काहीही...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
26 Apr 2014 - 12:52 pm

कशाचे फोटो काढुया आता ? असा विचार टाळक्यात आला... मग विचार केला की काहीही टिपायचे कसेही टिपायचे... बघुया हा सुद्धा प्रयोग करुन. वेववेगळे विषय कसेही टिपुन नक्की दिसतील कसे याची उत्सुकता होती...

1

2

3

4

5

6

7

8

9

10
11

{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

धन्या's picture

26 Apr 2014 - 12:56 pm | धन्या

मात्र शेवटचा फोटो खटकला.
इतर फोटोंमध्ये ऑड वाटतो.

मदनबाण's picture

26 Apr 2014 - 7:42 pm | मदनबाण

इतर फोटोंमध्ये ऑड वाटतो.
येस्स... बरोबर, आणि म्हणुनच मी तो शेवटी दिला आहे. रंगपंचमीच्या दिवशी हा Top View मारला होता.
या सर्व फोटों मधे मी प्रयोग केला आहे तो म्हणजे फोकसचा. फ्रंट, बॅक, मिड पॉइंट इं.
यातल्या सिमला मिरची आणि ग्लासच्या फोटो साठी प्रेरणा साक्षी काका आहेत... त्यांचे सिमला मिरची आणि चहावाल्याचे फोटो मस्त होते, परंतु मी चहावाल्याकडे न-वळता त्याच्या ट्रे कडे वळलो हाच काय तो फरक. :)

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 2:20 pm | तुमचा अभिषेक

छान, हे काहीही कसेही टिपलेले वाटत नाहीये, पण येस हौस म्हणून आपणही कॅमेरा घेऊन आता बाहेर पडावे असे हे फोटो बघून वाटू लागलेय एवढे नक्की :)

मदनबाण तुमचा कॅमेरा सुरु झाला यातच समाधान.
बर झालं बाई घरातल्या मिरच्या संपल्यात. हा फोटो बघुन आठवण झाली.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2014 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

{हौशी फोटुग्राफर } = २००/२०० मार्क! http://www.sherv.net/cm/emoticons/hobbies/camera-smiley-emoticon.gif

नाव मात्र मदनबाण आणि इतक्या सुंदर फोटोनंतर निदान शेवटी तरी एका सुंदर मदनिकेचा किंवा गेलाबाजार एका कमनिय वारुणीच्या कूपिकेचा एकही फोटो न टाकल्याबद्दल.....
णिशेध! णिशेध ...खम्प्लीट णिशेध !

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2014 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

@खम्प्लीट णिशेध !>>> =)) +++१११

नाव मात्र मदनबाण आणि इतक्या सुंदर फोटोनंतर निदान शेवटी तरी एका सुंदर मदनिकेचा किंवा गेलाबाजार एका कमनिय वारुणीच्या कूपिकेचा एकही फोटो न टाकल्याबद्दल.....
अहो... अत्तर हाय की... हीना,खस,मुखल्लत्.+उद आणि इतर.अपुन मदिरा के नही इत्तर के शौकिन हय | ;)
एकदा मुखल्लत {Mukhallat Attar} ट्राय माराच... ;)

कदाचित अवांतर होईल
पण त्या एकामागोमाग एक ठेवलेल्या रिकाम्या ग्लासांकडे पाहुन त्यांना माणसाशी रिलेट करता येईल, असे सहजच वाटून गेले.

पहा ना आपण मानव पण असे एकामागोमाग एक येतो रिकाम्या ग्लासांसारखे. ना कोणता रंग, ना कोणते लेबल, ना कोणी पहिला ना कोणी दुसरा.
त्यांची किंमत पण ठरते ती ह्या रिकाम्या ग्लासांत कोणता द्रव्य ओतला जाईल त्यावरुन.

आपण मानव मात्र आपणा सार्‍यांमध्ये असलेली ही समानता सोडून फुका एकमेकांना वेगवेगळी लेबल आणि विशेषणे लावत बसतो आणि बसतो भांडत.
ग्लासांना कदाचित हे कळलं असेल तर आपल्याला फिदीफिदी हसत असतील.

मदनबाण's picture

27 Apr 2014 - 12:23 am | मदनबाण

आपण मानव मात्र आपणा सार्‍यांमध्ये असलेली ही समानता सोडून फुका एकमेकांना वेगवेगळी लेबल आणि विशेषणे लावत बसतो आणि बसतो भांडत.
प्रतिक्रिया आवडली.

आदूबाळ's picture

27 Apr 2014 - 3:44 pm | आदूबाळ

सुहास दवणे

(ह घ्या बर्का. मोह आवरला नाही...)

सूड's picture

29 Apr 2014 - 6:03 pm | सूड

>>सुहास दवणे

=))))

बॅटमॅन's picture

29 Apr 2014 - 6:11 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) ठ्ठो =))

एकदम जहबहर्‍या =))

शुचि's picture

29 Apr 2014 - 9:30 pm | शुचि

सुमर खय्यम!!! ..... (ह घ्या)
संदर्भ - एका रुबाईत उमर खय्यम ने सुरयांबद्दल अशाच प्रकारचे काहीसे लिहीलेल आठवते.

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 7:16 pm | आत्मशून्य

.

फोटू चांगले आलेत रे बाणा पण मिरच्यांखाली असलेला फोटू नक्की कशाचा आहे ते समजले नाही. ग्रानोला असावे असे म्हणावे तर त्यावर योगर्ट ऐवजी आईस्क्रीम सारखे काहीतरी दिसतेय. त्यावर चेरी आहे असे वाटेपर्यंत अव्होक्याडोचे स्लाईसेस ठेवलेत असे वाटतेय. बाकी फोटू समजले. त्या रंगलेल्या मनुक्षाची परवानगी फोटू काढण्याआधी घेतले होतीस काय? नाहीतर दावा ठोकेल हो तो! ;)

फोटू चांगले आलेत रे बाणा पण मिरच्यांखाली असलेला फोटू नक्की कशाचा आहे ते समजले नाही.
मलाही माहित नाही ! मी मिठाइच्या दुकानात शिरलो आणि फोटो काढु शकतो का ? असे दुकानदाराला विचारले... हो म्हणताच क्लीक क्लीक सुरु... :)

त्या रंगलेल्या मनुक्षाची परवानगी फोटू काढण्याआधी घेतले होतीस काय? नाहीतर दावा ठोकेल हो तो!
हा.हा.हा... तो स्वतःचा चेहरा यात पाहु /ओळखु शकला तर दावा करेल ना ? ;)

निवेदिता-ताई's picture

26 Apr 2014 - 7:47 pm | निवेदिता-ताई

सुंदर

सानिकास्वप्निल's picture

26 Apr 2014 - 7:50 pm | सानिकास्वप्निल

सगळे फोटो मस्तं
मिठाईंचे फोटो बघून उगाच जळजळ झाली ;)

खटपट्या's picture

26 Apr 2014 - 9:43 pm | खटपट्या

मस्त रे बाणा, अजून येवुदेत
हे फोटो एखाद्या जाहिरात कंपनी ला दाखवलेस तर चांगले पैसे देतील.
आणि जाहिरात कंपन्यांसाठी तू फोटोग्राफी करू शकतोस असे वाटते.
छंद तर छंद आणि वर पैसे.

हे फोटो एखाद्या जाहिरात कंपनी ला दाखवलेस तर चांगले पैसे देतील.
आणि जाहिरात कंपन्यांसाठी तू फोटोग्राफी करू शकतोस असे वाटते.
धन्यवाद... :) माझ्यासाठी ड्रीम जॉब असेल तो... जर मला कोणी विचारले तुला कोणता जॉब करायला आवडला असता ?
तर... माझे उत्तर असते :--- संपूर्ण हिंदूस्थान भ्रमण आणि त्याची फोटोग्राफी,त्यानंतर संपूर्ण जग भटकंती आणि त्याची फोटोग्राफी. :)

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2014 - 9:50 pm | चौथा कोनाडा

मदनबाणाच्या कॅमेरातून टिपलेली रंगांची उधळण पाहून डोळ्याचे पारणे फिटले !

कवितानागेश's picture

26 Apr 2014 - 9:52 pm | कवितानागेश

मिरच्यांचे फोटो छान आलेत. :)

किसन शिंदे's picture

26 Apr 2014 - 11:04 pm | किसन शिंदे

सगळे फोटो झक्कास आहेत रे बाणा. ते मलई सॅन्डविच अस्सं उचलून खावंस वाटलं. :)

चाणक्य's picture

27 Apr 2014 - 3:59 am | चाणक्य

चहाच्या ग्लासांचा आवडला विशेष करून

शेवटचा फोटो नकोच होता ह्या से रीजमध्ये असं 'मला वाटतंय'.

बाकी फोटोज 'उच्च'.

शेवटचा फोटो नकोच होता ह्या से रीजमध्ये असं 'मला वाटतंय'.
ते कोणालाही "तस वाटल" तर त्यात चूक नाही. :) प्रत्येकाचे मत जाणुन घ्यायला आवडतेच. :)

भाते's picture

27 Apr 2014 - 5:23 pm | भाते

सगळे फोटो छान. पण ग्लासचा फोटो अप्रतिम आला आहे.

मला शेलाट्या मिर्च्यांचा फ़ोटो खूप आवडला. :)

सखी's picture

28 Apr 2014 - 6:07 pm | सखी

सगळीच रंगसंगती आवडली.

मदनबाण's picture

28 Apr 2014 - 6:24 pm | मदनबाण

प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींना धन्स ! :)

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 6:52 pm | दिपक.कुवेत

सगळेच फोटो फारच आवडले. तिखट मिरच्यांच्या खाली असणारं गोड कॉम्बीनेशन आवडल्या गेल्या आहे हे नमुद करु ईच्छितो......

ग्लासांचा फोटो सगळ्यात उजवा वाटला.

अनुप ढेरे's picture

29 Apr 2014 - 6:12 pm | अनुप ढेरे

मस्तं फटु !

चिरोटा's picture

29 Apr 2014 - 7:38 pm | चिरोटा

छान आलेत फोटो.

पद्मश्री चित्रे's picture

1 May 2014 - 8:12 pm | पद्मश्री चित्रे

ग्लास चा फोटो मस्त....

पैसा's picture

1 May 2014 - 8:17 pm | पैसा

सगले फटु आवडले. तुझी हौस अशीच वाढत जाऊ दे!

सुहास झेले's picture

2 May 2014 - 12:06 am | सुहास झेले

मस्त रे... ग्लासचा फोटो तर कडक. बाकी फोटो चांगले आहेत, पण तुझे आधीचे क्लिक बघितले असल्याने, त्यापुढे ते ओके वाटतात बस्स. आता नियमितपणे फोटो येऊ देत :)

अमोघ शिंगोर्णीकर's picture

2 May 2014 - 2:22 am | अमोघ शिंगोर्णीकर

मस्त फोटो...
शेवटच्या फोटोला माझा झब्बू.....

शेवटच्या फोटोला माझा झब्बू.....
तुमचा झब्बू पक्षी:- फोटु आवडला. :)

हे 'काहीही' म्हणजे कै च्या कै देखणे आहे बॉ !

वटवट's picture

29 Jul 2014 - 12:38 pm | वटवट

आह..... व्वाह..... का ती ल… सुन्दरच