आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
प्रतिक्रिया
1 Aug 2014 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो.
साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात.
- दिलीप बिरुटे
1 Aug 2014 - 11:29 am | प्रचेतस
मला ही हा धागा वाचायचा होता. कुठे गेलाय तो आता?
1 Aug 2014 - 1:03 pm | आतिवास
धागाकर्तीची क्षमा मागून.
साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता
स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?
1 Aug 2014 - 1:29 pm | कविता१९७८
हलवला नव्हता मिटवला होता आणि अनहीतामधे प्रकाशित केला होता.
1 Aug 2014 - 11:29 am | कविता१९७८
धन्यवाद
1 Aug 2014 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे.
-दिलीप बिरुटे
1 Aug 2014 - 12:02 pm | कविता१९७८
माझा पदयात्रेचा धागा तुम्हाला आवडला हे ऐकुन खुप बरे वाटले.
धागा पुन्हा प्रकाशित केलाय.
1 Aug 2014 - 12:13 pm | प्रचेतस
धन्यवाद कविताताई.
1 Aug 2014 - 9:30 pm | स्रुजा
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं.
आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.
1 Aug 2014 - 9:55 pm | कविता१९७८
मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी
1 Aug 2014 - 11:48 am | म्हैस
नवीन जिल्हा पालघरला शुभेच्छा .
1 Aug 2014 - 12:57 pm | नीलकांत
पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.
1 Aug 2014 - 1:21 pm | अनन्त अवधुत
बुलढाण्यातून खामगाव वेगळे झाले कि हि यादी पूर्ण होईल.
1 Aug 2014 - 11:04 pm | आनन्दिता
सातार्यातून कराड राहीलं.
1 Aug 2014 - 11:30 pm | रामपुरी
कोल्हापुरातून हुपरी-रेंदाळ राहिलं
3 Aug 2014 - 11:40 am | एस
आधी पुण्यातून सदाशिवपेठ वेगळी झालीच पाहिजे, कसे? *wink*
3 Aug 2014 - 7:08 pm | धन्या
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)
4 Aug 2014 - 7:33 am | खटपट्या
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.
1 Aug 2014 - 6:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पालघरकरांना शुभेच्छा. एकदिलाने कामाला लागा व जिल्ह्याला सम्रुद्ध करा.
1 Aug 2014 - 10:59 pm | साती
एक चांगलं काम झालं.
3 Aug 2014 - 9:28 am | पोटे
छान
4 Aug 2014 - 8:33 pm | प्रणित
जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १ तास ३० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
*cray2*