पेठे

ashu jog

संस्कृतीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

विटेकर's picture

4 Sep 2014 - 3:32 pm | विटेकर

मृणाल ..
हं ... एक दीर्घ श्वास सोडण्यात आला आहे.

सौंदाळा's picture

4 Sep 2014 - 4:36 pm | सौंदाळा

चित्रपट बघावसा वाटला नाही. टीव्हीवर लागेल तेव्हा पण बघणार नाही कदाचित.
इतिहास किंवा वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांवर आलेले कोणत्याही भाषेतले चित्रपट बघणे जमत नाही हे त्यामागचे कारण. पुस्तक / वाचन माझी जास्त चांगली पकड घेते चित्रपटापेक्षा.

सध्याच्या काळात मराठीमधे गीत-संगीत उत्तम असण्याची अपेक्षा कुणी धरत नाही.

हे मात्र पटले नाही. उलट सध्याच्या मराठी चित्रपटांकडुन माझ्या तरी संगीताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

बाकी 'शितु' ची आठवण काढल्याने अंमळ हळवा झालो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Sep 2014 - 4:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुस्तक / वाचन माझी जास्त चांगली पकड घेते चित्रपटापेक्षा.

हे खरयं. २.३०-३.०० तासात चित्रपटामधे एवढ्या व्यक्तींचा ईतिहास मांडणं अशक्य आहे.

आशु जोग's picture

4 Sep 2014 - 4:56 pm | आशु जोग

शाळा चित्रपटामुळे पुस्तक वाचावेसे वाटले.

आशु जोग's picture

7 Jan 2015 - 11:37 am | आशु जोग

अशा प्रकारच्या हाताळणीच्या चित्रांना स्लाइड-शो असे म्हणता येइल. एक स्लाइड येते पटकन जाते... मग दुसरी येते पटकन जाते...

पैसा's picture

5 Sep 2014 - 1:54 pm | पैसा

सिनेमा सहज मिळाला तर बघेन. लक्ष्मीकांत बेर्डेचे जोक्स आणि हिंदी सिनेमांची नक्कल नसलेला कोणताही मराठी सिनेमा एकदा बघायची तयारी आहे. मात्र असे सिनेमे-नाटकं बघताना आपण इतिहास म्हणून सहसा बघायचं नसतंच. जुन्या काळावर आधारित काल्पनिक कथा म्हणून बघावा. म्हणजे चुकांकडे कमी लक्ष जातं.

सती प्रथा वगैरेबद्दल चर्चा होईल असे मात्र वाटत नाही. त्या काळात ती प्रथा होती आणि रमाबाईंना सती जायची कोणी सक्ती केली नव्हती हे तथ्य आहेच. साक्षात जिजाबाई सुद्धा सती जाणार असं म्हणत होत्या. त्यांना शिवरायांनी थांबवलं असं वाचलं आहे.

आशु जोग's picture

5 Sep 2014 - 2:28 pm | आशु जोग

यात एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे

शूटींग भाराभर करून ठेवले आहे. यात पानिपत आहे, सदाशिवराव भाऊ आहेत, पार्वतीबाई आहेत, सदाशिवाचा तोतया आहे. राक्षसतागडीची लढाईचे उल्लेख आहेत. राघोबा, आनंदीबाई आहेत. २.३० तासात बसवताना बरीच काटछाट करावी लागलेली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Sep 2014 - 3:03 pm | प्रसाद गोडबोले

या चित्रपटामधे इतिहास आहे, पण हा ऐतिहासिक चित्रपट नाही. युद्ध आहे, पण हा युद्धपट नाही. राजकारण आहे, पण हा राजकीय चित्रपट नाही. ही प्रेम कहाणी आहे. तिला संदर्भ इतिहासाचे आहेत.

हाच तर लोच्या आहे आपलमराएक धड ऐतिहासिक चित्रपट बनवता येत नाही आपल्याला अजुन :(
माधवरावांचे उणेपुरे २८ वर्षांचे आयुष्य पण त्यात ज्या काही मोजक्या लढाया ते लढलेत अन जिंकलेत त्या निव्वळ क्लासिक पण युध्द पट करण्याचे शिवधनुष्य उचलणार कोण ?आपल्या पानिपताच्या युधावर ट्रॉय सारखा अप्रतिम चित्रपट का बरे नाही बनु शकत ? अख्खा चित्रपट सोडा पण ग्लॅडियेतरच्या सुरवातीला जर्मॅनिक ट्राईब्स बरोबरचे रोमन युध्दाचे जसे चित्रिकरण केले आहे , तसा , त्या क्वालीटीचा, एकही सीन आजवर कोणत्याच मराठी चित्रपटात पाहण्यात आलेला नाहीये :(

आम्ही फक्त प्रेमकहाण्या बनवाव्यात, चित्रपटातही तेच अन सीरीयस मधेही तेच ... दुनियादारी ,प्रेमाची गोष्ट अन टाईमप्लीज श्या:... गणपतिचा सीझन आला की त्यांच्या घरी गणपती अन दिवाळी आली की दिवाळी सासवा सुनांचे वाद नाहीतर नवरा बायको एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर्स एखादी व्यॅम्प नाही तर एखादी "रुपाली" म्हणुन खेकसणारी .... कंटाळा आलाय राव :(

अजुन हा चित्रपट पाहिला नाहीये पण काही खास अपेक्षा नाहीत , बघुन सविस्तर प्रतिसाद देतो ... पण राजकारणावर चित्रपट बनवायला त्यात प्रेमकथा घुसडायची गरज काय देव जाणे , लिंकन पाहिला का ? सीव्हील वॅरला पुर्ण बाजुला ठेवुनही लिंकनवर किती मस्त पिक्चर बनवला होता ... त्यात लिंकनच्या वैयक्तीक आयुष्यात बायकु कशी कजाग होती ह्या विषयीचे रेफरन्स घालायची गरज पडली नाही ...

असो.

आपली लायकी नाय असंच वाट्टं मला. अन हे मराठीच का, हिंदीबद्दलही तितकंच म्हणता यावं. नाञ म्हणायला तेलुगुमध्ये मगधीरा पिच्चरमध्ये जरा कायतरी होतं.

बॅटमॅन's picture

5 Sep 2014 - 4:47 pm | बॅटमॅन

आणि हो, एक सणसणीत अपवाद. अर्जुन द वॉरियर प्रिन्स हा डिस्नीचा अ‍ॅनिमेषनपट एक नंबर भारी होता. अन पूर्ण भारतात बनलेला.

आशु जोग's picture

5 Sep 2014 - 4:06 pm | आशु जोग

लिंकन पाहिला का ?

नाही पाहीला अजून

प्रसाद१९७१'s picture

5 Sep 2014 - 4:39 pm | प्रसाद१९७१

मोजक्या लढाया ते लढलेत अन जिंकलेत

लढलेत ह्या शब्दावर आक्षेप. लढाईच्या जवळपास गेले असतील पण स्वता लढले वगैरे नाहीत. सदाशिवभाउ आणि विश्वासरावांनंतर कोणी पेशवा लढाई लढले वगैरे नाहीत.

हा सिनेमा अगदी बोगस आहे ( कादंबरी सारखा ).

राज्यप्रमुखाने स्वतः लढणं अपेक्षित असतं होय? ऐकावं ते नवलच.

प्रसाद१९७१'s picture

5 Sep 2014 - 4:49 pm | प्रसाद१९७१

राज्यप्रमुखाने स्वतः लढणं अपेक्षित असतं होय? ऐकावं ते नवलच.

नसेल ना, मग लढाई "लढले" अशी टीमकी तरी वाजवू नये. आणि थोरले बाजीराव, चीमाजी आप्पा लढतच होते की स्वता.

माधवरावांनी कोणती अशी ऐतिहासिक दृष्ट्या खरीच महत्वाची लढाई लढली हा एक तर प्रश्नच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Sep 2014 - 5:27 pm | प्रसाद गोडबोले

प्रसादराव तुमचा अभ्यास किती ?

राक्षसभुवन हे नाव ऐकुन तरी माहीत आहे का ? किंव्वा कर्नाटकाची स्वारी वगैरे ?

प्रसाद१९७१'s picture

5 Sep 2014 - 4:41 pm | प्रसाद१९७१

क्लासिक पण युध्द पट करण्याचे शिवधनुष्य उचलणार कोण ?आपल्या पानिपताच्या युधावर ट्रॉय सारखा अप्रतिम चित्रपट का बरे नाही बनु शकत ? अख्खा चित्रपट सोडा पण ग्लॅडियेतरच्या सुरवातीला जर्मॅनिक ट्राईब्स बरोबरचे रोमन युध्दाचे जसे चित्रिकरण केले आहे

अहो असले टिनपाट सिनेमे करुन जर वाहवा मिळत असेल तर कोणी ह्या पेक्षा चांगले करायचा प्रयत्न तरी का करावा?

बॅटमॅन's picture

5 Sep 2014 - 4:47 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2014 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर

इंग्रजी चित्रपटांचं व्यवसाय क्षेत्र १०० टक्के (जगभर) मानलं तर मराठी चित्रपटांचं १ टक्का (भारतातही नाही फक्त महाराष्ट्रातच) इतकं कमी आहे असं मला वाटतं. आर्थिक गणितं जुळावित कशी. दिड तासाच्या चित्रपटासाठी ते जेव्हढा खर्च करतात (व्यावसायिक परताव्यामुळे करू शकतात) तेव्हढा खर्च करणे मराठी चित्रपट व्यावसायिकांना शक्य असेल असे वाटत नाही. फरक हा राहणारच.

आशु जोग's picture

6 Sep 2014 - 12:16 pm | आशु जोग

खर्च भरपूर केलेला आहे. त्यात हात आखडता घेतलेला नाही. पण...

आशु जोग's picture

1 Mar 2016 - 6:00 pm | आशु जोग

-होणार सून मी त्या घरची...
पडद्यावरची कहाणी पडद्यापुरती सिमित न राहण्याचे सध्याचे दिवस आहेत. पाहू या रमा-माधव हा चित्रपट प्रत्यक्षातल्या कोण कोणत्या कहाण्यांना जन्म देतो !

हे आम्ही या लेखाच्या शेवटी २०१४ मधेच म्हणून ठेवले होते.

.