"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
21 Oct 2008 - 9:38 pm

देसायांचा नातू तसा उनाड होता.पण तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं. गम्मत म्हणून नातवाने एकदा खेळता खेळता तो हातातला चेंडू त्या घरट्यावर फेकला,आणि नंतर झालं ते रामायण.

"लहान आहे तो,ह्या वयात हातून घडलेल्या गोष्टी कळत नाहीत बाल मनाला.
आपलं ते खरं करतात ही मूलं."
वैतागून पण नातवाची बाजू घेत बोलत होते भाऊसाहेब.
"सामंत, त्याच्या बाल मनाला चटका लागेल असं वाचून दाखवण्या सारखं काही तरी लिहाल का?
कधीतरी मी त्याला वाचून दाखवीन"
मला प्रो.देसाई विनंती करून सांगत होते.
हे ऐकून मी त्यांच्यासाठी अशी एक गोष्ट लिहीली.

गोष्टीचं शिर्षक होतं,
"आई असं मी पुन्हा करणार नाही गं!"
एक होता चिमुकला बाळ.त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची.त्याला रोज झोपताना काऊ चिऊची गोष्ट सांगायची.त्या गोष्टी त्या मुलाला खूप आवडायच्या.एकदा आईने त्याला एका पक्षीणीची आणि तिच्या चिमुकल्या पिल्लाची गोष्ट सांगीतली.ती सांगत होती,
"एकदा एका पक्षीणीने घराच्या कौलावर एक घरटं बांधलं होतं.आपल्याला बाळ झाल्यावर कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिने खूप काळजी घेतली होती.
सकाळ झाल्यावर ती घरट्या मधून बाहेर जायची,ह्या झाडावरून त्या झाडवर ऊडून बसायची.आकाशात खूप उंच उंच उडायची.
संध्याकाळ झाली की परत आपल्या घरट्यांत परत यायची.आपल्या अंड्याला उब मिळावी म्हणून त्यावर रात्रभर बसायची.एक दिवस आपल्याला पिल्लू होणार,रोज आपल्याला ते सकाळी चिव,चिव करून उठवणार. त्याच्यासाठी कोवळे कोवळे दाणे आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागणार. अशा आणखी खूप खूप गोष्टी मनात आणून ती आनंदी व्हायची.

आई गोष्ट सांगता सांगता बाळाचे डोळे पेंगू लागलेले पाहून, आई त्याला लवकरझोप यावी म्हणून त्याच्या कानाजवळ गाणे गुणगुणू लागली,

पक्षिण फिरते आकाशी
परि लक्ष तिचे
अपुल्या बाळाशी
कोवळे कोवळे दाणे टिपूनी
परत येतसे ती घरट्याशी
दाणे गिळूनी चटदिशी
बाळ झोपी जाई पटदिशी
पक्षिण फिरते आकाशी
परि लक्ष तिचे
अपुल्या बाळाशी

झोपी गेलेल्या आपल्या बाळाला पाहून आई आपलं गाणं संपवते.झोपेत त्या बाळाला एक छान स्वप्न पडतं.आई साठी चिव,चिव करणाऱ्या त्या पक्षीणीच्या पिल्लाचा आवाज ऐकून त्याची झोप मोड होते.चिडून तो पक्षीणीच्या घरट्यावर चेंडू फेकतो.पक्षीण घाबरून उडून जाते.
घरट्यातलं अंड खाली पडून फूटतं.बाळ घाबरं घुबरं होवून म्हणतं,
"माझी आई अशीच उडून गेल्यावर मला गोष्ट कोण सांगणार?,गाणं कोण म्हणणार?,मला झोप कशी येणार?,मग मला स्वप्न कसं पडणार?आणि झोपेतून बाळ जागा होतो,आणि मोठ्याने ओरडतो,
"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

अनामिक's picture

21 Oct 2008 - 10:24 pm | अनामिक

सामंत काका... खुप छान बोधकथा! अजाणत्या वयात चुका होणारच... मी पण केल्यात... अन माझी आई पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी सांगुन काय चुक काय बरोबर ते समजवायची. आईची शिकवण हाच आम्हा भावंडांचा अमुल्य ठेवा!! तुमच्या कथेमुळे सातासमुद्रापार असलेल्या आईची परत एकदा आठवण आली!!!

अनामिक

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 11:34 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला वाचून बरं वाटलं हे पाहून मला आनंद झाला.
सगळ्या आया सारख्याच्.प्रेमळ ,दयाळू ,समजून घेणार्या .
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पक्या's picture

21 Oct 2008 - 11:37 pm | पक्या

छान बोधकथा...आवडली. पक्षिणीचे गाणे ही छान.

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Oct 2008 - 9:30 am | श्रीकृष्ण सामंत

पक्या,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

22 Oct 2008 - 9:29 pm | धनंजय

स्वप्नाचे कथानक वापरण्याची युक्ती आवडली.

म्हणजे वाईट गोष्ट जागेपणी संपते, आणि लहान मुलाला थोडा चटका बसतो, पण अतिरेकी चटका बसत नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Oct 2008 - 10:22 pm | श्रीकृष्ण सामंत

धनंजय,
आपलं म्हणणं अगदी खरं आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

महिमा's picture

23 Oct 2008 - 10:44 am | महिमा

खुप आवडले..

श्रीकृष्ण सामंत's picture

23 Oct 2008 - 11:01 am | श्रीकृष्ण सामंत

महिमा,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com