एक बडबड गीत .............
बरं का ग मंदा
काय झालं एकदा,
ताई आमची चिरत होती
खसाखसा कांदा .
कांदा राहिला हातात
विळी गेली बोटात
विळी वरुन उठली,
नाचत सुटली.
धक्क्याने मोराम्ब्याची
बरणीच फुटली.
हाय हाय हाय
काचेवरती पाय.
काच गेली पायात
आता करू तरी काय?
बाबा हसले खो खो खो
आई हसली खी खी खी
ताईला आले रडू
आईने दिला लाडू
----------------------------------------
आणि हे 'बेताल बरबाद गीत' .............
बऱ का गं जनता
काय झालं एकदा
मंत्री आमचे मोडत होते
पटापटा कायदा.
कायदा राहिला बुकात
शिक्षा झाली कोकणात.
हाय हाय हाय
माझ्या पोराचे काय?
पत गेली आता
करू तरी काय?
पदावरून उठले
भांडत सुटले
धक्क्याने मेंदुवरचे
नियंत्रण सुटले.
'बाबा' हसले खो खो खो
'आई'(कोणाचीतरी)हसली खी खी खी.
मंत्र्यांना आले रडू
जनतेने द्यावा झाडू.
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 4:28 pm | Gayatri Muley
आणि हो.. मी "पहिल्यांदाच" पयली...
23 Jul 2014 - 4:40 pm | स्पा
हाहा
सहीच
23 Jul 2014 - 4:41 pm | भिंगरी
कृपया मिपाकरांनी वरील शीर्षक 'बेताल बरबाद गीत' असे वाचावे
बाय मिष्टेकसे च्युक हो गई
(धाग्यावरील लेखन दुरुस्त करण्यासाठी काही पर्याय आहे का?
नाहीतर माझी नेहमीच चूक होते आणि मग भिंगरीची भोवरी होते)
23 Jul 2014 - 11:04 pm | भिंगरी
दुरुस्ती बद्द्ल आभार
23 Jul 2014 - 4:49 pm | सूड
जमलंय बर्यापैकी!!
23 Jul 2014 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भिंगरी बडा नाम करेगी मिपाका !
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
23 Jul 2014 - 5:09 pm | कवितानागेश
:)
23 Jul 2014 - 5:15 pm | किसन शिंदे
दोन्ही जमलीयेत.
23 Jul 2014 - 5:18 pm | पिलीयन रायडर
अहो ते पहिलं जुनं बडबडगीत आहे.. मला नाही वाटत त्याचे कवी भिंगरी ताई/दादा असतील..
23 Jul 2014 - 9:53 pm | किसन शिंदे
असंय होय? आम्हाला वाटलं या भिंगरी ताई/दादांचं असावं. :)
23 Jul 2014 - 11:10 pm | यसवायजी
पैलं चांगलं जमलंय म्हण्णार होतो, तेवढ्यात हे वाचलं.:D
24 Jul 2014 - 1:16 pm | भिंगरी
या मिपाकरांना भिंगरी बद्दल काय शंका आहे?
मी ताईच आहे दादा नाही.
ताई की दादा अशी शंका कधी येते माहिती आहे ना? *shok*
23 Jul 2014 - 10:00 pm | अत्रुप्त आत्मा
शुं...........दल लिलश गं भिंगली! मत्त मत्त वात्तय वाचुन् *good*
23 Jul 2014 - 10:14 pm | मुक्त विहारि
झक्कास..
23 Jul 2014 - 10:57 pm | भिंगरी
अहो ते बडबड गीत माझे आहे असं मी म्हटलंच नाही.
हे तर किती जुनं आहे.
त्यावरून विडंबन केलं.
पण मूळ गीत माहित असावं म्हणून संदर्भासाठी दिलं
मी चोर नाही
24 Jul 2014 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
@मी चोर नाही>>> *ROFL*
24 Jul 2014 - 4:03 am | पाषाणभेद
मजा आली वाचून. (पण कोणतेही आईबाबा मुलीच्या पायात काच गेली म्हणून हसणार नाही. एखाद धबाका देतील पाठीत पण नंतर लगेच त्यावर उपचार करतील.)
19 Sep 2014 - 10:19 pm | भिंगरी
आता त्या मुळ बडबड गीताचे कवी शोधावे लागतील मग त्यांना सांगू दुरुस्ती करायला.
31 Mar 2015 - 9:01 am | भिंगरी
आता हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत्.पुन्हा एकदा विडंबण करण्याची तयारी करा रे कुणीतरी.
31 Mar 2015 - 12:05 pm | चुकलामाकला
भिंगरी ताई, सुरेख झालयं!
1 Apr 2015 - 6:45 am | कविता१९७८
मस्तच
1 Apr 2015 - 8:18 am | इशा१२३
मस्त जमलय..