स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
7 Aug 2014 - 6:15 pm

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल.
सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे. सावरकरांचं साहित्य, विशेषत: काव्य आवडणाऱ्यांसाठी ही एक उत्तम पर्वणी.
( सावरकर स्मारक संकेतस्थळावरून, फ्लिपकार्टवरून किंवा इन्फीबिमवरून या ध्वनिफीती मागवता येतील.
नम्र निवेदन - ही सदर ध्वनिफीतीची जाहिरात नाही. या रचनांचा आस्वाद सर्वांना/इच्छुकांना घेता यावा, हीच सदिच्छा.

दुवे

http://www.savarkarsmarak.com/

http://www.infibeam.com/Music/hum-hi-hamare-vaali-hain-various-audio-cd/...

http://www.flipkart.com/hum-hi-hamare-vaali-hain/p/itmdrjdkrpyzw3u2?pid=...

प्रोमो अपलोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संगीतमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Aug 2014 - 11:29 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2014 - 12:39 pm | श्रीगुरुजी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना ऐकायला नक्कीच आवडतील. परंतु उर्दू समजत नसल्याने रचनांचा कितपत आस्वाद घेता येईल याविषयी साशंक आहे.

माधुरी विनायक's picture

11 Aug 2014 - 2:39 pm | माधुरी विनायक

फेरनिवेदन पाहा. http://www.misalpav.com/node/28502
संबंधित संकेतस्थळावर या रचनांचा आस्वाद मोफत घेता येईल.

कविता१९७८'s picture

11 Aug 2014 - 10:39 pm | कविता१९७८

धन्यवाद