चारोळी, त्रिवेणी
दोघी बहिणी
काव्यात नव्हतं
तिसरं कोणी
काव्याची गेयता
चोरली कोणी
मी नाही चोरली
कवितेनी चोरली
विडंबनदादा येईल गं
दादाच्या मांडीवर बसीन गं
दादा तुझी कविता चोरटी
अन् मला म्हणते पोरटी
घातली काठी
कवितेच्या पाठी
काव्यातून, काव्यातून
चारोळी मोठी..
फुटली कविता
झाल्या चारोळ्या
नवागतांनी
वाजवल्या टाळ्या ...
प्रतिक्रिया
21 Oct 2008 - 3:59 pm | अनिरुध्द
एकदम छान. झकासच.
21 Oct 2008 - 5:05 pm | पांथस्थ
मस्तरे कांबळे!!!
---
आहे हे अस आहे.
21 Oct 2008 - 5:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लय भारी आणि गेयपण
21 Oct 2008 - 5:43 pm | सहज
छान कविता.
खिरापत काय? :-)
21 Oct 2008 - 5:44 pm | सहज
छान कविता.
खिरापत काय? :-)
21 Oct 2008 - 6:35 pm | दत्ता काळे
खिरापत ओळखायची असते.
त रीपण सांगतो - "दोन चारोळ्या "..
आणि त्या लगेच देणार आज, आत्ता, ताबडतोब..
वाचा "नवागताच्या चारोळ्या"
21 Oct 2008 - 6:38 pm | मनस्वी
मस्त!
००००मनस्वी ०००
21 Oct 2008 - 9:28 pm | सर्वसाक्षी
भोंडला रंगलाय!